शरावती इंगवले गेली आमच्या कोल्हापूरच्या कविमंडळातील एकुलती एक कवयत्री आणि चित्रकार गेली संवेदनशीलता हाच स्वभाव होऊन गेला आणि बेपर्वाई हीच मुख्य वृत्ती झाली कि जे बेबंद आयुष्य जन्मते ते शरावती सहज जगली वेदना झाल्या नाहीत असं नाही पण हे एक पॅकेज डील आहे ह्याची तिला पूर्ण कल्पना होती माझ्यावर तिचं बेइंतेहा प्रेम होतं आणि ह्या प्रेमानं मला जशी भरघोस आंघोळ घातली (तिच्यावरच्या एका कवितेत ती तांब्यानं मला न्हाऊ घालत नाही ती थेट नदीने मला अंघोळ घालते असं मी म्हंटल आहे ) तसं अनेकदा मला अडचणीतही आणलं तिचा पती राजकुमार यादव माझा जानी दोस्त होता आणि त्या दोघांचे आंतरजातीय लग्न मी माझ्या घरातच लावले होते माझा ह्या लग्नाला विरोध असूनही ! शेवटपर्यंत मी ही दोस्ती निभावली आणि दोस्तीतली सर्व कर्तव्ये इमानदारीने पार पाडली राजकुमारचा ऐन तारुण्यात झालेल्या मृत्यूने ही दोस्ती त्रिकोणी न राहता द्विकोनी झाली
आमची पिढी रजनीशांच्या पूर्ण आहारी गेलेली पहिली पिढी होती आणि राजकुमार शरावती आणि मी आम्ही तिघांनीही त्याकाळात जगण्यावर अनेक प्रयोग केले मी रजनीशांच्या मोहातून बाहेर पडलो पण हे दोघे बाहेर पडले नाहीत राजकुमारची रोमँटिक अध्यात्मिकता हीच शेवटी त्याची सर्वात मोठी शत्रू बनली तर शरावती हार्डकोअर अमृता प्रीतमची फॅन बनत गेली तिचा रोमांसिंग स्टोन कुठेच सेटल झाला नाही आणि २०१० पर्यंत मी तिचा सायकॉलॉजिकल नांगर म्हणून काम करत राहिलो तिचे रात्री अपरात्री येणारे फोन आणि तिच्या बोलण्यातला आवेग हा कायमच तिच्या प्रियकरांना काट्यासारखा टोचत राहिला त्यांच्यासमोरच मी माझ्या आयुष्यात फक्त श्रीधरवरच प्रेम केलं असं ती आवेगाने म्हणायची पण २००५ नंतर ती फोनवरून ह्याचे कन्फर्मेशन मागायला लागली आणि आमच्या संबंधांना माझ्याकडून वाळवंट प्राप्त व्हायला लागलं
मी आयुष्यात कधीही तिच्याशी कसलेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत तरीही आमच्यातले अशारीरी प्रेम कोल्हापूरला कधीही कळाले नाही ते कळाले होते फक्त तिचा पती राजकुमार यादवला आणि त्यामुळेच आम्ही तिघे न्यूडिटीपासून अमृता शेरगील राजनीशांच्यापर्यंत खुली चर्चा करत असू माझी मोक्षाची असोशी कळलेले हे एकमेव कपल होते . मराठी संस्कृतीत रजनीशवादी होऊन जगणे हे खायचं काम नाही हे दोघे तर कोल्हापुरात संपूर्ण शहर फाट्यावर मारून असे जगले शरावतीचा बेबंदपणा कोल्हापूरला झेपणं शक्यच न्हवता आणि राजकुमार फार लवकर गेल्याने त्याला त्याच्या अभावाची किनार होती
भारतीय संस्कृतीत पती , प्रियकर , जार , सखा आणि मित्र असे पाच प्रकारचे स्त्रीपुरुष संबंध आहेत आणि अनेक नाते संबंध आहेत शरावती नातेसंबंधात कधीच रमली नाही राजकुमार गेल्यावर पती गेला पुरुष जार म्हणून आमंत्रण देण्यात निपुण अशा लोकांना कसं हाताळायचं हे तिला नीट माहित होतं माझे तिचे संबंध हे सखा म्हणून होते सखा म्हणजे जो शरीरसंबंध ठेवत नाही पण पतीप्रियकर इतकाच महत्वाचा असतो महाभारतात असे नाते