नृत्य भाग १ श्रीधर तिळवे नाईक
मी सरोज खान ह्यांच्यावर लिहिलेल्या पोस्टवर आशुतोष दिवाण ह्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे
"मला नाचता पण येत नाही आणि सिनेमे पण फार पहात नाही.
पण नाच करणे व नाच बसवणे याबद्दल मला कुतुहल आहे.
१)नाचायचा एक जीन असावा असे वाटते.ज्यांना आपल्या शरीराबद्दलचा काॅन्शन्स पूर्ण विसरता येतो,आपण माकडासारखे नाचत नाही आहोतना अशी शंका येत नाही तेच नाचू शकतात असे वाटते.
२)वैद्यकीय व्यवसायात फार स्पर्धा असते.त्यात ऊच्च लेव्हलला पुढे रहायचे तर पुढची पुढची सर्जीकल टेकनीक्स मास्टर करुन काॅन्फरन्समधे शानमधे प्रेझेंट करणे हा सर्वात यशस्वी राजमार्ग आहे.आपोआप नाव होते,तुमचा रथ उंचावरुन,रटच्या वरुन उडू लागतो,काम वाढत राहते.अश्या काॅन्फरन्सेस मधे येणारे. सामान्य सर्जन्स मौजमजा सुद्धा करायला येत असतात(अडाॅक्टरांना कल्पना येणार नाही पण सर्जीकल काॅन्फरन्सेस ॲबसोल्यूटली ग्रूएलींग असतात.दुपारनंतर अती अभ्यासाने मला मळमळत असते).ते रात्री बॅंक्वेटला माफक पिऊन नाचत असतात.तर हे असे फ्रंटरनर सर्जन असतात ना ते मी पण कसा तुमच्यासारखाच आहे(भारी सर्जन असलो तरी)हे सामान्यांना सांगण्यासाठी पाच दहा स्टेपगीप शिकून न पिता त्यांच्यात नाचण्याचा केविलवाणा अभिनय करत असतात.हे अगदी नजरेत भरण्याइतके युनिफाॅर्म आहे.युद्धात सगळ्याच आघाड्या सांभाळ्याव्या लागतात.
३)आपले हे पाचदहा अवयव,त्यांच्या ठरावीक हालचाली,त्यांची परम्युटेशन्स काॅंम्बीनेशन्स करुन व निसर्गदत्त शरीराचा हुषारीने वापर करुन आशय कसा तयार करायचा हे मोठेच कोडे आहे.
अ)निसर्गाची चिन्हे इमीटेट करायची.पदरावरती मधे गडकरबाई
ब)कन्व्हेन्शनल कामुक अभिनय करायचा,लावण्या वगैरे
क)शब्दातून सुचवलेल्या आशयाला अनुरुप शारीर गोष्टी करायच्या,पव्वा चढाके
ड)शास्त्रीय नाचातल्या /आदिवासी नाचातल्या/लोककलेतल्या कन्सेप्टस् कमीजास्त भ्रष्ट करुन वापरायच्या त्या बघणाय्रांच्या नेणीवेत असतात.
इ)पुरुषी नाचात लैंगीक हालचाली करायच्या ज्या मेल इगो व फीमेल डिझायर्स फरदर करत असतील
ई)कवायत करायची,त्यात विनोद करायचे,शारीर लवचिकतेचे प्रदर्शन मांडायचे
अश्या काही गोष्टी सुचतात
४)सर्वात चांगले नाच आत्ममग्न पात्रांचे,अकृत्रीम,अनकाॅन्शस,जगाला भिरकावून देऊन केलेल्या लयदार हालचालींनी सजतात.ते चित्रपटाचा पडदा जिवंत करुन सोडतात.मला भासलेले काही
शोला जो भडके,चलत मुसाफीर,रंग बरसे,विकत घेतला शाम वगैरे.
५)आपल्याला एक प्रश्न
यातील नवीन ब्रेकथ्रूच्या प्रेरणा काय असाव्यात?व नवा ब्रेकथ्रू आला आहे हे कसे ओळखायचे? व आपल्याला भासलेले ब्रेकथ्रू अलिकडचे कोणते?"
सर्वात पहिली गोष्ट मी साहित्य , समीक्षा , दर्शनशास्त्र , दुकानदारी , भविष्यविज्ञान , इतिहास , समाजशास्त्र , राज्यशास्त्र आणि शिक्षणक्षेत्रात मेजर तर अर्थशास्त्र , इव्हेंटमनेजमेंट , अभिनय , चित्रकला , मॅगेझीनसंपादन , नाटकचित्रपटजाहिरात दिग्दर्शन , मार्शल आर्ट , संगीतात मायनर काम केलंय . नृत्यकलेत मी कोरिओग्राफर म्हणून काम केलेले नाही आणि ज्याक्षेत्रात आपण स्वतः काही कियेटीव्ह काम केलेलं नाही त्यावर काही बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो असे मला वाटत नाही मला नाचायला आवडतं हे खरंय , एक नाटकचित्रपटजाहिरातदिग्दर्शक म्हणून मी नृत्यावर काही काम केलेलं आहे पण ते मला अधिकार देत नाही त्यामुळे मी जे काही लिहितो आहे ते अधिकारी व्यक्ती म्हणून न्हवे ह्याची कृपया नोंद घ्यावी
तुमचा मुद्दा क्रमांक १ बरोबर असावा मी असावा म्हणतोय कारण जनेटिक्सबद्दलचे माझे वाचन व ज्ञान फार मर्यादित आहे मुख्य गोष्ट स्वतःला विसरणे असते हे मला मान्य आहे
मुद्दा क्रमांक २ वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही ऑथॉरिटी आहात माझ्या आयुष्यात मी फक्त दोनच वेळा मेडिकल पोस्टकॉन्फरन्समध्ये काय घडतं ते अनुभवलं आहे १ एकदा किशोर कदम दासू वैद्य प्रकाश होळकर आणि मी आम्ही चौघे चौघांच्या कविता हा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करायचा तेव्हा २ आणि दुसऱ्यांदा एका जगभर शाखा असलेल्या एका आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक ब्रॅण्डच्या एका इव्हेंटच्या तीन ऑर्गनायझरपैकी एक ऑर्गनाईझर होतो तेव्हा ! काही कारणास्तव मेन माणूस न आल्याने मला प्रश्नोत्तर सेशन कंडक्ट करावा लागला होता त्यामुळे मी फक्त अनुमोदन देऊ शकतो तुम्ही जो ॲबसोल्यूटली ग्रूएलींग शब्दप्रयोग वापरलाय तो चपखल आहे आपल्या कोल्हापुरात ह्याला घामटा काढणारी (घामटाकाढू )म्हणतात ह्यानंतर होणारा डान्स ! हा डान्स फक्त मेडीकलच न्हवे अनेक पार्ट्यात असाच होतो आणि ह्याला प्राचीन परंपरा आहे ज्या नकुलीश शैव दर्शनाचा मी आचार्य आहे त्या दर्शनाच्या आधारे मी आता सांगतोय
नृत्याचे सादरीकरण चार प्रकारे होते
१ शिव शैव
२ शक्ती शाक्त
३ स्कन्द स्कंदीय
४ गणपती गाणपत्य
ज्याला आज आपण अभिजात नृत्य म्हणतो त्याचा आरंभ शिव आहे मोक्ष मिळाल्यानंतर शिवांनी सर्वात प्रथम काही केलं असेल तर ते नृत्य ! ते सात दिवस नाचले असे म्हणतात आणि आपण त्यांना नाचतोय ह्याचंही भान न्हवतं ह्याच्या नेमकी विरुद्ध गोष्ट गौतम बुद्धाची आहे तो काही दिवस मौन आणि शांत राहिला शिवाचे नाट्यासंदर्भात नाव आहे भारत त्याने हे नाट्यशास्त्र त्याच्या शिष्यांना सांगितले भारत म्हणजे भाव रस आणि ताल आणि शिव ह्यांचा पहिला अधिपती म्हणून तो भारत संस्कृत भाषांतरात त्यामुळेच हे महेश्वराने सांगितले असा स्पष्ट उल्लेख आहे ह्यातूनच भरतनाट्यम उदयाला आले
आणि मग इतर अभिजात नृत्य प्रकार नटराजाला नमन केल्याशिवाय आजही नृत्य सुरु होत नाही ते त्यामुळेच ! सर्व नट शैव असायचे म्हणूनच पुढे नटांना शूद्राचा दर्जा दिला गेला
शक्ती म्हणजे शिवनृत्याचीच स्त्रैण अभिव्यक्ती पार्वती शंकराकडून अनेक गोष्टी शिकली त्यात तिने स्वतःची भर टाकली त्यातील एक नृत्य ज्याला आज मोहिनीनाट्यम म्हंटले जाते ते मुळात शाक्तनाट्यम आहे
स्कंद हा मूलतः योद्धा होता साहजिकच तो जे बापाकडून शिकला त्यात युद्धजन्यता जास्त असायची तुम्ही ज्याला कवायत म्हणता ती कवायत फार प्राचीन काळापासून नृत्याचा भाग आहे आणि वीर रस सादर करतांना ती वापरली जायची आजही खंडोबाच्या गाण्यात किंवा धनगरी गाण्यात ती जिवंत आहे शस्त्रनृत्य म्हणजे त्रिशूळ , तलवार ,काठी , भाला वैग्रे शस्त्रासहित करावयाचे नृत्य ! हे ह्या स्कंदीय नृत्याचे अटळ भाग आहे यक्षगान ह्यातून जन्मलेले आहे
गाणपत्य म्हणजे ज्याला आज आपण गणपती डान्स म्हणतो ते ! गणपती पडला ज्ञानयोगी त्यात पोट वाढलेले त्यामुळे माफक हालचाली करून नाचायचे एव्हढेच त्याला ठाऊक गणपती पहिल्यापासूनच शॉर्टकट काढण्यात वाकबगार म्हणजे स्कंद जेव्हा अवघी पृथ्वी प्रदिक्षणा करायला गेला तेव्हा हा आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घालून झाली माझी प्रदक्षिणा म्हणून मोकळा आज ह्या माफक हालचालीच्या नृत्याला आपण गणपती डान्स म्हणतो एव्हढंच पण हा पूर्वीपासूनच आहे जमेल तसे नाचा हा शिवांचा मेसेजचं आहे त्यामुळे केविलवाणा अभिनय असला तरी चालतो नाचणे महत्वाचे त्यामुळे प्रथम नाच शिका मग नृत शिका आणि नंतर नृत्य शिका नाच ही सुरवात आहे आणि ती कशीही असली तरी चालते
भारतात हे चारही प्रकार जिवंत आणि रसरसलेले आहेत आर्य ब्राम्हण आणि आर्य क्षत्रिय ह्या उच्च पुण्ययोनीतल्या लोकांनी कायमच स्वतःला वैदिक समजून ह्या धारेपासून स्वतःला दूर ठेवलं होतं पुढे सिनेमा आला आणि पैसाही मग ह्या लोकांनी नाचायला सुरवात केली तोवर नाचणाऱ्यांची हेटाळणी आणि फेटाळणी चालूच होती त्यातूनच संजय लीला भन्साळीचा पहिला बाजीराव नाचणारा दाखवला तर टीका झाली मला खात्री आहे पहिला बाजीराव शैव असल्याने नक्की नाचत असणार फक्त गाण्याचे बोल चुकीचे होते त्यामुळे शिव्याच घालायच्या होत्या तर ह्या मराठी गीतकाराला घालायला हव्यात भन्साळी थोडाच मराठी तज्ञ आहे ? त्याने आपले जे लिहून दिले ते गाणे घातले पहिल्या बाजीरावानंतर पेशवे वैष्णव झाले नृत्य लांबून बघायची गोष्ट झाली पण कुलदैवत गणपतीच राहिले
थोडक्यात प्रथम जमेल तसे नाचा !
(क्रमशः )
श्रीधर तिळवे नाईक
थोडक्यात प्रथम जमेल तसे नाचा !
(क्रमशः )
श्रीधर तिळवे नाईक
आता मुद्दा क्रमांक तीन
Comments
Post a Comment