शंकर सारडा :चौथ्या नवतेला प्रोत्साहन देणारा पहिला ज्येष्ठ समीक्षक
नव्यांची अक्षर चळवळीत माझा लेख आला आणि सगळीकडून टीका सुरु झाली ही चौथ्या नवतेच्या चळवळीची जाहीर सुरवात होती जे आतापर्यंत पर्सनल होते ते आता पब्लिकमध्ये आले अरुण म्हात्रेने लेख छापला पण विरोधही केला हा विरोध पुढे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्धही झाला त्यावेळी नव्यांची अक्षर चळवळ हा एक नव्या कवींना मोठाच आधार होता आणि नेमका तोच चौथ्या नवतेच्या चळवळीला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झाले म सु पाटलांनी अनुष्टुभच्यावतीने आधीच नकार दिला होता सत्यकथा बंद पडली होती आणि अनियतकालिकांच्या चळवळीने दम तोडला होता अशावेळी आता आपणच हातपाय हलवायला हवे हे स्पष्ट झाले आणि मी सौष्ठव नावाचे अनियत्कालिक सुरु करायचे निश्चित केले भालचंद्र कुबल ह्या माझ्या परममित्राने ह्या निर्णयाला केवळ पाठिंबा दिला नाही तर अंकाची प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारली आशुतोष आपटे , संतोष क्षीरसागर (हा आता जेजेचा डीन झालाय ) ह्यासारखे जेजेईट व मंगेश बनसोड आल्हाद भावसार महेश म्हात्रे ह्यांच्यासारखे हॉस्टेलाईट जॉईन झाले पुढे कालनिर्णयच्या (बहुधा जयराज) साळगावकरांनी अंक छापायचे कबूल केले आणि सौष्ठवचा पहिला अंक अतिशय देखण्या रूपात छापला गेला प्रश्न होता तो पब्लिकमध्ये आणायचा कसा मी आणि भालचंद्र कुबल ह्यांनी हा अंक साहित्य संमेलनात मुद्दाम आणायचा असं निश्चित केलं ऋत्विज काळसेकरने साहित्य संमेलनापुढं ज्ञानेश्वरीपासून कोसला सात सक्क पर्यंत सर्व ग्रंथाची शवयात्रा काढायची असं सुचवलं त्याचा प्लॅन तयार झाला पण बारगळला माझी हॉस्टेलची रूम थोडी स्फोटकच झाली आणि जवळच असल्याने आल्हाद भावसार आणि मंगेश बनसोड ह्या माझ्या मित्रांचीही ! भालचंद्र कुबल सगळ्यांना सांभाळून घेण्यात एक्सपर्ट असल्याने स्फोटकपणाला सौम्य विनोदाची फोडणी मिळायची रुईया कट्ट्याचा फुल पाठिंबा होताच .
नव्यांची अक्षर चळवळ काय घेऊन येणार हा प्रश्न होता नेमक्या ह्याचवेळी अभिधाचा हेमंत दिवटे सुरेश भटांना आदरांजली म्हणून गझल विशेषांक घेऊन येणार होता ज्याची संपादिका माझी एक मैत्रीण नीता भिसे करणार होती नवीन पिढीच इतकी पारंपरिक भूमिका घेऊन येत असेल तर आमच्या अंकाचं काय होणार हे उघड होतं पण अचानक एका अनपेक्षित जागेतून पाठिंबा आला आणि सर्व बदललं . ही जागा होती शंकर सारडा ! सारडांनी ही नवीन पोरं काहीतरी नवीन घेऊन आलेत म्हणून आमच्या अंकाबद्दल बोलायला सुरवात केली पुढे दैनिक पुढारीत त्यांनी आमच्या ह्या अंकावर एक स्वतंत्रपणे लेखच लिहिला माझ्या लेखातील निरीक्षणे त्यांनी नवीन पिढीची निरीक्षणे म्हणून मांडली . ह्यांमुळे वातावरण थोडे बदलले आणि चौथ्या नवतेचे स्वागत करायला हवे असा निदान विचार तरी पुढे आला नवीन पिढीतील अनेकजण त्यामुळे मला भेटायला आले त्यात अभिजित देशपांडे , मनोज जोशी , नितीन रिंढे हे एम ए चे महत्वाचे विद्यार्थी होते हेमंत दिवटे नंतर आला आणि आम्ही एकत्र काम करायचे ठरवले .
पुढेही शंकर सारडांनी कायमच प्रोत्साहन दिले मी साठोत्तरीवाल्यांना कमीत कमी भेटायचो त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीनंतर मी त्याना फार कमी भेटलो मात्र त्यांच्या सभ्यतेचा व खुलेपणाचा परिचय घनदाटच राहिला ते एका मारवाडी कुटुंबात जन्मले होते मारवाडी लोक फक्त व्यापार करतात असा एक मराठी लोकांचा गैरसमज आहे प्रत्यक्षात मारवाड्यांनी उत्तम लेखन केले आहे आणि भारतीय व्याप्यारी समाजची समज मारवाड्यांच्या साहित्यातून प्रकटली आहे जगभर फिरल्याने सारडांना नवीन जगाचे भान होते त्यांचा खुलेपणा आकस्मिक न्हवता त्याला वैश्विक साहित्याच्या अफाट वाचनाची जोड होती साहित्यिक व समीक्षा दोघांनाही घडवावं लागतं हा त्यांचा विश्वास होता आणि ह्या विश्वासापोटी मराठी साहित्य संस्कृतीची शक्य ती काळजी त्यांनी घेतली त्यांनी लिहिलेल्या बालकथा अद्भुत वळणाच्या होत्या हजारो पुस्तकांची त्यांनी परिचय समीक्षा लिहिली किंबहुना ते ह्याबाबत एक्सपर्ट होते ह मो मराठ्यांची निःष्पर्ण वृक्षावर भर दुपारी सारखी त्याकाळी स्फोटक वाटलेली अस्तित्ववादी कादंबरी संपादक म्हणून त्यांनी छापली हे त्याकाळात डेअरिंगच होते ऐन तारुण्यात ते मटाच्या रविवार पुरवणीचे संपादक होते हे सर्व जाणतातच स्त्रीवादी कादंबऱ्या हा त्यांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ कारण तो फार सुरवातीला आला होता ज्यावेळी स्त्रीवादाची फारशी चर्चाही न्हवती
ते एका अर्थाने नव्यांचे प्रायमरी अक्षर चळवळ होते ज्यातून त्यांचे प्रोत्साहन जन्मले त्यांच्या ह्या प्रोत्साहनाचा मी कायमच ऋणी राहीन आस्वादक समीक्षेचा एक धुरंदर निघून गेला एक ओपन माईंड कायमचे मृत्यूत बंद झाले त्यांना माझी आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
Champra Deshpande
स्मृतीस अभिवादन !
· Reply · 9h
Pranav Sakhadéo
मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये काम करत असताना सरांशी दोनतीनदा उमदी चर्चा झाली होती. ते गेले हे या पोष्टमुळे समजलं. आदरांजली.
· Reply · 9h
Shreeram Pachindre
विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
· Reply · 8h
Advait Mehta
अविनाश धर्माधिकारी यांच्या तुम्ही आम्ही आपण सगळेच या अंकातही सौष्ठव पुरवणी यायची ज्यात तुमचे लेख मनोज जोशी ,ज्ञानदा,हेमंत दिवटे,मंगेश बनसोड यांच्या कविता असायच्या....धर्माधिकारी सरांमुळं पोस्ट मॉडर्न लिटरेचरची ओळख झाली
Advait Mehta हो! त्याचं झालं असं कि मी आणि हेमंत दिवटे नंतर एकत्र येऊन एकत्रच अभिधाचे संपादन करायला लागलो अभिधाच्या एका अंकातील माझ्या बांधकाम चालू आहे ह्या कवितेवर वादळ झाले आणि मला भूमिगत व्हायला लागले ह्या वादळी दिवसात गोपीनाथ मुंडे ह्यांना तुम्ही दाऊदला पकडायच्या गप्पा करता आणि एका साध्या कवीला तुम्ही पकडू कसे शकत नाही असा प्रश्न विचारला गेला ह्या दिवसात तू आमच्या सोबत होतास हे मी विसरू शकत नाही त्याबद्दल कधीतरी आभार मानायचे होतेच ते आता मानतो
हेमंतने ह्यापुढे तुझी कविता मी अभिधात छापणार नाही आणि संपादक म्हणून अभिधात तू नको मी तुझ्यासारखा रिस्क घेऊन जगू शकत नाही मी आता अभिधा कमर्शियल करणार आहे असे सांगितले मी ते मान्य केले आणि चौथ्या नवतेचे काय होणार असा प्रश्न निर्माण झालाअशा अडचणीच्यावेळी धर्माधिकारी सर माझ्या मदतीला धावले सरांचे अद्ययावत वाचन आहे हे तर तुही जाणतोसच त्यांनी सौष्ठव तुम्ही आम्ही आपण सगळेच ची पुरवणी म्हणून छापायचे मान्य केले आणि सौष्ठवची दुसरी इनिंग सुरु झाली त्यात माझे लेख व कविता मनोज जोशी ,ज्ञानदा,संतोष क्षीरसागर ,मंगेश बनसोड ,भुजंग मेश्राम , मंगेश काळे यांच्या कविता असायच्या ह्या काळात मंदार फणसे कीर्ती शिंदे राहुल सरवटे हे सरांचे विद्यार्थी मला मित्र म्हणून लाभले हा एक एक्स्ट्रा फायदा ! सरांनी ह्या काळात जे अगत्य दाखवले ते फार लोभसवाणे होते आम्ही वैचारिक पातळीवर दोन ध्रुवावर दोघे आपण असूनही ह्या काळात उत्तम सहयोगी होतो
Comments
Post a Comment