द्रौपदी आणि श्रीकृष्ण ह्यांच्यात होते मित्र म्हणजे ना शरीरसंबंध ना प्रियकर पतीइतके महत्व तेही तिच्या आयुष्यात विपुल होते पण आयुष्यातले एकाकीपण सरता सरत न्हवते त्यातून मग दारू प्रचंड वाढत गेली आणि ह्या दारुनेच अनेक आजारपणांना निमंत्रण द्यायला सुरवात केली त्यातच तिचा दिलदार आणि मनस्वी स्वभाव त्यामुळे पैश्याची उधळपट्टी ! माझ्या आयुष्यात मी दारूमुळं झालेली इतकी नासाडी बघितली होती कि मी शरीला दारू सोड असा धोशा लावला पण ती सुटली नाही मला भेटायचं असेल तर दारू पिऊन यायचं नाही अशी मग मी कण्डिशनच ठेवायला लागलो आणि एक अपवाद वगळता तिनेही ही अट कसोशीनं पाळली
आणि मग माझ्या एका मित्राने तिच्यापुढे स्वतःला जाळून घेतले आणि आमचे संबंध संपले संवेदनशीलतेकडून संवेदनशून्यतेकडे चाललेली ही वाटचाल आहे असं मला वाटलं मुळात असं काही होईल ह्याची तिलाही कल्पना नसावी नेमकं काय झालं हे मला कधीही कळलं नाही आणि आता कळणार नाही
तिच्या काव्यसंग्रह प्रकाशन संभारंभाला मी प्रमुख पाहुणे किंवा तत्सम काही असावं अशी तिची अपेक्षा होती मी जिथं माझ्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन सभारंभ करत नाही तिथे तिच्या काव्यसंग्रहाचे सभारंभ कसा करणार ?माझा युक्तिवाद तिला पटला नाही तिचा शेवटचा फोन मला शिव्या घालणारा होता एका घायाळ हरिणीसारखी ती बोलत होती मग आमच्या कॉमन मित्रांच्यापुढे माझ्या नावाचा उद्धार होणे अटळ होते मी ह्या शिव्यांना प्रतिक्रिया द्यायला नकार दिला तशी धार वाढत गेली एका अप्रतिम नात्याचा शेवट असा व्हावा हे दुःखद होतं
मला नेहमीच वाटतं कि चौकटीत न बसणाऱ्या स्त्रियांना शिव्या घालण्यात आपण सगळेच निपुण आहोत शरावती मूड असला कि मस्त स्वयपाक करायची पण नसला तर हॉटेलमधून मागव असं स्पष्ट सांगायची मला तिचा हा स्पष्टपणा आवडायचा तिची भावनांच्याबाबतची पारदर्शकता कमालीची होती आणि तीही मी समजून घ्यायचो राग आला कि राग द्वेष वाटला तर द्वेष ! मला हे आवडायचे तिची प्रतिभा बेताची आहे असं मी तिला सरळ सांगायचो चित्रकलेत लॅन्डस्केपमध्ये तिने बरे काम केले होते आपण अमृता शेरगीलच्या तोडीचे काम करू असा तिला विश्वास होता तो फळला नाही तेव्हा फ्रस्टेशन सुरु झाले मी चित्रकला सोडल्याबद्दल मला ती शिव्या घालायची पण मला माझ्या मर्यादा माहित होत्या
शरावती प्रस्थापित चौकटीत जगली नाही ती कायमच उतू जाऊन सांडत राहिली तिचा मनस्वीपणा आणि स्वार्थी वाटावा असा आत्मकेंद्रीपणा अनेकांना झेपला नाही पुरुषांना तिच्यामुळं उकळी फुटली आणि तिनं त्यांचा उकाळा केला आणि आता ती गेली राजकुमार शरावती आणि श्रीधर ह्या त्रिकोणातील दुसऱ्या कोनाचाही कायमचा अंत झाला
शरीला श्रद्धांजली वैग्रे आवडणं शक्यच नाही आम्ही भेटलो कि ती श्री म्हणायची आणि मी शरे म्हणायचो कधीकधी हे दोन शब्द बोलल्यानंतर आम्ही दोघे काहीच न बोलता स्तब्ध उभे राहायचो आता ती स्तब्धता अनंतकाळ झाली
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment