फेक आणि मायेचे तीन पदन्यास

भारतात माया माहित नसलेला माणूस दुर्मिळ !! शैवांच्यात मायेचे तीन पदन्यास महत्वाचे

१  मूळ पदन्यास : माया म्हणजे वास्तव सत्य आणि माया असे हे ज्ञानिक जोडपे सत्य शून्य तर त्यातून असणारी माया अनंत जी अवकाश आणि काळ ह्यासारख्या डायमेन्शन्स म्हणजे मितींनी कैद ! मितींनी बद्ध सत्य ते माया

२ दुसरा पदन्यास ह्या मायेची  माया म्हणजे साक्षात आपली जैविक आई तिची ममता ही माया लावते

३ तिसरा पदन्यास असा आभास जो दुसऱ्या पदन्यासातून  जन्मतो ममतेतून जन्मतो त्याचे नाव ममत्व ममतेला वास्तवाचा आधार असतो ममत्वाला तो नसतो ते वास्तवापेक्षा अधिक वास्तव आहे पण जे  सत्य  नाही आजच्या मीडियात ह्या मायेचा सर्वाधिक बोलबाला आहे सत्य महत्वाचे नाही माया महत्वाची कारण मायेला टी आर पी आहे माया चटकदार असणे ही मायेची शक्ती आहे सुवर्णमृग नावाची गोष्ट जगात नसते ही गोष्ट का सीतेला माहीत नसते पण समोर सतत जाहिरातीसारख्या त्याच्या येरझाऱ्या सुरु झाल्यावर सुवर्णमृग खरा वाटायला लागतो हा खरा वाटायला लागणारा सुवर्णमृग ही माया ह्यातून निर्माण होतो माया पुरवण्याचा हट्ट आकाश मागण्याची तऱ्हा मग राज्यकर्ते असूनही विवेक हरवतो आणि सत्ताधारी धावतात सुवर्णमृग पकडायला जनतेसाठी हा एक बिग बॉससारखा शो होऊन जातो मला खात्री आहे हा शो जंगलातल्या लोकांनी मस्त एन्जॉय केला असणार किंवा रामामागे हेही सुवर्णमृग शोधायला बाहेर पडले असणार शेवटी येरझऱ्या काय फक्त सीतेलाच दिसल्या होत्या ? एक राजा अस्तित्वात नसलेल्या सुवर्णमृगाच्या मागे धावत असेल तर ते एन्जॉयबलचकी ह्या नादात मुख्य अस्सल खरीखुरी स्त्री पळवली गेली तरी सुगावा लागत नाही राजाला ! हट्ट करणारी गायब आणि हट्ट पुरवणारा हिंडत !

जिथे माया आहे तिथे मोह आहे आणि जिथे मोह आहे तिथे भ्रम आहे त्या भ्रमाचे मायाजाल आहे आणि मग त्यात ट्रॅप होणे आहे 

Comments

Popular posts from this blog