मोदी आणि समकालीन देशीवाद २ श्रीधर तिळवे नाईक
मागील लेखात आपण काही मुद्दे मांडले आता आपण जर मोदींच्या देशीवादाला प्रतिकार करायचा असेल तर तो कसा करता येईल ते पाहूया
१ सर्वात प्रथम आपण देशीयता आणि देशीवाद ह्या दोन्ही संकल्पना नाकारल्या पाहिजे देशीवाद परंपरेचं समर्थन करतो आपण हे सांगितलं पाहिजे कि परंपरा ही धर्मनिष्ठ गोष्ट आहे आणि कर्मकांड आणि अन्याय्य कायदाव्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी ती राबवली वाजते धार्मिक कायद्यांचे आणि सामाजिक रुढींचे अधिष्ठान परंपरा असते तिचा अर्थ सांगोपांग बदलण्याचा पहिला साहित्यिक प्रयत्न टी एस इलियटनं ट्रॅडीशन अँड इंडिविज्युअल टॅलेंट (इगोइस्ट १९१९)ह्या निबंधात केला त्याच्या मते इंग्लिश आधुनिकता जरी परंपरेच्या विरोधात जाऊन वा तिच्यापासून वेगळं होऊन जे बदल घडतात त्या बदलामुळं साहित्याची प्रगती होते असे मानत असली तरी प्रत्यक्षात तिची पूर्ती परंपरा कन्फर्म करण्यात होते परंपरा आत्मसात करण्याला आपण दुय्यम महत्व दिलेले असले तरी प्रत्यक्षात ती साहित्यात महत्वाचा रोल प्ले करत असते परंपरा स्वभावतः च विशेष आणि गुंतागुंतीची असते ती वर्तमानात स्वतःची एक व्यवस्था घेऊन वावरत असते आणि वर्तमानाचा भाग असते त्यामुळे ती वर्तमान व भूतकाळ ह्यांचे फ्युजन असते त्यामुळेच ती भूतकालीन रहात नाही एक प्रकारची कालातीतता तिला प्राप्त होते आणि कालनिष्ठताही ! त्यामुळेच जेव्हा कवी लिहितो तेव्हा त्याच्यात होमरपासूनचे सर्व काव्य उपस्थित असते आणि समकालीन वर्तमानही ! त्यामुळेच तो आधुनिकतेचे आधीच्या कविंच्यापासून किंवा कामापासून फारकत घेऊनच स्वतःच्या व्यक्तिगत महानतेच्या प्रतिभेच्या आधारे महान काव्य निर्माण होऊ शकते हे गृहीतक नाकारतो त्याच्या मते कवी कविता लिहितो तेव्हा त्याच्यात सगळे मृत कवी त्यांची परंपरा उपस्थित असते आणि त्याच्या त्या काव्यात ते मृत कवी आणि ती परंपरा स्वतःची अमरता घोषित करत असते
सर्वात प्रथम एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी ती म्हणजे कवी स्वतःसोबत परंपरा न्हवे तर डाटा घेऊन लिहीत असतो आणि परंपरा ह्या डेटाची केवळ एक भाग असते तो डाटात परंपरेबरोबर घरचे भूगोलाचे संस्कार , अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबस , इतिहास , शिक्षण , प्रशिक्षण आणि कौशल्ये असा तामझाम घेऊनच काव्य लिहीत असतो परंपरा ही डाटाचीच अनेकदा अडगळस्वरूप गोष्ट असते आणि ती शैव जैन बौद्ध वैदिक ब्राम्हणी वैष्णव हिंदू ख्रिश्चन इस्लामी वैज्ञानिक तंत्रज्ञानिक चिन्हज्ञानिक अशी काहीही असू शकते मात्र आजचा मनुष्य इंटरनेटजडित असल्याने तो फक्त स्वतःच्या डाटावर अवलंबून राहत नाही तो कायम स्वतःचा डाटा वाढवत असतो तासातासाने दिवसादिवसाने आणि आज अशी अवस्था आहे कि वर्तमानकालीन डाटा हाच त्याच्यात जास्त ऍक्टिव्ह असतो त्यामुळे कधी कधी काल हिंदू असणारा आज बौद्ध असतो तर उद्या जैन असू शकतो परंपरा अनेकदा बुडात असते आणि तिचा रोल बुडबुडे निर्माण करण्यापेक्षा जास्त असत नाही काँक्रीट काम आजच्या आकलनावर आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते मुळात आजचे सारे समुद्रच फ्लॅट होऊन स्वतःचं लोकेशन हिंटींग करत असतात आणि ती हिंट घेऊन समुद्राच्या कोणत्या खाडीत उतरायचं हे ठरवावं लागतं
अशावेळी परंपरेकडे एकच काम उरते ते म्हणजे हॉन्टिंग करणे आणि ज्याला तिच्या आधारे सत्ताकारण करायचे असते अर्थकारण करायचे असते तो भुतासारखा पिशाच्छासारखा हॉन्ट करत राहतो हॉन्टिंगला भुलणारे लोक समाजात कायमच असतात जेव्हा अख्खा समाजच हॉन्टिंगला भुलतो तेव्हा समाजाचा भूतखाना होतो तो हॉन्टिंगला हिटिंग समजायला लागतो आणि समुद्र कवेत घेतल्याचे काल्पनिक भास त्याला व्हायला लागतात पण अश्या भासांनी तहान भागत नाही कधीना कधी हा काल्पनिक समुद्र उघडा पडतो आणि पाण्याची नितांत आवश्यकता पटते गळे सुखतात गवत खाईन पण अणुबॉम्ब बनवेन म्हणणाऱ्या भुट्टोला खायला गवतही मिळत नाही आणि तो फाशी चढवला जातो
प्रश्न इतकाच उरतो भुट्टोनंतर अधिक कट्टर झिया उल हक़ येणार कि अधिक चांगली लोकशाही येणार ?
कविंना कायमच अधिक चांगल्या लोकशाहीची प्रतीक्षा करावी लागते आणि ही प्रतीक्षा परंपरेच्या बुडाशी बसून करता येत नाही
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment