भारतीय संस्कृती ही चार उपमुख्य संस्कृतींनी युक्त आहे मार्गी , देशी , पोटी आणि जमाती ह्या चारही संस्कृती भारतीय आहेत त्यातील कुठल्यातरी एका उपमुख्य संस्कृतीला संपूर्ण चेहरा मानणे हाच खरेतर नतद्रष्टेपणा !पण सांस्कृतिक राजकारण करणारे लोक हे वारंवार करतात . बॉलीवूड ही मार्गी संस्कृतीचे प्रॉडक्ट आहे म्हणून तो भारतीय संस्कृतीचा चेहरा नाही काय ?जमाती आदिवासी संस्कृतीची अस्मिता कुर्वाळण्याऱ्यांनी तिचा जेवढा सत्यानाश केला तेवढा कुणीच केला नाही त्यातूनच भुजंग मेश्रामासारखा अव्वल भारतीय दर्जाचा साहित्यिक मर्यादित केला गेलाय . एकीकडे जमातीचा गंधही नसलेले बॉलीवूडवाले आणि दुसरीकडे मार्गी म्हणजे काहीतरी भीषण आहे असा धसका घेणारे जमातीवाले दोघांनीही आदिवासी संस्कृती म्हणजे मजाक बनवून टाकलीये .

जगातील अनेक संस्कृतींचा जमाती हा एक उपमुख्य चेहरा आहे अगदी तथाकथित हॉलिवूडवादी  यू एस ए चाही ! संपूर्ण जगाची म्हणून एक जागतिक जमाती संस्कृती उदयाला येणे अटळ आहे त्यांच्यात देवाणघेवाण अटळ आहे . जग म्हणजे केवळ हॉलिवूड किंवा बॉलीवूड न्हवे जग म्हणजे भारतीय आणि मेसोअमेरिकन जमातीतील कलासंस्कृतीही !हा जागतिक चेहरा एका सामान पायावर उभा करण्याचे नवे आव्हान आजच्या जमाती संस्कृतीतील कलावंतांच्यापुढे आहे . भुजंग आणि मी अनेकदा ह्यावरून भांडायचो . त्याला हा असा जागतिक चेहरा साम्राज्यवादाचा कावा वाटायचा किंबहुना चौथी नवता हे नवे कारस्थान आहे म्हणूनच तो बघायचा पण पुढे त्याचे मत बदलत गेले पण संशय गेलाच नाही . हा संशयही मला आवश्यक वाटायचा आणि वाटतो कारण भांडवलशाही बेलगाम झाली तर साम्राज्यवादी बनू शकते असे मलाही वाटते त्यामुळेच संशयाची सुई बाळगतच हा पाया द्यावा लागेल . तो कसा द्यायचा ह्याची सविस्तर चर्चा व्हायला हवी . आमचे मित्र मोतीराम कटारे व इतर ह्यासंदर्भात काय करतात आणि काय करत जातात हे ह्यादृष्टिने फार महत्वाचे आहे


श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog