ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आणि तुकाराम ह्यांना फक्त कवी मानणे हे पलायन आहे . चौघेही निर्वाणाला पोहचले होते आणि त्यांची काव्यसाधना ही काही त्यांनी रसिकांना मनोरंजन देण्यासाठी केली न्हवती ती त्यांच्या निर्वाणसाधनेची भाग होती ज्यांना भक्ती मार्गाने निर्वाण प्राप्त करायचे आहे त्यांच्यासाठी ती आचरणाचा पाठ आहे साठोत्तरी लोकांना आणि कवी लोकांना अनेकदा साधना करायची नसते साधनेपासून पळायचे असते म्हणून मग त्यांचा कवी म्हणून अभ्यास वगैरे फॅडे निघतात . बसवेश्वर , कबीर , गुरुनानक , सोपान , मुक्ताबाई जनाबाई सहजोबाई लेहला रहीम रोहिदास असे एकापेक्षा एक श्रेष्ठ मोक्षधारी लोक ह्या भक्ती चळवळीने दिलेत गोरख सरहपा तिलोपा नरोपा निवृत्ती अश्या योग्यांनीही (तंत्रयोगी आणि राजयोगी )काव्यरचना केली आहे ह्यांचा फक्त कवी म्हणून अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी करावा पण ह्या लोकांना तो अपेक्षित नाही . तुम्ही निर्वाणाची साधना करावी हेच त्यांना अपेक्षित आहे तेव्हा कवी म्हणून अभ्यास फिभ्यास ह्या तुमच्या वावड्या आहेत उठसूठ शिवाजीचे नाव घेणारे राजकारणी आणि कवी म्हणून ह्यांचे नाव घेणारे कवी ह्यांच्यात काहीच फरक नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment