मनमोहन आणि हिंदुत्ववाद
कोल्हापूर स्कूलमध्ये जे काही कवी झाले त्यात मनमोहन नातू ह्यांचे नाव महत्वाचे आहे त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव गावी १९११ साली झाला
कोल्हापूर स्कूलमध्ये संत परंपरेत बहिणाबाई रोमँटिसिजम मध्ये रेंदाळकर हे कवी झाल्यानंतर आधुनिक कवितेचे जे तीन प्रवर्तक झाले त्यात मर्ढेकर आणि मुक्तिबोधांच्या बरोबरीने आपणाला कोल्हापूर स्कूलमधील मनमोहनांचे नाव घ्यावे लागते पुढे करंदीकर , सारंग आणि अरुण कोलटकर ही नावे येतात
एक प्रकारचा धुसमुसळेपणा आणि रग हे कोल्हापुरी स्कूलचे वैशिष्ट्य मनमोहनांच्यात ओतप्रोत भरलेले आहे तरीही त्यांचे नाव घेतले जात नाही कारण ते हिंदुत्ववादी मानले जातात कारण त्यांनी सावरकरांच्यावर लिहिलेली दगडाची पार्थिव भिंत ही कविता

मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली
ही त्यातील एक दमदार ओळ !
ही एक दमदार कविता असल्याने तिचा प्रभाव व्यापक पडला आणि बिचारे मनमोहन हिंदुत्ववादी झाले ते कायमचे ! प्रश्न असा कि मग हिंदुत्ववाद्यांनी त्यांना का आपला कवी म्हणून पुढे आणले नाही तर त्याला कारण गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी गांधिजिंच्यावर लिहिलेली कविता जी बिलकुलच हिंदुत्ववादी न्हवती
मराठी भाषावापराचे जे वैदिक स्कूल आहे ते प्रथम मनमोहनांनी काव्यात्मक केले नाहीतर तोवर हे स्कूल गद्यात्मकतेत अडकले होते पुढे मन्या ओकने ते अधिक डेव्हलप केले त्यांची गीतेसुद्धा अशा भाषेने नटलेली होती विशेषतः राधे तुझा सैल अंबाडा हे गीत त्यावेळी गाजले होते दिलीप चित्रे ह्यांच्या मते त्यांची युगायुगांचे सहप्रवासी ही कविता मराठी आधुनिक कवितेत अतिवास्तववादाची मुहूर्तमेढ रोवणारी माईलस्टोन दीर्घ कविता आहे ही एक अप्रतिम कविता आहे ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही चित्रेंनी त्यांच्या ह्या कवितेची तुलना नामदेव ढसाळ ह्यांच्या बाबरी मशिदीनंतर लिहिलेल्या कवितांशी केली आहे
असे असूनही मनमोहनांना अनुयायी का मिळाले नाहीत ? मला वाटतं कुठेना कुठेतरी अस्तित्वाला ग्रासणारी पिळवटून टाकणारी बैचैनी त्यांच्यात न्हवती इंग्लिश येत नसल्याने त्यांचा तिच्याशी परिचयच न्हवता ते थेट मराठी परंपरेतून लिहीत होते आणि फक्त देशी सोर्सवर विसम्बुन राहणाऱ्या कवीची मर्यादा त्यांना पडली
दुसरी गोष्ट गांधी हत्येनंतर कोकणस्थ ब्राम्हण अचानक आरोपीच्या पिंजऱ्यात गेले मनमोहन कोकणस्थ ब्राम्हण असल्याने त्यांच्याकडेही वक्र दृष्टी झाली त्यातच ऐन फाळणीच्या वेळी त्यांनी युगायुगांचे सहप्रवासी ही फाळणीवर कविता लिहिल्याने तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे मराठी समीक्षेला कळेना
तिसरी गोष्ट पुढे त्यांनी असे आधुनिकतावादी म्हणावे असे लेखन कमी केले आणि देशी रोमँटिसिझम कवटाळला मराठेशाहीवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या ज्या देशी रोमँटिक होत्या त्यामुळे ही आधुनिक कविता फ्लूक होती असेही अनेक आधुनिकतावादी लोकांना वाटून गेले
ह्यातच भर म्हणून त्यांची जात व सावरकर प्रेम ह्यामुळे त्यांच्यावर हिंदुत्ववादी शिक्का बसला तो कायमचाच त्यातून त्यांना कधीही सुटका मिळाली नाही ते एकटे पडत गेले हिंदुत्ववाद्यांना ते हिंदुत्ववादी वाटत नसल्याने त्यांनीही त्याची कदर केली नाही मुळात हिंदुत्ववाद्यांना आधुनिक कविता कितपत कळते ह्याविषयीच मला शंका आहे
एकंदरच हा कवी एकटा पडला आणि संपला त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे
'कलेवर कवीचे जाळू नका हो,
जन्मभर तो जळतच होता.
फुले तयावर माळू नका हो,
जन्मभर होत फुलतच होता'
असे काहीतरी त्यांच्या वाट्याला आले आणि ते मरेपर्यंत जळतच राहिले
आज उरलीये ती त्यांची युगायुगांचे सहप्रवासी ही दीर्घ कविता आणि तिच्यातला अभूतपूर्व कल्पनाविलास !
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment