( गिरीश कर्नाडांवरील हा लेख पूर्ण करण्याआधीच पावसाने धुमाकूळ घातल्याने घरात पाणीच पाणी झाले आणि लेखन लांबणीवर पडले आता तो देत आहे )
गिरीश कर्नाड ताठ मानेची आधुनिकता श्रीधर तिळवे नाईक
शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स ह्या पुस्तकातील माझ्या मांडणीप्रमाणे दाक्षिणात्य संस्कृतीत तीन द्विभुज प्रदेश आहेत
१ पहिला तामिळ द्विभुज प्रदेश ह्यात तामिळनाडू व केरळ येतात
२ दुसरा आंध्र द्विभुज प्रदेश ह्यात आंध्र व हैद्राबादी दखनी येतात
३ तिसरा कर्णाट द्विभुज प्रदेश ह्यात महाराष्ट्र व कर्नाटकअपरान्त येतात
ह्या द्विभुज प्रदेशातील ह्या जुळ्या उपसंस्कृती परस्परांना विलक्षण पूरक म्हणून कार्य करत असतात ह्या जुळेपणाचा विसर आता महाराष्ट्राला पडला असला तरी गिरीश कर्नाड जेव्हा जन्मले तेव्हा ही परिस्थिती न्हवती त्यामुळेच कर्णाट संस्कृतीचा वारसदार म्हणावा अश्या तऱ्हेने त्यांची वाढ झाली मराठी आणि कर्नाटक अशा दोन्ही उपसंस्कृतीतून त्यांनी जे घ्यायचे ते मनसोक्त घेतले
सारस्वत ही जात मुळात कर्णाट संस्कृतीतून तयार झालेली मूळची कर्नाटकातली शेणवी शैव ब्राम्हण असलेली व पुढे शंकराचार्यांच्या नादाला लागून स्वतःचे गौड सारस्वत असे नाव बदललेली !ही जमात अचानक पोर्तुगीज इंग्रजांच्या राज्यकारणात बदलली व पूर्णच वैदिक झाली तिने अपरान्तात (कोकण गोवा कॅनरा )आम्ही ब्राम्हण व उरलेले सर्व शूद्र अशी केरळ ब्राम्हणांप्रमाणे जाहीर भूमिका घेतली आणि वर्णव्यवस्था मजबूत केली ज्यां शेणविंनी त्यांना विरोध केला त्यांना जातिबहिष्कृत केले स्वतःला वैदिक म्हणून मान्यता मिळवण्यासाठी तिने जे काही केले ते कधीकाळी अभिमानाचा विषय वाटणाऱ्यांची संख्या एकेकाळी जास्त होती पण १९९० नंतर हा अभिमानाचा विषय नसून लाजेचा विषय आहे हे बहुजन समाजाने व सारस्वत बनायला नकार देणाऱ्या आणि स्वतःला शैव म्हणवून घेणाऱ्या जाती अंतर्गत शेणवी पुरोगामी विचारवंतांनी जाहीरपणे सांगायला सुरवात केली गिरीश कर्नाड कधीही ह्या पुरोगामी लोकांना शामिल न्हवते १९९५ नंतर त्यांचा विचार बदलला कारण गोवा कर्नाटकातील पुरोगामी चळवळीत शैवांचे वाढलेले वर्चस्व त्यांच्या लक्ष्यात आले अर्थात तिथेही त्यांनी एक घोळ घातलाच शैवांच्या टिपू सुलतानाविषयी किती विरोधी भावना आहेत ते लक्ष्यात न घेताच पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी त्यांनी टिपू सुलतानाला कर्नाटकाचा महानायक म्हणायला सुरवात केली आणि पुढे पुढे तर त्याला शिवाजी महाराजांच्या तुल्यबळ ठरवायला सुरवात केली हा केवळ इतिहासाचा अपलापच न्हवता तर डावेपणाचा माज होता त्यामुळे बसवेश्वरांच्यावर नाटक लिहून त्यांनी जे कमावलं ते टिपू सुलतानांची भलावण करून गमावले आज त्यांच्या मृत्यूनंतर जे वादळ उठलंय त्याला कारण त्यांचा हा अजिबोगरीब डावा स्टान्स आहे डावे इतिहासकार कधीच भारतात शैवांच्या भावना समजू शकले नाहीत गिरीश कर्नाड त्याला अपवाद न्हवते त्यांची ही शोकांतिका फक्त त्यांची नाहीये तर हिंदुत्ववादाला कसा विरोध करायचा हे न कळलेल्या पुरोगामीवादाची शोकांतिका आहे अर्थात त्यावरून त्यांना जे ट्रोल केले गेले ते मात्र चुकीचेच होते त्यापेक्षा त्यांच्या मांडणीचा प्रतिवाद करायला हवा होता ते लोकशाहीला धरून झाले असते पण ज्यांना ट्रोलिंगच करायचे आहे त्यांना काय ?
गिरीश कर्नाड ह्यांना मी प्रथम पाहिले ते स्वामी ह्या चित्रपटात हेमा मालिनी बरोबरचा त्यांचा हा चित्रपट त्यावेळी का करू सजणी आये ना बालम ह्या गाण्यासाठी गाजला होता मी आणि माझा मित्र निनाद हे गाणे मित्रांच्यात गात असू . आम्ही दाक्षिणात्य येसूदासला किशोरकुमारपेक्षा थोर गायक समजत असल्याने ह्या गाण्याला घरात विशेष भाव होता कर्नाड आणि हेमामालिनी ह्यांना लहानपणी असे एकत्र पाहणे हेच पुढे माझ्या अडॉ हॉका बानासुना ह्या कादंबरीतील एका पानाला कारणीभूत ठरले (पान क्र २५५)कर्नाडांच्यावरून मी एक पात्र बेतले एका सुमार बुद्धीच्या पण व्यवहारात हुशार असलेल्या सुपरस्टार अभिनेत्रींच्या अरेंज्ड लग्नासाठी आणला गेलेला प्रायोगिक रंगभूमीचा नाटककार अभिनेता ( पुढे हेमा मालिनीला प्रत्यक्ष भेटलो तेव्हा मात्र आपण सुपरस्टार सुमार दाखवायला नको होती असे मला फिलिंग आले )
कर्नाड हे त्यांच्या जन्मगाव माथेरानप्रमाणे थंड आणि बुद्धिमतेची उब मिळालेला चेहरा घेऊन वावरायचे आणि अंडरऍक्टिंग करायचे हे कधीकधी मस्त वाटे उदा एक था टायगर , इकबाल किंवा स्वामी मात्र मुद्रांची अमर्याद विविधता त्यांच्याकडे न्हवती त्यामुळे ते कधीच अभूतपूर्व वाटायचे नाहीत यक्षगानाच्या नाटकी अभिनयाचा त्यांच्यावर थोडा प्रभाव पडला असता तर बरे झाले असते असेही काहीवेळा वाटे
ते दिग्दर्शक म्हणून मात्र उत्तम होते वंशवृक्ष ही दिग्दर्शक म्हणून त्यांची सर्वश्रेष्ठ फिल्म होय उत्सवचा तामझाम त्यांनी उत्तम पेलला पण एथॉस निसटला त्यांच्याप्रमाणेच कर्णाट संस्कृतीतून आलेल्या बेंद्रेंच्यावर त्यांनी डॉक्युमेंट्री करणे हे तसे अपरिहार्यच होते
कर्नाडांचे खरे काम झाले ते नाटकांतच नाटककार म्हणून ! ९ व्या शतकातील कविराजमार्ग ह्या राजाच्या कारकिर्दीत कन्नड नाटके खेळली जात कन्नड लिखित नाटकांचा इतिहास १६५० पासून सुरु होतो भारतात संगीताची नोटेशन पद्धत प्रथम कन्नड लोकांनी सुरु केली ( ह्याविषयी मी पूर्वी लिहिले आहे ) तीही ह्या काळाच्या आसपास !
कर्नाड जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासाठी टी पी कैलासम , शिवराम कारंथ , पर्वतवणी आणि श्रीरंगा वा आद्य रंगाचार्य ह्यांनी आधीच रंगभूमी नांगरून ठेवली होती ह्यातील टी पी कैलासमची नाटके आता कालबाह्य वाटत असली तरी ती अर्वाचीन रंगभूमीला चालना देणारी होती आद्य रंगाचार्य संस्कृत स्कॉलर असल्याने त्यांना भरताच्या नाट्यशास्त्राचे सखोल ज्ञान होते ज्याचा कर्नाडांच्या विचारांवर प्रचंड परिणाम झाला आद्य रंगाचार्याचा इंडियन थिएटर हा तर क्लासिक ग्रंथच मानला जातो ज्याचा अनुवाद मराठीत भारतीय रंगभूमी ह्या नावाने झाला आहे शिवराम कारंथांनी लोक रंगभूमी विशेषतः यक्षगान आधीच आजमावलली होती ह्याशिवाय ऑपेरा प्रहसन फार्स ही ! ह्यांच्या कामाच्या खांद्यावर कर्नाड उभे होते
मिथ हे भारतीय रंगभूमीचे मीठ आहे कन्नड रंगभूमी त्यापासून कशी वाचणार ? साहजिकच मिथवर आधारित अर्वाचीन नाटके हा कन्नड रंगभूमीचा विशेष झाला तर भैरप्पा सारख्यांच्या अर्वाचीन कादंबऱ्या कन्नड कादंबऱ्यांचा ! बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे आगार असणाऱ्या महाराष्ट्रात मिथकीय व ऐतिहासिक कलाकृती ह्या पूर्णपणे सेंटीमेंटल निर्माण व्हाव्यात आणि भावनाशील असणाऱ्या कर्नाटकाने मात्र बुद्धिवादी तर्क अधिक जपणाऱ्या मिथकीय कलाकृती निर्माण कराव्यात हा विरोधाभास लक्षणीय आहे दोन्ही भूप्रदेश जगणारे कर्नाड हे ह्या विरोधाभासात वाढलेले नाटककार होते आणि हयवदनवर दोन भूप्रदेशातील संस्कारसंघर्षाचाचाही प्रभाव होता
रंगभूमीवर दंतकथेतील प्लॉटच्या आधारे अर्वाचीन तत्वाची मांडणी सुरु झाली ती ब्रिटिश राजवटीत ! सेन्सॉरशिपमुळे !उदा किचकवध इंग्रजांना किचक मानून बेतलेलं हे खाडिलकरांचे नाटक ! ययातीविषयी कर्नाड काहीही म्हणत असले तरी १९६० साली खांडेकरांच्या ययातीला साहित्य अकादमी मिळाले होते आणि ते त्यांना माहित असणारच ययातीचे भोगवादाचे प्रतीक म्हणून चित्रण खांडेकरांनी केले कर्नाडांनी सतत चिरतरुण राहू इच्छिणारी पिढी आणि मूर्ख आदर्शापायी त्यांना आपले तारुण्य बहाल करणारी नंतरची पिढी असा वेगळा अँगल ह्या दंतकथेला दिला मात्र कर्नाडांची क्राफ्ट्समनशिप ही नव्या पिढीची असल्याने खांडेकरांच्यापेक्षा अधिक सरस होती
ह्यानंतर आले ते कर्नाडांचे आणि भारतीय रंगभूमीवरचे अफलातून ऐतिहासिक नाटक तुघलक माझ्या मते कर्नाडांचे सर्वश्रेष्ठ नाटक तुघलकच ! इतिहासाचा विद्यार्थी असल्याने मुळात महम्मद बिन तुघलक ह्या विषयात मला जबरदस्त इंटरेस्ट होता त्यामुळे त्यावर नाटक म्हंटल्यावर मी ताबडतोब हे नाटक आणलं व वाचलं माझा ह्या नाटकाकडे पाहण्याचा त्यावेळचा दृष्टिकोन हा वाचकांपेक्षा दिग्दर्शकाचा जास्त होता आणि हे नाटक त्यावेळी प्लॉट कसा बांधावा ह्याचे आदर्श वाटले होते
तुघलक हा असा बादशहा होता ज्याला हिंदुस्तानची राजधानी देवगिरीत आणायची होती नवी व्यवस्था निर्माण करायची होती वडिलांच्या मृत्यूमुळे बादशहापद लाभलेल्या तुघलकचे स्वप्नाळू प्लॅन आणि त्यामुळे झालेली वाताहत ह्या दोन्ही गोष्टींना कर्नाडांनी जबरदस्त पेलले होते
ह्या नाटकाच्या इंग्लिश अवताराने कबीर बेदी नावाचा स्टार जन्माला घातला आणि त्यामुळंच अलेक पदमसिंना हे नाटक बंद करावे लागले कारण कबीर बाजारात बिझी झाला
ह्या नाटकावर अल्बेयर काम्युच्या कॅलिगुलचा जबरदस्त प्रभाव असला तरी तुघलकची माती अस्सल हिंदुस्थानी होती
हयवदन हे नाटकही बुद्धीप्रामाण्यवादाची बुद्धी महत्वाची कि मार्क्सवादाचा हात महत्वाचा हा प्रश्न उपस्थित करणारे होते ज्याचे बीज दंतकथेतच होते मात्र ह्या कथानकाला कर्नाडांनी दिलेल्या नवीन डायमेन्शन्स मस्त आणि खिळवणाऱ्या होत्या
पुढे नागमंडल ही असेच जे बघतांना मला बोअर झाले
त्यांची इतर नाटके मी वाचलेली किंवा पाहिलेली नाहीत त्यामुळे त्यावर बोलणे योग्य न्हवे
कर्नाडांच्यावर एक मोठा आक्षेप त्यांनी ओरिजिनल कथानक एकही दिले नाही असा आहे आणि एकाचा अपवाद वगळता ते सत्य आहे नागमंडलची मूळ कथा मी आधीच वाचल्याने ते नाटक मला बांधू शकले नाही काहीतरी कृत्रिम पाहतोय असे वाटत राहिले
कर्नाड मोहन राकेश बादल सरकार व तेंडुलकर ह्यांच्यात तेंडुलकरच निर्विवाद श्रेष्ठ होते आणि ज्ञानपीठ त्यांनाच आधी मिळायला हवे होते मग कर्नाडांना ! खुद्द कर्नाडांनी हे बोलून दाखवले आहेच ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि दुसऱ्यांच्या कथेवर काम करून वा लिहूनही ज्ञानपीठ मिळू शकते असा मेसेज गेला ( मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत शिकवतांना त्याला वारंवार मी तोंड दिले आहे )
कर्नाडांची नाटकाविषयीची मते मला कधीच पटणारी न्हवती माझा कर्नाडांच्याविषयी सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच होता कि मला ते कधीच क्रिएटिव्ह वाटले नाहीत अपवाद तुघलक व हयवदन त्यामुळे मंगेश बनसोडने त्यांना अकादमीत बोलावले तेव्हा मी गेलो नाही
व्यक्ती म्हणून मात्र ते चालती बोलती सभ्यता होते आणि वैयक्तीक पातळीवरच्या त्यांच्या कृत्या ह्या आधुनिकता उंचावणाऱ्या होत्या
त्यांच्या जाण्यामुळे एक ताठ मानेचा आधुनिक नाटककार व दिग्दर्शक गेला माझी त्यांना आदरांजली
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment