परकीय वाङ्मय आकार व प्रकारासाठी परकीय भाषा येणे आवश्यक आहे काय ? श्रीधर तिळवे नाईक
सदानंद डबीर ह्यांनी अलीकडे लोकसत्तात एक प्रतिक्रिया लिहुन नको ती खळबळ उडवलेली आहे मराठीतील मूर्खपणा किती खालच्या थराला जाऊ शकतो त्याचा हा नमुना आहे आणि चर्चेचा विषय काय तर सुरेश भटांना उर्दू येत होती कि नाही आणि त्यामुळे त्यांनी चुका केल्या कि नाहीत अनेकदा जेव्हा एखादा कवी एखादा काव्यप्रकार एखाद्या परकीय भाषेतून घेऊन येतो तेव्हा त्याला ती परकीय भाषा येत असते म्हणजे इंग्लिशमधून सॉनेटस येणे किंवा माधव ज्यूलियनांनी फारसीतुन गझल आणणे काही वेळा ज्या परकीय भाषेतून ती आलेली असते त्या भाषेनेही तो प्रकार कुठल्यातरी भलत्याच भाषेतून आणलेला असतो उदाहरणार्थ सॉनेट हा प्रकार सूर्याला वाहिली जाणारी सूक्ते ह्या रूपातून विकसित झाला आणि ज्या इटालियन भाषेच्या इतलो दालमिशियन ह्या सिसिलियन पोटभाषेत जियकोमो लेंटिणी ह्या कवीने तो जन्माला घातला ती भाषा आता जवळपास मृतप्राय झालेली आहे पण म्हणून कोणी यूरोपमध्ये सॉनेटस लिहिणाऱ्यांना तुला इतलो दालमिशियन ही मूळ भाषा येते का असं विचारलं नाही फ्रेंचांनी आपली सॉनेट्स विकसित केली तर ब्रिटिशांनी आपली आणि मराठीने आपली . पण गझल लिहिणाऱ्या लोकांच्या अहंकाराविषयी काय बोलावं ? जो तो स्वतःलाच गझल कळली असं भासवत असतो पूर्वी ब्राह्मण जसे वेद काय ते आपल्यालाच कळले म्हणून भासवत तसा हा कर्मठ भटाळ प्रकार ह्याची सुरवात भटांनीच केली आणि आता हा प्रकार त्यांच्यावरच उलटलेला दिसतो माधव ज्युलियन ह्यांना गझल कशी कळली नाही आणि ती कशी फक्त मलाच कळली हे सांगणारे भट आता सदानंद डबीर ह्या त्यांच्या शिष्याकडूनच वापरल्या गेलेल्या त्यांच्या स्ट्रॅटेजीला बळी पडलेत मुळात माझा प्रश्न असा कि गझल लिहण्यासाठी उर्दू कशाला यायला हवी भटांना जी गझलियत बरोबर वाटत होती ती त्यांनी मांडली तिथेच प्रश्न संपला तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तुमची संकल्पना मांडा आणि विषय संपवा उद्या गझल ही मूळची अरेबिक असल्याने तुम्हाला अरबी भाषा येते का असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय करणार ? कुठल्याही प्रकाराने देशीवादी होऊ नये पण देशीपणा जरूर धारण करावा आणि देशीपणा धारण करताना परंपरेशी जरूर लढावे अनेकदा मार्गी लोक आमच्या मूळ आकाराप्रमाणे तुम्ही देशी आकार धारण करा असा आग्रह धरतात पण आग्रह हा मूर्खपणाचा असतो उर्दू गझलेचे उर्दूचे बघून घ्यावे उर्दूतून आपण काय आयात करायचे काय नाही कसे आयात करायचे कसे नाही हे आपण ठरवायचे उर्दूतली आजाद गझल मी आणलीच कि पण म्हणून तिचे यमकाचे नियम मी पाळावेत असं थोडंच आहे ? आकारिक गोष्टीवर भांडून भांडून गझलकार निव्वळ स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत कलेत प्रमाण भाषा , प्रमाण आकार असे काही नसते फक्त शास्त्रीय वापराच्यावेळी ते योग्य असते इतकं बेसिकही जर आपणाला कळणार नसेल तर आपल्याला काय घंटा कळालं ?
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment