नेमाडे आणि मूल्ये
नेमाडे ह्यांनी पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय मूल्यांना साफ नकार देऊन मूल्ये देशीच असतात आणि देशपरत्वे ती बदलतात असा पोस्टमॉडर्न आग्रह धरला मी गेली कित्येक वर्षे अशी मराठी म्हणावीत अशा मूल्यांची वाट पाहतोय पण नेमाडे काही ती सांगायला तयार नाहीत राजकीय सामाजिक आर्थिक समता हे युरोपियन मूल्य आहे तर अध्यात्मिक समता वारकऱ्यांच्या वारीत समता पण गावात वस्तीत प्रकट आल्यावर विषमता हे देशी मराठी मूल्य आहे तर इथं देशीवादी म्हणवणारे लोक हे देशी मूल्य स्वीकारायला तयार आहेत का आणि नसेल तर उगाच युरोपियन मूल्यांच्यावर जी आता जागतिक झालेत उगाच टीका करू नका राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य हेही असेच युरोपियन मूल्य आहे मराठीत त्याचा मागमूस नाही असेल तर दाखवा आणि हो तुकारामांचं नाव घेऊ नका तुम्ही त्यांना वैकुठंसदनी पाठवलेले आहे बरं त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही ते स्वीकारलंय असं दिसत नाही
मी वाट पाहतोय तुमच्या देशी मूल्यांची
कोव्हीड हाताळण्याची देशी मूल्यव्यवस्था सांगा कि थाळ्या वाजवणं आणि रस्त्यावर येणं हे देशी मूल्य आहे ?
मी वाट पाहतोय
आणि हो मोक्ष किंवा निर्वाण देशी नाही संपूर्ण मानवजातीसाठी आहे असंच सर्वांनी सांगितलंय तेव्हा ते तर केवळ अंतर्राष्टीयच न्हवे तर इंटरब्रह्मांडीक मूल्य आहे
देशी मूल्य सांगा मित्रांनो
नवऱ्याला हळद लावणे ? ह्याला मूल्य न्हवे प्रथा म्हणतात मित्रांनो
देशी मूल्य सांगा
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment