म सु पाटील गेले श्रीधर तिळवे नाईक
म सु पाटील गेले साहित्यपाटीलकीच्या सप्तायनातील आणखी एक आयतन गेले दुसरी आधुनिकतावादी नवता समीक्षेच्या क्षेत्रात सात कुलकर्ण्यांनी गाजवली तर तिसरी देशी नवता पाटलांनी !गंगाधर पाटील ह्या बिग बॉसच्या नेतृत्वाखालील ह्या पाटलांनी देशी साहित्याला प्रचंड जागा उपलब्ध करून दिली आणि त्यात मसुचे स्थान फार महत्वाचे होते १९८० नंतर देशीवादी साहित्याचे व्यासपीठ म्हणून उदयाला आलेल्या नियतकालिकात अनुष्टुभ हे केंद्रीय नियतकालिक होते व आहे ते तसे असण्यात मसु पाटलांचा वाटा अनन्यसाधारण होता.
मराठीत कुठल्याही नवतेचे प्रथम कुठलेतरी एक बंडखोर अ -नियतकालिक येते आणि मग एक केंद्रीय स्थानी एक त्या नवतेचे चेहरा बनलेले एक नियतकालिक येते फुल्यांच्या प्रबोधनवादी नवतेची सुरवात खुद्द त्यांच्याच नियतकालिकांनी झाली आणि पुढे अनेक साहित्यातील प्रबोधनवादी नियतकालिके जन्माला आली ह्या ब्राम्हणी नियतकालिकांनी तब्बल ७० वर्षे फुल्यांचे साहित्यिक कार्य गाडून टाकले आधुनिक नवतेत बंडखोर अनियत्कालिक होते चित्र्यांचे अभिरुची आणि चेहरा होते श्री पु भागवतांचे सत्यकथा !मर्ढेकरी कवितेला पुढे आणले अभिरुचीने सत्यकथेने वा मौजेने न्हवे पण लक्ष्यात कोण घेतो ?
देशी नवतेत अशोक शहाणे दिलीप चित्रे राजा ढाले ह्यांच्या अनियतकालिकांनी बंडखोरी केली आणि देशी नवतेचा सर्वसमावेशक चेहरा बनले अनुष्टुभ ! अनुष्टुभला चेहरा बनवण्यात म सु पाटील ह्यांचा सिंहाचा वाटा होता मराठीत बहुपद्धतीय समीक्षा करणारे जे स्कूल आहे त्याचा देशीवादी चेहरा म्हणजे म सु पाटील !
बहुपद्धतीय समीक्षक साहित्यात कलाकृतीची समीक्षा करतांना अनेक समीक्षा पद्धतींचे उपयोजन करतो म सु नीं आदिबंधात्मक संरचनावादी देशीवादी मानसशास्त्रीय संस्कृत अशा अनेक समीक्षापद्धतीचा अभ्यास केला होता आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या समीक्षेत पडले होते शेवटी शेवटी ते सर्जनसमीक्षा पद्धतीकडे वळले होते आणि सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध ह्या ग्रंथाला साहित्य अकॅडमी पुरस्कारही मिळाला होता
मसुंची आणि माझी ओळख सरोजिनी वैद्य ह्या माझ्या मार्गदर्शकांनी द ग गोडसे ह्यांच्यावर झालेल्या चर्चासत्राच्या निमित्ताने करून दिली होती त्याकाळी माझी देशीवादाची मांडणी पुढीलप्रमाणे होती
प्रबोधनवादी देशीवाद : बसवेश्वर व फुले
रोमँटिक देशीवाद : द ग गोडसे
आधुनिक देशीवाद : भालचंद्र नेमाडे व दिलीप चित्रे
त्यावर त्यांचा प्रश्न होता बसवेश्वरांचा मराठी साहित्याशी काय संबन्ध आणि माझे अत्यंत दर्पोक्तीपूर्ण व अहंकारी उत्तर होते " माझ्यामुळे आला आहे "
साहजिकच पुढे प्रश्न होता चक्रधर का नाही असा होता आणि माझे उत्तर होते चक्रधर फार बंदिस्त होते असे होते
" तू तुझी मांडणी करणारा लेख अनुष्ठूभला पाठव "
"मी साठोत्तरी ला लेख पाठवत नाही " हे माझे उत्तर होते मी हे उत्तर सहज म्हणून दिले होते पण ते माझे पॉलिसी बनून गेले पुढे जेव्हा विजय तापस हा ऎशोंत्तरी समीक्षक संपादक झाला तेव्हा मी अनुष्टुभला पहिला लेख पाठवला
खरेतर नवं अनुष्टुभला !
कवितेबाबत मात्र दोनवेळा माझे धोरण मी थोडे सैल केले कारण चौथ्या नवतेच्या कविता ह्या अंकातून येतील अशी खात्री देण्यात आली होती एकदा ती पाळली गेली एकदा नाही
एकदा चक्क वादच झाला आमच्या गावातील एका प्रेमप्रकरणावरून मी लिहलेली आमदारपुत्र आणि शहनाज डार्लिंग ही ग्रेस व पुशी रेगे ह्यांचे डिकन्सट्रक्शन करणारी कविता मी पाठवली राजपुत्र आणि डार्लिंग ह्या ग्रेस ह्यांच्या व शहनाज ह्या रेगेंच्या कवितांचे हे डिकन्सट्रक्शन होते ते त्यांना अतिशय आवडले होते आणि त्यावर स्वतंत्र पणे लिहिण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला अट एकच होती ती म्हणजे एक कडवे जे त्यांना अनावश्यक वाटत होते ते मी वगळावे मी त्याला नकार दिला मसुंनां नकार देणे हा त्या काळात अपराध असल्याने मी तत्कालीन अनेक मित्रांच्या शिव्या खाल्ल्या
माझ्या नकाराने मी एक अत्यंत अहंकारी इसम आहे ह्याची त्यांना खात्रीच पटली असणार असे वाटले असतांनाच आमची भेट झाली आणि काही घडलेच नाही अशा थाटात आम्ही बोलत राहिलो मी गंगाधर पाटलांच्या चिन्हमीमांसेची मीमांसा केल्याने ते प्रचंड खुश होते तर माझी नेमांडेंवरची टीका अधिक अकादमीक व्हायला हवी असे त्यांचे म्हणणे होते नेमाडे व गंगाधर पाटलांचं काय महत्व आहे ह्यावर मग आम्ही बोलत राहिलो
आमच्यातल्या आस्थेचा आणखी एक समान बिंदू होता प्रभाकर पाध्ये तुमच्या पिढीतील कुणीतरी प्रभाकर पाध्येंच्यावर लिहायला हवे असे ते म्हणायचे त्यावर तुमच्या पिढीचा बॅकलॉग अजून बाकी आहे असं मी म्हणायचो हा बॅकलॉग पुढे प्रभाकर पाध्ये : वांङ्मय दर्शन ह्या पुस्तकाद्वारे त्यांनी व गंगाधर पाटलांनी भरून काढला पाध्यांची प्रबोधनमीमांसा ही मराठीतील एक आगळीवेगळी मीमांसा असल्याने त्यांच्यावर खूप लिहिले जाणे आवश्यक आहे ह्यावर आमचे एकमत होते
त्याकाळात मी बुद्धाच्या तृष्णा विचाराचा वापर साहित्य समीक्षेत व्हायला हवा ह्या विचाराचा होतो आणि मी एक मॉडेलही तयार केले होते जे पुढे टीकाहारण ह्या ग्रंथात आले मसुंनी त्यांचे तृष्णा आधारित मॉडेल पुढे अकादमीक चौकटीत सादर केले जे महत्वाचे आहे ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोन्ही कवी साठोत्तरीचे ऑब्सेशन आहेत ह्यांची मसुंनीं केलेली मीमांसा देशीवादाला पुढे न्हेणारी आहे मुख्य म्हणजे हे विश्लेषण अकादमीक चौकटीत झाल्याने ते अधिक वस्तुनिष्ठ झाले आहे त्यात देशीवादाचा अविर्भाव नाही
