२८ सप ३ ऑक्टो १२ +२ -१४

२१ ते २६ सप्टें  १२

१४ ते १९ स  १२

७ ते ११ सप्टें १४ +१ =१५

१ ते ५ सप्टेंबर १० -१०


मुंबई विद्यापीठातील ६३ व्याख्यानांचा ज्ञानगोंधळ घालून संपला गेली पाच वर्षे मी हा गोंधळ घालतो आणि बुद्धिमान विध्यार्थ्यांच्यामुळे मजा येते दरवर्षी कुणी ना कुणी अपडेट असणारे विद्यार्थी निघतात  रॉजर बेकन , फ्रान्सिस बेकन , किर्केगार्द , फ्रेडरिक निट्झशे , सिग्मंड फ्रॉइड ,देकार्त , नेमाडे , रुसो , व्हॉल्टेअर , मार्टिन ल्युथर , सार्त्र , काम्यू , ऍडम स्मिथ , विजय तेंडुलकर , मोहन राकेश , गिरीश कर्नार्ड , महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर , बसवेश्वर ,स्ट्रिंडबर्ग , शेक्सपियर , बेंथॅम , मिल , आर्तो , रेम्बो , बोदलेअर , दाली , व्हॅन गॉख ह्यांची सोबत तात्पुरती सम्पली नवीन पिढी वाचत नाही हा समज पुन्हा एकदा धुळीला मिळाला अनेक आडवेतिडवे प्रश्न आले अगदी आयन रॅन्डवरसुद्धा प्रश्न विचारले गेले नेहमीप्रमाणे गुगल घेऊन बसण्याची अनुमती होती त्यामुळे तपशील चुकले कि तपासले जाऊ लागले कंगना राणावत , नसिरुद्दीन शाह , सत्गुरू जग्गी वासुदेव , रेप केस , सिरीयात मुस्लिम ,ह्यांच्यावर वाद झाले हे सर्व रेकॉर्डेड असल्यामुळे कधीतरी सर्व बाहेर येईलच बुद्धिप्रामाण्यवादापासून अस्तित्ववादापर्यंत एक मोठा कॅनव्हास उभा करण्याचा एक प्रयत्न केला फक्त एक कार्ल मार्क्स बाकी राहिलाय तो बहुदा नोव्हेंबरमध्ये घेईन 

मला स्वतःला हा युरोपियन कालखंड अतिशय आवडतो त्यामुळे ह्या कालखंडावर बोलायलाही आवडते 

एक निरीक्षण मुद्दामच नोंदवतोय अद्ययावत वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललीये आणि उत्तर भारतातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललीये तेव्हा मराठी लोकांनी ह्यांना भय्या वैग्रे म्हणणं थांबवावं भविष्यातील एक्सपिरिमेंटल थिएटर कदाचित हेच लोक चालवतील आणि दिल्ली हे प्रायोगिक रंगभूमीचे नवीन केंद्र म्हणून जन्माला येईल अशी चिन्हे दिसतायत मराठी लोकांना केवळ फुकाचा माज आहे सावरकर , फुले आंबेडकरांच्या पलीकडे काही नवीन  विचार असतो ह्याची त्यांना जाणीवच नाही 

श्रीधर तिळवे नाईक 




Comments

Popular posts from this blog