लुईझि ग्लुक : प्लॉटची प्रोसेस बदलणारी कविता श्रीधर तिळवे नाईक
लुईझि ग्लुकला २०२० चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याने ती आता प्रकाशित आली असली तरी स्त्रीवादी कविता वाचणाऱ्या लोकांना ती फार पूर्वीपासून परिचित आहे भारतात कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे जे काही गैरसमज पसरलेत त्यातील एक म्हणजे अमेरिकेत सांस्कृतिक पातळीवर अभिजात असं काहीही घडत नाही प्रत्यक्षात ज्याला आज आपण पोस्टमॉडर्न कला म्हणतो तिच्या संदर्भातील सर्व पायोनियर कलात्मक व सांस्कृतिक घडामोडी अमेरिकेत घडल्या आहेत फ्रांस इंग्लडने अत्यंत जाणीवपूर्वक अमेरिकन लोकांचे योगदान नाकारायचा प्रयत्न केला पण तो फसला आहे त्यामुळेच एका अमेरिकन कवयित्रीला मिळालेल्या ह्या पारितोषिकाने काहींच्या डाव्या भुवयीने आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी जगभर ह्याचे स्वागतच होईल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही
१९४३ साली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ग्लुकचा जन्म झाला फर्स्टबॉर्न , अव्हेरनॉ , व्हिलेज लाईफ , हे तिचे गाजलेले संग्रह द वाइल्ड ईरीसला पुलित्झर मिळाले आणि ती प्रकाशात आली सुरवातीला उत्तम गीतांसाठी ती गाजली पण हळूहळू तिच्या आत्मचरित्रात्मक कवितांनी अमेरिकन जगतात प्रतिष्ठा प्राप्त करायला सुरवात केली कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून न्हवे तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणाऱ्या उत्तरस्त्रीवादी साहित्यिकांच्यात ती मोडते
वैयक्तिक अस्तित्व वैश्विक करण्यासाठी तिला हा पुरस्कार मिळालाय असं जाहीर झालं असलं तरी louise gluck मला आवडली ती तिच्या मातुल व कन्येय भावांच्यामुळे (फिलिंग्जमुळे) !माझी आई किंवा कन्या मॉडर्न कवयत्री असती तर तिने कशा कविता लिहिल्या असत्या ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तिच्या कविता! अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचे प्रतिबिंब तिच्या कवितेत पडलेले दिसते . प्रतिमांचे अवडंबर न माजवता फिलिंगच्या सुईवर उभे केलेले नेमके शब्दप्रयोग हे तिचे वैशिष्ट्य बोदलेयर रिल्के ह्यासारख्या आधुनिक कवींनी अनेक जुने प्लॉट नवे करून दाखवले आणि ह्या पायवाटेवरून मग अनेक कवी गेले ग्लुकनेही हेच स्त्रीवादाच्या संदर्भात करून दाखवले
मिथ ऑफ डिव्होशनमध्ये हेडीसचा प्लॉट हे ह्याचे उत्तम उदाहरण ! हा मृत्यूचा देव प्रेयसीसाठी डुप्लिकेट पृथ्वी बनवल्यानंतरही तो त्याच्या प्रेयसीला मृत्युलोकात घेऊन येतो एका अर्थाने हे मूळ कथेचे विपरितिकरण अमेरिकन समीक्षेत ह्याला मॉक एपिक म्हणतात त्याला म्हणायचं होतं आय लव्ह यु आणि तो म्हणाला तुझा आता मृत्यू झालाय त्यामुळे तू सेफ आहेस ह्या त्यातल्या खतरनाक ओळी ! अ फेबल मध्ये ब्रेश्टने आपल्या नाटकात वापरलेला पूर्ण फिरवलेला क्लेम करणाऱ्या दोन आया व एक मूल ह्याचा प्लॉट तिने पूर्ण पुन्हा फिरवलाय हे ती अनेकदा करते आपल्याकडे कथाकाव्याला दुय्यम समजणारे महाभाग आहेत त्यांनी ही कवयत्री जरूर वाचावी प्लॉटचे नवे डिझाईन जमणे महत्वाचे ते अनेकांना जमत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो
तिला अनेकदा पोस्टकन्फेशनल कवयित्रीही मानले जाते कारण साठोत्तरी घरेलू आयुष्याच्या अनेक प्लास्टिकल शोकात्मिका तिच्या कवितेत आढळतात ज्यांना तिच्या आत्मचरित्राची जोड असते अशा कविता लिहितांना ती अनेकदा वर्णनात्मक वाक्यांच्या सढळ वापर करत मग कल्पनेचा वापर करत झेपावणे हे ती सहज करते उदाहरणार्थ
You're stepping on your father, my mother said,
and indeed I was standing exactly in the center of a bed of grass,
mown so neatly
अशा वर्णनात्मक ओळींनंतर
it could have been my father's grave,
अशी एक साधी ओळ सगळं बदलून टाकते आणि मग सहज
although there was no stone saying so.
असं सांगत ती जणू वास्तव निर्देश करते ज्यामुळे भाव घनदाट होतो
ही खास स्त्रैण शैली आहे आणि ती भोळसट रोमँटिक नाही त्यामुळेच
This is my home, he said.
The city?—?the city is where I disappear.
असा शेवट होतो आणि हे ऍबओरिजनल लँडस्केप संपते
तिची परदेशी पाहुण्यांच्याविषयी एक कविता आहे अरुंधती देवस्थळे ह्यांनी तिचा उत्तम अनुवाद केला आहे ती पुढीलप्रमाणे
दुसऱ्याबद्दल होणाऱ्या आभासाबद्दल बोलून कविता सुरु होते पुढे घर आणि फोन ह्यांच्या अस्तित्वाच्या ताणाबाण्यातून अनेक जीवघेण्या गोष्टींची घरात आणि मनात होणारी उलथापालथ येत राहते मधेच स्वर्गातले नातेवाईक रियल असल्यासारखे येतात नाते जुळते मी आणि आईवडील एकच असे वाटते आणि शेवटी कोणीही येत नाही आणि प्रश्न तसाच राहतो कोण करतं फोन असा मध्यरात्री ? खरंच कोण फोन करतं ? असा प्रश्न सोडून कविता संपते
खरेतर ग्लुकला नोबेल मिळेल असं मला वाटलं न्हवतं पण मिळाले हेही बरे झाले मूळ प्लॉटच्या प्रोसेस बदलणाऱ्या ज्या काही मोजक्या कवियित्री आहेत त्यातील ती एक हे पारितोषिक बहुदा त्यासाठी दिलेलं असावं व्हिलेज लाईफमधल्या एका कवितेत तिनं म्हण्टलंय
I open my fingers—
I let everything go.
Visual world, language,
rustling of leaves in the night,
smell of high grass, of woodsmoke.
I let it go, then I light the candle.
मी बोटं उघडते
आणि सगळं जाऊ देते
दृश्य जग , भाषा ,
रात्रीच्या पानांची सळसळ
उंच गवताचा वास लाकूडजळिताचा
मी सर्व जाऊ देते
आणि एक कँडल पेटवते
(व्हिलेज लाईफ )
ही कवितेची कँडल आहे हे उघडच आहे सध्याच्या हायटेक जगात अनेक प्रकारच्या लाईट्स झगमगाट करत असतांना ही कँडल पेटवणं महत्वाचं ठरत कारण ती बाहेर नाही आत आहे काळजात ! ग्लुक अशी कँडलसारखी रेंगाळत उजळत राहते आतल्या आत बहुदा त्या आत टाकलेल्या प्रकाशासाठी ग्लुकला हा सन्मान ग्लुकला हा सन्मान दिला असावा
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment