श्रीधर तिळवे ह्यांची राहुल सरवटे ह्यांनी घेतलेली मुलाखत 2006 परममित्र २००६
भाग १
भाग १
श्रीधर तिळवे आजच्या काळातला महत्वाचा , समर्थ, आणि सशक्त कवी आहे . ही ओळख मुख्यतः अपुरी असेल जर त्यांच्या radical समीक्षात्मक / दार्शनिक मांडणी कडे दुर्लक्ष आपण करत असू .
श्रीधरची मोक्षप्रद प्रतिभा टीकाहरण सारख्या संहितेत प्रखरपणे व्यक्त झाली आहे. तितकीच ती कव्ही किंवा स्त्री-वाहिनी सारख्या संग्रहातून झालीय. सगळ्या साहित्यातून व्यक्त झालेली आणि जे समजून घ्यायला दिशादर्शक ठरणारी त्यांची समक्षता ( जी त्यांच्या जीवनव्यवहाराहून आणि जीवनदर्शनाहून अलिप्त कधीच रहात नाही existential quotient मध्ये मुरल्यासारखी ) ही सर्वमान्य मराठी समीक्षेहून मूलतः भिन्न आहे , आणि तिला नवं वळण देणारी आहे .
श्रीधरच्याच मते , संहिता/ समीक्षा वैयक्तिक नसून open forum सारखी आहे . त्याचा अन्वयार्थ ज्यांन त्यानं आपापल्या परीनं लावावा . शिवाय साहित्यिक संहिता हि साहित्यिक संहिता असतानाच समाजशास्त्रीय संहिता असतेच . ह्या जाणिवेतून व्यक्त होणारा अनित्यवाद post modern अराजकाकडे वळत नाही किंवा modernity तल्या निश्चततेचा आत्यंतिक पणाही स्वीकारत नाही .
आजच्या काळातल्या जगण्याच्या प्रश्न संदर्भात ज्यात साहित्याला जगवण्याचा भाषा टिकवण्याचा प्रश्नही आलाच ही itergrated , अनित्यवादी जीवनदृष्टी आपल्यातल्या ( सामाजिक व वैयक्तिक दोन्ही अर्थांनी ) अनेक गुंतागुंतीचे सम्यक विश्लेषण करून ते प्रश्न सोडवण्यासंदर्भात मूलभूत योगदान करू शकते / करते.
या संदर्भात श्रीधर तिळवेशी नव्या पिढीच्या खुला वैचारिक संवाद / चर्चा व्हावा या उद्देशाने काही मुलाखत वजा चर्चा करण्याचा प्रयत्न .
१ कव्ही किंवा टीकाहरण मध्येही संक्षिप्त उल्लेख येऊन गेलाय तुमच्यातल्या कवीचा ( आणि जर वेगळा असेल तर दर्शनकाराचा सुद्धा ) विकास कसा होत गेला ? कुठल्याही सामाजिकतेला वैयक्तिक व्यवधानांना तुम्ही प्राथमिक पणे व्यक्त होत गेलात ? तुमच्या जडणघडणीच्या संदर्भातले महत्वाचे टप्पे कुठले ?
माझं संपूर्ण आयुष्य
प्रथम बदललं ते
स्वामी विवेकानंद ह्यांनी अगदी
लहानपणीही मला शालेय पाठ्यपुस्तकातील स्वामी
विवेकानंद , म. गांधी , म.
फुले , बाबासाहेब आंबेडकर हि
माणसे आवडत
नंतर माझं जगच बदललं पण मला पुन्हा स्वामी विवेकानंदांनीच
रुळावर आणलं मी पहिला समग्र विचारवंत वाचला तो विवेकानंदच विवेकानंद वाचताना मला स्मृती, श्रुती पुराणोक्त धर्माच्या भीषणतेची कल्पना येणे शक्यच नव्हते . ती मला प्रत्यक्ष माझ्या आयुष्यातूनच आली मी विवेकानंदांकडे वळण्याचे कारणही माझा अध्यात्म शोध होता आत्मा आहे का ? पुनर्जन्म आहे का हे मला फार लहानपणापासून पडलेले प्रश्न उदाहरणार्थ माझ्या लहानपणापासून मी स्वप्नात पाश्चात्य अभिजात सिंफनी ऐकायचो मला त्याचे मुळच कळायचे नाही. कारण संगीताशी माझ्या दूरनव्यानेही संबंध नव्हता माझ्या वडिलांनी संगीत जाणीवपूर्वक आमच्यापासून दूर ठेवलेले आणि तरीही माझ्या स्वप्नात सिम्फनी ह्याचा अन्वयार्थ लावायचा कसा ? बर स्वप्नात अतिशय स्वच्छपणे सुरावटी ऐकू यायच्या आणि जागा झालो कि संगीतातलं ओ कि ठो कळायचं नाही. त्यावेळी मला असं वाटायला लागलं कि ह्याच मूळ मागील जन्मात असणार नाहीतर माझा मेंदू हा शिकला कुठून हा प्रश्न !
मग थोडा भरकटलो पण रुळावर आलो . विवेकानंदांच्या कडून सत्याकडे अनेक मार्गांनी जात येते. हे मी शिकलो राजयोग , कर्मयोग ,
भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्यावर विवेकानंदांनी दिलेल्या व्याख्यानाचा माझ्यावर खोल संस्कार आहे तर राजयोग हा ह्या काळात माझ्या साधनेचा मुख्य कणा होता. त्या अंतिम सत्याची काही काळ का होईना पण चव मी चाखली आहे . त्याला शून्य निर्वाण म्हणायचे कि ईश्वर ब्रम्ह म्हणायचे हा फक्त तत्त्वज्ञानाचा वैचारिक खेळ आहे . खरतर तो भंपकपणाच आहे पण तो चालतोच . ह्यानंतर मात्र माझे पतनच झाले आणि आता मी आत्मनरकाच्या इतक्या खालच्या पातळीवर आलोय कि ..... कधी कधी इतका ताप होतो पण कधी कधी ह्यातूनही वर उफळेन अशी आशा वाटते
ह्या नंतरचा दुसरा प्रभाव गौतम बुद्धाचा . गौतम बुद्धाकडून मी तृष्णेचा विचार शिकलो बुद्धाकडूनच मी कृष्णमूर्तींच्याकडे आलो
माझे आर्थिक विचार मात्र मी जी दुकानदारी करत होतो तिथूनच आले मार्क्समुळे मी श्रम हि संकल्पना आत्मसात केली . मला मार्क्सवाद मान्य नाही पण श्रमांना योग्य मोबदला व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हे माझे ठाम मत आहे आजच्या भांडवल शाहीत ८५% ते ७५% श्रमांना हा मोबदला व प्रतिष्ठा मिळत नाही आणि हे भांडवलशाहीचे फार मोठे वैगुण्य आहे असे मला वाटते श्रमांचा विचार करताना मी गांधींच्या कडे ओढला गेलो . गांधींनी श्रमाला जी प्रतिष्ठा दिली ती जगात इतर कुठल्याही नेत्याने दिली नाही हे लक्षात येताच मी ओवरऑल गांधीच्यांकडेच ओढला गेलो. गांधींची मेथडॉलॉजी हीच खरे त्यांचे योगदान त्यांचे तथाकथित विचार मात्र आऊटडेटेड झालेत असं मला वाटत मात्र त्या विचारामागची जी अध्यात्मिकता आहे ती काबिलेतारीफ आहे
ह्याच काळात मला सामाजिक प्रश्नही तीव्रतेने जाणवत होते विशेषतः जातीयतेचे दुखणे भयंकर त्रासदायक होते आणि त्यासाठी विवेकानंद , बुद्ध , गांधी ,मार्क्स पुरेसे वाटत नव्हते आणि त्यावरच्या सोल्युशनसाठी मी फुले आंबेडकरांच्याकडे
वळलो माझा पहिला कविता संग्रह पाहशील तर तो ह्यामुळेच ह्या सर्वांना अर्पण केलेला दिसेल. भारतातील जातिवर्णव्यवस्थेच आकलन जेवढं फुले आंबेडकरांना झालय तितकं इतरांना झालय असं मला वाटत नाही . हा सगळा काळ १९८० ते ८५ चा आहे ह्या सर्व संस्कारामुळे मी राजयोग व धार्मिक बाबतीत विवेकानंदवादी
अनेकांतवादी मानसिकबाबतीत बौद्ध आर्थिक बाबतीत श्रमाला पूर्ण मोबदला व प्रतिष्ठा देणाऱ्या व भांडवलदारांनी गांधींनी सांगितलेल्या ट्रस्टीच्या भूमिकेत असलं पाहिजे . अशा आग्रह धरणाऱ्या नैतिक भांडवलशाहीचा शोध घेणारा भांडवलवादी तर सामाजिक बाबतीत फुले आंबेडकर वादि असा झालो होतो. मात्र मी मूळचाच एक संशयखोर मनुष्य आहे हा संशय कुठल्याही प्रकारच्या मोठेपणापुढे दबत नाही ह्याच काळातील पाश्चात्य वाचनाचा सर्वात मोठा संस्कार माझ्यावर बर्ट्रॉर्ड रसेलने केला होता माझ्या संशयीपणाला तर त्याने चांगलेच बळ पुरवले . मी मार्क्सवादी न होण्याचे सर्वात मोठे कारण माझी दुकानदारी आणि रसेलचे मी केलेले वाचन होते. ह्याच रसेलचा जो बँडबाजा व्हिटगेस्टाईनने वाजवला त्यामुळे मी एकदम भाषेविषयीच संशयी झालो आणि मग सर्वार्थाने चिन्हांचा विचार करणे भाग पाडले. इथूनच पुढे चिन्हसृष्टीविषयी विचार करणे सुरु झाले . भाषा आणि जीवन यांच्यात कायमच अद्वैत असते हे मला मान्यच नाही भाषा हि जीवनाचा एक पैलू आहे आणि भाषेत भाषा आणि जीवन ह्याच्यात अद्वैत असू शकते . पण जीवनाचा एक फार मोठा भाग भाषेबाहेरच असतो . आणि त्याला भाषेतून व्यक्त करण्याची धडपड सतत चालू असते असे मला वाटते . अनेकदा चिन्हसृष्टीत विशेषतः गणितात काम करताना चिन्हसृष्टी बाहेरच्या जीवनाची सुत्रे सापडतात आणि संपूर्ण जीवन त्याने बदलते हे म्हणजे एका पेलूचा इतर पेलूवर होणारा परिणाम असतो . जीवनाचे प्रत्येक अंग हे ईतर अंगावर परिणाम करत असते ह्यातील कुठल्यातरी एका अंगाला डोक्यावर घेऊन नाचण्याची आणि ह्या अंगातून संपूर्ण देह पाहण्याची व हाताळण्याची पाश्चात्य तत्वज्ञाची खोड मी मला सुरुवातीपासूनच आवडच नव्हती. आजही मी अनेकांगवादी आहे असे तू म्हणू शकतोस ( किंवा बहुनयवादी ) समग्र आणि संपूर्ण पहाणे ही दर्शनाची पहिली अट आहे असे मला वाटते.
मी विज्ञानाचा विद्यार्थी त्यामुळे अकरावीत असतानाच मी काळ आणि अवकाश हे दोन नय ( वा अंश वा अंग ) स्वीकारले होते विवेकानंदांच्यामुळे मी सत , चित्त आनंद आणि क्रिया ( कर्म ) हे चार नय स्वीकारले पुढे बराच विचार करून मी शिव आणि शक्ती ह्या आणखी दोन नयांची भर त्यात टाकली आणि ह्या आठही नयांना स्थिती असते म्हणून स्थितीला मी नववा नय म्हणून स्वीकारले . विज्ञानांकडून मी प्रत्येक नयस्थितीत द्रव्य , रचना , ऊर्जा , आणि गती असते हे शिकलो. आईनस्टाईच्या E = MC 2 समीकरणाचा माझ्यावर खोल संस्कार आहे . ह्यातूनच द्रव्य म्हणजे matter ( m ) E म्हणजे ऊर्जा ( energy ) आणि C म्हणजे गती ही तीन तत्त्वे अवतरली कवितेतून आणि भाषेतून मी रचना stracture उचलेले .कुठलीही स्थिती ही कधीच स्थिर नसते अध्यात्मात साधना करताना एक अंतिम अशी मुक्त असते हे मला मान्य होते त्या मुक्त स्थितीपर्यंत पोहचण्यासाठी साधक ( ह्यात भक्तही येतो ) हा अनेक स्थित्यांतून जातो त्यांचे निरीक्षण करून मी असंवेद्य , संवेद्य, प्रकट , जागृत, उन्नत व मुक्त अश्या सहा स्थित्या स्वीकारल्या आणि जिला तू व्यक्तिगतता म्हणतोस तिची एक संपूर्ण मांडणी पुढीलप्रमाणे तयार झाली .
माणूस ( वा मितिक ) ( वा व्यक्ती )
नऊ नय वा अंश
स्थिती
|
सत
|
चित्र
|
आनंद
|
क्रिया
|
शिव
|
शक्ती
|
अवकाश
|
काळ
|
असंवेद्य
|
सौष्ठव
|
जाणीव
|
स्वभाव
|
स्पंदन
|
संवेदक
|
असोशी
|
पर्यावरण
|
महाकाल
|
संवेद्य
|
अंग
|
बुद्धी
|
भाव
|
स्फुरण
|
बोधक
|
पिपासा
|
भूगोल
|
काळ
|
प्रकट
|
शरीर
|
विचार
|
भावना
|
हालचाल
|
कर्ता
|
आसक्ती
|
क्षेत्र
|
वेळ
|
जागृत
|
देह
|
विवेक
|
रस
|
कृती
|
साधक
|
इच्छा
|
पेस
|
मृत्यू
|
उन्नत
|
काया
|
प्रज्ञा
|
भक्ती
|
कर्तव्य
|
साक्षी
|
स्फूर्ती
|
अनंत
|
महामृत्यू
|
युक्त
|
चैतन्य
|
सत्य
|
करुणाशांति
|
कर्म/कार्य
|
बुद्ध
|
प्रतिभा
|
पूर्ण
|
शून्य
|
Comments
Post a Comment