यशवंत मनोहर आणि सरस्वती श्रीधर तिळवे नाईक
उथ्यानगुंफा हा माझ्या कॉलेजजीवनातला एक आवडता काव्यसंग्रह कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही ही त्यातली गाजलेली ओळ पु ल देशपांडेंच्या लेखामुळे ती अधिकच सर्वत्र पसरली त्यातला लखलखाट पुढे डेव्हलप झाला नाही कदाचित जीवनायन अपवाद आंबेड्करांच्यावर नामदेव ढसाळ ह्यांनी असं काही जबरदस्त लिहून ठेवलंय कि त्याच्या आसपासही कोणी जाऊच शकत नाही यशवंत मनोहर त्याला अपवाद नाही त्यामुळे त्यानंतरचे यशवंत मनोहर हे तितकेसे अपील नाही झाले सौंदर्यशास्त्रावरचे त्यांचे लेखन नक्कीच दखलपात्र विशेषतः मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राची त्यांनी केलेली उलटतपासणी सौंदर्यशास्त्रावर लिखाण करणारा दलित हा ब्राह्मणी असतो अशी गैरसमजूत असणाऱ्या दलितांच्यात त्यांना ब्राम्हणी समजणारे काही महाभाग असावेत
साठोत्तरी फुलेआंबेडकरवाद दोन मार्गाने जातो
फुलेकेंद्री फुलेआंबेडकरवाद
आंबेड्करकेंद्री फुलेआंबेडकरवाद
यशवंत मनोहर हे दुसऱ्या मार्गाने गेलेले ! फुले आंबेडकरवादाची त्यांनी केलेली आंबेड्करकेंद्री मांडणी सातत्याने पुढे आलेली !
नामदेव ढसाळने कवितेत अनेकांना खुजे करून टाकले त्यात एक यशवंत मनोहर ! मात्र नामदेवला कधी अकादमीक समीक्षा जमली नाही ती यशवंत मनोहरांना जमली अनेकदा यशवंत मनोहर ठाम भूमिका घेत नाहीत अशी तक्रार अनेक दलित करतात त्यामुळे साहजिकच अचानक यशवंत मनोहरांनी ठाम भूमिका घेतल्याने साहित्यात बावचळ निर्माण झाली ही ठाम भूमिका सरस्वतीबाबत असल्याने सरस्वती पुन्हा चर्चेत आली आहे
सरस्वती हे आर्य संस्कृतीचे फार आरंभापासून एक प्रतीक आहे जगभरातल्या प्रत्येक संस्कृतीत एक भूमिदेवता व एक जलदेवता असतेच आर्यांच्यात सरस्वती ही जलदेवता आहे ऋग्वेदाच्या पहिल्याच मंडलात तिचा उल्लेख तिसऱ्या सूक्तात येतो ह्याचा एक अनुवाद पुढीलप्रमाणे
. Let pure Sarasvatī, providing prize mares along with prizes,
be eager for our sacrifice, bringing goods through her insight.
11. The impeller of liberal gifts, taking note of good thoughts,
Sarasvatī has received our sacrifice.
12. Her great flood does Sarasvatī reveal with her beacon.
She rules over all insights.
(पान ९२ अ ऋग्वेद भाषांतर Jamison, Stephanie W., Brereton, Joel P., Oxford University Press
198 Madison Avenue, New York, NY 10016 २०१४ )
असा केला गेला आहे ह्या अनुवादात एकाचवेळी नदीजल आणि ज्ञान ह्यांची कारक अशी ही देवता आहे उत्तरवैदिक काळातही सरस्वतीची अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति (ऋग्वेद २,४१ १६) (ámbitame nádītame dévitame sárasvati |apraśastā́ iva smasi práśastim amba nas kr̥dhi)अशी माता नदी व देवी म्हणून प्रतिष्ठा टिकून होती व ती जलदेवता व जलमाता होती वसिष्ठांनी तिचा गौरव
