विचारप्रणाली ह्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टमध्ये फार महत्वाच्या असतात आणि होत्या त्यांची सुरवात ज्ञानकारणापासून व ज्ञानकेंद्री विचारप्रणालींनीपासून झाली पायोनियर होते रिचर्ड बेकन व फ्रान्सिस बेकन रिचर्डने निसर्गवाद आणला तर फ्रान्सिसने ज्ञानात इंद्रियप्रामाण्यवाद आणला त्याला शह म्हणून देकार्तने भूमिती व गणितकेंद्री बुद्धिप्रामाण्यवाद आणला ह्या तीन विचारप्रणालीतून ज्याला आज आपण विज्ञान पद्धत म्हणतो तिची पायाभरणी झाली राजकारणात मग हॉब्ज , लॉक , व्हॉल्टेअर , मिल ह्यांच्यामुळे राजकीय विचारप्रणाल्या अस्तित्वात आल्या ऑगस्ट कॉम्ट दुर्खाइम ह्यांनी सामाजिक विचारप्रणाल्या मांडल्या
क्लास हा शब्द यूरोपात प्रचलित तितकासा न्हवता त्याऐवजी इस्टेट वा तत्सम शब्द प्रचलित असे फर्स्ट इस्टेट चर्च दुसरी मोनार्च तिसरी ज्यात व्यापारी शेतकरी कारागीर पशुपालक होते ह्यातील व्यापाऱ्यांना प्रचंड पैसे मिळू लागले साहजिकच त्यांच्यात अस्वस्थता वाढायला लागली व्यापारात राजाराणीला द्यावा लागणारा शेअर प्रचंड होता (५० ते ८० टक्के ) रिस्क आम्ही घ्यायची आणि पैसे राजाराणीला हे का हा प्रश्न निर्माण झाला ईस्ट इंडिया कम्पनीने स्वतःच पैसे उभे करायला सुरवात केली ह्या व्यापारी वर्गाने शेतकरी कारागीर पशुपालक ह्यांना पकडून फ्रेंच राज्यक्रांती घडवली आणि लोकशाहीची दुसरी क्रांती आणू पाहिली अमेरिकेतही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्याविरोधात ती झाली होती
क्लास हा शब्द यूरोपात प्रचलित तितकासा न्हवता त्याऐवजी इस्टेट वा तत्सम शब्द प्रचलित असे फर्स्ट इस्टेट चर्च दुसरी मोनार्च तिसरी ज्यात व्यापारी शेतकरी कारागीर पशुपालक होते ह्यातील व्यापाऱ्यांना प्रचंड पैसे मिळू लागले साहजिकच त्यांच्यात अस्वस्थता वाढायला लागली व्यापारात राजाराणीला द्यावा लागणारा शेअर प्रचंड होता (५० ते ८० टक्के ) रिस्क आम्ही घ्यायची आणि पैसे राजाराणीला हे का हा प्रश्न निर्माण झाला ईस्ट इंडिया कम्पनीने स्वतःच पैसे उभे करायला सुरवात केली ह्या व्यापारी वर्गाने शेतकरी कारागीर पशुपालक ह्यांना पकडून फ्रेंच राज्यक्रांती घडवली आणि लोकशाहीची दुसरी क्रांती आणू पाहिली अमेरिकेतही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्याविरोधात ती झाली होती
------------------------------
निसर्गवाद ही प्रामुख्याने मोक्षकेंद्री विचारप्रणाली तिने परलोकावरून इहलोकाकडे आपले लक्ष्य खेचले पण प्रश्न असा होता कि हा जो इहलोक आहे तो आपणाला जाणता येईल का ? तो जाणायचा असेल तर कसा जाणायचा ह्यातूनच प्रबोधनाची पहिली विचारप्रणाली जन्मली ती म्हणजे इंद्रियप्रामाण्यवाद इहलोकाचे खरे ज्ञान आपणाला इंद्रियांच्यामार्फत होते अशी मांडणी फ्रान्सिस बेकनने केली आणि माणसाला वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह ज्ञान इंद्रियांच्यामार्फत व सायंटिफिक मेथडमार्फत होऊ शकते असा सिद्धांत मांडला इंद्रियांना होणारे वास्तवाचे वस्तुनिष्ठ ज्ञान हेच खरे ज्ञान व तेच महत्वाचे त्याने ख्रिश्चन धर्माला नकार दिला नाही पण त्या ज्ञानाला त्याने ज्ञानव्यवस्थेच्या केंद्रीय स्थानावरून हटवले व इंद्रियांच्या मार्फत होणारे ज्ञान प्रमाणित केले ही वास्तवाला मान्यता देण्याची खेळी होती पण धर्माला न दुखावता !
देकार्तने ही इंद्रियप्रामाण्यता नाकारली व माणसाला होणारे ज्ञान हे इंद्रियांना नाही तर बुद्धीला होते असे प्रमेय मांडले तो गणितज्ञ होता आणि गणित वास्तवात कुठेच न्हवते ह्याचा अर्थ गणित हे मानवनिर्मित ज्ञान आहे आणि माणसाजवळ अतुलनीय बुद्धी असल्यानेच माणसाला ते प्राप्त होते असा त्याचा कयास असावा ह्यातूनच बुद्धीला प्रमाण मानणारे बुद्धिप्रामाण्यवादी ज्ञान श्रेष्ठ ठरवले गेले आणि बुद्धिप्रामाण्यवाद जन्मला
आजची सायंटिफिक मेथड ही ह्या दोघांच्या तत्वज्ञानाच्या संयोगाने जन्मली आहे इंद्रियांच्यामार्फत संवेदना येतात पण अंतिम विचार ही बुद्धी करते व अंतिम ज्ञान बुद्धीला प्राप्त होते असे विज्ञान सांगते
जॉन लॉकने ह्या दोन्ही पद्धतीचे संश्लेषण करून अनुभवप्रामाण्यवाद मांडला
रोमॅंटिसिझमने ह्या तिन्ही प्रामाण्यवाद्यांना नाकारले आणि निसर्गाचे खरे ज्ञान हे भावनांच्या साहाय्याने होते असा सिद्धांत मांडला ह्यातूनच भावप्रामाण्यवाद जन्मला मात्र ह्या लोकांनी वैज्ञानिक ज्ञानात किती भर टाकली हा एक प्रश्न आहे मात्र कलेच्या क्षेत्रात ह्यांनी अतुलनीय काम केले
ह्या चारी प्रामाण्यवादाला नकार देऊन पाचवा वाद आला तो वास्तवप्रामाण्यवाद ह्या वादाच्या मते ऑब्जेक्टिव्ह ज्ञान हे निसर्गात आणि वास्तवात असते आणि माणूस ते फक्त डिस्कवर करतो गणित निसर्गात असते माणूस ते फक्त शोधतो ह्याला आपण वास्तव प्रमाण मानणारा वास्तवप्रमाण्यवाद म्हणून संपूर्ण प्रबोधनाचा प्रोजेक्ट हा ह्या पाच वादाभवती फिरतो ईश्वराला प्रमाण मानणारे धर्मग्रंथाला प्रमाण मानणारे ज्ञान ह्या सर्वांनीच मुख्य ज्ञान म्हणून नाकारले
ह्यानंतर सहावा भांडवलवाद ऍडम स्मिथचा
मग सातवा सेण्ट सायमनचा समाजवाद
प्रबोधनाचा शेवटचा वाद आठवा डार्विनवाद होता
त्याचा एक अविष्कार नववा मार्क्सवाद होता उत्क्रांतीवाद त्यातूनच जो अधिक उत्क्रांत तो शहाणा युरोपियन शहाणे ठरले व्यापारवादाचा रानटीपणा शास्त्रीय चेहरा घेऊन आला
दहावा लोकशाही समाजवाद
प्रबोधनाच्या केंद्रस्थानी विज्ञानाचा प्रोजेक्ट होता ह्या प्रोजेक्टमधल्या सर्वांनीच स्वातंत्र्य समता आणि बंधुता कबूल केली कारण त्याशिवाय ज्ञान शक्य न्हवते विज्ञानाला मानवजात ही एक जात स्पेसीज म्हणून दिसली साहजिकच सर्व मानव समान दिसले एकाच स्पेजीचचे म्हणून बंधुभगिनी दिसले आणि सत्य शोधण्यासाठी ते स्वतंत्र असणे गरजेचे दिसले सुरवातीला राजेशाही व नंतर लोकशाही व्यवस्था दिसली कारण सर्व समान असतील तर एकजण राजा कसा असू शकतो राजा बनण्याची संधी सर्वांनाच असायला हवी म्हणून लोकशाही प्रत्यक्ष व्यवहारात सुरवातीला व्यापार कारण राष्ट्रांना त्यांचे प्रोजेक्ट चालवण्यासाठी पैसे हवे होते व्यापारवाद मग सर्व अडाणी लोकांना नवे ज्ञान देऊन शहाणे बनवणे ज्ञानवाद व शेवटी मात्र बळी तो कान पिळी ह्या न्यायाने शोषण सुरु होते डार्विनवाद
Comments
Post a Comment