मी सातपाटील कुलवृत्तांत का वाचत नाही श्रीधर तिळवे नाईक
हा प्रश्न प्रथम मला माझा परममित्र किशोर कदम ह्याने विचारला होता ह्या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मी देणार म्हणून थांबलो होतो आता ते देतो
१ पहिले कारण आजारपणांमुळे मला वाचन पूर्वीसारखे करता येत नाही त्यामुळे जुने लेखक समकालीन लेखक आणि नवे लेखक अशी मी विभागणी करून नव्या लेखकांना प्रिफरन्स द्यायचा असं धोरण निश्चित केलं आहे प्रणवची मेट्रोमॉल वाचणे हे मला सातपाटील वाचण्यापेक्षा अधिक आवश्यक वाटते
२ दुसरे कारण वैयक्तिक आहे प्रत्यय आणि व्यत्यय ह्या पुस्तकात रंगनाथ पठारे ह्यांनी टीकाहरण संदर्भात जे निखालस चुकीचे लिहिले आहे त्यामुळे यदाकदाचित वाचन केले आणि काही लिहिले तर त्याचे रिसेप्शन पठारेंच्याकडून प्रॉपर तरीक्याने होईल ह्याची खात्री मला वाटत नाही अभिधानानंतरशी निगडित तिळवेबद्दल त्यांनी जे लिहिले ते लिहिण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे पण जेव्हा दोन व्यक्तींच्यातला वाद असतो तोही वैयक्तिक तेव्हा दोन्ही बाजूं ऐकून लिखाण करावयाचे असते पठारे ह्यांनी चित्र्यांना प्रमाण मानून माझी काही बाजू असेल हे ध्यानातही न घेता हे लिखाण जजच्या अविर्भावात केले आहे त्यांच्या आणि चित्रे ह्यांच्या ज्येष्ठतेचा आदर करून मी कधीही ह्याला उत्तर दिलेले नाही पण साहित्यव्यवहारातील एक बाजू जी ह्या घटनेशी निगडित आहे आणि जी चित्र्यांना आयुष्यभर सांगूनही कधी कळली नाही ती पुन्हा इथे सांगतो आहे कारण साहित्यव्यवहाराशी त्याचा संबंध आहे कल्चरल इंडस्ट्रीत सृजन प्रथम होते मग उत्पादन साहित्यात लेखक सृजन करतो प्रकाशक उत्पादन ! हे उत्पादन कसे करावयाचे त्यासाठी कुणाच्या प्रस्तावना घ्यायच्या कुणाच्या हस्ते प्रकाशन सभारंभ करावयाचे ह्या संदर्भातले निर्णय कुणी घ्यायचे ह्या संदर्भातले पाच संकेत आहेत
१ लेखकाने निर्णय घ्यावेत प्रकाशकाने अंमलबजावणी करावी
२ प्रकाशकाने निर्णय घ्यावेत लेखकाने अंमलबाजवणी करावी
३ दोघांनी चर्चा करून निर्णय घ्यावेत दोघांनी अंमलबजावणी करावी
४ प्रकाशनाचे उत्पादन असल्याने प्रकाशकाने निर्णय घ्यावेत दोघांनी अंमलबाजवणी करावी
५ प्रकाशकाने निर्णय घ्यावेत प्रकाशकाने अंमलबाजवणी करावी
माझी ह्या संदर्भातील भूमिका प्रकाशकाने निर्णय घ्यावेत प्रकाशकाने अंमलबाजवणी करावी ही आहे कारण त्यात संन्याशाला आवश्यक ती अर्थक्रियेपासूनची मुक्तता आहे गृहस्थाश्रमातील व्यक्तीला आर्थिक क्रिया महत्वाच्या वाटणे स्वाभाविक आहे त्यामुळे त्याला पाचवा पर्याय योग्य वाटेलच असा नाही पण संन्याशाने आर्थिक भानगडीत ज्यास्त गुंतू नये आणि त्यासाठी पाचवा संकेतच योग्य असे माझे मत आहे चित्र्यांना हे कधीही कळलं नाही त्यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध नसते तर मी त्यांना फोनसुद्धा करण्याच्या भानगडीत पडलो नसतो त्यांनी जे काही केलं त्याबद्दलही सगळं विसरून मी पुढं सरकलो होतो त्यांच्या साठीच्या सभारंभात मी ऍ डॉ हॉ का बा ना सु ना मधल्या तुकड्यांचे वाचन करावयाचे असेही ठरले होते पण माझी काही कामे अशी आली कि मला त्यांना नन्तर नकार द्यावा लागला तो त्यांच्या जिव्हारी लागणे साहजिकच होते ते भूतकाळाशी त्याचा संबंध जोडत होते आणि मी वर्तमानातून नकार देत होतो पुढे मग अनेकांनी पेट्रोल टाकले आणि संबंध जळाले स्खलनशिलता आणि मत्सर ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे सर्वांनाच क्षमा करून पुढे सरकणे कधीही योग्य !
मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगारपासून प्रकाशकाने निर्णय घ्यावेत प्रकाशकाने अंमलबाजवणी करावी ही भूमिका पार पाडतो आहे वैयक्तिक पातळीवर माझ्या पुस्तकांचा प्रकाशन सभारंभ करायला माझा पूर्ण विरोध आहे पॉप्युलर आणि ग्रंथाली सारख्या प्रकाशनाने त्याचा आदरही केला आहे कीर्ती शिंदे नितीन वाघ आणि सतीश पाध्ये ह्या माझ्या प्रकाशकांनीही त्याचा आदर केला आहे मात्र मी त्यांना नेहमीच तुम्हाला प्रकाशक म्हणून काही करायचं असेल तर खुशाल करा फक्त मला त्यात ओढू नका म्हणून सांगितले आहे त्यामुळे माझ्या कुठल्याच पुस्तकाचा प्रकाशन सभारंभ झालेला नाही टीकाहरण आणि पुढे कव्ही ह्या दोन्ही पुस्तकांच्यावेळी मी चित्र्यांना नेहमीच सांगितले आहे कि हा तुमचा आणि प्रकाशकांचा व्यवहार आहे काय करायचे ते तुम्ही ठरवा पण दोन्ही वेळी चित्र्यांनी घोळ घातले आहेत त्यांनी कायमच जणू मी त्यांना विनंती करतो आहे अशा थाटात इतरांना निवेदनं दिली आहेत मी चित्र्यांना टीकाहरणबाबत तुम्हाला जे बोलायचं आहे ते खुशाल बोला असंच सांगितलं होतं जर ह्याबाबतीतील संभाषणाच्या टेपा उपलब्ध होऊ शकत असतील तर नक्की उपलब्ध करून ऐकाव्यात असो नंतर काय झालं ह्याची चौकशी मी आजतागायत केलेली नाही कारण पुन्हा माझी भूमिका ! हा प्रश्न प्रकाशक व ते ह्यांच्यातील आहे असं मी मानतो
रंगनाथ पठारेंनी ह्या वैयक्तिक वादात का उडी घेतली हे मला आजतागायत कळलेलं नाही त्यांच्या पुस्तकातील आशयाचा ह्या घटनेशी काय संबंध आहे हेही मला कधी कळलं नाही मी फक्त माझ्यापुरता निर्णय घेतला तो म्हणजे दोन्ही बाजू न ऐकता जजमेंट देणाऱ्या व्यक्तीशी म्हणजे ह्या केसमध्ये रंगनाथ पठारे ह्यांच्याशी संबंध नको एखाद्या क्षेत्रात फट म्हणताच ब्रम्हहत्या होणार असेल तर त्या क्षेत्रात संन्याशाने पाऊल टाकू नये
तिसरे कारण माझी धर्म ही कादंबरी आहे तिचाही फार मोठा भाग माझ्या मागच्या पिढ्यांनी व्यापला आहे अशावेळी ह्याला समांतर एखादी कादंबरी प्रकाशित झाली असेल तर ती न वाचणेच श्रेयस्कर अ डॉ हॉ का ब ना सु ना हिट झाली असती तर धर्म २००९ सालीच आली असती पण असे झाले नाही अ डॉ हॉ का ब ना सु ना आर्थिक पातळीवर आतबट्ट्यातला व्यवहार ठरल्याने माझ्या कादंबऱ्या प्रकाशित होणे बारगळले . माझी त्याबद्दलही तक्रार नाही वडलांना वचन दिले नसते तर सर्व पंचगंगेत बुडवून मोकळा झाला असतो लेखन वैग्रे गोष्टी मोक्षासंदर्भात फार किरकोळ आहेत असो
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment