संतोष पवार
हे सर्व एकाच पातळीवर समजून घेणे खूप कठीण आहे, साहित्य,प्रेम,नाते, गुरू-शिष्य परंपरा, मान्यता, अधिक्षेप, मतभेद, काव्यपरंपरा, शत्रू-मित्रभाव, वाड्मयाच्या गावातील अनेकानेक आंतरविरोध हे सर्व एकात एक मिसळले जात आहे.
या पद्धतीने मराठीचा वाड्मय इतिहास लिहिला जाऊ शकतो काय ? कारण 1990 ते 2009 हा मराठी कवितेचा कालखंड आपण इथे आणला आहे. आणि हा व्यवहार मोजक्या लोकांच्या मध्ये घडला आहे. याला वारकरी चळवळीसारखे परिमाण कदापिही येऊ शकत नाही. अनेक भूमिका एकात एक मिसळून टाकल्याने वाचकाच्या हाती गावणारे चौथ्या नवतेचे म्हणून काय शिल्लक राहते? एक श्रीधर तिळवे- व्यक्ती आणि वाड्मय हा प्रकल्प कुणी आकाराला आणून देईल तर फार मोठे उपकार होतील, चित्रे हे चरित्रवादी कवी होते, त्या अर्थाने आपण त्यांचे अनुयायी आहात. आपले सर्व आयुष्य कवितेत त्यांनी ओवले, तुम्हीही तेच करत आहात. पण तुम्ही समकालीन समीक्षेला देखील या क्षेत्रात आणल्याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल...
त्या अर्थाने चिकित्सा करणारे, कुणी पाध्ये, पुंडलिक, पाटणकर,धोंड, हे नाहीतच आता.गेला बाजार राजाध्यक्ष, थोरात तरी पुढे येतील की नाही ही शंकाच आहे. दुसरे केशवसुत, मर्ढेकर वगैरे ठरविण्याच्या भानगडीत आता कुणी जाणार नाही. मराठीतील लोकांपर्यंत यापैकी काहीच पोचलेले नाही, आणि कुणी ते समजून घेईलसेही वाटत नाही, एवढीच एक यात थोर गोची आहे फक्त...
खैर आपल्यावरील कविता इथे आता देण्याचा मोह आवरत नाहीय....
श्रीधर तिळवे
हा आरोपी आहे मराठी भाषेचा
भाषेला याला विसरायचे आहे
तिने कित्येकदा तयारीही केलीय
याच्या खूनाचेही प्रयत्न झालेत
आणि दरवेळी खून होऊनही हा जिवंत निसटला आहे
भाषेला लागलेल्या किडीत याचा समावेश होतो
आणि मूळ भाषा मरायच्या भीतीने यावर कीटकनाशक मारता येत नाही
हा कोणत्याही रंगाचा चाहता आहे केमाफेण्ट कन्सल्टमेंट तसा
हा असतो हिरव्या पानावर हिरव्या किडीसारखा
तूर्तास शेवटचा सापडला तेव्हा तो या भगव्या रंगाच्या झब्ब्यात होता
हा भाषेच्या पोलिसांना हवा आहे ते याचा कसून शोध घेताहेत काळ्या गोऱ्यागावात...
हा रीतसर मृत घोषित करूनही पुन्हा पुन्हा आढळून आल्याचे लोक सांगतात
याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आहे
मात्र दरवेळी बंदुकीच्या टप्प्यात येऊनही दरवेळी गोळ्या डुप्लिकेट असल्याने केवळ हा वाचला आहे
आता हा म्हातारा झाला असून दृष्टीही अधू झाली असे वाटते आहे. याला कर्ज देणाऱ्या बँका बुडाल्या आहेत आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
याची पुस्तके अद्याप वाचून व्हायची आहेत लोकांकडून
...पण हा भाषेला लागलेला महाकिटक आहे
याचा संसर्ग झालेला याचाच द्वेष करतो आणि यालाच कॉपी करतो हे याच्या आजाराचे लक्षण आहे
हा दिसताच जवळच्या भाषेच्या पोलिसाला कळवा
याला सदेह भाषेसह बोलत्या अवस्थेत पकडून देणाऱ्यास
मोठे बक्षीस दिले जाईल...
संपर्क करा, कुणीही कुणाला कुठेही.

पहिल्या प्रथम धन्यवाद तू कायमच माझ्या मागे उभा राहिला आहेस . फक्त एक छोटासा मतभेद वास्तव आहे म्हणून प्रथम सांगतो मी चरित्राचा कवी नाही किंबहुना माझा चित्रेंशी जो काही वाद होता त्यात ह्या चरित्रवादाचाही समावेश होतो फक्त स्वतःचे मी ओतणे हे मी केलेले नाही माझ्या अनेक कवितात माझा मागमूससुद्धा नाही उदाहरणार्थ स्रीवाहिनीतील स्रीयांच्यात मी कुठे आहे किंवा चॅनेल अंडरवर्ल्ड मधल्या ९० टक्के कवितात श्रीधर तिळवे कुठे आहे मी स्वतः बहू मी वादाचा सिद्धांत मांडला आहे आणि तो माझ्या कवितांना तंतोतंत लागू होतो
माझ्या अश्या अनेक कविता आहेत जिथे माझे चरित्र नाही फक्त अनुभवविश्व आहे
दुसरी गोष्ट चरित्रवादाची सुरवात चित्रेंनी केलेली नाही ते श्रेय नामदेवांना जाते आणि मग तुकारामांना ! चित्रेंनी चरित्रवाद नामदेव तुकारामाकडून घेतलाय त्यामुळे मी चित्रेंचा अनुयायी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
तिसरी गोष्ट आता प्रश्न ह्या लेखाचा ! तर तो माझ्या अनेक मृत्युलेखाप्रमाणे चित्र्यांच्या मृत्यनंतर ताबडतोब लिहिला गेला होता तो वाचला तेव्हा वाटले कि हा खूपच पर्सनल झालाय आणि तो प्रकाशित केला तर औचित्यभंग होईल त्यामुळे तो मी प्रकाशनाला दिला नाही आणि नंतर तो मी विसरून गेलो होतो तो आता आठवला कारण नेमाडे ह्यांचे अलीकडचे व्याख्यान मराठी आधुनिकतेचा विचार चित्र्यांनी नेमाडे ह्यांच्या आधी केलाय पण नेमाडे ह्यांनी त्यांचा साधा उल्लेखही केलेला नाही चित्रे ह्यांनी नेहमीच देशीवादाचे श्रेय नेमाडे ह्यांना दिले आहे आणि स्वतःला देशीवादी म्हणणे टाळले आहे नेमाडे ह्यांनीही मराठी आधुनिकवादाचे श्रेय मर्ढेकर , करंदीकर आणि चित्रे ह्यांना द्यायला हवे खरेतर नेमाडे चित्रेवादी बनू लागलेत कि काय अशी शंका मला येऊ लागलीये पूर्वी फक्त आशयाच्या अंगाने बोलणारे नेमाडे देशीवाद्यांना सौष्ठवाकडेही लक्ष्य द्या असे सांगू लागलेत नेमाडेंच्यातला हा बदल एस एन डी टी च्या एका चर्चासत्रात जाणवला होता
आणि शेवटची गोष्ट मी चित्र्यांचा कधीही शिष्य न्हवतो मी त्यांना भेटल्यापासून त्यांच्याशी केवळ वाद आणि वादच घालत आलोय किंबहुना मी त्यांचा शिष्य बनलो नाही ह्याचाच त्यांना राग होता कि काय माहित नाही
चौथ्या नवतेची चळवळ ही कोणत्या नावाने येते ते महत्वाचे नाही तिचा आशय येतो कि नाही हे महत्वाचे तुझा भ्रमिष्टाचा जाहीरनामा हा काव्यसंग्रह चौथ्या नवतेचा एक माईलस्टोन संग्रह आहे हे मी नेहमीच मांडत आलेलो आहे ही चळवळ ओंकार कुल्कर्णीपासून प्रणव सुखदेव पर्यंत अनेकांच्या कवितांत तळपतांना दिसते तेव्हा ती मोजक्या लोकांची चळवळ वैगरे म्हणण्याला अर्थ नाही अनेक नव्वदोत्तरी कवी आणि दोन हजारोत्तरी कवी स्वाभाविकपणे चौथ्या नवतेची कविता लिहीत आहेत फक्त अनेकांना चौथ्या नवतेचा टॅग लावायचा नाहीये इतकेच पण त्याने काय फरक पडतो मुलाला चौथी नवता नावाचा कपडा घाला नाहीतर अभिधानंतर नावाचा कपडा घाला किंवा जागतिकीकरणोत्तर नावाचा कपडा घाला मूल चिन्हसृष्टीय जालतेचे जनुकत्व घेऊन जन्मतंय ना बस माझ्यासाठी ते पुरेसे आहे शेवटी त्यासाठी तर हट्टाहास होता पुन्हा एकदा धन्यवाद
Comments
Post a Comment