लिरिकलता आणि मुक्तता

आपण ह्यापूर्वी मुक्त गझलेवर चर्चा केली आणि त्यावर वाद झाले मग नज्मवर चर्चा केली मग सुजित फाटकच्या निमित्ताने स्वछंदी मुक्ततेवर चर्चा केली ह्या सहाही  लेखात एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे छंदता आणि मुक्तता ह्यांच्या संबंधाच्या मात्रा किंवा अक्षर वृत्ते लवचिक करून पण गेय कवितेचा फॉर्म शाबूत ठेवून अभिव्यक्तीची मुक्तता जपणे हा ह्या साधनेमागचा उद्देश आहे

प्रश्न असा आहे कि ह्या ध्यासामागे काय आहे

१ मुक्तछंदाला आव्हान देणे ?
२ कवितेचे कवितापण प्राप्त करून देणे ?
३ कवितेला रस पूर्ण बनवणे ?

मुक्तता ही मुक्तीपेक्षा वेगळी असते हे प्रथम लक्ष्यात घ्यावे लागते मुक्तछंद ही छंदापासून मुक्ती होती मुक्तता छंदापासून मुक्ती घेत नाही ती छंद मोकळा करते लवचिक करते सैल करते पु शी रेगेंचा शब्द वापरून म्हणायचे तर ती छांदसी जपते मात्र ही छांदसी जपताना ती आधुनिकता आणि आधुनिकता आणि चौथी नवता सोडत नाही ती रोमँटिक भावनिक उसासे टाकत नाही तर खऱ्याखुऱ्या भावनिक वा वैचारिक आशयाचा शोध घेते ती वैचारिक आशयातही लिरिकल राहण्याचा प्रयत्न करते अनेक लिरिकल कविता गाता येतात एका अर्थाने सृष्टीय नवतेतून निर्माण झालेला स्वछंद ती आधुनिक करते उत्तराधुनीक करते किंवा चौथ्या नवतेचा करते मुक्तछंद मीटर धूडकावतो पण लय धुडकावत नाही किंबहुना मुक्तछंदाने लय धुडकावली कि ती गद्य कविता बनते स्वछंद मीटर धुडकावत नाही पण ते सैल करतो

उर्दूतल्या आझाद गझल नज्म अशा गोष्टी सहज करतात मराठीत त्या रुजणे आवश्यक आहे मी मागेच म्हंटले आहे कि सृष्टीय आशय हा अक्षरगण आणि मात्रा अशा दोन्ही प्रकारच्या  वृतात लिहणे शक्य आहे आरती प्रभू व ग्रेस ह्या दोन्ही कविंनी हे करून दाखवले आहे  मात्र ह्यांच्या कविता कधीही प्रतिसृष्टीय औद्योगिक आशयात सामील होत नाहीत हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे रोमँटिक भावनात्मक तीव्रतेच्या आधारे हे कवी कब्जा करतात
लिरिकलता रोमँटिक होत नाही ती आधुनिकतावादी दुसऱ्या , देशीवादी तिसऱ्या व चौथ्या चिन्हसृष्टीय नवतेतील भावनिक तीव्रता व्यक्त करण्याची धडपड करते हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे अन्यथा ग्रेस आणि आरती प्रभूंचे प्रतिमाबंबाळ रोमँटिक धूर काढण्यातच लिरिकलता खर्ची पडू शकते

लिरिकलता मुक्तछंदाला आव्हान देते पण हे आव्हान ती जाणीवपूर्वक देत नाही तर अजाणता देते कवितेच्या कवितापनाच्या ज्या पारंपारिक पण सनातन धारणा आहेत त्यातील जे चांगले आहे त्याला शाबूत ठेवते आणि कविता रसपूर्ण बनवते आधुनिक आयुष्याच्या बेचव कंटाळवाण्या निर्ढावलेल्या वातावरणात ती काहीकाळ माणसाला भावनिक माणूस बनवते एका अर्थाने माणसाच्या आतील इमोशनल मॅनची ती आवाज असते अगदी आधुनिक उत्तराधुनिक किंवा चौथ्या नवतेच्या वैचारिकतेलाही ती एक तीव्रता देण्याचा प्रयत्न करते

प्रणव सखदेव ची एक कविता ह्या पार्श्वभूमीवर पाहू

एवढा मोठा चढ चढून १५आलो होतो वर १०
प्रवास होता खूप तरी १५ तुझी भूक अनावर १२ 
दार उघडून टेकलो तर १५ पंचाईत झाली अशी १४
केवढा होता पसारा... १५सुरुवात करायची कशी?१४
हॅवरसॅक काढल्या काढल्या १७ शरीर झालेलं रूमभर१५
एकेक अवयव गोळा करण्यात वेळ गेला फार
तुझ्या मनात भीती – लागलं असेल ना दार?
माझ्या मनात एकच प्रश्न – टॅटू कोणताय अंगभर?
छताकडे बघत बघत रात्र गेली सगळी
तिथे चिकटून होती एक पाल काळिनिळी
फटफटल्यावर तिच्यासारखंच झालं होतं कलेवर
- प्रणव सखदेव


कवितेची सुरवात

एवढा मोठा चढ चढून आलो होतो वर
प्रवास होता खूप तरी तुझी भूक अनावर 

अशी होते 

मीटर थोडं सैल केलंय हे इथेच स्पष्ट होत 

मात्र कवितेला एक स्वछंदी ठेका आहे हेही दिसते 

कविता चढ चढून आल्यावर सुरु होते हा चढ टेकडीचा नाही तर बिल्डिंगचा आहे कारण पुढे जो उल्लेख येतो तो घराचा आहे जिने चढून वर आलाय कारण त्याला तिची  भूक अनावर झालीये ह्यात आणखी एक अर्थही आहे तिची भूक अनावर आहे म्हणजे तिची भूक अनावर झाल्याने ती भागवण्यासाठीही हा निवेदक एव्हढे चढ चढून आलेला असू शकतो म्हणजे अनावर भूक त्याला तिला किंवा दोघांनाही असू शकते ही भूक शरीरभूक आहे हे पुढे स्पष्ट आहे

दार उघडून टेकलो तर १५ पंचाईत झाली अशी १४
केवढा होता पसारा... १५सुरुवात करायची कशी?१४
हॅवरसॅक काढल्या काढल्या १७ शरीर झालेलं रूमभर१५


दार उघडल्यावर पंचाईत झालीये कारण पसारा आहे आता अशा पसाऱ्यात भूक भागवायला सुरवात कशी करायची ? अशावेळी शरीर रुमभर होणं अटळ आहे 


एकेक अवयव गोळा करण्यात वेळ गेला फार 
तुझ्या मनात भीती – लागलं असेल ना दार?
माझ्या मनात एकच प्रश्न – टॅटू कोणताय अंगभर?

भूक भागवण्याची सुरवात करायची तर अवयव  गोळा करणे भाग आहे पण चढ चढल्याने दोघेही किंवा एकजण थकलाय त्यामुळेच अवयव गोळा करण्यात वेळ फार गेलाय त्यातच तिची स्त्रीसुलभ भीती लागलं असेल ना दार संबंधात विशेषतः मध्यमवर्गीय ही भीती खूप त्याला ह्या भीतीचं फार काय पडलेलं नाही बहुदा आपण दार लावून नीट घेतलंय अशी खात्री असावी त्याला प्रश्न पडलाय तो तिच्या अंगभर कुठला टॅटू आहे हा इथे टॅटू हा तिच्या शरीरमूडचा सिम्बॉल आहे आणि हा सिम्बॉल कळल्याशिवाय पुढे जाणं अवघड आहे 

छताकडे बघत बघत रात्र गेली सगळी
तिथे चिकटून होती एक पाल काळिनिळी 
फटफटल्यावर तिच्यासारखंच झालं होतं कलेवर

पुढे मग सर्व काही झालं का ? झालेही असेल किंवा झालं नसेलही पण एक नक्की आहे झाल्यानंतर वा न झाल्याने झोप आलेली नाही त्यामुळे रात्र छत बघण्यात गेली कदाचित टॅटू न सापडल्याने काहीच करता न आलं असावं ह्या टॅटूऐवजी मग काय सापडलं तर पाल तीही काळीनिळी परिणामी फट्फटल्यावर शरीराचं काय झालं तर कलेवर हे कलेवर कुणाचं झालंय तिचं कि त्यांचं कि दोघांचं ? ते कसं तर पालीसारखं हे मात्र स्पष्ट आहे टॅटू शोधायला निघालेल्या माणसाला पाल सापडलेली आहे 

हे सर्व तो शहरात थकून घरी आल्यावर घडलंय का तर हेही शक्य आहे किंवा संबंधात थकल्याने दोघे कलेवर झालेले असणेही शक्य आहे 

कवितेला एक खटका आहे आणि तो सुरवातीपासून शेवटपर्यंत टिकलेलाआहे कविता त्याच्यामुळेच अधिक  लिरिकल आहे मात्र रोमँटिक नाही तर आत्ताच्या संबंधातील थकवा होण्यापासून कलेवर होण्यापर्यंतचा त्यात प्रवास आहे ती निरस नाही तिच्यात रसपूर्णता आहे थकव्याची पार्श्वभूमी आहे पण हा थकवा बेचव करून मांडण्यापेक्षा तो लिरिकल करून मांडला आहे कविता दुर्बोध नाही थेट आहे पण घट्ट अर्थात बांधली गेलेली नाही अर्थासाठी थोडी मुक्त आहे 

श्रीधर तिळवे नाईक 





सानेकर हा लिरिकल न्हवे तर वृत्तछंदाच्या परंपरेशी  निष्ठा ठेऊन लिरिक्स परंपरेत कविता  लिहितो  जसे ग्रेस व आरती प्रभू त्यामुळेच त्याला स्वछंदी मुक्त गझल मान्य नाही आणि तो मुक्त गझल लिहीतही नाही किंबहुना मुक्त गझलेला गझल म्हणून मान्यता द्यायला त्याचा विरोध आहे आणि आम्ही आमचे मतभेद मान्य करून मित्र आहोत सुरवातीला त्याच्या गझला सुरेश भटांच्या टायपातल्याच होत्या पण २०१० नंतर  त्या बदललेत आणि ते चांगलेच आहे गझलेने कधीही नवता सुरु केलेली नाही मात्र गझलेने आलेल्या नवतेचा प्रसार  केला आहे अभंग ओवीत मात्र नवता सुरु झाल्या आहेत म्हणजे मर्ढेकरांनी अभंग ओवीतच आधुनिक नवता आणली करंदीकरांनी ती नाठाळ अभंग आणून वाढवली चित्रे कोलटकरांनी ह्या कामाचे देशीकरण घडवले

ओवी मर्ढेकरांनी प्रथम वाकवली तर अभंग करंदीकरांनी कोलटकरांना ह्याचे श्रेय देणे इतिहासाचा अपलाप आहे

आणि त्याही आधी फुल्यांनी ! प्रत्येक नवता जन्माला घालणाऱ्याने पारंपारीक फॉर्म वाकवलेले आहेतच मराठी कवितेचा इतिहास देशीवाद्यांच्यापासून सुरु होत नाही हे जितक्या लवकर सगळ्यांच्या ध्यानी येईल तेवढे बरे


छान ! तुझ्या नकळत तू चौथ्या नवतेचा कणा मांडलास माझे चौथी नवता मांडतांना हेच म्हणणे होते मी ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतो हे देशीवादी तरी आपल्या बोडक्यावर कशाला हवेत आणि परंपरा तरी कशाला हवी मी माझा आत्ताचा मला येणारा अनुभव व्यक्त करणार किंवा माझी आत्ताची अनुभवशील कल्पनाजन्यता मांडणार तू करेक्ट ट्रॅकवर आलायस पण कोल्हटकर वैग्रे हेही फेकता आले पाहिजे समज मी डिमॉनिटायझेशनवर कविता लिहली ती अनाऊन्स झाली तो दिवस तर त्या दिवशी मी कोल्हापुरात होतो माझ्या मिलिंद गुर्जर नावाच्या मित्राबरोबर ! तो दिवस मी मांडणार त्यासाठी तुकाराम ज्ञानेश्वर काय कामाचे गाथा तरी काय कामाची देशीवादी तर काय कामाचे देशीवाद्यांनी परंपरेचे ओझे आमच्या बोडक्यावर मारले म्हणून तर त्याविरुद्ध युद्ध ! पुढे तर त्याचीही गरज सम्पली अधूनमधून इंजेक्शन द्यावे लागते कारण परंपरेच्या बाहेर येणे इतके सोपे नसते आज अवस्था अशी आहे कि तुमच्या पिढीपुढे नव्वदोत्तरी हीही परंपरा आहे तिच्यातून तुम्हा लोकांना बाहेर पडावेच लागेल दुर्देवाची गोष्ट अशी कि त्यासाठी प्रयत्न होतांना दिसत नाहीत मुळात आधीच्या लोकांनी काय केलंय ते तपासून बघण्याची वृत्ती नाही अपवाद नितीन वाघासारखे आहेत पण आमच्या विरोधात जाण्याच्या नादात तो देशीवादी बनत चाललाय आणि आंबेडकर त्याला सोडवत नाहीत नवतेसाठी आपल्या मूळ पुरुषाची किंवा बाईचीच हत्या करावी लागते आणि हे सोपे नसते

तू सत्तसई पाशी आलायस आमची पिढीतील मी आणि सलील वाघ दोघेही तिच्यापाशी एकेकाळी पोहचलो होतो आणि तिचे जे काय करायचे ते आम्ही केले सलिलवरची जी लिंक मी तुला पाठवलीये त्यात त्याच्या त्या कवितेचे सविस्तर विवेचन आहे मी जे केले त्यावर फेसबुकवर एक लेख टाकला होता असो

हे सगळं संपल्यावर उरतो तो निखळ वर्तमान त्या वर्तमानातही परंपरा वर्तमान म्हणून उपस्थित असते भूतकाळ म्हणून न्हवे तर ह्या वर्तमानाला भीडता येणे हेच महत्वाचे असते हा वर्तमान पूर्वीसारखा देशी वा राष्ट्रीय राहिलेला नाही तर ग्लोबल झालाय वर्तमानाचे हे ग्लोबलायझेशन पेलणे अनेकांना झेपत नाहीये देशीवाद तर परंपरेच्या बिळातच शिरतो आणि आणि आत जाऊन डोलत बसतो हे डोलणं खोटं खोटं आहे नाग पुंगीसमोर खोटं खोटं डोलतो तसं

मराठी देशीवादाचा  आरंभ सत्तसई पासून होतो 









Comments

Popular posts from this blog