आधुनिकतावादी  कवितेची  पायोनियरशिप आणि इतिहासाच्या बदलत्या पोझिशन्स श्रीधर तिळवे नाईक 



लॉकडाऊनमुळे मिळालेल्या अधिकतम काळात काही अधिक डीजीफेऱ्या मारल्या तर आधुनिक कवितेचे प्रवर्तक म्हणून टी एस एलियटचे(इलियट)  नाव  घेणाऱ्या दोन पोस्ट वाचल्या आणि आश्चर्य वाटले . मर्ढेकरांनी हे म्हंटले तर समजू शकते कारण त्यांच्या सिलॅब्समध्ये हे शिकवले जात होते पण मराठीतील आत्ताच्या पिढीनेही हे म्हणावे ?

हे लोक साहित्याचा कोणत्या काळातला इतिहास वाचतात  ?

युरोपियन साम्राज्यवादी राजवटींच्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वसाहतींच्यामध्ये डिक्लोनाईझ होण्याची प्रोसेस जगात सर्वत्रच सुरु झाली (गोव्यात स्वातंत्र्य उशिरा मिळाल्याने थोडी उशिरा )आम्हा गोवेकरांच्यावर पोर्तुगीज कवितेचा प्रभाव जास्त आहे म्हणजे बोरकरांची जपानी रमलाची रात्र ही कविता इंग्लिश परंपरेच्या प्रभावातून निर्माण होणे अशक्य त्यामुळेच तीची जातकुळी स्पॅनिश पोर्तुगीजशी अधिक मिळत होती त्यामुळे  गोव्यासारख्या प्रदेशात डी -पोर्तुगिझाइझ (ह्या विषयावर पुन्हा कधीतरी सविस्तर !) तर  ब्रिटिश भारताच्या संदर्भात देशीवाद्यांनी कितीही बोंब मारली तरी १९५० पर्यंत प्रभावाचा मुख्य सोर्स ब्रिटिश व अल्पसा अमेरिकन साहित्य असल्याने डीइंग्लिशाईझ्ड  ! जिथे जिथे कॅथॉलिक प्रभाव जास्त तिथे तिथे आधुनिक कविता उशिरा त्यामुळं पोर्तुगालमध्ये आधुनिक कविता उशिरा पोहचली आणि पर्यायाने गोव्यातही त्यामानाने पेंटिंग फास्ट ! त्यामुळं फर्नांडो पेसो सारखा दुसरा पण अस्सल मॉडर्निस्ट (पहिला मारिओ कारमेरिओ पुरेसा मॉडर्निस्ट न्हवता )पोर्तुगीज कवी गोव्यात अवतरायला खूपच उशीर झाला परिणामी आजही गोव्यात आधुनिक कवी शोधावा लागतो आणि आता तर नेमाडेंच्या देशीवादाने  पुरता सत्यानाश करून गोवा साहित्याबाबत पुरता मागे न्हेला  आहे त्यामुळं आधुनिकतेचा प्रश्न आला कि महाराष्ट्र आधी गोवा नंतर (पॉंडेचरीत मात्र फ्रेंच राजवटीमुळे माहोल वेगळा आहे ) असाच क्रम ठेवावा लागतो

त्यामुळेच मराठीला डी - ब्रिटिशाईज्ड करण्यासाठी मराठीसारख्या मागासलेल्या वाङ्मयीन संस्कृतीतही दिलीप चित्रेनीं  हे दाखवून दिले  कि युरोपियन आधुनिकतेचा प्रवर्तक टी एस एलियट नसून कवी चार्ल्स बोदलेयर  हा फ्रेंच कवी आहे  ह्यामागची कारणे उघड होती कारण खुद्द चित्रेंच्यावर स्पॅनिश फ्रेंच विशेषतः ओक्टोव्हिओ पाझचा प्रभाव पडला होता गंमतीचा भाग असा कि खुद्द चित्रेंना पाझ वर अमेरिकन  इ इ कमिंगन्झचा प्रभाव पडला होता हे दिसले न्हवते आणि आम्हा दोघांचा ह्यावरून वादही झाला होता

चित्रेंनी एलियटची स्थाननिश्चिती नीट मांडल्यानंतरही हे लिहिले जावे ? किमान साठोत्तरीने काय लिहलंय ते तरी आम्ही वाचणार आहे कि नाही ?

खरेतर ह्या आधीच इंग्लिशमध्ये उत्खनन होऊन मेक इट न्यू ही आधुनिकतावादाची घोषणा एज्रा पौंडने दिली होती हे संशोधन झाले होते आणि १९३५ ते ४० दरम्यान हे  श्रेय पाउंडला दिले जाऊ लागले  होते पन्नासोत्तरी (आपल्याकडे ही साठोत्तरी होते )पिढीने पुन्हा बोदलेयर पुढे आणला कारण एज्रा पौंडने मुर्खासारखा हिटलरला दिलेला पाठिंबा ! तो सहन करणे दुसऱ्या महायुद्धानंतर कुणालाच शक्यच न्हवते

दुसऱ्या महायुद्धांनंतर अमेरिका केंद्र बनली आणि अमेरिकन संस्कृतीवर्चस्ववाद्यांनी पुन्हा बोदलेयर हे केंद्र हटवून त्या जागी वॉल्ट व्हीटमन हा अमेरिकन कवी पायोनियर कवी म्हणून पुढे आणला आणि आपल्याकडे त्या प्रभावाखाली येऊन सदानंद रेगेंनी व्हिटमनच्या कवितांचा मराठी अनुवादही केला

अमेरीकनांचे वर्चस्व इंग्लिश लोकांना कसे चालणार ? त्यातच फ्रेंच इंग्लिश मधल्या पारंपरिक  सांस्कृतिक भांडणाने पुन्हा उचल खाल्ल्यावर इंग्लिश संस्कृतीवाल्यांनी एडगर ऍलन पो हा कवी प्रवर्तक म्हणून पुढे आणला आणि ह्याची प्रेरणा खुद्द बोदलेयर होती कारण बोदलेयरनेच आपल्या आधीचा सर्वात प्रभावी कवी म्हणून पोला सॅल्यूट मारला होता आणि त्याचा अनुवादही केला होता

ह्यांनंतर जगभर चौथ्या नवतेच्या पिढीने साठोत्तरी इतिहासाला चॅलेंज देत नव्या इतिहासाचे लेखन करायला सुरवात केली पोमोच्या इतिहास रचितांनी खरंतर आमची पिढी कंटाळली होती पोमोचे खोटे इतिहास कोणते आणि खरे इतिहास कोणते ह्याची तपासणी करतांना खूपच वेळ वाया जाऊ लागला पण तरीही सत्य काय ते शोधले पाहिजे म्हणून आमच्या पिढीने इतिहास शोधले आणि टाइमलाईन रचायला सुरवात केली आज टाइमलाईन ही इतिहास लेखनासाठी एक पायाभूत आवश्यकता मानली जाते आणि विकिपीडिया तिचा मुबलक वापर करतो असे असतांनाही कुणी जर बुकींश पद्धतीने टी एस एलियटला पायोनियर म्हणत असेल तर कठीण आहे

आज कोणीही एडगर अँलन पोचे महत्व नाकारत नाही पण आधुनिक कवितेचे प्रवर्तक म्हणून बोदलेयर आणि व्हीटमन ह्यांचेच नाव घेतले जाते त्यातही बोदलेयरचेच  जास्त कारण त्यांची संवेदनशीलता सर्वांगाने आधुनिक आहे व्हिटमन नॅशनल अधिक आहे (त्यामुळेच  ट्रम्पच्या काळात त्याचा भाव अधिक वधारला आहे कारण व्हिटमन सुरवातीपासूनच अमेरिकन आयडेंटिटी स्थापित करणारा कवी आहे  ) इतकेच न्हवे तर अलीकडे एलियट आणि एज्रा पाउंड ह्यांच्या बरोबरीने  जॉन शॉ नेल्सन हा ऑस्ट्रेलियन कवी आधुनिक कविता लिहीत होता अशीही मांडणी समोर येते आहे  त्यामुळे जागतिक व युरोपियन आधुनिकतेच्या  पायोनियरशिपचा टिळा आता कुणीही  एज्रा पाउंडला लावत नाही मात्र हिटलरला पाठिंबा दिल्याने त्याला अक्षरशः जो फेकून देण्याचा कार्यक्रम झाला तो आता कुणी करत नाही त्याच्या कंटोजचा विचार पुन्हा एकदा उत्तरआधुनिकतेच्या संदर्भात केला पाहिजे असेही अनेकांना वाटते आहे शिवाय संरचनावादी समीक्षकांनी वैयक्तिक जीवनात कवीने काय शेण खाल्ले ह्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही आम्हाला त्याने निर्माण केलेल्या संहितेच्या आधारेच त्याचे मूल्यमापन करणे योग्य वाटते असा स्टान्स घेऊन त्याचे मूल्यमापन त्याच्या संहितांना केंद्रस्थानी ठेऊन करायला सुरवात केलीये तर उत्तर संरचनावादी एज्राच्या कवितेत वा इतर संहितेत हिटलरी प्रवृत्ती दिसतात का त्याचा मागोवा घेतायत मात्र कुणीही पाउंडला जागतिक आधुनिक कवितेची पायोनिअरशिप देत नाही मात्र तो ब्रिटिश इंग्लिश आधुनिकतावादी कवितेचा पायोनियर होता हे त्याचा हिटलरी गुन्हा माफ करून मान्य केले जाते आहे

एज्रा पाउंडची मराठीला असलेली देणगी म्हणजे त्याचा प्रतिमावाद अख्खी सत्यकथा ह्या प्रतिमावादावर उभी आहे त्याचे हे योगदान किमान सत्यकथावाद्यांनी  नाकारू नये

मात्र ह्याचा अर्थ टी एस एलियटलाही श्रेय द्यावे असा नाही आणि हे श्रेय कुणी देतही  नाही कारण त्याच्याआधी बोदलेयर व्हिटमन रॅम्बो रिल्के वैग्रे आधीच आधुनिक कविता लिहीत होते हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे मात्र इंग्लंडच्या साहित्यात  एलियटचे नाव अढळ आहे त्याची १९१५ सालची लव्ह सॉंग ऑफ आल्फ्रेड फ्रुफ्रॉक ही मॉडर्निस्ट चळवळीतील एक ग्रेट कविता आहे हे सर्वांनाच मान्य आहे शिवाय वेस्ट लॅण्ड हा मास्टरपीस होता हेही !

एलियटचे मराठी साहित्यावर दोन उपकार आहेत
१ पहिला मर्ढेकरांना आधुनिक कविता लिहायला ज्यांनी प्रेरित केलं त्यांच्यापैकी तो एक होता
२ दुसरा परंपरा आणि नवता ( विशेषतः TRADITION AND INDIVIDUAL TALENT हा निबंध  )ह्यांच्या संबंधाचा त्याने जो विचार केला त्याचा प्रथम प्रभाव करंदीकरांच्यावर पडला व पुढे नेमाडेंच्यावर ! प्रत्येक कवी ग्रेट कवी स्वतःच्या परंपरेत उभा राहून लिहितो व लेखकाचे मूल्यमापन त्याच्या आधीच्या कलेचा आधारे केले पाहिजे हा नेमाडेंचा विचार मुळात एलियटपासून सुरु होतो.


थोडक्यात माझ्या मते आधुनिक कवितेची टाइमलाईन पुढीलप्रमाणे मांडता येईल

एडगर पो -तुकाराम पूर्व आधुनिक 

बोदलेयर १८४५ पासून प्रकाशित कविता काव्यसंग्रह १८५७ Les Fleurs du mai (The Flowers of Evil

व्हिटमन १८५० च्या आसपास १८५६ ग्रास ऑफ लीव्ज 

रॅम्बो

रिल्के पॉल व्हॅलरी (ह्याचा पु शि रेगेंच्यावर जबरदस्त प्रभाव आहे ) मेलार्म वैग्रे अनेक

अशी आहे ह्यात एलियट खूप लेटकमर आहे
आणि इंग्लिश लेटकमर असल्यानेच आपण भारतीय लेटकमर झालो आहोत

श्रीधर तिळवे नाईक















Comments

Popular posts from this blog