कवींनी गद्य वाचावे श्रीधर तिळवे नाईक 

जगाचा वाङ्मयीन इतिहास एक गोष्ट नेहमीच सांगत आलाय ती म्हणजे कुठल्याही नवतेची सुरवात प्रथम ज्ञानाच्या क्षेत्रात होते मग साहित्यात ती प्रथम कवितेत प्रकट होते मग कथेत मग चित्रशिल्पकलेत मग कादंबरी नाटकात मग सिनेमा टीव्ही वेबमधे 

साहित्याच्या क्षेत्रात एखादी नवता कवितेत अवतरल्यावर नंतरच्या कविंच्याकडून एक साधी अपेक्षा असते कि त्यांनी आधी ती नवता पचवावी पण अनेकदा असे होत नाही आमच्या पिढीने साठोत्तरी देशी नवता पचवणे आवश्यक होते बहुतांश लोकांनी हे न करता साठोत्तरीचा देशीवादी हिंदू नवबौद्ध हमरस्ता पकडला  भालचंद्र नेमाडे अरुण कोलटकर नामदेव ढसाळ दिलीप चित्रे रघु दंडवते ह्यांनी ती निर्माण केली  ,राजन गवस , रंगनाथ पाठारे श्याम मनोहर वृंदावन दंडवते ह्या सारख्या लोकांनी कादंबरीनाटकात ही देशी नवता विस्तारली  समांतर केली आणि सदानंद देशमुख इंद्रजीत भालेराव आसाराम लोमटे कृष्णान खोत ह्वैग्रेंनी ती प्रस्थापित केली  प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा कादंबरीत आलेला आशय काही कवींनी कवितेतून प्रकट करायला सुरवात केली आता ज्यांनी गद्य वाचले आहे त्यांना ह्यात काय रस येणार ? भले मग तो तुमचा आत्मानुभव असेल जर ह्या कवींनी गद्य वाचले असते तर आणि नीट पचवले असते तर आपला स्वानुभव नेमका प्रस्थापित अनुभवापेक्षा कुठे वेगळा आहे ते कळले असते फक्त थोडा साक्षेप व विवेक आणि स्वतःच्या आयुष्याची परखड समीक्षा ह्यांची गरज होती हे न घडल्याने मग स्वतःच्या काव्यात काहीही नवे प्रकट न झाल्याची शोकांतिका निर्माण झाली आहे म्हणून मी नेहमी म्हणतो कवींनी गद्य बारकाईने वाचावे 

श्रीधर तिळवे नाईक 

बऱ्याच वर्षांनी योग्य माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाय जयंत नारळीकर ह्यांचे अभिनंदन ! मी वैज्ञानिक कथा त्यांच्यापासूनच वाचायला सुरवात केली फालतूचा थरार नाही तपशीलातला नीटनेटकेपणा आणि वैज्ञानिक आव न आणता लिहिलेल्या वैज्ञानिक कथा ! व्यक्तिरेखा अधिक खोलात जाऊन निर्माण करायला हव्या होता मात्र उद्देशापासून न ढळलेल्या ! त्यांनी विज्ञानकथाला प्रतिष्ठा दिली . अभिनंदन नारळीकर !

श्रीधर तिळवे नाईक 

आकार व अवतार शिव अवतरण्याची क्षमता असलेला आकार म्हणजे अवतार आकार प्रत्येक गोष्टीला पण अवतार मनुष्यालाच अपवादात्मक इतर प्राणी असू शकतील नाही असे नाही 

अवतार लहान मुलाचे सात शेवटचा राम 

कार्यातील कोणताही गुण कारणातील गुणाशिवाय निर्माण होत नाही 

Comments

Popular posts from this blog