उत्तम बंडू तुपे : काट्यावरचे पोट शेवटी गेले श्रीधर तिळवे नाईक 


उत्तम बंडू तुपे गेले मराठीतला पोटी संस्कृतीतील एक दमदार कादंबरीकार काट्यावर पोट ठेवत नाहीसा झाला
साठोत्तरी पिढीने जसे मार्गी लेखक जन्माला घातले देशी लेखक जन्माला घातले तसे पोटी लेखकही जन्माला घातले मार्गी आणि देशी संस्कृतीत ज्यांचे पोट कापड आरोग्य शिक्षण आणि घर काट्यावरच असते अशा लोकांची संस्कृती म्हणजे पोटी संस्कृती होय मुंबईत धारावी संस्कृती किंवा अंडरवर्ल्ड किंवा शहरात वा गावात दलित आणि स्त्रिया ह्या ह्या पोटी संस्कृतीच्या पाया असतात तुपे हे गावातील दलित संस्कृतीतून शहरातील दलित संस्कृतीत दाखल झालेले लेखक होते ह्या दलित संस्कृतीचा पहिला गद्य अविष्कार ज्यांनी मोठ्या ताकदीने केला त्या अण्णाभाऊ साठेंच्या मांग गटातून ते आलेले होते पूर्वी गावात जसे महारवाडा असे तसे मांगवाडाही असे
औद्योगिक संस्कृतीत चांभाराबरोबर त्यांचेही उद्योगधंदे मोडकळीस आले आणि ते देशोधडीला लागले चांभार गांधीजींच्या नेतृत्वाखाली दुकानं टाकून थोडेफार सेटल झाले आणि काहींनी तर गांधीजींच्या संदेशानुसार अधिक मोठ्या धंद्यात प्रवेश केला महारांनी शिका संघटित व्हा लढा हा आंबेडकरांचा महामंत्र जपून शिकून नोकऱ्या मिळवून थोडाफार सेटल झाला पण मांगांना मात्र त्यांचा मार्ग सापडला नाही स्वतःला नवबौद्ध म्हणवून घ्यायचे नाही आणि हिंदू तर काहीच मदत करायला तयार नाही अशा अवस्थेत ते होते आंबेडकरांनी त्यांना मार्गदर्शन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण जी दरी रहायची ती राहिलीच ह्यावर उपाय म्हणून अण्णाभाऊ साठेंना मांग जगताचे जगतनायक बनवण्याचे व स्वतःची अस्मिता प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरु झाले ह्या पार्श्वभूमीवर तुपे जेव्हा मराठी दलित साहित्याच्या क्षितिजावर अवतरले तेव्हा त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण होते अण्णाभाऊंच्या निधनामुळे एक पोकळी निर्माण झाली होती आणि ती कुणीतरी भरून काढणे आवश्यक होते

तुपेंचे अल्पशिक्षित असणे त्यांना अण्णाभाऊंच्या वाटेने न्हेणारे ठरले अण्णाभाऊंची पैश्यांची गरज त्यांना प्रचंड लिखाण करायला भाग पाडत असे तुपेंनेही जवळजवळ ७०० कथा लिहिल्या शिवाय कादंबऱ्या !

साठोत्तरी सत्तरोत्तरी अशा दोन पिढ्यात नेमाडे चित्रे कोल्हटकर श्याम मनोहर नामदेव ढसाळ , दया पवार , केशव मेश्राम , रंगनाथ पाठारे वैग्रे निर्माण झाल्यावर मराठीत ऐंशोत्तरीची गद्य लेखन करणारी सतीश तांबे , राजन गवस , चारुता सागर , मेघनाद कुलकर्णी , मेघना पेठे , कविता महाजन , राजन खान अशी गद्य फळी निर्माण झाली त्यातील एक सशक्त गद्य लेखक म्हणून तुपे ह्यांचा उदय झाला ह्यातील राजन गवस उत्तम कांबळे आणि उत्तम तुपे ह्या तिघांनीही देवदासी ह्या पोटी संस्कृतीचे उत्खनन केले आणि त्यातूनच राजनची चौंडकं(१९८५) भंडारभोग  (१९८७)व तुपेंची झुलवा (१९८६)लागोपाठ आल्या शिवाय चारुता सागरच्या कथा आल्या

गावात सर्व काही आलबेल असतं ह्या रोमँटिक समजुतीला छेद द्यायला दलित साहित्याने आधीच सुरवात केली होती ह्या कादंबऱ्यांनी ह्या छेदाचा  परीघ वाढवला झुलवा तर इतकी गाजली कि त्यावर चेतन दातार ह्या आमच्या मित्राने झुलवा नावाचे नाटकच रचले ज्यातून मराठीला सयाजी शिंदे नावाचा एक अभूतपूर्व अभिनेता लाभला शिवाय सुकन्या कुलकर्णी ! सयाजीच्या अभिनयातील ऊर्जा आणि ह्या ऊर्जेचे त्याने केलेले संतुलन जोमदार होते वामन केंद्रेचे दोन बेस्ट डिरेक्शनपैकी हे एक (दुसरे एक झुंज वाऱ्याशी होते ) केवळ सयाजीसाठी मी हे नाटक अनेकदा पाहिले होते तुपेंची मूळ कादंबरी हीच आशयाबाबत प्रभावी होती देवदासी समाजात जन्मलेल्या आणि सुरवातीला देवदासी होणे नाकारलेल्या पण प्रियकराकडून हातोहात फसून शेवटी व्यवस्थेच्या वरवंटयाखाली येऊन निमूट आपले जातीकर्म स्वीकारणाऱ्या मुलीची ही कहाणी !

मात्र त्यांचे सर्वोत्कृष्ट पुस्तक झुलवा न्हवे जरी ते झुलवाकार म्हणून प्रसिद्ध होते
माझ्या मते त्यांचे सर्वोत्कृष्ट पुस्तक त्यांचे आत्मचरित्र काट्यावरची पोटं ! दलित संघर्षाचे स्वरूप किती बदलले किती नाही हे नेमकेपणाने अधोरेखित करणारे हे पुस्तक !

ज्याप्रमाणे जिवन्त असतांना साठेंच्यावर चर्चा झाली नाही त्याप्रमाणे तुप्यांच्यावरही चर्चा झाली नाही ह्या दोघांनाही अल्पशिक्षित असल्याने साहित्यात फिल्डिंग कशी लावायची ते माहीत न्हवतं ह्यातूनच मांगांना आंबेडकरवादापासून अलग करण्याची प्रोसेस जाणीवपूर्वक सुरु आहे असा युक्तिवाद पुढे आला आणि दलित साहित्य एकजातीकेंद्रित मुद्दामहून बनवण्यात आले आहे का असा प्रश्न निर्माण झाला

वास्तविक तुपे ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन लिखाण करत होते व्यवस्थेने दिलेली दुःखशीलता आविर्भाव न आणता ते पकडत अण्णाभाऊंच्या लोकशरण शैलीचा प्रभाव त्यांच्यावर होता पण अण्णाभाऊंचा वास्तवाचा वारसाही होता त्यामुळेच दलित वास्तववाद पुढे घेऊन जाण्यात त्यांचा नक्कीच वाटा आहे वास्तव आणि भावनाशीलता ह्यांचा एक अजब सांधा त्यांच्या गद्यात आहे तो कोणी पुढे घेऊन जाईल तर मला नक्की आवडेल

श्रीधर तिळवे नाईक










Comments

Popular posts from this blog