एकाचेतत् सरस्वती नदीनां शुचिर् यती गिरिभ्य आ समुद्रात्।
रायश् चेतन्ती भुवनस्य भूरेर् घृतम् पयो दुदुहे नाहुषाय॥(ऋग्वेद ७. ९५ . १ )
असा केला आहे ती एकमेव एकचेत आहे
नदीस्तुतीसुक्तातही सरस्वती आहे पण आता ती अनेकांपैकी एक आहे कारण हे सूक्त गंगेकाठी लिहिले गेले आहे
आपण लक्ष्यात घेतलं पाहिजे कि नद्यांना पवित्र मानण्याचा हा जागतिक कालखंड आहे अनार्यांच्यात शैवांच्यात पवित्र नदी ह्याअर्थाने वापरला जाणारा शब्द गंगा होय गंगा म्हणजे पवित्र नदी आणि प्रत्येक पवित्र नदी शिवाच्या जटेतून उगम पावते ही श्रद्धा ! अलकनंदा ही शैवांची मुख्य गंगा !! पुढे आर्यांनी भगिरथाची दंतकथा रचून तिचे नामकरण गंगा करून गंगा ह्या शब्दाचे विशेष नाम केले सरस्वती म्हणजेही कुठलीही पवित्र नदी सामान्य नदी आणि पवित्र नदी ह्यांच्यात फरक आहे जिच्याकाठी शिवालय आहे ती गंगा व जिच्याकाठी यज्ञ होतात ती नदी सरस्वती अशी गंगा व सरस्वतीची व्याख्या आहे त्यामुळेच कुठलीही नदी शिवालयाने वा यज्ञाने पवित्र झाली कि ती नदी गंगा वा सरस्वती असू शकते शैवांनी आपल्या अनेक नद्यांना गंगा हा प्रत्यय त्यामुळेच जोडलेला आहे गंगा हे विशेषण आहे त्यामुळेच पंचगंगा वैनगंगा वैग्रे आर्यांनी हिमालयाकडून व्हाया सिंध पंजाब गुजरात मराठा उत्तरेत प्रवेश केल्यावर शैवांची गंगा ही संकल्पना स्वीकारली मात्र सरस्वतीला ते विसरले नाहीत ते ह्या संकल्पनेचा पाठलाग करत राहिले त्यातूनच सरस्वती गुप्त झाल्याची दंतकथा रचण्यात आली एका अर्थाने आपली मुळे तुटल्याची ही खंत आहे इंग्रजांच्या कालखंडात ही गुप्त झालेली सरस्वती पुन्हा आर्यांच्या भावविश्वात ढवळाढवळ करू लागली कारण वाक हा शब्द ! वरील ऋचाअर्थात हीच गडबड आहे
वाक ह्या शब्दाचा मूळ अर्थ घाट आहे आणि आजही वाकवळण सारख्या शब्दात तो टिकून आहे ह्या वाकचा अर्थ नंतर बदलला आणि वाणी असा झाला आणि हाच अर्थ प्रमाण मानून नंतर सरस्वती विद्येची देवता असल्याचे सांगितले जाऊ लागले वर उल्लेख केलेल्या अमेरिकी ऑक्सफर्डनेही हाच अर्थ स्वीकारून भाषांतर केले
मूळ अर्थ काय आहे ? तर माझ्या मते तो पुढीलप्रमाणे
"पवित्र अन्नयुक्त धनदात्री सरस्वती आमच्या यज्ञाची इच्छा करो आमच्यासारख्या सुबुद्ध पुरुषांचा यज्ञ तिने स्वीकारला आहे आणि जागृत होऊन प्रवाहित झालेल्या तिने तिचे सर्व घाट पाण्याने संपन्न केलेले आहेत "
आर्य सरस्वतीचे हे नदीमाता असणे शैवांच्या सात आसरा व मातृदेवतांच्याइतकेच सहज स्वाभाविक आहे तिच्याशी वाद असण्याचे कारण नाही पण हे रूप खुद्द आर्यांनी जपले का ?
साधारण इसवीसनपूर्व ११०० च्या आसपास वैदिकधर्मात वैदिक आर्य जनतेवर प्रभुत्व कुणाचे ह्यावरून सत्तासंघर्ष सुरु झाला व पुरोहित वर्गाने क्षत्रियांना नामोहरण करणे सुरु केले शेवटी ह्या संघर्षात ब्राम्हण विजयी झाले त्यांनी कर्मवादी वैदिक धर्माचे रूपांतर जन्मवादी ब्राह्मणधर्मात केले ह्या काळात त्यांचा अनार्यधर्माशी जोरदार संघर्ष होऊ लागला आणि सरस्वतीची जलदेवता म्हणून असलेली प्रतिष्ठा प्रथम धुळीस मिळाली ती ह्या ब्राह्मणधर्माच्या काळात !ह्या काळात ब्राह्मणधर्माने शैव धर्माशी स्पर्धा सुरु केली आणि मग शंकर पार्वतीसारखे जोडपे ही गरज होऊन बसली त्यासाठी ह्या काळात ब्रह्मदेवाने सरस्वतीला आपल्या जिभेपासून निर्माण केल्याची व नंतर तिच्याशी लग्न केल्याची कथा रचण्यात आली ह्या कथेनुसार लग्न झाले त्यांना स्वयंभू मनू नावाचा पुत्र झाला व त्याच्यापासून सर्व मानवजात जन्मली मानवाच्या उत्पत्तीची ही कथा अनेक आर्यांनी स्वीकारली
पुढे काळ बदलला आणि ह्या कथेबाबत एक आक्षेप आला तो म्हणजे ब्रम्हदेव हा जर सरस्वतीचा पिता असेल तर तो तिच्याशी लग्न कसे करू शकतो ? कारण तोपर्यंत स्वपुत्रीबरोबरचे संबंध निषिद्ध झाले होते ही कथा डावलणे शक्यच न्हवते कारण तिचा ब्राम्हणांनी खूप गवगवा करून ठेवला होता मग करायचे काय शेवटी तोड म्हणून तिचा विस्तार करून उत्तर देण्यात आले कि शरीरसंबंधासाठी पाठीशी लागलेल्या ब्रम्हापासून सरस्वतीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण यश मिळाले नाही तेव्हा ह्यांचे लग्न झाले सरस्वती पुराणानुसार दोघे जंगलात राहिले व त्यांना स्वयंभू मनू नावाचा पुत्र झाला व त्याच्यापासून सर्व मानवजात जन्मली सरस्वतीने पित्याला म्हणजे ब्रम्हाला तुझी कोणी पूजा करणार नाही असा शाप दिला ह्या शापामुळेच आजही ब्रम्हदेवाची मंदिरे फारशी आढळत नाहीत
पुढे इसवीसन पूर्व ६०० ते ५०० ह्या काळात ह्या ब्राह्मणधर्माला चॅलेंज करायला तीन क्षत्रियधर्म आले सांख्य , जैन व बौद्ध ! ह्यामुळे वैश्य जैन धर्मात तर क्षत्रिय बौद्ध धर्मात विलीन झाल्याने ब्राह्मणधर्मात फक्त ब्राह्मणच उरले ह्या क्षत्रियधर्मानी ब्राह्मणधर्माचे देव व देवता नाकारल्या पण काही काळांनी त्यांना पुन्हा जागा द्यायला सुरवात केली त्यामुळे इंद्र सरस्वती वैग्रे देवता जैन बौद्ध धर्माच्या देवताही झाल्या जैनांनी प्रथम सरस्वतीला सामावून घेतले नवबौद्धांना माहित नसते कि सरस्वती ही देवता बौध्दांच्यातही आहे
ह्या क्षत्रियधर्मांना पराजित करण्यासाठी महाकाव्यप्रधान पौराणिक वैष्णव धर्म निर्माण झाला ज्यांचे राम व कृष्ण हे क्षत्रिय हिरो ब्राम्हणांचे ऐकत राज्यकारभार करत असतात ह्या नव्या वैष्णव आर्यधर्मात सरस्वतीचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला कारण तिने ब्रम्हदेवाला शाप दिल्याची कथा आता सेटल झाली होती हा प्रश्न शेवटी सरस्वतीला विष्णूची पत्नी बनवून सोडवण्यात आला आणि सरस्वती वैकुंठात राहते असे मत प्रचलित झाले
पण पुढे परशुरामाने क्षत्रिय नष्ट केल्याची कथा ब्राम्हणांनी रचली आणि ह्याचा फायदा वैश्यांना झाला आणि सर्वत्र वैश्य राजवटी आल्या गुप्त काळात गुप्त राजे वैश्य असल्याने वैश्य देवतांचा व वासुदेव व जैन ह्या वैश्यांच्या धर्माचा प्रभाव वाढला ह्या दोन्ही धर्मातले वैश्य लक्ष्मीचे भक्त होते साहजिकच ह्या काळात लक्ष्मीला स्थान देणे गरजेचे बनले त्यातून विष्णूची पत्नी म्हणून सरस्वती गेली व लक्ष्मी आली
पुढे शंकराचार्यांनी शैव शाक्त वैष्णव व स्मार्त ब्राम्हधर्म (म्हणजे वेदांत )असे चार धर्म एकत्र केले व त्यातून हिंदू धर्म जन्माला घातला ह्या हिंदू धर्मात सरस्वतीचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला अडचणीच्या वेळी मदतीला धावणे ही भगवान शिवाची खासियत असल्याने ते ह्यावेळीस धावून आले आणि सरस्वती शंकरांची अनुज म्हणजे धाकटी बहीण झाली प्रश्न होता ह्या नव्या बहिणीचे नामकरण काय करायचे ? त्याचे उत्तर जैन परंपरेने दिले
जैनांनी शब्ददेवीची चौदा रूपे सांगितली आहेत
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती।तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसगामिनी।।
पञ्चमं विदुषां माता षष्ठं वागीश्वरी तथा।कुमारी सप्तमं प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी।।
नवमं च जगन्माता, दशमं ब्राह्मिणी तथा।एकादशं तु ब्रह्माणी, द्वादशं वरदा भवेत्।।
पञ्चदशं श्रुतदेवी, षोडशं र्गौिनगद्यते।।
प्रथम भारती, द्वितीय सरस्वती तिसरे शारदा देवी चौथे हंसगामिनी पाचवे विदुषी, सहावे वागीश्वरी, सातवे कुमारी, आठवे ब्रह्मचारिणा नववे जगन्माता, दहावे ब्राह्मिणी, अकरावे ब्रह्माणी बारावे वरदा तेरावे वाणी, चौदावे भाषा, पंधरावे श्रुतदेवी, सोळावे गौ
ह्यातील शारदा हे रूप हिंदू धर्मात मुख्य रूप म्हणून स्वीकारण्यात आले ह्याचा अर्थ लक्ष्मी व शारदा ह्या आर्य हिंदूंच्या मुख्य देवता वैश्य जैन तर पार्वती शैव धर्मातून आलेल्या आहेत इसवीसन १००० पासून हिंदू धर्मात ब्रम्हा विष्णू महेश शारदा लक्ष्मी पार्वती स्थिर झाले वैष्णवांनी मात्र सरस्वती हेच रूप ह्या काळात कायम ठेवले
पुढे मुस्लिम काळात पुन्हा तख्त पलटले ब्राह्मणांना पुन्हा आता आपण वेगळे असल्याचा साक्षात्कार झाला त्यांनी चातुर्वर्ण्यव्यवस्था बाजूला करून द्विवर्ण व्यवस्था आणली आणि त्यातूनच हिंदू धर्मात ब्राम्हण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरले साहजिकच देशी अनार्य लोकांचे अस्सल अनार्य देशी देव शंकर पार्वती अडचणीचे झाले आणि त्यांना हिंदू धर्मातून पुन्हा साईडलाईन करण्यात आले राम कृष्ण विष्णू हे मुस्लिम लोकांनी महाकाव्यांना सन्मान देणे सुरु केल्याने प्रस्थापित केले गेले अनेक देशी देव विष्णूचे अवतार केले गेले उदा विठ्ठल काशी ही शैवांची धर्मराजधानी असल्याने तिथल्या मुख्य मंदिरावरच घाला घातला गेला (पुढे अहिल्याबाई होळकरांनी ते पुन्हा बांधून घेतले ) हिंदू धर्म हा पुन्हा वैष्णव झाला वैष्णव संतांचे साहित्य हे हिंदू धर्माचे साहित्य म्हणून पुढे आणण्यात आले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रम्हदेव सरस्वती पुन्हा स्थिर झाले कारण सरस्वती पुत्री राहिली नाही कारण कुराणानुसार आदमच्या हड्डीपासून जशी हव्वा तयार झाली तशीच ब्रम्हदेवाच्या जिभेपासून सरस्वती असा तर्क तयार झाला व हा विवाह स्वीकारणीय झाला साहजिकच पुन्हा सरस्वतीपूजन सुरु झाले मात्र आर्यांनी ज्या विद्या शूद्र मानलेत त्यांचे करायचे काय तर मग त्यासाठी ब्राम्हनायझेशन झालेला गणेश पुढे आणला गेला पण मराठा व शीख राजवटींनी हर हर महादेवच्या घोषणा देऊन पुन्हा शैव धर्म जिवन्त केला उत्तरपेशवाईने पुन्हा वैष्णवधर्म व मनुस्मृती आणली मनुस्मृतीच्या आधारे लिहिली गेलेली धर्मशास्त्रे आणली
ब्रिटिश राजवटीत पुन्हा तख्त पलटले होळकरांसारखे मराठा व शीख ह्या दोन्ही शैव राजवटी पराजित झाल्याने पराजित शैवांना व त्यांच्या लडाकु श्रद्धांना साईडलाईन करणे ब्रिटिशांची गरज होती त्यांनी जाणीवपूर्वक पुन्हा आर्य धर्मांना उत्तेजन द्यायला सुरवात केली ब्रिटिशांच्यामुळे आणि आर्य सिद्धांत आल्यामुळे त्याला ऍड्रेस करणे भाग होते महात्मा फुले ह्यांनी ह्या सिद्धांताच्या आधारे आर्यांना आउटसायडर ठरवून भारतीय संस्कृतीचे बाहेरून आलेले शोषक आर्य आणि मूलनिवासी शोषित अनार्य असे दोन प्रवाह आहेत अशी कडक भूमिका घेतली तर टिळकांनीही आर्य सिद्धांत स्वीकारून आर्य थेट उत्तर ध्रुवावरून आल्याचे सांगितले आर्यांना आता पुन्हा आपण बाहेरून आल्याचा व आपण ब्रिटिश आर्यांचे भावंडं असल्याचा साक्षात्कार झाला साहजिकच देशी अनार्य लोकांचे अस्सल अनार्य देशी देव शंकर पार्वती पुन्हा अडचणीचे झाले आणि त्यांना हिंदू धर्मातून पुन्हा साईडलाईन करण्यात आले राम कृष्ण विष्णू हे अस्सल आर्यन असल्याने व मुस्लिमांच्याप्रमाणे युरोपियन लोकांनी महाकाव्यांना सन्मान देणे सुरु केल्याने हिंदू धर्म हा पुन्हा वैष्णव झाला त्यातच भरीसभर म्हणून वैष्णवांची गीता ही कोर्टात शपथ घेण्यासाठी समस्त हिंदूंची धर्मग्रंथ म्हणून लादली गेली वैष्णव संतांचे साहित्य हे हिंदू धर्माचे साहित्य म्हणून पुढे आणण्यात आले न्यायमूर्ती रानडेंसारखे नेते त्यावर लिहू लागले हिंदू धर्माचे हे नववैष्णवीकरण हळूहळू प्रस्थापित होत गेले आणि मूळ शैव असलेल्या विचारवंतांनाही शंकराला बाजूला ठेवून वेदांत व वैष्णवांच्या भाषेत बोलायला लागले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रम्हदेव सरस्वती पुन्हा स्थिर झाले साहजिकच शाळेतून सरस्वतीपूजन सुरु झाले मात्र आर्यांनी ज्या विद्या शूद्र मानलेत त्यांचे करायचे काय तर मग त्यासाठी आर्यनायझेशन झालेला गणेश पुढे आणला गेला ज्याची प्रचंड चेष्टा करणारे गीत महात्मा फुले ह्यांनी लिहिले.
पुढे आपण स्वतंत्र झालो ब्रिटिश काळात ब्रिटिश बाहेरून आल्याने सर्व आर्य आपणही बाहेरून आल्याचे सांगायचे कारण ते अभिमानास्पद होते पण स्वातंत्र्यानंतर आपण बाहेरून आलोय हे सांगणे परवडणारे न्हवते पण अचानक स्टान्स बदलणेही शक्य न्हवते कारण ब्राम्हणांनी स्वतःच इंडोयुरोपियन भाषाकुलाचा व संस्कृत ही भारतातील भाषांची मातृजननी असल्याचा डांगोरा पिटला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ह्याबाबत काही करणे भाग होते पण करायचे काय ? इंडोयुरोपियन भाषाकुल फेटाळता येईना म्हणून दिशाच उलटी केली गेली म्हणजे आर्य बाहेरून आत आले ह्याऐवजी आर्यच भारतातून बाहेर जगभर पसरल्याचा सिद्धांत प्रसूत करण्यात आला हा सिद्धांत सिद्ध करायचा कसा ? त्यासाठी चार गोष्टी करणे भाग होते
१ आर्यांचे जनेतिक कोड भारतीय असल्याचे सिद्ध करणे
२ ऋग्वेद भारतात लिहिला गेला आहे हे सिद्ध करणे
३ हे सिद्ध करायचे असेल तर ऋग्वेदातील सगळा भूगोल हा भारतीय असल्याचे सिद्ध करणे ऋग्वेदात गंगेचा उल्लेख फक्त दोनवेळा एकदा प्रक्षिप्त एकदा संदिग्ध असा असल्याने हे सिद्ध करण्यासाठी गंगा कामाची न्हवती त्यामुळे सरस्वती भारतात असल्याचे सिद्ध करणे कारण हे करण्याशिवाय पर्याय न्हवता त्यासाठी घग्गर नदी हीच सरस्वती असा सिद्धांत मांडला गेला
४ हे सिद्ध करायचे असेल तर सरस्वतीबरोबर सिंधू ही प्राचीन संस्कृती जी अनार्यांची असल्याचे सिद्ध झाले होते काहीही करून वैदिक असल्याचे सिद्ध करणे तिला वैदिक सरस्वती संस्कृती ठरवणे .
ह्या चारी गोष्टीसाठी आर्यांनी पुन्हा एकदा जीव पणास लावायला सुरवात केली आहे आणि आज ह्या सगळ्या अस्मितेच्या खेळात सरस्वती ही केंद्रीय स्थानी आलेली आहे
आर्य असे का फसले ? कारण त्यांचा खोटेपणा ! सरस्वती ही नदीदेवता होती ती खरोखर प्रत्यक्ष नदी असल्याचा खोटा दावा आर्यांनी केला आणि आता तो सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली पण ती नदी आणणार कोठून ? एका बहाद्दराने तर आकाशातील नदीला सरस्वती म्हंटले एकाने घग्गरला ! जी नदी अस्तित्वातच नाही ती प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न केला कि हे घडते
आर्यांच्या ह्या खटाटोपाला छेद दिला तो राजेश कोच्चर ह्यांनी ! राजेश कोच्चर (पहा Rajesh Kochhar: The Vedic People, Their History and Geography, Orient Longman, Delhi 1999)ह्यांच्या मते अफगाणिस्तानातील Harahvaiti हरयवती व आत्ताची हेल्मन्ड ही अफगाणिस्तानातील नदी हीच सरस्वती होय आणि ऋग्वेदात हिचाच उल्लेख सरस्वती म्हणून आला आहे आपल्याकडे संजय सोनवणी ह्यांनी ह्या सिद्धांताचा अतिशय चांगला असा विस्तार केला आहे
ह्या सिद्धांताचा प्राथमिक आधार गांधार उर्फ अफगाणिस्तान हा भाग परकीय वा परदेशी मानणे हा आहे पण प्राचीन भूगोलाचा विचार करता गांधार हा मी भारताचाच भाग मानतो राजेश कोच्चर तसे मानत नाहीत जर गांधार भारताबाहेर होता असे मान्य केले तरच आर्य भारताबाहेरून आलेत असं म्हणता येईल अन्यथा जर हिंदुकुश पर्वतरांगा ज्यांचे आजही नाव हिंदुकुश आहे आपण भारतीय मानले तर आर्य बाहेरून न्हवे तर भारताच्या एका भागातून दुसऱ्या भागात आलेत असेच मानावे लागते मी तसे मानतो म्हणूनच मी आर्य बाहेरून आलेत असं मानत नाही कोच्चर हा भाग भारताबाहेरच्या भूगोलाचा मानतात म्हणून मग आर्य बाहेरून आलेत असे म्हणावे लागते
दुसरी गोष्ट ह्या सिद्धांताचा मुख्य आधार अवेस्तन भाषेत स चा उच्चार ह होतो हे बाळबोध गृहीतक आहे ज्याच्या आधारे सिंधूचा हिंदू झाला व हरयवतीची Harahvaiti सरस्वती झाली असे सांगण्यात येते प्रत्यक्षात अवेस्तन ह्या भाषेत जिच्या नावात स आहे असे अनेक शब्द आहेत ज्यांच्या उच्चारात स आहे जर तिथे स चा उच्चार "स"च होतो तर मग फक्त सिंधूचा उच्चार करतांना ह म्हणजे हिंदू कसा होईल ? दुसरी गोष्ट पंजाब सिंध गुजरात मराठात उतरलेल्या आर्यांचे उच्चारण अवेस्तांप्रमाणे होते काय ? तेही “स” चा “ह” करायचे काय ज्यामुळे हरयवतीचा स झाला ? असे असेल तर खुद्द आर्यांच्या भाषेचे नाव संस्कृतऐवजी हहंकृत असायला हवे आणि सामवेदाचे नाव हामवेद असायला हवे पण असे झालेले नाही संस्कृत संस्कृत आहे सामवेद सामवेद आहे तेव्हा हे ह चे स होणे तर्कदुष्ट आहे वास्तविक हिंदू हे नाव इंदू ह्या शब्दावरून आले आहे आणि त्याचा अर्थ चंद्राप्रमाणे तिथी म्हणजे दिवस महिना पक्ष नक्षत्रगणना ठरवणारे लोक असा होतो
वास्तविक हा सगळा खटाटोप करण्याची आर्यांना गरजच नाही ते खरोखरच बृहद भारतातील आहेत आणि त्यांची आर्य संस्कृती ही हिंदूकुशचा पायथा ते काश्मिरी हिमालयाचा पायथा अशी हिमालयाच्या पायथ्याशी विकसित झालेली संस्कृती आहे खुद्द आर्यांची मूळ कथा सांगते कि सर्व प्रजापिता वा कश्यप ह्यांच्यापासून सर्व आर्य जन्मलेत म्हणजेच आर्यांचे मूळ बहुदा काश्मीर किंवा हिंदकुश आहे
आईसएजमध्ये त्यांना स्थलांतर करावे लागले आणि ते रशिया , इराण , इराकमध्ये गेले पण त्यापैकी अनेक परतले सिंधी भाषेत आर्य ह्या शब्दाचा अर्थ परतलेले लोक असा होतो आणि तोच आर्य ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे नंतर त्याचा अर्थ सभ्य असा झाला आहे ह्याच काळात द्रविड आणि नाग विंध्य व दक्षिणेकडे सरकले आहेत दक्षिणेत आधीचे द्रविड होतेच पुढे इसवीसनपूर्व १५०० ला पुन्हा एकदा नाग द्रविडांना दक्षिणेकडे मायग्रेशन करावे लागले आहे
माझ्या मते हरयवती हे नाव शन्कराच्या हर ह्या नावावरून आले आहे आणि एकेकाळी अफगाणिस्तान (प्राचीन काळी गांधार) हा शैव असल्याने ह्या नदीचे नाव हरयवती पडले होते ह्याच नदीच्या काठावरील ज्या शैवांना व देवासुरांना असुर आर्यांकडून हाकलण्यात आले ते अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे अपरान्तात व बंगालमध्ये उतरले हे नदीकाठचे असल्याने कोळी होते प्राचीन काळात कोळी असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे होते कारण गंगेकाठी म्हणजे पवित्र नदीकाठी जी शिवालये असत त्यांचे पुरोहित हे कोळी असत (आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे मूळ पुजारी कोळी असण्याचे कारणही हे मूळचे नदीकाठचे शिवालय आहे हे आहे )गांधारातले हे गोरेगोमटे देखणे पुरोहित कोळी लोक केरळ तामिळ बंगालमध्ये गौड व स्मार्त कोकणात चित्पावन कोकणस्थ व गोवा कर्नाटकात हरयवत नंतर संभवि नंतर शेणवी व पुढे सारस्वत झाले जिला आज आपण सरस्वती म्हणतो ती ह्या मूळ अफगाणी शैव महादेव कोळी वा देवासूर आर्य असलेल्या पण पुढे शैव ब्राम्हण व नंतर वैदिक ब्राम्हण व नंतर सनातन कर्मठ ब्राम्हण झालेल्या कम्म्युनिटीची देणगी आहे ह्याच कम्युनिटीतील देवसूर वैदिक आर्य असलेल्या वा नंतर वैदिक झालेल्या ब्राम्हणांनी महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात ह्या प्रदेशात ऋग्वेद पुन्हा नीट रचला पुढे तो विखुरला आणि व्यासांनी तो पुन्हा संकलित केला त्यामुळेच आपणाला मूळ वेद माहीत नाहीत आपल्याला माहीत असलेले वेद हे व्यासांनी ऋग्वेद , सामवेद आणि यजुर्वेद ह्यांचे केलेले संकलन आहे आणि हे संकलन गांधारी आर्य लोक शैवांच्या गंगा संस्कृतीत दाखल झाल्यावर केले गेलेले आहे अथर्ववेद हा मात्र पूर्णपणे मूळच्या शैव अनार्य असलेल्या पण नंतर वैदिक बनलेल्या ब्राम्हणांनी रचलेला वेद आहे आणि तो त्यामुळेच सामावून घ्यावा कि नाही ह्यावर किमान हजार वर्षे वाद झालेला आहे ह्या धर्मांतरित ब्राम्हणांच्या काही ऋचा ऋग्वेदात व यजुर्वेदातही आहेत पण त्या व्यासांनी सामावून घेतल्या आहेत कारण व्यासांच्या काळात आर्यांचा शैव अनार्य द्वेष प्रखर न्हवता एका अर्थाने ही गंगा सरस्वती तहजीब होती जी लोप पावत गेली पुढं मुस्लिमांच्यानंतर गंगा जमुना तहजीब आली
ही गंगा सरस्वती तहजीब शैवांच्या सुसंस्कृतपणामुळे आणि आरंभीच्या वैदिक मनमोकळेपणातून आली आहे ह्या वैदिक मनमोकळेपणाला नंतर ब्राम्हण्याने ग्रासले शैवांच्यात दोन उपसंस्कृती आहेत द्रविड आणि नाग ! दोन्ही शैव उपसंस्कृतींनी कायमच सर्वांना उदारपणे आश्रय दिला आहे त्यात मुंडापासून गांधारपर्यंत अनेक लोक येतात हिंदकुश गांधार ते काश्मिरी हिमालय पर्यंत हिमालयाच्या आश्रयाने हिमालयाच्या काठी उभी राहिलेली आर्य संस्कृती शैवांनी कायमच धाकटी भगिनी मानली नागांनी त्याच्या पूर्वेकडील हिमालयाच्या काठी आपली वेगळीच पिवळी शैव नागसंस्कृती रचली जी आसाम बंगाल ओरिसा तिबेट नेपाळ भूतानपासून थेट महाराष्ट्रातील विदर्भापर्यंत पसरलेली दिसते पण ब्राम्हण्यग्रस्त झालेल्या देवआर्यांनी ह्या द्रविडनाग शैव संस्कृतीचे काय केले ? त्यांनी भगिनीभाव कधी जपलाच नाही उलट अनार्यांच्या शैवांच्या प्रत्येक गोष्टीवर आपलाच हक्क सांगून वर अनार्य रानटी म्हणत भंपकपणा केला त्यासाठी वेळप्रसंगी परकीय राजवटींशी घृणास्पद युती केली अनार्यांच्या इन्टिलेक्च्युअल विरासतीवर डल्ला मारला ह्या सगळ्याला कधीतरी उत्तर मिळणारच होते ते आ ह साळूनखे ह्यांनी ब्राम्हणांना आपल्या धर्मात प्रवेश देण्यास मनाई करून दिले ह्या उत्तराचाच एक अविष्कार म्हणजे यशवंत मनोहर ह्यांनी सरस्वतीला दिलेला नकार ! त्यांचा लेचापेचा स्वभाव बघता ते किती ह्या नकारावर ठाम राहतील ह्याबद्दल मला शंका आहे हिंदुत्ववाद्यांनी सरस्वती ही सांस्कृतिक अस्मिता म्हणून उभी करायला सुरवात केली ती १९९० पासून आणि त्यामागची कारणे काय होती ह्याची वर चर्चा केली आहे श्रीकांत तळेगिरीसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी तर सरस्वती नावाचा एक ग्रंथच रचला आणि ब्राम्हणांनी पुन्हा एक सरस्वती संस्कृतीचे षडयंत्र रचून इंडस संस्कृती वैदिक होती असा प्रचार करायला सुरवात केली व घग्गर म्हणजे लोपलेली सरस्वती असे तद्दन खोटे प्रचार सुरु केले
जे लोक अजून जुनाट पद्धतीने सरस्वतीला पाहतायत ते आऊटडेटेड आहेत १९९० नंतर सरस्वती हा अनार्यांविरुद्धचा कल्चरल अजेंडा झाला आहे साहजिकच ह्या अजेंड्याचा निषेध करणे आवश्यक आहे आमच्यासारखे लोक थेट पुरस्काराला नकार देतात तो सगळ्यांना जमेल असं नाही ज्यांना पुरस्कार घ्यायचा आहे त्यांनी निदान आता यशवंत मनोहरांसारख्या अटी घालायला हरकत नाही आणि जर समोरचे संयोजक आपलाच अजेंडा दामटवत असतील तर मग ऐनवेळी पुरस्कार नाकारलेला बरा !
मनोहरांनी नेमक्या कोणत्या कारणांनी सरस्वतीला नकार दिलाय मला माहित नाही आंबेडकरवादी सरस्वतीला वेगळ्या कारणांसाठी नकार देऊ शकतात पण शैव आणि नवबौद्ध दोघांचाही अंतिम उद्देश वर्णजातींचा अंत व स्त्रीपुरुष समता हाच आहे मीही शाळेत सरस्वतीला पाटीवर काढले आहे आणि सरस्वतीपूजन केले आहे पण त्यावेळी सरस्वती निव्वळ विद्येची देवता होती हिंदुत्ववाद्यांनी तिला सांस्कृतिक मुद्दा बनवले आणि रणांगणात आणले एकंदरच हिंदू धर्म हा आर्य व शैव संस्कृतीचा सम्यक व समग्र समतोल व्हावा पण काहीजणांना असे वाटत नाही असे दिसते राजा राममोहन रॉयपासून स्वामी विवेकानंद ठाकरेंच्यापर्यंत अनेक शैवांनी व उत्तरार्धातील नववैष्णव शिंदे गांधींनी त्याला सम्यक व समग्र समतोल देण्याचा प्रयत्न केला पण ह्या शैव व नववैष्णव लोकांच्या कामावर काही कर्मठ सनातन लोक पाणी फिरवण्याच्या प्रयत्नात आहेत ह्यांना अजूनही कळत नाही कि सांस्कृतिक साळसूदपणा आणि अरेरावीपणा करण्याचे दिवस आता गेले अनार्य ज्यांना आता ओबीसी बीसी आदिवासी म्हंटले जाते ते आता हे सहन करण्याच्या मनःस्थितीत नाहीत असो
खरेतर जिथे सरस्वती आहे आणि ती जर आपणाला नको आहे तर पुरस्कार घ्यायला जावेच कशाला ? हाच प्रश्न आहे असो ह्यानिमित्ताने सरस्वतीवर अधिकाधिक विचारमंथन होणार असेल तर तेही ह्या घटनेचे चांगले फलितच म्हंटले पाहिजे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment