धूर्तता  , हुशारी , बुद्धिमत्ता ,प्रज्ञा आणि परमप्रज्ञा श्रीधर तिळवे नाईक

अलीकडच्या काळात धूर्ततेला आणि हुशारीला म्हणजेच स्मार्टनेसला जरा जास्तच महत्व आल्याने धूर्तता
, हुशारी , बुद्धिमत्ता ,प्रज्ञा आणि परमप्रज्ञा ह्यांच्यातील फरक सांगणे गरजेचे झाले धूर्तता म्हणजे येनकेनप्रकारे यश मिळवण्यासाठी व्यवहार व दुनियादारी ह्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी पुरेपूर वापर करणे धूर्त  मनुष्य म्हणजे धूर्ततेचा  पुरेपूर वापर करून त्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ! मी प्रयत्न करणारा म्हणतो कारण हल्ली बहुसंख्य लोक धूर्त  झाल्याने अंतिम लढाईत जो अधिक धूर्त  व नशीबवान तो विजयी ठरतो हुशारी मध्ये व्यवहार आणि दुनियादारी कशी हाताळायची हे कळणे धूर्ततेजवळ नीतिमत्ता नसते हुशारी मात्र कायद्याच्या चौकटीत सर्व बसवून किंवा कायद्यातील पळवाटांचा पुरेपूर फायदा घेणारी असते बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या गोष्टीला समजून घेण्याची आकलन करण्याची क्षमता ! व्यवहारात अनेकदा धूर्तता  आणि हुशारी बुद्धिमत्तेवर मात करते आणि धूर्त व हुशार माणसे बुद्धिमान माणसावर मात करतांना दिसतात कारण बुद्धिमान माणसाला अनेकदा जगरहाटी व व्यवहार कळत नाही किंवा कळाला तरी वळत नाही प्रज्ञावान माणसाला इंग्लिशमध्ये जिनियस असा शब्द आहे प्रज्ञेकडे बुद्धिमत्तेबरोबर प्रतिभाही भरपूर असते त्यामुळे ती सृजनशील असते अनेक वैज्ञानिक तंत्रवैज्ञानिक चिन्हवैज्ञानिक हे प्रज्ञावान असतात परमप्रज्ञा म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडली गेलेली प्रज्ञा ही फक्त मोक्ष (मुक्ती निर्वाण ) मिळालेल्यांनाच प्राप्त होते संपूर्ण ब्रह्मांड हे एक परममहामुद्रा एक परममहामेंदू म्हणून काम करत असते परमप्रज्ञेला हुशारी आणि धूर्तता  व्यवस्थित कळत असते पण ही हुशारी आणि धूर्तता ज्या असोशीमधून (भुकांच्यातून ,तृष्णांच्यातून व निकडीतून ) जन्मलेली असते तिचे तिला आकलन असते त्यामुळे ती करुणशील होऊन हुशार व चालाकं लोकांना माफ करत असते अर्थात जेव्हा तिला असं वाटते कि ह्या क्षमाशीलतेमुळे हुशार व धूर्त लोक सुधारणार नाहीत व मानवतेचा प्रचंड लॉस करतील तेव्हा ती अशा लोकांबाबत  कठोरही होते अनेकदा प्रज्ञेच्या व परमप्रज्ञेच्या मृत्यूनंतर धूर्तता व हुशारी तिने निर्माण केलेल्या संस्था आपल्या ताब्यात घेऊन त्यांना आपल्या हातातील खेळणं बनवतात प्रश्न असा असतो कि बुद्धिमान माणसं हे होऊ का देतात ? समाजात १० टक्के मंद आणि १० टक्के धूर्त आणि १० टक्के हुशार आणि  ६९ टक्के बुद्धिमान व १ टक्के प्रज्ञावान व परमप्रज्ञावान असे लोक असतात तरीही समाज हा १० टक्के धूर्त आणि १० टक्के हुशार अशा २० टक्के लोकांच्या ताब्यात का राहतो ? का ७० टक्के लोक ह्या २० टक्के लोकांचे दास्य पत्करतात ? वर्ण जात धर्म हे नेहमीच १० टक्के धूर्त आणि १० टक्के हुशार लोक वापरत राहतात आश्चर्याची गोष्ट अशी कि शासनसंस्थाही १० टक्के धूर्त आणि १० टक्के हुशार लोक स्वतःच्या ताब्यात ठेवतात त्यासाठी बुद्धिमान लोकांचा वापर करतात आणि बुद्धिमान लोक आपल्याला वापरू देतात

का ?

श्रीधर तिळवे नाईक




Comments

Popular posts from this blog