प्रबोधनात (Enlightenment ) अडकलेल्या नवता आणि आधुनिकतेचा प्रश्न

मराठीत ज्यांनी नवता मांडायच्या त्यांनीच नवतेचे साहित्यही निर्माण करायचे अशी वहिवाट थेट ज्ञानेश्वरांपासून निर्माण झालेली दिसते त्यामुळे जेव्हा ब्रिटिश राजवटीत पुन्हा प्रबोधनाला चालना मिळाली आणि एतद्देशीयांना विज्ञानाचा मुख्य म्हणजे फ्रान्सिस बेकनने मांडलेल्या सायंटिफिक मॅथोडोलॉजिचा अप्रत्यक्ष परिचय झाला तेव्हा त्याचे पडसाद कलेत उमटणे अटळ होते मराठीतील प्रबोधनवादी नवता लोकहितवादी , फुले , जांभेकर प्रभुतींनी सुरु केली असली तरी साहित्यातील त्याचा पहिला पडसाद फुल्यांच्या कवितेत आणि तृतीय रत्न (१८५५)ह्या नाटकात उमटला फुल्यांचे समकालीन साहित्यिक क्लासिसिजममधेच अडकले रॅशनॅलिझमकडे वळलेच नाहीत फुल्यांना कादंबरी लिहिता आली न्हवती ती कसर बाबा पदमजी ह्यांनी  यमुनापर्यटन (१८५७) लिहून भरून काढली पुढे विसाव्या शतकात बळवलेली पहिली रोमँटिक नवता केशवसुतांनी निर्माण केली त्यांनी कवितेवर कविता लिहूनच आपल्या नवतेची मांडणी केलेली दिसते वास्तविक ह्या काळात मराठीत कलेचा शास्त्रशुद्ध शोध सुरु व्हायला हवा होता पण तो झाला नाही फ्रान्सिस बेकनने रॅशनॅलिझमची आणि अनुभववादाची मांडणी केली असली तरी त्याने कलेबाबत जी भूमिका घेतली ती सौंदर्याच्या कल्पनेला पूरक असल्याने  सौंदर्यशास्त्राचा पाया घालायला मदत करती झाली मराठीत सौंदर्यशास्त्र अवतरायला वामन मल्हार जोशींची वाट बघायला लागली आणि त्यानंतरच मराठी रोमँटिक कविता सुधारली विशेषतः पु शी रेगे आणि त्यांच्यामुळे आरती प्रभू व ग्रेस त्यांनीच प्रथम विचारसौंदर्य हा शब्दप्रयोग वापरला पुढे प्रभाकर पाध्ये ह्यांनी त्यांच्यावर वामन मल्हार आणि विचारसौंदर्य नावाचा एक ग्रंथच लिहिला मात्र वामची  मांडणी ही फारच जुजबी होती आणि त्यातूनच एक अजिबोगरीब क्रायसिस मराठीत निर्माण झाला 

दुसऱ्या नवतेचे आधुनिकतावादी वाङ्मय यूरोपात सुरु झाले ते वास्तववाद , सौंदर्यवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद ह्यांच्याविरोधात साहजिकच ह्या वाङ्मयाचा सौंदर्यशास्त्राला  ठाम विरोध होता कलेने शास्त्र ठोकरून लावावे ह्या मताचे हे लोक होते मराठीत आधुनिकतावादी कविता लिहिली बा सी मर्ढेकरांनी पण यूरोपमधील आधुनिकतावाद्यांच्या प्रमाणे सौंदर्यशास्त्र ठोकरून लावण्याऐवजी त्यांनी स्वतःचे सौंदर्यशास्त्र मांडले हे विरोधाभासी होते पण हे घडले आणि ह्याचे कारण मराठीतील सौंदर्यशास्त्राचा अभाव होता म्हणजेच कवी म्हणून आणि कादंबरीकार म्हणूनही आधुनिकतावादी झालेले मर्ढेकर समीक्षक म्हणून नवता मांडण्याऐवजी चक्क प्रबोधनात परतले होते गंमतीचा भाग असा होता कि हे करतानाच ते प्रतिमावाद मांडून युरोपियन आधुनिकतावादाच्या सिम्बॉलिझमशी जवळीकही साधत होते हे घडण्याला जबाबदार तत्कालीन परिस्थिती होती जी प्रबोधनात हेलकावे घेत होती 

पुढे नेमाडे ह्यांनी कोसला ही आधुनिकतावादी कादंबरी लिहिली खरी पण त्यानंतर ते बदलले आणि त्यांनी तिसरी नवता मांडली प्रबोधनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधन हे परंपरेत राहून परंपरेविरुद्ध बंड करते काही दिवसापूर्वी मी फेसबुकवर एक रॉजर बेकनवर लेख टाकला होता तो हेच सिद्ध करण्यासाठी कि कसे त्याने यूरोपमधील ख्रिश्चन धर्मगुरूंचे काम करता करता विज्ञानाची पार्श्वभूमी तयार केली धार्मिक परंपरेत व सातत्यात उभे राहून विज्ञान निर्माण करण्याचा हा प्रयत्न एका अर्थाने देशीवादी होता आणि तो यशस्वी झाला होता नेमाडे नेमके हेच काम करू इच्छित होते प्रबोधनाने चार वाद निर्माण केले 
१बुद्धिप्रामाण्यवाद 
२निसर्गवाद 
३ सौंदर्यवाद 
आणि 
४ वास्तववाद 
नेमाडेंनी कोसलातील आधुनिकतावादी शैलीचा त्याग करून वास्तववादाचा पुरस्कार करायला सुरवात केली आणि त्यातूनच बिढार जरीला झूल जन्मल्या हे प्रबोधनात परतणे होते मात्र मर्ढेकरांच्यासारखे नेमाडे दुभंगले नाहीत म्हणजे साहित्य आधुनिकतावादी आणि समीक्षा प्रबोधनवादी असे त्यांचे झाले नाही त्याऐवजी देशी परंपरेतील देशी वास्तववाद अशीच त्यांनी मांडणी केली आणि साहित्यही तसेच लिहिले जणू कोसला लिहिणारा कोणी दुसराच लेखक होता 

प्रश्न असा कि आपले नवतावादी लेखक पुन्हा पुन्हा प्रबोधनात का परततात ? 

ह्यामागची कारणे उघड आहेत 
१ पहिले कारण तुम्ही तारुण्यात कितीही बंडखोर असा भारतीय समाज तुमची बंडखोरी पुरेपूर जिरवतो आणि जाणीव करून देतो कि तू एका पुरेसे प्रबोधन न झालेल्या समाजात जन्माला आलेला आहेस जो अजून जातीपाती आणि वर्ण ह्यांच्यातूनही बाहेर आलेला नाही तेव्हा तुझ्या आधुनिक मौजा चुपचाप गुंडाळ आणि जे खरेखुर्रे वास्तव आहे त्याकडे लक्ष्य दे 
२ तुमचे कुटुंब आणि तुमचे उपजिवीकेचे साधन जर तुम्ही कॉस्मो संस्कृतीत नसाल तर तीव्रतेने तुम्हाला परंपरेशी तडजोडी करायला भाग पाडते आणि त्यातूशेवटी न पुन्हा पुन्हा तेच तेच वास्तव डोकावणाऱ्या ह्या सिच्युएशनला टाळणे तुम्हाला फार जड जाऊ लागते आणि शेवटी तिला फेस करण्याचा एकच मार्ग उरतो वास्तववाद किंवा भावनाशील असाल तर रोमँटिसिझम 
३ तुमच्या बंडाला मान्यता मिळाली नाही आणि जर तुम्हाला समाजाची दाद हवी असेल तर आपोआपच तुम्ही समाजाच्या मानसिकतेशी जुळवून घ्यायला लागता . भारतीय आणि मराठी समाजाची मानसिकता ही अद्यापही धार्मिक आहे किंवा प्रबोधनवादीच आहे ह्यापलीकडे तुम्ही काही लिहिले तर रसिकांना चालत नाही त्यामुळे तुमची आधुनिकताही कोसलासारखी आधुनिकतेची टवाळी करणारी असेल तर ती खपते अन्यथा ती  चालत नाही त्यामुळेच ज्यांना ह्या देशातल्या लोकांना सोबत घेऊन जायचे आहे किंवा ज्यांना ह्या देशातील लोकांची दाद वा मान्यता हवी असते त्यांना 
पारंपरिक धार्मिक 
किंवा 

१बुद्धिप्रामाण्यवाद 
२निसर्गवाद 
३ सौंदर्यवाद 
आणि 
४ वास्तववाद 
ह्या चार वादात फिरणारे वाङ्मय लिहावे लागते किंवा कलाकाम करावे लागते अपवाद इंटरनॅशनल लोकांनी दिलेली दाद त्यांनी दाद दिली तर लाजेकाजेस्तव किंवा त्यांनी मान्यता दिली म्हणजे ग्रेटच असले पाहिजे ही कलोनियल मानसिकता असल्याने कधीकधी तुम्हाला मान्यता मिळू शकते प्रत्यक्षात इथल्या लोकांना तुमच्या कामाशी झ्याट काही देणेघेणे नसते जे कृष्णमूर्तीपासून गायतोंडेंच्यापर्यन्त सर्वांना भारतीयांनी दिलेली दाद ही त्यांना आंतरराष्ट्रीय दाद मिळाल्यानंतर कलोनियल मानसिकतेने दिलेली किंवा लाजेकाजेस्तव दिलेली दाद आहे 
आता अशी दाद हे मटका लागण्यासारखे असते त्यामुळे साहजिकच मटका खेळण्यापेक्षा प्रबोधनवादाचा सेफ्टी गेम खेळणे कधीही परवडेबल असते आणि त्यामुळेच अनेक नवतावादी लेखक झक मारत प्रबोधनात परततात आजही हा प्रबोधनाचा सेफ्टी गेम चालूच आहे आणि आजही हा सेफ्टी गेम  सध्या सारेच अगदी फेसबुकवरही खेळतायत 

तेव्हा जय प्रबोधन ! जय प्रबोधन सेफ्टी आणि प्रबोधन सेफ्टी झिंदाबाद ! 

