ओबीसी साहित्याची चळवळ आणि स्त्रीवाद

 भारतातील विचारप्रणालीत्व  खालील टप्प्यातून गेलेलं दिसतं

१ नवजागरणवाद : ह्याची सुरवात बसवेश्वरापासून झाली . छत्रपती शिवाजी , पहिला बाजीराव पेशवा , गुरु नानक , सम्राट अकबर , दयानंद सरस्वती ह्यांनी हा टप्पा अधिक विकसित केला आणि त्याची धार वाढवली . जागरणवादाला पडलेल्या सामाजिक मर्यादा ह्यांनी ओलांडल्या आणि वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध एक ठाम भूमिका घेतली प्रस्थापित धर्मांना ठाम नकार दिला .
२ सुधारणावाद : ह्याची सुरवात राजाराम मोहन रॉय ह्यांनी केली . न्यायमूर्ती रानडे , लोकहितवादी , बाळशास्त्री जांभेकर ह्यासारख्यांनी त्याचा विस्तार केला  विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार केला आणि समाजात सुधारणा झाली पाहिजे असा आग्रह धरला

३ प्रबोधनवाद : ह्याची सुरवात महात्मा फुले ह्यांनी केली आणि आज ज्याला बहुजनवाद म्हणतात त्याची स्थापनाही महात्मा फुले ह्यांनी केली . ब्राह्मण्याविरुद्ध ठाम बुद्धिवादी भूमिका घेऊन बहुजनांच्या सामाजिक संघटनाची आवश्यकता मांडली

४ दलितवाद : सवर्णवादाने केलेल्या शोषणाला अधोरेखित करून त्याविरुद्ध बंड केले . ह्याची सुरवात आंबेडकरांनी केली दलित म्हणजे फक्त अस्पृश्य न्हवे तर सामाजिकदृष्ट्या शोषित .


५ आदिवासीवाद : ह्याची सुरवात बिरसा मुंडा ह्याने केली

६ मार्क्सवाद  : ह्याची सुरवात मार्क्सवादी विचारवंतांनी केली

७ लोकशाही समाजवाद : पंडित नेहरू , मानवेंद्र रॉय ह्यांनी ह्याची पायाभरणी केली

८ बुद्धिवाद : भारतात विज्ञाननिष्ठ चळवळ फारशी उभारली गेलेली नाही ह्याला कारण वर्ण आणि जातीचे राजकारण बुद्धिवादी वर्ण आणि जात ह्यापैकी कशालाही भीक घालत नाही तो फक्त विज्ञाननिष्ठ भूमिका घेतो आणि विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या सत्यांना ठाम नकार देतो आंबेडकर असोत कि फुले कि मार्क्स कि गांधी कि रानडे गोखले कि हेडगेवार तो कुणाचीच पत्रास बाळगत नाही . दुर्देवाने भारतात भलेभले बुद्धिवादी आपल्या जात किंवा  वर्णाला किंवा एखाद्या आईडियालॉजीला जाऊन मिळतात त्यातच भारतात विचारवंताला मिळणारा पाठिंबा हा जात आणि वर्णाच्या आधारे मिळतो आणि पाठिंब्यासाठी का होईना पण अनेक बुद्धिवादी बुद्धिवाद सोडतात . त्यातच विज्ञान आणि तर्कशास्त्र  हे जसजसे अधिकाधिक क्लिष्ट होत गेले तसतसे त्यांना समजून घेणारे लोक कमी होत गेले मे पु रेगे ह्यांनी रूपांतरित केलेले '' आकारिक तर्कशास्त्र '' हे मराठीतील सर्वात आडवान्स तर्कशास्त्रीय पुस्तक त्यानंतर काय ? तर घंटा ! त्यामुळे भारतात बुद्धिवादी जवळजवळ नाहीतच . अपवाद अमर्त्य सेन पण ते आता भारतीय कमी आणि एन आर आय  अधिक !






















Comments

Popular posts from this blog