फेक आणि रिस्पॉन्सिबिलिटी श्रीधर तिळवे नाईक
पोस्टकॉर्पोरेटीझमने ब्रँड ही संकल्पना इतक्या प्रचंड प्रमाणात संपूर्ण व्यवस्थेवर लादली कि व्यक्तिगतता त्याखाली चिरडली जाऊन मेली ह्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले मुख्य म्हणजे
१ श्रेय कुणाला
२ आणि कायदेशीर जबाबदारी कुणाची
ह्या प्रश्नाचे उत्तर त्या त्या कॉर्पोरेट कम्पनीला श्रेय व कायदेशीर जबाबदारीही त्या कार्पोरेट कम्पनीची असे देण्यात आले आहे पण उत्तराधुनिकतेचा अस्त होत असतांना आणि जालतेचा आणि जालीयतेचा उदय होत असतांना ह्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा नव्याने बघणे आवश्यक झाले आहे
फिल्म इंडस्ट्रीत अनेक लेखक दिग्दर्शक संगीतदिग्दर्शक सर्रास चोऱ्या करतात आणि चित्रपटसाक्षर नसलेल्या निर्मात्यांना हे लोक सर्रास हे माझे ओरिजनल काम म्हणून सर्रास गंडवतात ही चोरी पकडली जाते तेव्हा निर्माते फसतात कारण कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावरही पडते अनेकदा मूळ लेखक संगीतदिग्दर्शकाला पैसे देऊन निर्माते ही चोरीची प्रकरणे मिटवतात आणि निर्मात्याचा दोष नाही म्हणून बहुतांश कलावंत पैसे घेऊन सोडून देतात चोरी पचते आणि चोर पुन्हा चोरी करायला मोकळे होतात साहजिकच अलीकडे मी बॉलिवूडच्या निर्मात्यांना अग्रीमेंट करतांना हा माल चोरीचा असल्याची तक्रार आल्यास कायदेशीररित्या त्याला मीच जबाबदार आहे असं कलम टाका म्हणून सांगतो
पत्रकारितेत फेक न्यूज देण्याचे व रचण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे आणि ह्या फेकनेसची जबाबदारी कुणी घ्यायची असा एक मूलभूत प्रश्नच निर्माण झाला आहे आनंदवनाबाबतची न्यूज ही फेक असेल तर त्याची जबाबदारी कुणाची ?
अलीकडे मीडियात अशा भानगडी वाढत चाललेल्या दिसतात माझ्या मते बातमीची जबाबदारी ह्यापुढे ज्याने दिली आहे त्याच्यावर टाकावी आणि लेख आणि अग्रलेख ह्यांचीही ज्याने तो लिहिला आहे त्याच्यावरच जबाबदारी टाकावी त्यासाठी प्रत्येक बातमीच्या बातमीदाराने नाव लेख व अग्रलेख ज्याने लिहिला आहे त्या लेखकाचे नाव टाकावे आणि यदाकदाचित कोर्टात मॅटर गेले तर त्या मॅटरची जबाबदारी त्या त्या बातमीदार व लेखकावरच टाकावी यदाकदाचित बातमी एडिटरने एडिट करून ट्विस्ट केली असेल तर मूळ बातमी व ट्विस्ट केलेली बातमी ह्यांची तुलना करून बातमी वा लेख ट्विस्ट केला असेल तर त्याची जबाबदारी ह्या ट्विस्टरवर टाकावी हे उत्तम ब्रँड तयार करण्याच्या नादात व्यक्तिगत श्रेय न देण्याची सिस्टीम माझ्या मते आऊटडेटेड होत चाललीये कारण पूर्वी विश्वासार्हता आणि सत्यता प्रचंड होती १९५० नंतर ती लयाला जायला सुरवात झाली आणि आता ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण लयाला गेल्या आहेत पोस्ट्रुथ एरा असे नाव देऊन ह्यातून सुटता येणार नाही तर जबाबदारी अंगावर घेऊन आणि टाकूनच
हा प्रश्न सोडवता येईल ब्रॅण्डिंगच्या सनातन कर्मठ युक्तिवादाला मूठमाती देऊन पुन्हा एकदा वैयक्तिक जबाबदारीचे युग इन्ट्रुड्युस करण्याशिवाय तरणोपाय नाही
श्रीधर तिळवे नाईक
छोट्या छोट्या गोष्टी

Comments
Post a Comment