श्रीधर तिळवे नाईक 

कव्ही ह्या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाने माझ्या चॅनेल सीरिजची सुरवात झाली आणि चॅनेल श्रीवाहिनीने ह्या सीरीजची सांगता ! ही सांगता आकस्मिक होती आणि मग मी थांबलो. कधी न्हवे तो मी थांबलो . ह्यातून बाहेर पडण्यासाठी मी माझा कवीमित्र सलील वाघ आणि जयंत गाडगीळ ह्याच्याशी चर्चा करायचो मेनॉपॉज आल्यानंतर बायकांची जी स्थिती होते तशीच काहीशी ही स्थिती होती अखंडपणे लिहिता माझा हात कधी थांबेल असं  वाटलं न्हवतं मग अचानक एके दिवशी जोशी कि कांबळे ह्या चित्रपटाची  सुरवात झाली  आणि  हा पोएटरीपॉज संपला आणि नेट सिरीज सुरु झाली

श्रीवाहिनी ही १९९० ते २००७ ह्या दरम्यान लिहिली गेली असली तरी तिचा बाज २००७ कडे  आधिक कलतो ती एका अर्थाने चॅनेल सीरिजचे  कल्मिनेशन आहे शिखर आहे ह्या सिरींजमधला हा माझा एक आवडता संग्रह आहे कालातीत कविता लिहण्याऐवजी तो तो क्षण वा  ते ते क्षण कागजावे ही माझी काव्यप्रकृती आहे महान कविता लिहण्याचे काम मी माझ्या समकालीन कविंच्यावर सोडले आहे . महान कविता लिहायला लागणारी प्लास्टिकप्रवृत्ती माझ्याकडे नाही मी बायोलॉजिकल  कागद आहे जो कधीही डिजिटल होऊ शकतो . अनुभवाप्रमाणे गियर बदलावा तशी माझी भाषा बदलते स्वतःची भाषा वैगरे महान कामे मला जमत नाहीत डोंगर पोखरून वर्षाला अभिजात असे मोजके कवितांचे उंदीर काढणारे अभिजात कवी मी साईडलाईन करतो कारण अख्खा डोंगर कवितेच्या उंदरांच्या उदरात  सरकवण्याचा माझा प्रयत्न असतो मी अभिधेत असतो आणि अभिधेनंतरच्या लक्षणेत आणि व्यंजनेतही असतो  . मी सौष्ठवात असतो आणि सौष्ठवाने घेतलेल्या शब्दवेधातही असतो माझ्या समकालीन लेखकांना कवींना आणि समीक्षकांना मी कवी आहे हेच मूळात मान्य नाही त्यामुळे कवितेच्या क्षेत्रात चौथी नवता मांडणारा समीक्षक एव्हढीच काय ती माझी कामगिरी असे त्यांचे मत आहे आणि ते ते व्यक्त करत असतात अर्थात हे राजकारण आहे कि हलकटपणा आहे कि भय आहे कि चाटूगिरी आहे कि भाडखाऊपणा आहे कि सत्याचा अपलाप करण्याची दुष्ट मानसिकता आहे कि स्वतःच्या हितसंबंधांची रक्षण करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कि कवी म्हणून मला संपवण्याचे हे षडयंत्र आहे हे त्यांनाच ठाऊक. खरा कवी असा समकालीन लोकांच्या नतद्रष्टपणामुळे संपतो का हा प्रश्न आहे .

ह्या संग्रहाची रचना माझ्या इतर संग्रहापेक्षा थोडी वेगळी आहे ती कशी रचनेत टाकावी हा खरेतर प्रश्न आहे
असो कविता तुमच्यापुढे आहेतच

(सतीश पाध्येंसाठी २००९ साली लिहिलेले टिपण अ ड़ॉ हॉ कॉ च्या अल्प खपामुळे हा संग्रह काढण्याचे त्यांनी रद्द केले    )
========================================================================
मंगेश बनसोड
ह्या जुन्या कविता ठेऊन करायचं तरी काय ? मुळात सगळ्याच जुन्या कविता फेसबुकवर टाकणे गरजेचे वाटल्यानेच हे सुरु झाले आहे काहींना माझ्या जुन्या कविताच बेस्ट वाटतात आणि तेही योग्य आहे काहींना नव्वदनंतरच्या तर काहींना दोन हजारनंतरच्या काहींना दोन हजार दहानंतरच्या ! सर्वच आपापल्या जागी योग्यच आहेत . एखादे मूल थोरले एखादे धाकटे आईने ह्यात डावे उजवे करू नये अनेकदा कलेच्या क्षेत्रात धाकटी भावन्डे जास्त कर्तृत्ववान निघतात पण म्हणून आईसाठी थोरले भावंडं कमी कुवतीचे होत नाही डेकॅथलॉन सिरीज , चॅनेल सिरीज , नेट सिरीज , निर्वाण सिरीज ही चारी माझ्यासाठी माझीच मुले आहेत त्यातील थोरले खूपच लाजाळू होते म्हणून लोकांपुढे येत न्हवते पण ते आता आणत असतो इतकेच
======================================================================

तिळवे भांडार हे माझ्या वडिलांचे आणि माझे कोल्हापुरात असताना असलेले दुकान माझ्या अनेक कवितांत कायमच डोकावत राहिले पुढे मॉल संस्कृति आल्यावर अनेक दुकानांची वाताहत झाली त्यात माझेही दुकान होते आणि आत्मचरित्रातील काल्पनिक क्षण ह्या माझ्या प्रकाशित महाकृतीतील दुसऱ्या खंडात ह्यावर एक दीर्घ कविता होती त्यापूर्वीचे दुकान हे प्रामुख्याने १९८२ ते १९८७ ह्या कालखंडातील अनेक कवितांत आले माझ्या गझला ह्याला अपवाद असणे शक्यच न्हवते ते काही शेरात डोकावले आहे पण काही अशाही गझला होत्या ज्या पूर्णपणे दुकानावर लिहिल्या गेल्या मराठीत व्यापारी वृत्तीला स्थान नाहीच त्यामुळे व्यापारी वृत्तीला पाप समजून तिचा त्याग करणाऱ्या संत तुकारामाला इथे देवाचे स्थान आहे मला स्वतःला माझे वडील पक्के गांधीवादी त्यामुळे त्यांनी अतिशय सचोटीने व्यापार केला त्यामुळे व्यापाराचे आणि ह्या व्यापारी वृत्तीचे वावडे नाही त्यामुळे त्याचे पडसाद माझ्या कवितात उमटणे अटळ ! व्यापाराशिवाय समाज कसा काय अस्तित्वात असणार हे मला अजूनही समजलेले नाही अगदी कम्युनिस्ट राजवटींनाही तो टाळता आलेला नाही . असो . इथे फेसबुकवर काही दुकानगझला देतोय .
श्रीधर तिळवे नाईक
======================================================================
धन्यवाद ह्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल ! २६ जुलैला अडकणाऱ्या अनेकांपकी मीही एक ! त्या  अनुभवाची जी दीर्घ  कविता झाली तिचा हा तुकडा !  . आपण आपल्या  गावात वेगळे असतो आणि आपला पावसाळाही नैसर्गिक असतो इथे मुंबईत सर्वच बदलते . असो . कवितेतल्या पावसापेक्षा आता ह्या क्षणी पडतोय तो पाऊस महत्वाचा  आणि सुंदरही  !
-----------------------------------------=======================================================================
गोपालदास सक्सेना नीरज गेले हिंदीत आधुनिक गझलेची पायाभरणी करणारा गझलकार गेला विंदा करंदीकर आणि सुरेश भट ह्यांच्या कालखंडाच्या दरम्यान त्यांचा जन्म झाला होता (१९२५) आणि त्याचा त्यांना आणि पर्यायाने हिंदी गझलेला प्रचंड फायदा झाला विंदा करंदीकरांची आधुनिकता त्यांच्या ठायी होतीच पण त्याच बरोबर प्रत्येक शेर स्वतंत्र असला/वाटला  पाहिजे हा गझलेच्या काव्यशास्त्रातला मूलभूत सौन्दर्यधाकही त्यांच्या ठायी होता त्यामुळे त्यांच्या गझला कधीच कविता वाटल्या नाहीत त्यांनी गिरवलेली गझलेची बाराखडी नंतर सुरेश भटांनी मराठीत आणली आणि पुढे हिंदीत दुष्यन्तकुमार सारखा गझलकार त्यांच्या खांद्यावर सहज उभा राहू शकला जे दुष्यन्तकुमारला साधलं नाही ते त्यांच्याच समवयस्क सुरेश भटांना साधले नाही आणि मराठी गझलेला चंद्रशेखर सानेकर येण्याची वाट बघावी लागली हिंदी आणि मराठी गझलेत हा जो एक पिढीचा फरक पडला आणि हिंदी गझल जी एक पिढी पुढं निघून गेली त्याचे कारण गोपालदास सक्सेना नीरज होते

सक्सेना हे विंदा करंदीकरांच्या प्रमाणे मध्यमवर्गीय ब्राह्मण होते आणि त्यामुळे त्यांच्या गझलेवर सुरवातीला विंदाच्याप्रमाणे वेदान्तदर्शनाचा पगडा होता हिंदी आणि उर्दू ह्यांना प्रभावीपणे एकत्रित वापरण्याची त्यांची शैली पुढे हिंदी गझलेचा ट्रेडमार्क बनली उदाहरणार्थ
 दिल जवाँ सपने जवाँ मौसम जवाँ शबभी जवाँ
तुझको मुझसे इस समय सूनेमे मिलना चाहिए


ह्यातील पहिली ओळ उर्दू तर दुसरी थेट हिंदी आहे किंवा 
दाग़ मुझ में है कि तुझमें ये पता तब होगा
मौत जब आएगी कपड़े लिए धोबन की तरह

ह्यातील धोबन चा वापर अप्रतिम आहे जो हिंदीचा फील देतो .

किंवा 

जब चले जाएँगे हम लौट के सावन की तरह


याद आएँगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह
ह्यातील चुंबन ही असाच हिंदी फील देतो
नीरजनी हिंदी गझलेला हिंदी व्यक्तिमत्व दिले आणि तिचे उर्दूत्व शाबूतही ठेवले विंदांनी जसे गझलेचे माधव ज्यूलियनत्व शाबूत
शाबूत ठेवले आणि तरीही तिला आधुनिक मध्यमवर्गीय चेहरा दिला तसे काहीसे हे काम आहे .
मी स्वतः नीरज प्रथम वाचले होते आणि मग दुष्यन्तकुमार त्यामुळे दुष्यन्तकुमार कुणाच्या खांद्यावर उभा आहे
ह्याची मला नीट जाणीव होती आणि आहे
नीरज ह्यांच्या फिल्मी गीतांवर काय लिहावे आनंद बक्षी ह्यांच्या ट ला ट व री ला री जुळवणाऱ्या प्रतिभेवर ते आणि
इंदीवर उत्तम डोस होते बॉलीवूडने हे डोस अंगी लावून घेतले नाहीत हे नीरज ह्यांचे न्हवे तर बॉलीवूडचे दुर्देव आहे
नीरज गेले पण ते कधीही

गीत उन्मन है ग़ज़ल चुप है रुबाई है दुखी

ऐसे माहौल में 'नीरज' को बुलाया जाए
असं म्हणत महफिलीत दाखल होऊ शकतात
श्रीधर तिळवे नाईक


प्रबोधनात (Enlightenment ) अडकलेल्या नवता आणि आधुनिकतेचा प्रश्न २श्रीधर तिळवे नाईक

भारतीय प्रबोधनाची चर्चा महाराष्ट्राच्या संदर्भात करताना मराठी आधुनिकीचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो कारण ह्या प्रबोधनाचा इतिहास अत्यंत घिसापिट्या अशा दोन दृष्टिकोनातून लिहिला जातो आणि आपल्या नवता त्यामुळेच प्रबोधनात अधिकच गटांगळ्या खात राहतात
आपले प्रबोधन प्रामुख्याने
१ इंग्रजीकरण
२ ब्राम्हणीकरण
२ ब्राम्हणेतरीकरण
४ हिंदुत्वीकरण
५ बौद्ध नवंयांनीकरण
६ वैश्यिकरण
७ क्षत्रियकरण
ह्या सात   प्रक्रियेतून वाटचाल करत जाते आणि आपले बाराही समुदाय ह्या प्रक्रियांना बळी पडताना दिसतात ह्या  प्रक्रियांनी एकाचवेळी आपणाला परंपरेतून बाहेर काढले , नव्याने परंपरेशी भिडवले आणि शेवटी पुन्हा आपणाला परंपरेत गटांगळ्या खायला भागही पाडले

भारतीय समाजशास्त्राने ह्याची फारशी चिकित्सा केली नाही मी विनोदाने नेहमीच म्हणतो कि समाजशास्त्रानें भारतात वर्णजातिशास्त्र असे नाव धारण केले असते तर ते अतिशय मूलगामी तर झाले असतेच पण त्याला भारतीय चेहरा फार लवकर प्राप्त झाला असता पण असे झाले नाही कारण भारतात समाजशास्त्र विकास पावत असतांना नॅशनल फ्रिडम मुव्हमेंट चालू झाली जिला ही चौकशी केंद्रीयस्थानी आणणे चळवळीच्या राजकीय  पातळीवर परवडणारे न्हवते भारतीय नागरिक मॅनुफॅक्चर करण्याचा चळवळीचा प्रयत्न त्यामुळे कोलमडून पडला असता


उदाहरणार्थ भारतीय पुरोहित समुदायात गुरव ,शेणवी वा लिंगायतांसारखे शैव ब्राम्हण  हे शैव पुरोहित  स्वतःला वैदिक ब्राम्हण म्हणवून स्वतःचे ब्राम्हणीकरण घडवण्यात मग्न असतांना वैदिक ब्राम्हण मात्र पारंपरिक हिंदू व मुस्लिम क्षत्रिय इंग्रजांच्याकडून राजकीय पेन्शन घेण्यात मग्न झाल्याने नवीन आलेल्या ख्रिस्चन राजकर्त्या लोकांच्यात प्रवेश करून पारंपरिक नोकरदार वर्गाच्या जागा कशा पटकावता येतील त्याची आखणी करत स्वतःचे इंग्रजीकरण घडवण्यात मग्न झाले होते साहजिकच रानड्यांच्या पासून अनेकजण हे प्रथम इंग्रजांचे नोकरदार होते आणि मग फावल्या वेळात समाजसुधारक होते किंबहुना ह्या काळातील अनेक ब्राम्हणांचा समाजसुधारणा हा पार्टटाइम बिझनेस होता जो इंग्रजांच्या लेव्हलला पोहचण्याची धडपड होती त्यामुळेच इंग्रजांची विधवा लग्न करते म्हणून आपल्याही विधवांनी लग्न केले पाहिजे इंग्रज अनेक विज्ञानाचे शिक्षण घेतात म्हणून आपणही शिक्षण घेतले पाहिजे इंग्रजांच्या बायका शिकतात म्हणून आपल्याही बायका शिकल्या पाहिजेत अशी ही कॉपीपेस्टींगची प्रक्रिया त्यांनी सुरु केली पण इंग्रजांनी फक्त ब्राम्हणांना स्वतःच्या साम्राज्य चालवण्याच्या यंत्रणेचे अपरिहार्य नटबोल्ट म्हणून वापरायला सुरवात केलीये हे काही चतुर ब्राम्हणांच्या लक्ष्यात यायला सुरवात झाली त्यातच अर्थशास्त्राचा प्राथमिक परिचय झालेल्या काही गोखलेंसारख्या लोकांना इंग्रज कलोनियालिज्मची कटू आर्थिक फळेही लक्ष्यात आली असे गोखलेंसारखे काही मोजके लोक जे आतून अध्यात्मिक होते कलोनियलिझम पासून वाचले आणि म्हणूनच त्यांनी गांधींना खरा भारत खेड्यात आहे असे सांगून त्यांना भारतभर भ्रमण करण्यास सांगितले भारतात अरविंद घोषांसारख्याचा अपवाद वगळता रामकृष्ण परमहंस रमण महर्षी जे कृष्णमूर्ती सारखे अनेक स्पिरिच्युअल कलोनियालीज्म पासून वाचले होते गांधी रामकृष्ण परमहंस सारख्या  कलोनियालिज्मपासून वाचलेल्या लोकांचा वारसा चालवत पुढे आल्याने तेही इंग्रजीकरण आणि कलोनियालिज्म ह्यांच्यापासून ७० टक्के वाचले .

जे चतुर ब्राम्हण होते त्यांच्या लक्ष्यात आले कि पारंपरिक राजेशाही आली तर मुख्य राजेपद आपल्या हाती येणे कधीही शक्य नाही त्यासाठी लोकशाहीच हवी त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला ही क्षत्रियकारणाची सुरवात होती टिळकांनी यशस्वी राजकीय नेतृत्वाची मॅनेजमेंट कशी करायची हे स्वतःच्या नेतृत्वाने दाखवून दिले ह्याचा आदर्श पूर्वीच्या पेशवाईत होताच नाव भोसले घराण्याचे राज्य ब्राम्हणांचे असे पेशव्याचे  धोरण होते तेच पुढे चालवून नाव इंग्लिश राज्यकर्त्यांचे आणि राज्य ब्राम्हणांचे अशी योजना राबवता येणे शक्य होते त्यानुसार इंग्रज नोकरशाही बळकावली गेली होतीच आता फक्त राज्य ताब्यात घेणे बाकी होते त्यासाठी होमरूल चळवळ आवश्यक होती ती उभी केली गेली आणि त्यासाठी काँग्रेस उभी केली गेली वैदिक राज्य असेल तर राज्यपद अवैदिक राज्य असेल तर प्रधानपद ही ब्राम्हणांची एक सनातन धार्मिक योजना चालत आलेली होतीच /आहेच ( त्यातूनच मोदी अब्राम्हणी राजा आणि आरसेस प्रधान हे आताही चालले आहेच ) इंग्रजी राज्यकर्ता आणि ब्राम्हण प्रधान हे समीकरण होमरूलने जुळवले जे त्याकाळात सर्वांनाच सोयीचे होते

ब्राम्हणांतील काहीजणांना मात्र ना राजकारणात रस होता ना पुरोहिती भिक्षुकशाहीत ! त्यांना इंग्रजांची राजकीय वा शासकीय चाकरी करण्यात रस न्हवता त्यांना नव्या युगाची बिझनेसीय तुतारी ऐकायला येत होती त्यांनी वैश्यिकरणाची प्रक्रिया आत्मसात करायला सुरवात केली धंदा करताना वर्ण जाती भुक्कड आहेत हे ह्यांच्या लक्षात आले होते त्यांना ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट होता उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोरांचे घराणे प्रथम ह्यात पडले त्यांच्या आजोबांनी ट्रेड सुरु केला शेरबाजारात उलाढाल सुरु केली व्यापारी समुदायांना राज्यकर्त्यांत फारसा रस असत नाही राज्यकर्ता कुठल्याही वर्णजातिधर्माचा येवो जोवर तो आपल्या आर्थिक संबंधांना धक्का लावत नाही तोवर त्याने दिलेले कायदे मोडत मोडत पाळायचे असे त्यांचे धोरण असते व्यापारी समुदायात दाखल झालेल्या ब्राम्हणांनी ही प्रक्रिया आत्मसात करून वैश्य व्हायला सुरवात केली महाराष्ट्रात ह्याची परंपरा लक्ष्मणराव किर्लोस्कर सारख्या उद्योगपतींनी सुरु केली ह्यांना ब्राम्हणशाहीत फारसा रस न्हवता साहजिकच ते खऱ्या अर्थाने पुरोगामी होते पण हे सर्व भांडवलवादी होते
ब्राम्हणांच्यातच एक असाही वर्ग होता ज्याचे वैश्यिकरण समाजवादी पद्धतीने सुरु झाले ह्यांनाही आर्थिक प्रश्न पडले होते पण त्यांना इंग्रजी साम्राज्यवाद उलथून टाकायचा होता आणि समाजवाद आणायचा होता ह्या समाजवादाची मालकी आणि नेतागिरी ब्राम्हणांच्याच हातात राहणार हे उघडच होते ह्या लोकांनी लोकशाही समाजवाद भारतात आणला आणि पुढं साम्यवाद ! ह्यांना ब्राम्हण्याचा दोष लावून घ्यायचा न्हवता किंबहुना ब्राम्हण्य ह्यांचे शत्रू होते आणि सामान्य माणसाबद्दल त्यांना कळवळा आणि जिव्हाळा होता समाजवादी उद्योगधंदे निर्माण करण्यात ही वैश्यसेना का अपयशी झाली ह्याची कारणमीमांसा आपण पुढे करूच पण एक गोष्ट नक्की ती म्हणजे ह्या लोकांचे धार्मिक ब्राम्हण्य सुटले तरी समाजवादी ब्राम्हण्य आणि साम्यवादी ब्राम्हण्य सुटले नाही आणि ह्या पोथीनिष्ठ अंधेपणाणेच समाजवादाची आणि साम्यवादाची वाट लावली नेमक्या ह्याच काळात गांधी उगवले

गांधीजी हे रामनाम घेणारे कृष्ण होते ज्यांचे विनोबा भावे हे युधिष्ठर नेहरू पटेल  हे अर्जुन सुभाषचंद्र बोस हे भीम आणि इतर हे नकुल सहदेव होते त्यांच्या प्रभावाने ब्राम्हण हे वैश्यिकरण  ह्या प्रक्रियेकडे अधिक जाणीवपूर्वक वळले त्याची सुरवात किर्लोस्कर किंवा बॉलीवूडचे प्रथम वितरक चित्रे ह्यांनी केली होती पण आधुनिक भारत ह्या ग्रंथात जावडेकरांनी इंग्रजांच्या वैश्यिकरणाची जी चर्चा केली होती तशी चर्चा काँग्रेसच्या गोखले , नौरजी वैग्रे लोकांनी आधीच केली होती जिला गांधींच्या मुळे एक ऑफिशियलीटी प्राप्त झाली साहजिकच ब्राम्हण वैश्य बनून व्यवसायात पडायला सुरवात झाली आणि त्यातील काही तर ब्रम्हदेशात जाऊन व्यवसाय करू लागले ब्राम्हणांनी सिलिकॉन व्हॅलीत जाण्याचा पायंडा ह्या लोकांनी सुरु केला गांधींनी ब्राम्हणांचे राजकीय नेतृत्व हिसकावून घेतल्याने काही राजकीय ब्राम्हणांच्या विशेषतः राजवाडे केळकरांच्या सारख्या टिळकभक्तांच्या पोटात पोटशूळ उठल्याने त्यांनी गांधींना सातत्याने विरोध केला तरी ज्यांना मोक्षप्राप्ती हवी होती अश्या अध्यात्मिक ब्राम्हणांना मात्र गांधींचे प्रचंड आकर्षण होते टिळक धार्मिक होते त्यामुळे ढांइ अक्षर प्रेमके पढण्यापेक्षा वैदिक पंडित होण्यातच त्यांना रस होता आणि त्यामुळेच गीतारहस्य मध्ये आध्यत्मिक दृष्टिकोनापेक्षा  कर्मयोगिक वैदिक मुक्ताफळे जास्त होती जी ब्राम्हणांचे राजकीय नेतृत्व टिकवण्याला मदत करत होती अध्यात्मिक ब्राम्हणांना त्यातला पोकळपणा कळायला लागला होता आणि त्यातच वाणी कुणब्यांचे राजकीय सदनात काय काम ही टिळकांची भूमिका नवीन काळात सुसंगत नाही हेही त्यांना कळत होते टिळक एका अर्थाने पेशवाई आणण्याच्या अनकॉन्शस लौकिकात गुंतले असल्याचे त्यांना कळून चुकले होते ह्याउलट गांधी राजकीय असले तरी मुमुक्षु होते साहजिकच अध्यात्मिक ब्राम्हणांना गांधी आकर्षक वाटायला लागले आणि  गांधींना त्यांनी आपले नेता मानायला सुरवात केली

प्रश्न फक्त  ह्या स्वातंत्र्य संग्रामाच्या महाभारताच्या कर्णाचा होता हा कर्ण ब्रिटिशांच्या बाजूने उभा होता कारण त्याला सार्थ भीती होती कि ह्या पांडवांचे राज्य स्वातंत्र्य मिळवून पुन्हा पेशवाई आणणार आणि त्यात दलितांची प्रचंड होरपळ होणार ह्या कर्णाचे नाव होते बाबासाहेब आंबेडकर ! ह्या कर्णाने कायमच कृष्णाची निन्द हराम केली . आणि हा कृष्ण चातुर्वर्ण्याच्या पुरस्कार करतोय असा त्याला कायमच संशय होता सगळ्या पांडवांना आणि कृष्णालाही पुरून उरेल अशी तर्कशक्ती त्याच्याकडे होती त्याचा महाभारताला विरोध होता पण तो खुलाही होता
त्याला गांधींची अंतःकरणाची भाषा भाकडकथा वाटत होती आणि आपल्या मेंदूची बुध्दिभाषा ऐकणे त्याला आधिक प्रमाण वाटत होते त्याने गांधी आणि वैश्यिकरण दोन्ही नाकारले मात्र ज्याप्रमाणे कृष्णाच्या मागे जनता गेली तसे त्याचेच लोक गांधींच्या मागे गेले कारण त्यांना विशेषतः चांभारांना वैश्यिकरण हवे होते शिका संघटित व्हा लढा ह्या बाबासाहेबांच्या भाषेपेक्षा गांधींची शिका दुकाने टाका पैसे कमवा आणि मग अधिक वेगवेगळे मोठे धंदे संघटित करा ही भाषा त्याला अधिक प्रॅक्टिकल वाटली बाबासाहेब दलितांना नव्या युगाचे बौद्ध ब्राम्हण बनायला सांगत होते तर गांधी नव्या युगाचे व्यापारी व उद्योगपती !




अश्या पार्श्वभूमीवर सावरकर उगवू लागले  ते पुन्हा एकदा मराठी ब्राम्हणी नेतृत्व हे भारताचे प्रमुख नेतृत्व बनणे पॉसिबल आहे अशी आशा दाखवत ! हे एका अर्थाने काँग्रेसी हिंदू प्रोन टिळकवादाचे काँग्रेसबाहेर निर्माण झालेले एक्सटेंन्शन होते काँग्रेस ही पहिली छत्री होती आणि त्या छत्रीला काउंटर म्हणून ही दुसरी छत्री निर्माण करण्यात आली होती जी हिन्दुप्रोन टिळकवादाची अधिक अडवान्स आवृत्ती होती हिने काँग्रेस गांधीजींच्या ताब्यात गेली आहे हे ओळखून स्वतःची हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या आधाराने जनसंघ व पुढे भाजप नावाची समांतर छत्री उभी केली दुसरीकडे जिनांनी मुस्लिम छत्री मुस्लिम लीग च्या छत्राखाली उभी केली

ह्यातून खरेतर इंडियातून  १ सेक्युलर भारत २ मुस्लिमवादी पाकिस्तान आणि ३ हिंदुत्ववादी हिंदुस्थान अशी तीन राष्ट्रे निर्माण व्हायला हवी होती पण गांधींच्या लोकप्रियतेने समस्त हिंदू काँग्रेसच्या छत्रीखाली गिळले . गांधी हा आपला मुख्य शत्रू आहे हे कळलेल्या जहाल  हिंदुत्ववाद्यांनी गांधींना संपवण्याचा प्लॅन आखला आणि तडीसही न्हेला गांधीहत्या झाली नसती तर जनसंघ हा स्वातंत्र्यानंतर पाच वर्षातच मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला असता आणि कदाचित १९६५ च्या आसपासच हिंदुत्ववादी सत्तेवर आले असते हिंदुत्ववाद्यांना हे आजही कळलेले नाही

श्रीधर तिळवे नाईक











Comments

Popular posts from this blog