Posts

 इब्सेन आणि बेकेट श्रीधर तिळवे नाईक  सर्वसाधारणपणे मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत मी दरवर्षी इजम शिकवतो पण ह्यावर्षी ऐनवेळी मंगेश बनसोड ह्याने दोन लेखक शिकवण्याची दोस्तीगळ घातली आणि मला हेन्रिक इब्सेन आणि सॅम्युएल बेकेट हे दोन लेखक शिकवण्याची वेळ आली आजारपणामुळे तयारीला वेळच मिळाला नाही आणि कमी होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या जीवावर एक तासाची आठ व्याख्याने देण्याची वेळ आली पीएचडीला केलेले संशोधन ऐनवेळी स्मरत गेले आणि व्याख्याने रंगली एखादा लेखक प्राध्यापक लोक कसा शिकवतात हे मला माहित नाही पण दोन तास त्या लेखकाची क्रिएटिव्ह प्रोसेस उलगडायची आणि दोन तास प्रत्यक्ष कलाकृती असे काहीतरी झाले हेन्रिक इब्सेनची क्रिएटिव्ह प्रोसेस विलक्षण !अस्तित्ववादाचा प्रभाव किर्केगार्द वाचून त्याच्यावर पडला आणि पन्नासाव्या वर्षी त्याला त्याचे क्रांतिकारी नाटक सापडले आयुष्यभर आपल्या ईल्लेजिमेंट मुलाच्या परतण्याच्या  शक्यतेचे भय त्याचा कायमच पाठलाग करत राहिले नित्शेच्या ट्रॅजेडीवरच्या विचारांनी ग्रीक ट्रॅजेडीविषयीचे त्याचे आकलन बदलले आणि शेक्सपियरन ट्रॅजेडीतून त्याची प्रतिभा मुक्त झाली लिखा...
 ग्रेस , बालम आणि रोमँटिक श्रीधर तिळवे नाईक  बालम गेल्याविषयी फार शोक कुणाला झाला नाही कारण तो काही स्वयंभू प्रज्ञेचा कवी न्हवता ज्यांना स्वतःची कल्पनाशीलता सापडली पण ज्यांना त्या कल्पनाशीलतेचे स्वायत्त दर्शन बनवता आले नाही अश्या ग्रेसच्या सावलीत किंवा रोमँटिक भाषेत सांगायचे तर ग्रेसच्या हंसध्वनित वाढलेल्या कवींच्या मांडणमंडीतला तो एक घायाळ अन उदास पक्षी होता  मुळात ग्रेसचे कुळ सुरु होते ते पंडिती कविंच्यापासून ! मार्गी व देशी वृत्तांच्यावर कमालीचे प्रभुत्व , अनेक शब्द जोडून नवीन शब्द तयार करण्याचे कौशल्य ह्यांच्या आधारे उभी राहिलेली ही पंडिती शब्दकळा मराठी साहित्यावर अवकळा आणणारी होती व तिचे जीवनाशी नाते तुटलेले होते मराठी संस्कृतीतील उत्तर पेशवाईची बामणी व्रतवैकल्याची पुराणप्रधान कथांची शाळा  मराठी साहित्यातील दरबारी दालनात पेश केली गेली आणि शब्दकळा व प्रतिमाविलास म्हणजे साहित्य समजणारे एक स्कूलच सुरु झाले ह्या स्कूलचे प्रधान अध्यापक कवी मोरोपंत होते पंतपंडित कवींचे सरपंत ! ह्याच काळात थोडेसे उशिराने सुरु झालेले उर्दू व इंग्रजी भाषेचे रोमँटिक स्कुल स्पॉंटनियस ओव्हर...
 FACESHIP ITS THE RELATIONSHIP ON FACEBOOK WITHOUT FLESHAL CONTACT. IT COMMUNICATES DIGITAL THINGS BUT NEVER TOUCH EACH OTHER. ALL PLEASURES AND SORROWS ARE SHARED WITHOUT REAL SENSES.  SHRIDHAR TILVE NAIK सतीश तांबे ह्यांच्या पोस्टवर लिहिलेली कॉमेंट  अर्थसंदिग्धता व दुर्बोधता श्रीधर तिळवे नाईक  अर्थसंदिग्धता हा मुळीच काव्यगुण न्हवे तो एक सापेक्ष इफेक्ट आहे आकलन आणि अनाकलन ह्यांच्यामुळे निर्माण झालेला ! दुर्बोधता हे त्याचे टोक ! अर्थसंदिग्धता व दुर्बोधता दोन प्रकारची असते १ सहज २ हेतुग्रस्त जी सहज असते ती अर्थसंदिग्धता व दुर्बोधता उत्तम पण जी अर्थसंदिग्धता व दुर्बोधता मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण केली जाते ती घटिया ! तिची सुरवात ग्रेस आणि खानोलकर ह्यांनी केली . लेखकाचे कामच मुळी शब्द ह्या साधनांद्वारे अर्थ ह्या माध्यमातून अनुभव निर्माण करणे हे असते हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता अनुभवाचा गळा घोटते तर सहज निर्माण झालेली अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनुभवाच्या कक्षा रुंदावते अनुभवविश्व विस्तारते मर्ढेकर हे सहज अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेचे उत्तम उदाहरण आहे अर्थस...
 अलीकडच्या काळात कलावंताने काय करायचे ह्याबाबत एक गोंधळ उडालाय कि काय अशी शंका येते आहे कलावंताने सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असते राजकीय बाजूंच्या बाजूने न्हवे जे पोलिटिकल पार्टीत आहेत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका हीच आपली भूमिका म्हंटली तर ते नैसर्गिक आहे पण जे राजकीय पक्षात नाही त्यांनी पक्षीय हितसंबंधात न अडकता सत्य काय आहे ते तपासायला नको का ?  सध्या जणू काय मोदी आणि मोदीविरोधी अशा दोनच बाजू समाजाला आहेत अशा थाटात काही लोक वैचारिक पैलवानकी करतायत मोदीवादी लोकांचे एका अर्थाने हे यशच म्हंटले पाहिजे मोदींनी  काहीही केलं तरी ही मंडळी त्याला हे लोक चांगलंच म्हणतात त्याउलट मोदीविरोधी लोक मोदींनी  काहीही केलं तरी ते चूक असं ठरवतात जणू काय विरोधी पक्षात बसले आहेत समाजवादी , साम्यवादी , आंबेडकरवादी आणि मुस्लिमवादी असे सगळे एकत्र आले आहेत धर्मवादी राजवटीला विरोध हा ह्या लोकांचा अजेंडा आहे  ह्याउलट ब्राम्हणांची झुंडशाही ही गायब झालेली मध्ययुगीन व पेशवेकालीन गोष्ट पुन्हा जिवंत झाली आहे काहींना तर मनुस्मृतीप्रधान राज्य परत आणण्याचे स्वप्न पडायला ला...
 बरेच झाले छापील दिवाळी अंक मेले श्रीधर तिळवे नाईक  हल्ली छापील दिवाळी अंकांच्या नावाने गळा काढणारे वाढतायत म्हणून हे लिहितोय एकतर मुळात छापीलतेची गरज संपलेली आहे आपण सर्व जितक्या लवकर डिजिटल होऊ तितके बरे त्यामुळे डिजिटल नियतकालिकांची व अनियतकालिकांची व दिवाळी अंकांची सध्या गरज आहे अनेकांना छापील म्हणजे परमानंद वाटणे साहजिक आहे पण जेव्हा छापील तंत्रज्ञान आले तेव्हा अनेकांना हस्तलिखितात परमानंद मिळत होताच जुन्या गोष्टींचा कुरवाळआनंद सर्वकाळात असतो पण त्याने काळ थोडाच थांबतो ? दिवाळी अंक जेवढ्या लवकर डिजिटल होतील तेव्हढ बरं ! ह्याबाबत मी ऐसी अक्षरे चा आवर्जून उल्लेख करेन (ते मला शत्रू मानत असूनही ) ते सातत्याने डिजिटल अंक देतायत त्यांची ब्राम्हणकेन्द्रियता ही शंकास्पद करते हे खरं पण त्यातले अनेक लेख लक्षणीय असतात दुसरे उदाहरण अक्षरनामाचे हेही  उल्लेखनीय ! मला वाटतं अशा उपक्रमांची मांदियाळी वाढणे आवश्यक आहे  आजच्या काळात ट्विटर , फेसबुक पोस्ट , ब्लॉगर ह्या फक्त वेगवेगळ्या साईट्स राहिलेल्या नाहीत तर त्या नव्या जानर बनलेल्या दिसतायत  ट्विटर साधारण पोस...
 मी अर्णब गोस्वामीबद्दल लिहीत नाही कारण मी रिपब्लिक टीव्ही पहात नाही अर्णब गोस्वामी अँकर म्हणून समोरच्या माणसाला त्याची बाजू मांडायची संधीच देत नाही आणि समोरच्याला बोलायला संधी न देणारा अँकर माझ्या तत्वात बसत नाही निखिल वागळेंनीं नंतरच्या काळात हाच उद्योग करायचे त्यामुळे मी त्यांनाही पाहणे सोडून दिले होते पत्रकाराचे काम सत्य शोधणे आणि मांडणे हे आहे स्वतःची आयडियालॉजी मांडणे नाही असं माझं मत आहे सध्याच्या प्रोपोगंडिस्ट पत्रकारितेत ते आऊटडेटेड आहे असो  मात्र फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने अर्णब ह्यांनी  घेतलेली कंगना राणावतची मुलाखत मात्र मी पाहिली होती माझे विद्यार्थी व टीममेट मात्र त्यांना आवर्जून पहात असतात  श्रीधर तिळवे नाईक  व्यवहारी आहात ह्याचा अर्थ शहाणे आहात असा होत नाही  श्रीधर तिळवे नाईक 
    मी सातपाटील कुलवृत्तांत का वाचत नाही श्रीधर तिळवे नाईक   हा प्रश्न प्रथम मला माझा परममित्र किशोर कदम ह्याने विचारला होता ह्या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मी देणार म्हणून थांबलो होतो आता ते देतो   १ पहिले कारण आजारपणांमुळे मला वाचन पूर्वीसारखे करता येत नाही त्यामुळे जुने लेखक समकालीन लेखक   आणि नवे लेखक अशी मी विभागणी करून नव्या लेखकांना प्रिफरन्स द्यायचा असं धोरण निश्चित केलं आहे प्रणवची   मेट्रोमॉल वाचणे हे मला सातपाटील वाचण्यापेक्षा   अधिक आवश्यक वाटते   २ दुसरे कारण वैयक्तिक आहे प्रत्यय आणि व्यत्यय ह्या पुस्तकात रंगनाथ पठारे ह्यांनी टीकाहरण संदर्भात जे निखालस चुकीचे लिहिले आहे त्यामुळे यदाकदाचित वाचन केले आणि काही लिहिले तर त्याचे रिसेप्शन पठारेंच्याकडून प्रॉपर तरीक्याने होईल ह्याची खात्री मला वाटत नाही अभिधानानंतरशी निगडित तिळवेबद्दल त्यांनी जे लिहिले ते लिहिण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे पण जेव्हा दोन व्यक्तींच्यातला...