विछंद : चौथ्या नवतेचा छंद श्रीधर तिळवे नाईक
अक्षरमात्रावृत्ते ही नैसर्गिक व विश्वीय स्वछंद हा सृष्टीय युगाचे मुक्तछंद हे प्रतिसृष्टीय युगाचे प्रोडक्ट असेल तर विछंद हा प्रतिसृष्टीचा शेवटचा व चिन्हसृष्टीचा पहिला छंद आहे १९८४ पासून मी तो वापरतोय १९९१ ९२ च्या पॉप्युलर प्रकाशनाने काढलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या संग्रहामध्ये षंढधर शून्यराम अस्तित्वे ह्या नावाची कविता विछंदातली कविता होती ही पुढीलप्रमाणे
षंढधर शून्यराम अस्तित्वे
''डोक्यावर आहे खुंटी मारल्यागत स्वर्ग
पायाखाली अजाण जमीन
मी श्रीधर शांताराम तिळवे
उर्फ षंढधर शून्यराम अस्तित्वे
बाहेर जायचं का ?''
''राजू , फिरून ये जरा ''
''काय घरात पडलायस भूकेसारखा ?''
''इथं सर्वच जातीधर्मवासियांना
प्रवेश मिळेल हां ''
''टेबलावर साली जगाची धूळ ''
''दोन भजी एक चहा आण ''
''साला प्रत्येकाचं लाईफ कांदाभजीसारखं
एक भजी दुसऱ्या भजीसारख नाही ''
''रेडिओवर रफी चौदहवी का चांद
गळ्यातून ओततोय चहात ,चहा प्या ''
'' लताचा गंधार म्हणजे …. ''
'' भीमसेन जोशींचा निषाद म्हणजे …''
''च्यायला !''
''भूखको साला मारती हैं आँतको ठण्डा करती हैं
अगर ये चाय न होती तो भूखे कहाँ जाते ?''
''हमभी फरमाते हैँ ''
''नाम ?''
''राजू दयेन्द्र ''
''फरमाईये ''
''सूर्यामध्ये आयुष्याचे कितने दिन मर गये
काळाचे किती हत्ती आतड्यातून गुजर गये ''
''व्वा !''
'' न जाने उसकी कितनोने **
फिरभी कहती हैं मैं हुं कुंवारी ''
श्शी !
''मैने जो डाला उसमे थोडासा पानी
कहने लगी हाय ! मेरी गयी रे जवानी ''
''अश्लील ! अश्लील !''
''वास्तववाद !''
''फुस्स !''
'' The life is the greatest joke
and wife is the best entertainment ''
''साली दहा रुपये दिल्याशिवाय
देत नाही मारायला बायको असून ''
'' स्त्रीमुक्तीची वाटचाल … ''
'' स्त्रीची चाल बघा मग वाटचाल …… ''
'' श्री काही सुचत का ?''
''हाथमे रुमाल लेकर आ रही हैं वोह
न जाने किसके कफ़नकी तैयारी हैं ये ''
''व्वा !''
'' और एक ''
'' चली गयी वो कुछ खुदको संभलकर कुछ हमे बदलकर
हम तो खडे रहे थे जैसे जिंदगी जा रही थी अपनी ''
'' इंग्रजी रद्द झालीच पाहिजे ''
''इंग्रजी लावणी ऐकणार का ?''
''या रावजीची चाल लावायची ''
''oh my dear , come here
I 'll give my love ,
love , love , love ,
please come in my , please come
in my , come in my cave
Oh My dear …. ''
'' आपुन साला जाणार कुठ ?''
''बॉर्न सर्टिफिकेटपासून डेथ सर्टिफिकेटपर्यन्त ''
''श्री बीए तरी नीट कर ''
'' एकच प्यालाची वाट लावली वरदन ''
'' गडकऱ्यान्च्या प्यालाला शांति लाभू दे ''
''अमिताभचा एक डायलॉग ,
मेरे ज़ख्म जल्दी नहीं भरते ''
'' संजीवने खल्लास किया रे त्रिशूलमे ''
''एकदम खल्लास ''
'' ह्या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे ''
'' श्शी ! कुठ काय लिहितात कार्टी ?''
''होतीच ना ही कोरी पाटी ?
आम्हीच भरली ती अंधारान …. ''
'' लोकसंख्येचा प्रश्न …''
'' युवक एकता झिंदाबाद ! ''
'' मी बिस्मिल्ला खान ऐकणार आहे आज ''
''इंदिरा गांधीकी जय ''
''तुमच्या …. च्या *च्चीची जय *डेच्यानो ''
'' दम मारो दम…. ''
'' जन गण मन …… ''
'' हरे राम हरे कृष्ण …. ''
''झीनतच्या मांड्या …. ''
'' विझत चालली साली कम्युनिस्ट क्रांतीसारखी …. ''
'' स्त्रीमुक्ती ……. ''
''पाणी !पाणी !''
''आनंदयात्री गावा गाणी ''
''खुर्चीच आमची तुमची राणी ''
''तत्वज्ञान आवश्यक …… ''
'' संशयवादी होतो लोक मृत्युनंतर म्हणाले
ईश्वराला मृतात्म्याकडून शांती मिळू दे ''
'' व्वा तिळवे ! कुठून उचललात हो ?''
''गंगे , परसाकडला माझी पाळी हाय सांगून ठेवते …''
''तुमबिन जाऊ कहा दुनियामे आके … ''
''गंगे , आली पाळी …''
'' कुछ ना फिर चाहा सनम तुमको चाहके … ''
'' म्युनिसिपालटीचा मुडदा बशिवला ह्या …. ''
'' पाणीबी वहात नाय नळातन … ''
''काय रे ही इंडिया ?''
'' घाम फुट्या साला … ''
'' अनुप जलोटाची चांद अंगडाइया लावा जरा ''
'' कथेला जाम विषय ''
'' मॉडर्न पेंटिंग … ''
''कागदावर मुता दोन मिंट
जे तयार होईल ते मॉडर्न पेंटिंग ''
'' आन्तरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी
अलिप्तता राष्ट्रांची स ………''
'' टै टै टै ....... ''
'' मी म्हणते रडवी पोर आणावीत कशाला ?''
''कवी का ?''
''हैलो , हैलो ,
हरवलेले शब्द एका *नीत सापडले
झवा आणि घेवून जा ''
'' हैल्लो , जपत जावा शेठजी
साखरेचा भाव तुमच्या प्रकृतिवर ''
''भगवा झेंडा पडला ... ''
'' लाल हजर आहे ''
'' लाल पडला ..... ''
'' भगवा हजर आहे ''
'' hello डार्लिंग … ''
'' निरोध विसरलात ना ?
किसेस घ्या फक्त . कुटुंब नियोजन आहे . ''
'' संभोगातून समाधी हा भगवान …''
'' बॉल काय आहेत रे ? बाप रे बाप ! …. ''
''अक्षरश : हिमालय ठेवल्यासारखा वाटतोय. ''
'' हिमालयातील संन्यासी लोकांनी … ''
'' विसंगतीतून सुसंगतीकडे जाण्याचा
मानवाचा सनातन प्रयत्न आहे हे मिस्टर …… ''
''कुठला + डेचा बोलला हा … ''
हुश्श !
शून्य !
शून्य !
शून्याबाहेर शून्य .
शून्यात शून्य .
शून्यही शून्य .
पू
र्ण
वि
रा
म .
श्रीधर तिळवे नाईक
एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार
पॉप्युलर प्रकाशन १९९१-९२ ह्या कविता संग्रहात प्रकाशित
माझ्या विछंदाची प्रेरणा मला गाहा सत्तसई मधून मिळाली होती हा एक एक्सट्रा ऑर्डीनरी फॉर्म होता प्रत्येक गाथा स्वतंत्र होती तरीही संपूर्ण सत्तसई एक विशाल कविता वाचल्याचे फिलिंग देत होती असे काही करता येईल का असा कवी म्हणून मला पडलेला प्रश्न होता गीतेचे श्लोक ही दुसरी प्रेरणा सत्तसई चे एका गाथेतून दुसऱ्या गाथेकडे जाणे आणि गीतेतले एका श्लोकातून दुसऱ्या श्लोकाकडे जाणे अभूतपूर्व होते ( गीतेतल्या आशयाला माझा ठाम विरोध आहे पण तो वेगळा मुद्दा आहे ) आणि वैष्णव एकात्म प्रत्यय !
ह्यातूनच माझ्या वि छंदी कविता जन्माला आल्या आणि त्यातील एक षंढधर शून्यराम अस्तित्वे ही एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगारमधून प्रसिद्ध झाली ह्या कवितेचे मूल्य फक्त केशव मेश्रामांना कळले होते
आणि ते त्यावर लिहिणारही होते पण ते झाले नाही नामदेव ढसाळांचा वारसा पुढे गेला तर तो अशा नव्या प्रयोगांनी जाईल असे ते मला म्हणत मतभेद असूनही त्यांचा चौथ्या नवतेला पाठिंबा होता प्रॉब्लेम मलाच होता साठोत्तरींना जास्त भेटायचे नाही शक्यतो टाळायचे ह्या माझ्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका मेश्रामांच्या बरोबर असलेल्या माझ्या नात्याला बसला आणि ह्या कवितेवर त्यांच्याकडून लिहिणे झाले नाही
विछंदात सर्व तुकडे आपल्या आपल्या जागी स्वतंत्र असतात आणि प्रत्येक तुकडा हा मुक्तछंदात किंवा गद्यात असतो एखादा तुकडा लिरिकलही असू शकतो आणि आयुष्याचे फ्रॅगमेंटेशन अधोरेखित करणे हा हेतू असतो माझा प्रयत्न फक्त उत्तराधुनिक फ्रॅगमेंटेशन करणे हा न्हवता तर फ्रॅगमेंटेशनचे इंटिग्रेशन करण्याचा होता एका अर्थाने इंटिग्रेटेड फ्रॅगमेंटेशन करण्याचा हा प्रयत्न होता आणि तो सरळ सरळ माझ्या आध्यात्मामुळे आला होता विछंदाने फक्त फ्रॅगमेंटेशन दाखवू नये तर त्याचे जाळे बांधून ते सादर करावे असे माझे मत आहे
विछंद हे छंदाचे नवे तंत्र आहे स्वछंद , मुक्तछंद ह्यांच्यानंतरचे ! मी ते अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वापरले आहे माझ्या अ ड़ॉ हॉ का बा ना सु ना मध्ये विछंदातल्या अनेक कविता आहेत एक नमुन्यादाखल देतो आहे म्हणजे ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल
पाऊस पडतोय आणि मी माझी चड्डी पावसाळ्यात वाळत घातलीये
मी एका अशा जगात जगतोय जिथे संगणक खुळखुळतायत
आणि बाळबोध दिसतायत
पेजर कधीही हरवतायत लोक ते शोधण्याचा भानगडीत
न पडता घरी परतायत त्यांना पेजरनंतर त्यांचा नंबर लागेल
अशी भीती वाटते
मी हातावर आकडे मोजतोय आणि तरीही
हातचा एक
हाताशी लागत नाही
हात्तीच्या !इतकंच ना ?
मग हातचा एक म्हणून हत्ती दे .
शेवटी आपला देश हत्तींचा आणि आंधळ्यांचा आहे आपणास
त्याचा अभिमान वाटला पाहिजे
हा fan कसा ऐटीत hat घालून बसलाय
माझे केस उडवत
बायका हातची काकणे आरश्यासारखी दाखवत
त्यात standard ऑफ लिविंग दिसते म्हणे
तू माझा पेजर आहेस आणि सूर्य तुझ्यासाठीही उगवतोच
माणसांना जगातली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी चाललीये असं वाट्त
ह्या सहस्त्रकाचा अंत माझ्या सावलीत हलतोय
जी बाई चांदतारे तोडून आण म्हणते ती ढगात असते
डोंगर नांगर टाकून बसलेत
आणि समुद्र त्यांच्यापासून फक्त दोन मैलावर त्यांची वाट पाहतोय
हे त्यांना माहित नाही
पाय तुम्हाला तिथेच पोहचवतात जिथे तुम्हाला पोहचायचे असते
मात्र तुम्ही पोहचलेले त्यांना आवडत नाही
पाय खऱ्या अर्थाने '' पहुंचे हुए '' असतात
रेल्वे स्टेशनचे पूल
आणि तुझ्या कानातले डूल
रेल्वे आली कि
सारख्याच इंटेन्सिटीने थरथरतात
विमाने उडतायत
सांताक्रुझच्या डोक्यावरून
सांताक्रुझच्या पायाखालून
काय उडत असेल ?
हरवलेल्या वस्तू शोधून न काढण्यात महाराष्ट्र पोलिस एक्स्पर्ट आहेत
नुक्ताच खिडकीतून बाहेर आलेला हात कुंडीला पाणी घालणारा
शब्द
हवेतच
असतात
जे जिभेला आवडते ते आरोग्याला नेहमीच हानिकारक असते
सावल्या बॉडीच्या मर्जीशिवाय हलूच शकत नाहीत
माणसाचे जमिनीवर गुरुत्वाकर्षणी प्रेम आहे म्हणून त्याला घर लागते
खरा मजला एकच -ग्राउंड फ्लोर
बाकी सगळे हवेतले इमले
आवश्यक तेवढ्याच वस्तू गोळा कर
आवश्यक तेथेच /तेवढ्याच /तेव्हाच वापर
UNDERWEAR DREAMS and V I P UNDERWEAR
शेवटी मी शिकलोच
जे शिकवलं गेलं
Now Let Me Unlearn
एक माणूस कोळश्याने निसर्ग काढतोय
अश्रूंना कणा नसतो , डोकं नसत , फक्त हृदय असत
ते वाहतात तेव्हा संपूर्ण वाहतात
गांडीवर टाटू काढून घेणाऱ्यांना बहुधा निसर्गाचं खोदकाम पुरेसं वाटत नसावं
पाठीवर झोपावं कि पोटावर झोपावं
दोन्हीत फरक काय ?
झोपण्याच्या वेळीच आपण नेमके जागे कसे ?
श्रीधर तिळवे -नाईक
उत्तम विछंद कवितेचा नमुना म्हणून मी सलील वाघच्या भूर्जपत्रे ह्या कवितेचा उल्लेख करेन ती त्याच्या रेसकोर्स आणि मैदान ह्या काव्यसंग्रहात आहे ही कविता पुढीलप्रमाणे
विछंदी कवितेचा पुढचा टप्पा मी अचानक गाठला तो वीछंदी गझला लिहून जिथे माझ्या मुक्त गझलाच पचलेल्या नाहीत तिथे ह्या गझला पचणे कठीणच मी ह्या गझलांचा एक नमुना इथे देतो
गझल ३
कपडे आज फाटले ती उद्याची फॅशन झाली
काळीज फाटले ते भूतकालीन झाले १
मी ज्योक केले तेव्हा त्यांनी आईस्क्रीम खाल्ले
अश्रू मात्र माझे बिसलरी झाले नाहीत २
फेक होण्याचे लायसन सर्वांना मिळाले
मी ओरीजनल माझा काळाबाजार झाला ३
मेंदूत ज्याच्या त्याच्या निगोशियेशन्स चाललेल्या
जो तो बाजारात फुलटाईम सेल्समन ४
हा लॅपटॉप न्हवे हा तर नव्या युगाचा पोपट
हा तेच बोलतो आहे जो डाटा कोंबलेला ५
आजचे मॅनिप्युलेशन उद्याचे आर्थिक धोरण
जे साधे सरळ आहेत त्यांची नोट फाटकी ६
प्रश्न असा कि मराठीत विछंद का रुजला नाही ?
साठोत्तरीने विछंदाला कधीच पाठिंबा दिला नाही कारण त्यांनी तो जन्माला घातलेला नाही साहजिकच जे जे आपण जन्माला घातलेलं नाही त्याचा प्रचार होऊ द्यायचा नाही हे साठोत्तरीचे धोरण त्याच्याच आधारे ह्या साठोत्तरी देशीवादी लोकांनी साठोत्तरीचे एक्स्टेन्शन म्हणून वावरणाऱ्या सर्व नव्वदोत्तरींना पाठिंबा दिला आणि जे त्यांचे एक्स्टेंशन म्हणून वावरले नाही त्यांची मारायचा प्रयत्न ह्या पिढीने केला बंडखोरीचा कणा फक्त मान्यतेपुरता ताठ ठेवणाऱ्या कविंनी ही गुलामी स्वीकारली खरी पण त्याने मराठीचे अतोनात नुकसान केले आहे
अपेक्षा होती एकविसाव्या शतकातील कविंच्याकडून पण त्यांनाही बहुदा इन्स्टंट मान्यता हवी आहे असं दिसतं नवीन काही काम करण्याऐवजी देशीवाद्यांनी दिलेले फॉर्म गिरवण्यातच हीही पिढी रमल्याने बहुदा विछंदाकडे
दुर्लक्ष्य झाले असावे असो
श्रीधर तिळवे नाईक



Comments
Post a Comment