बरेच झाले छापील दिवाळी अंक मेले श्रीधर तिळवे नाईक 

हल्ली छापील दिवाळी अंकांच्या नावाने गळा काढणारे वाढतायत म्हणून हे लिहितोय एकतर मुळात छापीलतेची गरज संपलेली आहे आपण सर्व जितक्या लवकर डिजिटल होऊ तितके बरे त्यामुळे डिजिटल नियतकालिकांची व अनियतकालिकांची व दिवाळी अंकांची सध्या गरज आहे अनेकांना छापील म्हणजे परमानंद वाटणे साहजिक आहे पण जेव्हा छापील तंत्रज्ञान आले तेव्हा अनेकांना हस्तलिखितात परमानंद मिळत होताच जुन्या गोष्टींचा कुरवाळआनंद सर्वकाळात असतो पण त्याने काळ थोडाच थांबतो ?

दिवाळी अंक जेवढ्या लवकर डिजिटल होतील तेव्हढ बरं ! ह्याबाबत मी ऐसी अक्षरे चा आवर्जून उल्लेख करेन (ते मला शत्रू मानत असूनही ) ते सातत्याने डिजिटल अंक देतायत त्यांची ब्राम्हणकेन्द्रियता ही शंकास्पद करते हे खरं पण त्यातले अनेक लेख लक्षणीय असतात दुसरे उदाहरण अक्षरनामाचे हेही  उल्लेखनीय ! मला वाटतं अशा उपक्रमांची मांदियाळी वाढणे आवश्यक आहे 

आजच्या काळात ट्विटर , फेसबुक पोस्ट , ब्लॉगर ह्या फक्त वेगवेगळ्या साईट्स राहिलेल्या नाहीत तर त्या नव्या जानर बनलेल्या दिसतायत 

ट्विटर साधारण पोस्टकार्डाची चारोळीटाइप कवितेची अल्पवाक्यिय प्रतिक्रियेचे 

फेसबुक पोस्ट व व्हाटसप लघुमाध्यमआकारीय  निबंधाचे कथेचे कवितेचे लेखाचे 

व ब्लॉग हे लेखसंग्रहाचे ,पुस्तकाचे , कवितासंग्रहाचे व मॅगेझिनचे 

असे जानर झालेले दिसतात 

मी स्वतः माझी सगळी पुस्तके सगळे कवितासंग्रह  सगळ्या लघु मध्यम कादंबऱ्या  माझ्या ब्लॉगवर टाकलेल्या आहेत फक्त धर्म व अर्थ ह्या महाकादंबऱ्या टाकलेल्या नाहीत कारण त्या अनसाइझेबल आहेत 

अशावेळी ह्या सर्वांना एकत्र करणारे दिवाळी अंकटाईप काहीतरी डिजिटल हवेच आहे 

आज  ह्या डिजिटल लेखनाला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे मुख्य म्हणजे इथल्या सादरीकरणात वर्तमान घडत असतो हा घडता वर्तमान तातडीने सादर करणे हे चौथ्या नवतेचे वैशिष्ट्य इथे ठळकपणे जाणवते 

छापील अंक अनेकदा नॉस्टॅल्जीक असतात ह्याउलट डिजिटल अंकातील नॉस्टलजिया हा चौथ्या नवतेबरोबर वावरत येतो तो समर्थनीय नाहीये पण अनेकदा पन्नाशी पार केलेल्यांचे ते बालपण व तरुणपण असते आणि त्यात चौथ्या नवतेच्या पहिल्या पिढीचे प्रतिबिंब असते त्यामुळे नवता वाढावी असं वाटत असेल तर तुमच्या दिवाळी अंकात डिजिटलता व पोस्टडीजिटलता वाढणे आवश्यक असते व आहे 

पण हे फार मोठ्या संख्येने घडत नाही एक कारण जाहिरातप्रतिसादचा  अभाव असावे छापीलला काही प्रमाणात का होईना जाहिरातप्रतिसाद आहे असे सांगितले जाते पण स्पष्ट सांगायचे तर हे दृश्य फार काळ टिकणारे नाही नवीन पिढी डिजिटलीक होणे अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी तुम्हाला डिजिटल दिवाळी अंक काढावेच लागतील काहींनी आपले प्रिन्टल आणि डिजिटल असे द्विरुपी केलेले दिसते तोही उत्तम मध्यममार्ग आहे 

बाकी जे निखळ छापील आहे ते मेलेलेच बरे !

छापील अंक काढून झाडं खराब करण्यापेक्षा डिजिटल व्हा 

श्रीधर तिळवे नाईक 

======================================================================

आता शिक्षकांना तुम्हीही शाळभिंतीतील एक विट म्हंटल्यावर पोरांना आवडून पॉप्युलर होईल नाहीतर काय होईल ? त्या काळाचा एथॉस होतं गाणं !

Comments

Popular posts from this blog