शंकर कलेवर का बोलले आणि बुद्ध का बोलला नाही ? श्रीधर तिळवे नाईक
कुठल्याही काळातले सिद्धबुद्ध हे त्यांच्या आसपासच्या माणसांशी त्यांना ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत बोलतात भगवान शंकर फारच सिम्पल आणि पशुपालक लोकांशी बोलत होते अपवादात्मक वेळा शेतकरी लोकांशी जी उदयाला येत होती भगवान शंकरांचा वेगळेपण असे कि ते स्वतः अष्टपैलू कलावंत होते साहजिकच सर्व कलेविषयी त्यांनी सातत्याने चर्चा केलेल्या आहेत आणि त्यातूनच नाट्यवेद तयार झाला आणि नाट्यशास्त्रही ! इतर सिद्धबुद्धांना अशी चर्चा करावी लागली नाही कारण ते कलावंत न्हवते बुद्धाने तर कलेला मनाईच केली आहे शंकर नाचतात म्हणूनही त्यांची टवाळी करणारे लोक होते आणि आहेत अनेक नवबौद्ध निर्वाण प्राप्त झालेला मनुष्य नाचू कसा शकतो म्हणून प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या प्रश्नामागे बौद्ध ढाचा असतो भक्तीत कविता खूप महत्वाची होती म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम शब्दाची चर्चा करतात त्याउलट नानक रचायचे संगीत रचना करायचे आणि गायाचेही परिणामी पंजाबी शिखांच्यात संगीत दिगदर्शन व गायन महत्वाचे झाले आजही सर्वाधिक संगीतकार व गायक पंजाबी आहेत त्याचे मूळ गुरु नानकांच्यात आहे
भगवान कपिल , महावीर व बुद्ध हे शेतीच्या आणि गणकारणाच्या म्हणजेच संघाच्या भाषेत बोलतायत अपवादात्मक वेळा व्यापाराच्या बुद्धाने तर कलेला मनाईच केली आहे कारण बुद्धाचा पिंड हा ज्ञानयोगी माणसाचा आहे कलावंताचा नाही पुढे जे शैव बौद्ध झाले त्यांनी महायान धर्म निर्माण केला आणि पशुपतिनाथाच्या मूर्तीबरहुकूम त्यांनी बुद्धाच्या मुर्त्या तयार केल्या आणि बुद्धाची पूजा अर्चना सुरु केली हा मागील दाराने शैव धर्म आणण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला ह्यातून एक गडबड झाली बुद्धाचा मूळ उपदेश हा चक्क हीन झाला आणि त्याचे हीनयान झाले
भगवान बसवेश्वर शेती व्यापार आणि प्रबोधनाच्या भाषेत बोलतायत (स्थावर जंगम हे बसवेश्वरांनी वापरलेले शब्द ह्या काळातील व्यापारी व इस्टेटीशी निगडित शब्द आहेत लिंगायत साधूंना जंगम म्हणतात म्हणजे जे मोबाईल आहेत ते )
रमण महर्षी आधुनिक भाषेत चर्चा करतायत तर जे कृष्णमूर्ती उत्तराधुनिक भाषेत जेके जेव्हा बोहम सारख्या QUANTAM PHYSICS मधल्या तज्ञ सायन्टिस्टशी बोलतायत तेव्हा त्याची लेव्हल बघून बोलतायत त्यांच्याकडे येणारे लोक पंडित होते म्हणजे त्यांनी बौद्ध पंडितांशी केलेली चर्चा ही त्यांच्याच लेव्हलला जाऊन केलेली चर्चा आहे त्याउलट विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा खूप साध्या भाषेत आहे सिद्धबुद्ध चर्चा समोरच्या माणसाला मुद्दा समजावी म्हणून करतात अनेकदा ही गोष्ट लक्ष्यात घेतली जात नाही दुसरी गोष्ट मोक्षाची चर्चा ही नेहमीच जिवंत माणसांशी केली जाते त्यामुळेच मोक्षात मौखिक खूपच महत्वाचे असते आणि लिखित म्हणजे ह्या मौखिकचे लिखित व अलीकडे छापील व मुद्रित ! अनेकदा जेकेंचे भाषणे व संभाषणे ऐकलेले लोक सांगतायत कि जेकेंचा इम्पॅक्ट मुद्रित भाषेत आलेलाच नाही आणि मला वाटते हे सत्य आहे त्यातून गंडवागण्डवी करणारे लोक धडा शिकले आणि त्यांनी व्याख्याने अध्यात्मिक थिएटर केल्यासारखी सादर केली ओशो रजनीशांच्यापासून आसाराम बापूंच्यापर्यंत अनेकांनी हे थिएट्रिकल सादरीकरण केलेले दिसते
ह्यापुढचा काळ हा अध्यात्मिक फ्रॉड लोकांचाच असणार आहे कारण मोक्षाची गरज मॉबला वाटत नाही किंबहुना उत्तराधुनिकतेत ऑथेंटिक स्पिरिच्युअल मॉबचाही मृत्यू झाला आहे जे सिद्ध आहेत ते शांतपणे नेटवर्कच्या बाहेर गेले आहेत मोक्षाविषयी आवश्यक ते बोलले गेले आहे आणि आता बोलण्याची गरज नाही असे त्यांचे मत आहे ह्यांच्यापैकी एखादा सिद्ध तुमच्या आसपासच असू शकतो तो ह्या क्षणी एखाद्या मॉलमध्ये सफाई करणारा असू शकतो किंवा तो हिमालयावर असू शकतो ह्याला अपवाद चुकून एखादा संघटित धर्मात एन्लायटन झाला तर होईल मला तरी संघटित धर्मात असा कुणी भेटलेला नाही आसाराम बापूंच्यापासून रामरहीमपर्यंत सगळे फ्रॉड !
भारतात तरी मोक्ष ही दुर्मिळ घटना होत चाललीये ज्यांना प्राप्त आहे ते बोलायला तयार नाहीत आणि ज्यांना ती प्राप्त नाही असेच लोक तिचा बाजार मांडून बसलेत
त्यामुळे पुढचे सिद्ध भारतापेक्षा जर्मनी व अमेरिकेतून उगवण्याची शक्यता अधिक ! ते उगवतील आणि बोलतीलही ! कारण वेस्टमध्ये बोलण्याची अजूनही गरज आहे . भारतात यदाकदाचित कुणी सिद्ध बोलायला उभा ठाकला तरी भारतीय त्याला समजून घेतील ह्यावर विश्वास ठेवावा असे दिवस नाहीत
श्रीधर तिळवे नाईक
शैवांच्या दोन संकल्पना महत्वाच्या
१ क्षण
२ सण
प्रत्येक क्षणाचा सण होणे म्हणजे मोक्ष
साहजिकच शैवांनी सणांचे जेवढे मनावर घेतले तेवढे कुणीच घेतले नाही ज्या दर्शनाचा संस्थापकच बैलावर बसून (बैलावर बसणं किती अवघड असतं हे गावातल्यांना सांगायला नकोच ) लग्नाला वाजतगाजत जातो त्याचे अनुयायी नाचत जातील नाहीतर काय ?
जो उत्साह निर्माण करतो तो उत्सव आर्यांनी शैवांची संस्कृती स्वीकारली तेव्हा त्यांनी हे सणही स्वीकारले आणि कालांतराने त्याला उत्सव म्हणायला सुरवात केली
शैवांची जी सणसणीत उत्सवी जीवनशैली आहे ती शंकराच्या जीवनशैलीतून विकसित झाली आहे ह्या उत्सवीपणाचा सणांचा कधीकधी अतिरेक होतो आणि फेसबुकवरच्या अनेक विचारवंतांना तो गांगरून टाकतो विशेषतः कट्टर आर्यन मानसिकता असलेल्यांना त्याचा त्रास होतो आणि तशा पोष्टीही पडतात शैवांना समजून घेण्याची अजूनही त्यांची तयारी नाही एव्हढंच त्यातून दिसतं पण शैवांना जेव्हढे वेड सणांचे आहे तितकेच वेड आर्यांना व्रतांचे आहे हेमाद्रीचा चातुर्वर्गचिंतामणी अशा व्रतवैकल्यांनी भरून गेला आहे आणि लोकहितवादींनी त्यावर हल्लाही केला आहे सणांचा अतिरेक टिकापात्र आहे असं मानणाऱ्यांना व्रतवैकल्यांचा अतिरेक मात्र दिसत नाही
वास्तविक अतिरेक सण आणि व्रत दोन्हीचा थांबायला हवा वास्तविक व्रते विकसित झाली ती प्रथम जैनांच्यात मग वासुदेव पंथीयांनी ती स्वीकारली मग वैष्णवांनी नवस मात्र शैवांच्यातही होता आणि आर्यांच्यातही किंबहुना यज्ञ म्हणजे नवसाचे आर्य रूप होय अमुक एक इच्छा पूर्ण व्हावी असा संकल्प वा प्रार्थना करून यज्ञ सुरु होई आणि इच्छा पूर्ण झाली कि यज्ञ संपे

Comments
Post a Comment