धुनकीचा किडा श्रीधर तिळवे नाईक

काल प्रणव सुखदेव ने सुजित फाटक ची कविता टाकली आणि एका नव्या कवीचा शोध लागला नेटवर शोधतांना तो गिटारीच्या लयकारीवर कविता सादर करतो असे लक्ष्यात आले आणि मग कोल्हापूरचा धुनकीचा किडा आठवला आमच्या सांस्कृतिक समूहात सुरवातीपासूनच संगीताला असाधारण महत्व होतं निनाद , श्रीनिवास , अवधूत आणि मी असे गाणारे तर अजय कोंडेकर , चंदू कागले (ह्याने आता कोल्हापुरातील गावरान मिसळ काढली ) असे वाजवणारे होते संगीताच्या ह्या किड्याला रॉकचा चढावा चढला कि जो किडा तयार होई तो धुनकीचा किडा होय आम्हा गोवेकरांना हा किडा भारतात सर्वाधिक चावला कारण पोर्तुगीज प्रभावामुळे  गिटार हे गोव्याचे प्रमुख वाद्य झाले आणि बँडची झुंबड गोव्यात सर्वाधिक उडाली गोव्यात आमच्यासाठी गिटार हे एक रिलिजियस वाद्य आहे मराठी कविंच्यात गिटारबद्दल जे ऑब्सेशन आहे त्यात ह्या रिलिजियस अँगलचा अतापताही नसतो असे माझे निरीक्षण आहे मी चेन्जसारख्या अनेक कवितात ती जपण्याचा प्रयत्न केला होता

आमची बिटल्सपासून सॅटरडे नाईट फीव्हरपर्यंत अधाशासारखे संगीत ऐकून पागल झालेली एक पिढी त्यावेळी उदयाला आलेली होती रॉक स्टायलीत जगणं महान मानणारा हा किडा मुंबईत आल्यावर बँडच्या लयकारीत धुमायला लागला एकीकडे गुलाम अली पंकज उधास तर दुसरीकडे धुनकीवाले बँड माझ्या तत्कालीन डॉकटर  सर्कलनं एक बँड काढला होता आणि माझा आत्ताचा डेंटिस्ट मित्र त्यावेळी त्यात गिटार वाजवायचा पुढे सुजित शेट्टी बापी टुटूल ( सरकारचे बॅकग्राउंड ह्यांनी दिले होते )ह्यांच्या मैत्रीने  हा किडा सांभाळला ज्याला आम्ही प्रेमाने जाड्या म्हणायचो व बच्चा समजायचो त्या अमित त्रिवेदीने पुढे बॉलिवूड गाजवले बापी टुटूलनीं माझ्या काही असाइन्मेण्टना म्युझिक दिले

ह्या काळातले वातावरण रॉक ऑन ह्या चित्रपटात बऱ्यापैकी आले आहे हा चित्रपट आमच्यासारख्या अनेकांना नॉस्टलजिया देऊन गेला होता सुजित फाटकला पाहतांना त्या काळाची आठवण आली

कवितेत ही धुनकी अवतरते ती लिरिकल प्रयोग करून सुजितच्या कवितेतही ही लिरिकलता आढळते पण ह्याला मर्यादाही येते तुम्ही जर नवीन चाली शोधू शकला नाही कि रिपीट व्हायला लागता अशावेळी थांबण्याचे विजडम तुमच्याजवळ असेल तर मनोहर ओक सारखे तुम्ही थांबता सुजित ह्या विजडममुळे थांबलाय का ?

अनेक धुनकीकिडावाले कवी हे मूलतः रोमँटिक असतात आणि मग अपरिहार्यतेने भावबंबाळ प्रतिमावादाला बळी पडतात सुजितचे ग्रेसकडे वळणे त्यातून जन्मलेले आहे का ? कि ग्रेस फक्त ऑडियन्सला अट्रॅकट करण्याची लकब आहे ? तसे असेल तर धुनकीची मिजास कवीत उरली नाही आणि तो लोकमान्यतेकडे वळला असे मानायचे काय ?कि त्याला गायक म्हणूनच मान्यता हवी आहे असं मानायचं ?

धुनकीच्या किड्यातून जन्मलेल्या शोकांतिका पाहून व त्यातील बिटलिजमला ,   रॉकरोमँटिसिज्मला उतारा म्हणून रॅप अवतरले रॅप हा प्रोटेस्ट होता मी दंगा ( ही सौष्ठवच्या पहिल्याच अंकात टाकली होती ) ह्या बायकांना आणि शहरे शहरे ह्यासारख्या कवितामध्ये त्याचा वापर केला होता ( ह्या कविता कव्ही ह्या काव्यसंग्रहात आहेत ) पारंपरिक पोस्टमॉडर्न प्रोटेस्टिक रॅपला नाकारून नवा डिस्क्रिप्टिव्ह इंटिग्रेटेड रॅप जन्माला घालण्याच्या शक्यता शोधणे असा त्यावेळी करंट होता वास्तवाचा लिरिकल तुकडा भारतीय पद्धतीने निर्माण करण्याची धडपड त्यात होती पुढे नज्म सारखा प्रकारही रॅपल करण्याचा प्रयत्न मी बांधकाम चालू आहे ह्या कवितेत केला होता ( अभिधा ९६)

लिरिकलतेबाबत काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आवश्यक आहे

१ लिरिक्स (गीते) म्हणजे लिरिकल कविता न्हवे लिरिक्स ही प्राचीन काळापासून लिहिली जातायत लिरिकल
)कविता ह्या आधुनिक कवितांचा भाग म्हणून जन्मतात ह्याचा अर्थ आधुनिक गीते नसतात असा नाही मात्रा आणि अक्षरांची बंधने पाळून आधुनिक गीत लिहिणे शक्य आहे

२ लिरिकल कविता छंदता जपते  पण छंद जपत नाही मात्र ती मुक्त छंदही असत नाही ती गाता येते पण तिचे गाणे मीटरमध्ये बसणारे असेलच असे नाही सुजितच्या दोन मराठी कविता मी अशा युट्युबवर  ऐकल्या आहेत

३  आधुनिक संवेदनांची जोपासना त्यात असते आणि त्यांचा अविष्कारही असतो गझल नज्म वैग्रे पारंपारिक फॉर्म सैल करून ती वापरू शकते किंवा काही पाश्चात्य सैल  फॉर्म ती वापरू शकते


आता प्रश्न नवीन पिढीचा आहे प्रणव आणि नितीन म्हणतात त्याप्रमाणे फेसबुकवर एकमेकांचा शोध लागलेली ही पिढी आहे आणि नितीन वाघचा अपवाद वगळता मलाही त्यांचा शोध फेसबुकवर लागलेला आहे  (प्रणवच्या मते सतीश तांबे बाबा वैगरेही त्याला फेसबुकवरच भेटलेत )आश्चर्यकारकरित्या नितीन प्रणव ओंकार सुजित ह्या साऱ्यांनाच लिरिकलचे आकर्षण आहे आणि त्यांच्यातला कॉमन फॅक्टर धुनकीचा किडा आहे हे लोक  लिरिकलच्या काही नवीन शक्यता शोधतायत ही आनंदाची गोष्ट आहे सुजित फाटकची कविता ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर पाहिली पाहिजे मला स्वतःला प्रणवचे लिरिकल प्रयोग अतिशय आवडतात त्याची विविधता दिलखेचक आहे सुजीतची शरीराच्या वळणावरचे नियॉन्स मला अतिशय आवडलीये त्याची सुरवातच अशी आहे

शरीराच्या वळणांवरचे नियॉन्स रिकाम्या कॅफेमध्ये तिच्या विचारात असावं तसे नियॉन्स चमकतात रस्त्यांवर पूर्वाचे इंग्लिश आवाज धुरामधून ऐकू येत राहतात वापरले जातोय हे लक्षात आल्यावर एक हात सुसाइडवर दुसरा तिच्या केसात यूरोपियन ड्रीम्स उमटतात इंडियन डोळ्यात ती जाईल ती जात्येय ती गेल्येय खरं तर शेवटच्या ब्लूप्रिंट्स वाऱ्यात उडताएत शहरभर मी बघतो नियॉन्स तरंगत असलेले तिच्या शरीराच्या वळणांवर

ह्यातली लिरिकलता उत्कृष्ट आहे
विशेषतः
एक हात सुसाइडवर दुसरा तिच्या केसात यूरोपियन ड्रीम्स उमटतात इंडियन डोळ्यात

ह्या ओळी जीवघेण्या आहेत
पण पुढे त्याने यूरोपियन ड्रीम्समुळे इंडियन डोळ्यातील मराठीत लिखाणच बंद केले आहे काय रॉक ही आधुनिकता असेल तर रॅप ही उत्तराधुनिकता होती सुजित रॅपकडे का गेला नाही ?असे  प्रश्न पडलेत  चार पाच कविता लिहून गायब झालेल्या कवीचे काय करायचे ? त्यामानाने नितीन प्रणव ओंकार सत्यप्रकाश ह्यांचे सातत्य जास्त महत्वाचे आहे माझी सुजीतला विनंती आहे कि त्याने आणखी लिहावे मराठीतही लिहावे

मर्ढेकर व करंदीकरांनी मराठी अभंग ओवीचे आधुनिकीकरण घडवले जे देशीवाद्यांनी अधिक देशी करून देशी आधुनिक लिरिकलता घडवली माझ्या समकालीनांनी लिरिकलकडे फारसे लक्ष्य दिले नाही ( ही फक्त माझी तक्रार नाही दर्शनच्या अंकात वसंत पाटणकरांनी आमच्या पिढीवर ही टीका केली आहे )आणि ज्यांनी लक्ष दिले त्यांनी पारंपरिक दर्शनच्या अंकात आकारातील अभन्ग गझल व नज्म मधेच समाधान मानले त्यांना मुक्त करण्याची  माझी धडपड होती ती किती फळली कुणास ठाऊक मात्र आत्ताची ही नवीन पिढी लिरिकलचे स्वतःचे काही प्रयोग सादर  करत असेल तर तिला दाद देणे अत्यावश्यक आहे ज्या मुक्ततेचा मी आग्रह धरला तो ह्या पिढीने फार तीव्रतेने लावून धरलाय असं वाटतं आमच्यापेक्षा ही पिढी चौथ्या नवतेची कविता अधिक सशक्तपणे लिहिणार हा माझा सिद्धांतच आहे तो जर ह्यांच्या कवितांनी सिद्ध झाला तर माझ्याहून  आधिक आनन्दी कोण असणार ?

श्रीधर तिळवे नाईक

सुजित फाटक हा मला तुझ्यामुळेच माहित झाला त्यामुळे त्याच्या वैयक्तिक बाबीवर मी लिहू शकत नाही मला त्याच्या युट्युब संकेतस्थानावर चार पाचच मराठी कविता दिसल्या दोन तीन महान कविता लिहिणाऱ्यांच्यावर मी एक स्वतंत्र लेखच लिहिला होता . म्हणजे अंतरिक्ष फिरलो पण गेली ना उदासी फेम म म देशपांडे किंवा गर्दीला विशेषण एकच - खुनी फेम श्रीधर शनवारे सुजित असा नसला तर आनंदच आहे 

लिरिक्स आणि लिरिकलला नाकं जाहीररीत्या मुरडली ती हेमंत दिवटे आणि सचिन केतकर ह्यांनी मुंबई विद्यापीठातल्या विद्यापीठाच्या काव्योत्सव २००७ ह्या  कार्यक्रमात आणि तू म्हणतोस तसे कोल्ह्याला द्राक्षे आंबट  असाच तो प्रकार होता मी त्याला ठाम विरोध केला होता 

"मराठी कविता अधिकाधिक गद्यप्राय होत असताना मला सुजितसारखा कवी आवश्यक वाटतो, ज्याला परंपरा माहीत आहे आणि नवता ज्याचा श्वास आहे. <तुला किस करून जगण्यावर कोण लावून घेईल कर्फ्यू? > अशी ओळ लिहिणं हे त्यालाच जमू शकतं "
ह्याच्याशी मी सहमत आहे 


नीरसता आणि रटाळता ह्या सापेक्ष गोष्टी आहे  

सर्वसाधारणपणे वाचकावर  कोणत्या कवीचे आणि कवितेचे आणि काव्यपरंपरेचे संस्कार आहेत ह्यावर ते अवलंबून आहे उदाहरणार्थ रजनीश ओशो हे तत्वज्ञानात अस्तित्ववादापर्यंत सहज पोहचतात पण त्यांनी दिलेल्या कविता पाहिल्या तर त्यात अध्यात्मिक किंवा रोमँटिक कविताच दिसतात आधुनिक कविता त्यांना आवडत नाहीत त्यांना त्या निरस वाटतात कारण त्या काव्यपरंपरेचे संस्कार नाहीत जर रजनीशांसारख्या खुल्या माणसाची ही अवस्था तर बाकींच्यांबद्दल काय बोलावे ?

दुसरी गोष्ट वाचकाचा रस कशात असेल त्याची संवेदनशीलता नवतेबाबत किती उत्सुक असेल त्यावरही नीरसता व रटाळपणा  अवलंबून आहे

सर्वसाधारणपणे उत्तम वाचक हा 
१ आपल्या आधीच्या काव्यपरंपरा 
२ समकालीन नवता 
३ पुढील नवता 

सतीश तांबे उत्तम वाचक असल्यानेच तो ह्या तिन्ही गोष्टींना दाद देतो मराठीत असे उत्तम वाचक किती ?
मर्ढेकरांच्या ज्या कवितांना निरस व चोथा म्हणून हिनवले गेले त्यांनाच आता माईलस्टोन म्हणून गणले जाते हे का घडले  तर आपल्या आधीच्या काव्यपरंपरांनी जखडल्या गेल्याने समकालीन आधुनिकतावादी नवता अनेकांना दिसलीच नाही एखादाच पु ल देशपांडे असतो जो निरस म्हणूनही पुढे चूक सुधारून मर्ढेकरांच्या कवितेचे कार्यक्रम करतो 

मर्ढेकरांनी फक्त कविताच न्हवे तर सौंदर्यशास्त्र लिहून समीक्षाही प्रतिमाकेंद्री केली आणि आज अवस्था अशी आहे कि अनेकांची काव्यात्मक संवेदनशीलताही प्रतिमाकेंद्री झाली आहे आधुनिकतावादाला आणि सत्यकथेला हे साजेसे होते पण त्याचा फुगा फुटल्यावर त्यालाही आव्हान मिळालंय हेही अनेकांच्या गावी नाही अभिधानानंतर साच्यात अडकले ते ह्या प्रतिमावादामुळे मी त्यातून निसटलो पण अनेकांना हे जमलेले नाही किंबहुना आपण कोणत्या पिंजऱ्यात अडकलोय ह्याचीच अनेक कविंना कल्पना नाही प्रतिमा हे साधन आहे एक्स्प्रेशन नाही 


 ह्याशिवाय साहित्यिक राजकारणात एखादा  कोणत्या ग्रुपच्या वतीने उभा आहे ह्यावरही रटाळपण  अवलंबून आहे आपल्या ग्रुपशिवायच्या कविता रटाळ वाटणारे महाभाग आहेतच खाजगीत उत्तम म्हणून दाद देणारे वाचक ग्रुपच्या नादाला लागून ग्रुपबाहेरच्या कविंना सहजरित्या निरस व रटाळ म्हणून बाद करतांना मी पाहिले आहे संपादकाच्या सत्तेचे तळवे चाटणारे अनेक कवी मी पाहिले आहेत आणि तळवेचाटू लोकांच्या साधारण कवितांना असाधारण म्हणणारेही महाभाग मी पाहिलेत सांस्कृतिक अभिरुचीचे राजकारण हा अजूनही मराठी समीक्षेचा चर्चाविषय नाही

ह्यावर उपाय एकच असतो आपली संवेदनशीलता सतत तासणे आणि तिला नवे टोक काढणे तिला कुठल्याही ग्रुपकडे गहाण न टाकणे आणि लोकमान्यतेची आसक्ती फेकून  देणे 

सर्वांनाच हे जमते असे नाही असो 










ह्या तिन्हींना दाद देतो 










Comments

Popular posts from this blog