इब्सेन आणि बेकेट श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत मी दरवर्षी इजम शिकवतो पण ह्यावर्षी ऐनवेळी मंगेश बनसोड ह्याने दोन लेखक शिकवण्याची दोस्तीगळ घातली आणि मला हेन्रिक इब्सेन आणि सॅम्युएल बेकेट हे दोन लेखक शिकवण्याची वेळ आली आजारपणामुळे तयारीला वेळच मिळाला नाही आणि कमी होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या जीवावर एक तासाची आठ व्याख्याने देण्याची वेळ आली पीएचडीला केलेले संशोधन ऐनवेळी स्मरत गेले आणि व्याख्याने रंगली एखादा लेखक प्राध्यापक लोक कसा शिकवतात हे मला माहित नाही पण दोन तास त्या लेखकाची क्रिएटिव्ह प्रोसेस उलगडायची आणि दोन तास प्रत्यक्ष कलाकृती असे काहीतरी झाले हेन्रिक इब्सेनची क्रिएटिव्ह प्रोसेस विलक्षण !अस्तित्ववादाचा प्रभाव किर्केगार्द वाचून त्याच्यावर पडला आणि पन्नासाव्या वर्षी त्याला त्याचे क्रांतिकारी नाटक सापडले आयुष्यभर आपल्या ईल्लेजिमेंट मुलाच्या परतण्याच्या शक्यतेचे भय त्याचा कायमच पाठलाग करत राहिले नित्शेच्या ट्रॅजेडीवरच्या विचारांनी ग्रीक ट्रॅजेडीविषयीचे त्याचे आकलन बदलले आणि शेक्सपियरन ट्रॅजेडीतून त्याची प्रतिभा मुक्त झाली लिखाणाचा ढाचा कधी वास्तववादी तर कधी प्रतिकवादी ठेवत त्याने त्याचे अस्तित्ववादी व्हिजन सादर केले वास्तववादी रंगभूमीचा पायोनियर म्हणून तो ओळखला जात असला तरी त्याचे व्हिजन वास्तववादी कमी आणि अस्तित्ववादी जास्त आहे व्यावसायिक रंगभूमीवर वावरत असल्याने त्याला त्या रंगभूमीच्या मर्यादा समजायला वेळ लागला खरा पण जेव्हा त्या समजल्या तेव्हा त्याने त्याबाहेर जाऊन प्रयोग केले प्रत्येक नव्या नाटकावेळी त्याने शिव्या खाल्ल्या आज त्याची नाटके व्यावसायिक वाटतात हिंदी व साऊथ फिल्मवाल्यांनी त्याच्या नाटकातले अनेक सीन्स उचलले त्यामुळे त्या सीन्सचे महत्व वाटत नाही पण ज्यावेळी ते त्याने लिहिले त्यावेळी ते क्रांतिकारक होते ग्रीक ट्रॅजेडीतील नियती त्याने वास्तववादी केली नित्शेचे तात्विक लिखाण त्याने फारसे मनावर घेतले नाही ते घेतले स्ट्रींडबर्गने आणि त्यातून पुढे अभिव्यक्तीवादी नाटके लिहून त्याने इब्सेनपुढचे नाटक लिहिले ज्याचा प्रभाव बेकेटवर पडला
बेकेट स्वतःला एक्सप्रेशनिस्ट समजत असला तरी लोक त्याला व्यस्त ऍब्सर्ड रंगभूमीचा एक प्रमुख शिल्पकार समजतात त्याची आयरिश जेम्स जॉईसच्या पडलेल्या प्रभावाशी जी अखंड मारामारी चाललेली होती ती क्रिएटिव्ह प्रोसेसमधली एक इंटरेस्टिंग घटना आहे आणि मग दुसऱ्या महायुद्धानंतर आयर्लंडमध्ये परतल्यावर स्वतःच्या घरी आल्यावर जॉईस ऍड करत जातो आणि त्याच्या प्रभावातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला सब्स्ट्रॅक्ट करायला हवे हा त्याला झालेला साक्षात्कार आणि त्यातून जन्मलेली त्याची मिनिमलिस्ट नाटके कमी भाषेत बोलणारी ग्रीक रंगभूमीवरचा नाहीसा झालेला ऑडिओ पुन्हा जिवंत करणारी ! एखाद्या लेखकाने भाषा किती तासावी ह्याला काही मर्यादा ? शेवटी मग श्वासच ऐकवणे बाकी होते ते त्याने ब्रेथ नाटकात केले
इब्सेन क्रांतीने पीडित तर बेकेट महायुद्धांनी हिटलरचे सैनिक पाठलागावर असतांना आपल्या प्रेयसीसकट आपल्या शहराच्या अंतापर्यंत पळत जाणारा आणि मग तिथून फ्रेंच सैनिकांना मदत करणारा बेकेट प्रत्यक्ष नाटकात का उमटला नाही ? औषधाच्या दुकानात काम करतांना झालेल्या अफेयरला अनेक नाटकातून ऍड्रेस करणारा इब्सेन आणि आपल्या प्रेयसीचा मागमूसही नाटकात न सोडणारा बेकेट ! दोघेही मध्यमवर्गीय ! व्यापारी संस्कृतीत जन्मलेले आणि तिच्यात वाढलेले ! त्यामुळे औद्योगिक क्रांतीशी अनुभवाने परिचित ! मध्यमवर्गीय कुटुंबातली कैद दोघांनीही सादर केली ! नोराची घुसमट ते काहीही नाव ठेवलं तरी चालेल अशा पात्रांची कैद असा हा युरोपियन प्रवास ! युरोपच्या मुख्य देशाच्या संस्कृतीतून न येता पेरिफेरीवर असलेल्या नॉर्वेजियन व आयरिश देशाच्या संस्कृतीतूनआलेले हे दोघे (स्ट्रिंडबर्गही असाच ) युरोपच्या मुख्य रंगभूमीचा मुख्य चेहरा बनावेत हे विलक्षण !
विद्यार्थ्यांच्या निमित्ताने खरंतर मीच आठ तास युरोपमधून भटकून आलो स्मरणशक्तीने धोखा दिला म्हणजे शॉ चा इब्सेनिझम आठवला नाही त्यावर बोलायला हवं होतं विशेषतः इब्सेन हा डिस्कशन रंगमंचावर आणणारा पहिला नाटककार होता हा त्याचा मुद्दा महत्वाचा तो राहूनच गेला बेकेटच्या साक्षात्काराची तारीखच आठवली नाही तारिखवारसकट खडाखड बोलण्याची माझी शैली सध्या वर्षांवर गुजारा करतीये अर्थात लोकांना कुठल्याही घटनेचे वर्ष आठवले तरी खूप असे वाटत असल्याने येभी चलता है !
एखाद्या लेखकावर इझमच्या संदर्भात बोलणे आणि व्यक्ती म्हणून बोलणे ह्या दोन भिन्न प्रक्रिया आहेत हे ह्या निमित्ताने तीव्रपणे जाणवले विद्यार्थ्यांना शिकवतांना आपणही शिकत असतोच .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment