करोना, निर्मितीप्रक्रिया आणि खंडकाव्य श्रीधर तिळवे नाईक


निर्मितीप्रक्रियेचा वेग आणि ठहराव किती काळासाठी असावा हा एक सनातन वाद आहे ह्याबाबत माझे मत मी पुढीलप्रमाणे मांडले होते

"अनुभव येणे आणि अनुभव व्यक्त करणे ह्यांच्यातील अंतर किती असावं ह्याविषयी कुणीही कुणाला उपदेश करू नये एखादा कवी अनुभव येण्याबरोबर ताबडतोब व्यक्त झाला तर तो प्रतिक्रियावादी असतो असा कुणाचाच  गोंडस गैरसमज नसावा एखाद्या कवीची अनुभव रिचवण्याची एक पद्धत असेल आणि ती स्लो असेलही पण म्हणून तीच योग्य हे कुणी ठरवलं आणि कोण ठरवणार ? "

दुसरी गोष्ट एखादा फास्ट मोशनवाला असला तरी प्रत्येकवेळी तो फास्टमोशनवाला राहील ह्याची काय खात्री आणि जो स्लो  मोशनवाला असला तरी प्रत्येकवेळी तो स्लो  मोशनवाला राहील ह्याची काय खात्री ? एकाच कलाकृतीतील अनुभवांच्याबाबत मोशन वेगवेगळी असू शकते तीव्रता अनुभव मुरून निर्माण होऊ शकते तशी तातडीमुळेही निर्माण होऊ शकते

सर्वसाधारणपणे २०१४ पर्यंत माझी कवितानिर्मितीची प्रक्रिया ही धबधब्यासारखी होती आल्या कि एकदम
 २४ २५ कविता किंवा  दीर्घकविता ! २०१४ नंतर अपवाद वगळता एखाद दुसरी छोटी वा दीर्घ कविता यायला लागली अलीकडे २४/२५  कवितांची निर्मिती एकाचवेळी होणे गायब झाले

कवितांच्या ओळी गुंजायला लागल्या कि मला कळतं धबडगा चालू होणार पावसाचे सुरवातीचे थेम्ब पडावेत तशे हे शब्दांचे थेम्ब असतात पण ह्यावेळी अचानक पसायदान टाईप दीर्घ कविता आली ही आल्यानंतर ताबडतोब दुसरी दीर्घ कविता आली आत्तापर्यंतचा अनुभव लक्ष्यात घेता हे सर्व  महाकाव्याकडे जाणार असं वाटायला लागलं मी आतापर्यन्त आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आणि श्रीवाहिनी अशी दोन महाकाव्ये लिहिली त्यानंतर हे तिसरे येते कि काय असं वाटायला लागलं करोनावर तिसरे महाकाव्य ही थोडी अजिब घटना होती कारण मी  अ डॉ हॉ का बा ना सु ना मध्ये व्हायरस हाताळला होता अनटचेबल नावाचा त्याच्यासारखाच करोना असल्याने  त्यामुळे नविन काय येणार हा प्रश्न होता माझ्या विद्यार्थ्यांनी ह्या अंगाने माझ्याशी फोनवर चर्चाही केली होती त्यामुळं नवीन सांगायला आता काय राहील हाच प्रश्न पडला ह्याशिवाय  ह्या पूर्वी  महामारीच्यावर ग्रेट कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या होत्या विशेषतः काम्युची प्लेग तेव्हा प्रश्न असा निर्माण झाला कि आत्ताच्या स्थितीत लिहावे  का आणि लिहिले  तर ब्लॉगवर वा फेसबुकवर टाकावे  का ?

ही स्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली कारण एरव्ही माझ्या  ब्लॉगवर काळ कुत्रंही फिरकत नाही त्यामुळं  काहीही टाकलं तरी चालायचं माझं वाचन काउंटिंग तीसच्या पलीकडे जायचं  नाही पण अचानक ह्या जानेवरीपासून ते  बदलायला लागलं  फेसबुकवरच्या लव्ह सेक्स एलसेट्राने ४०० पार केलेलें

अशावेळी लिखाण बेजबाबदार होणं परवडणारं नसतं विशेषतः मृत्यू समोर असतांना त्यामुळं मेडिकल टाळायचं असं ठरवलं मग मी सुसाटलो हळूहळू स्पष्ट झालं कि आपली पहिली कविता पसायदानासारखी आहे आणि दुसरी थेट मृत्युच्या डोळ्यात डोळा घालून बघणारी बाकी सर्व ह्या दरम्यान !

ह्यातील सर्वात विचित्र गोष्ट एड्सने गेलेल्या माझ्या दोन मित्रावरच्या दोन कवितांची जो विषय मी २९ वर्षे टाळला तो इतक्या वर्षांनी उगवून यावा

पहिल्या दोन कविता माझ्या आत्ताच्या आध्यात्मिक स्थितीने जन्माला घातल्या तरी माझ्या मित्रांवरच्या ह्या कवितांनी जुना श्रीधर जागा करून त्याला नायक बनवलं एका अर्थाने ह्यातला नायक हा १९८९ -९०चा हॉस्टेलमधला श्रीधर तिळवे आहे मी त्याला थांबवले नाही तो जसा येतोय तसा येऊ दिला

माझ्या आयुष्यात ह्यापूर्वी कधीही असं काही घडलं न्हवतं पण निर्मितीप्रक्रिया ही अशीच चकवा देत असते


मराठी साहित्यात चौथ्या  नवतेच्या बाबतीत घडलेली सर्वात विचित्र पण उत्तम  घटना म्हणजे आधीचे चोखाळलेले मार्गच उपलब्ध नसणे ही होय साहजिकच आधीच्या नवतातील  अनेकांना तिसऱ्या नवतेचे  देशीवाद , पोस्टमॉडर्निझम , पोस्टकलोनियलिझम वैग्रे  पाश्चात्य देशांनी आधीच नीट तयार केलेले  मार्ग अवलंबायची सोय जशी होती तशी आम्हाला नाही   ह्यापूर्वीच्या  प्रबोधनवादी नवतेपासून रोमँटिक वा  मॉडर्न नवतेपर्यंत सर्वांना आधीच उपलब्ध असलेल्या मळवाटा आमच्यासाठी आधीच उपलब्ध नाहीत त्यामुळे जगभरातले चौथ्या नवतेचे कवी करोनाचे त्यांच्या कवितेत काय करतायत मला माहीत नाही मी फक्त माझ्यापुरतं काय करायचं ते केलं

ह्या कलाकृतीचं नेमकं स्वरूप काय असणार हे मला माहीत न्हवतं आणि नाही मी सृजनप्रक्रियेला कंट्रोल करायच्या भानगडीत पडत नाही ती महाकाव्य होणार कि खंडकाव्य होणार मला माहीत नाही  कारण दहा सर्गापैकी आठ लिहून तयार झाले फेसबुकवर टाकलेही गेले  व  उरलेले दोन सर्ग इथे टाकतो आहे ते नेमकं काय स्वरूप घेणार मला माहीत नाही बहुदा हे खंडकाव्य होईल असे सकृतदर्शनी दिसते आणि तसे झाले तर हे माझे पहिले खंडकाव्य होईल

मुळातच नाझींच्या छळछावणीत ज्यूंनी केलेल्या लिखाणासारखे हे काव्य आहे जिथे लिहिणारा जगणार आहे कि मरणार आहे हे लिहिणाऱ्याला माहित नाही शेवटचा मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघणारा सर्ग मात्र आपोआपच आला कारण मृत्यूच्या डोळ्यात डोळा घालून बघणे ही माझी प्रवृत्ती आहे

ह्या काव्याचा शेवटचा संदेश घाबरू नका हाच आहे

श्रीधर तिळवे नाईक



     

Comments

Popular posts from this blog