पुढे जेव्हा त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जे चर्चासत्र झाले त्याचा विषय निर्मितिमीमांसा हा ठरला होता आणि नव्या पिढीच्या वतीने बोलण्याचा आग्रह मला झाला जो मला पूर्ण अनपेक्षित होता मी माझ्या कवितेची निर्मितिमीमांसा केली जी पुढे नितीन वैद्य ह्याच्या आशय मध्ये आली होती सर्जनाबद्दलच्या त्यांच्या ध्यासातूनच पुढे
सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध हा ग्रंथ सिद्ध झाला
आमचे संबंध कसे होते तर गुलाब व निवडुंगासारखे ज्यात मी काटेदार निवडुंग होतो तर ते गुलाबाप्रमाणे सॉफ्ट होते माझ्या रु बरोबरच्या संबंधाने ते समाधानी होते (ज्ञ आणि रु ह्या माझ्या आयुष्यातील दोन्ही महत्वाच्या प्रेयस्या त्यांना माहित होत्या ) पण माझ्यातल्या संन्याश्याने उचल खाल्ल्याने माझा ऐनवेळी रामदास होऊन मी पळ काढला आणि ते त्यावर नाराज झाले होते त्यांच्या अत्यंत सभ्य आणि संयत स्वभावानेच हे सम्बन्ध तोलून धरले असे म्हणायला हरकत नाही माझी असभ्यता त्यांनी कशी खपवून घेतली ते त्यांनाच माहित ! एखादा बाप एखाद्या बंडखोर आणि वात्रट मुलाकडे जसे पाहतो तसे ते पाहात असावेत
मला अनुष्टुभचे अंक मिळायचे नाही कारण स्थिर पत्त्याचा अभाव शेवटी एकदा त्यांनी बांधून तयार असलेले सगळे अंक मला लाईफ मेम्बर बनवून देऊन टाकले अनुष्टुभ हे देशीवाद्यांचे सत्यकथा आहे हे माझे मत त्यांना माहित होते तरीही मी अंक वाचावा म्हणून ते आग्रही होते अनुष्टुभ हे मार्गीसाठी प्रचंड खुले आहे असा त्यांचा दावा होता आणि तो खरा होता माझे ह्यावर उत्तर होते कि सत्यकथा ही रोमँटिक कवितेसाठी आणि देशी ग्रामीण साहित्यासाठी खुलीच होती कि ! त्यामुळे तिचा आधुनिकवादी चेहरा बदलत नाही त्याचप्रमाणे अनुष्टुभ ही प्रतिमांच्या बांधकामात अनेकदा अडकते आणि ह्या प्रतिमा ग्रामीण पृष्ठस्तरीय अनुभवाचा भाग म्हणून येतात म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन अनुष्टुभने का नाचावे ? अंतिमतः अनुष्टुभ देशीवादाचाच चेहरा ठरते . माझे हे म्हणणे त्यांना मान्य होते की नाही हे मला माहित नाही आणि आता उत्तर द्यायला मसु नाहीत आहे ती मसुंची समीक्षा आग्रह लावून धरणारी पण आक्रमक न होणारी मसुंच्या स्वभावाप्रमाणे असणारी
मसुंन्नी लांबा उगवे आगरी नावाचे कथन लिहून आपली पार्श्वभूमी सांगितली आहे अत्यंत दारिद्र्यातून पुढे आलेले असल्यानेच बहुदा त्यांना ग्रामीण कविंच्याविषयी प्रेम असावे नवीन कविंना प्रोत्साहन देण्याची त्यांची एक विशिष्ट धाटणी होती त्या धाटणीत मी बसलो नाही हे सुदैव कि दुर्दैव हे सांगणे महाकठीण
मराठी समीक्षेचा एक गहन पण सभ्य चेहरा काळाच्या कृष्णविवरात आता नाहीसा झालाय अरेरावी न करणारी पाटीलकी कायमची गेली
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment