अलीकडच्या काळात कलावंताने काय करायचे ह्याबाबत एक गोंधळ उडालाय कि काय अशी शंका येते आहे कलावंताने सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असते राजकीय बाजूंच्या बाजूने न्हवे जे पोलिटिकल पार्टीत आहेत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका हीच आपली भूमिका म्हंटली तर ते नैसर्गिक आहे पण जे राजकीय पक्षात नाही त्यांनी पक्षीय हितसंबंधात न अडकता सत्य काय आहे ते तपासायला नको का ? 

सध्या जणू काय मोदी आणि मोदीविरोधी अशा दोनच बाजू समाजाला आहेत अशा थाटात काही लोक वैचारिक पैलवानकी करतायत मोदीवादी लोकांचे एका अर्थाने हे यशच म्हंटले पाहिजे मोदींनी  काहीही केलं तरी ही मंडळी त्याला हे लोक चांगलंच म्हणतात त्याउलट मोदीविरोधी लोक मोदींनी  काहीही केलं तरी ते चूक असं ठरवतात जणू काय विरोधी पक्षात बसले आहेत समाजवादी , साम्यवादी , आंबेडकरवादी आणि मुस्लिमवादी असे सगळे एकत्र आले आहेत धर्मवादी राजवटीला विरोध हा ह्या लोकांचा अजेंडा आहे 

ह्याउलट ब्राम्हणांची झुंडशाही ही गायब झालेली मध्ययुगीन व पेशवेकालीन गोष्ट पुन्हा जिवंत झाली आहे काहींना तर मनुस्मृतीप्रधान राज्य परत आणण्याचे स्वप्न पडायला लागले आहे मंदिरे खुली करण्याचे आंदोलन हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे उद्या जर ह्यामुळे करोना पसरला तर भाजपच्या व्होटबँकेवर ह्याचा विपरीत परिणाम होईल ह्याचेही भान नाही 

===================================

बाबासाहेबांचं नाव घ्यायचीही आपली लायकी उरलेली नाही . तरीही जय भीम !

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog