Ēलग : चौथी नवता ------------------ बायलाइन : Ŗीधर ितळवे shridhar.tilve1@gmail.com ------------------ हेिडंग : भिवđयतांितर्कीचा सामर्ाज्यिवĒतार ------------------ इंटर्ो : १८५० नंतर िवȧानाच्या मयार्दा Ēपđट होऊ लागčया आिण १८९० नंतर तर त्यािवषयी Ēपđट चचार् सुरू झाली. या सवार्चा सखोल पिरणाम युरोिपअन िवचारवंतांवर होऊन अनेक पर्ितभावंत हेपुन्हा एकदा गिणत आिण भूिमती यांच्याकडɂवळले. त्यामुळɂिवसाďया शतकातील संपूणर्जगावर पर्भाव टाकणारेजे तŚवȧ होते , तेसवर्च गिणत अथवा भूिमतीशी संबंिधत होते... ------------------ Ĉलबर् : मानवी इितहासात गिणत आिण भूिमती या मानवी समाजाच्या आǐ तांितर्की होत. त्या तकɒशाĒतर्ाच्या आधारेचालतात व अमूतर्शक्यतांच्या पर्देशात िसnj होतात. साहिजकच गिणत आिण भूिमतीत अďवल दजार्ची पर्ितभा आिण कčपनाशक्ती लागते... ------------------ गेčया काही लेखांत आपण मानवी ȧानाच्या शाĒतर् आिण िवȧान या दोन महŚवाच्या अंगांचा आिण त्यांचा भिवđयाशी असलेčया संबंधांचा थोडक्यात िवचार कɁला. आता आपणाला ितसķया अंगाचा िवचार करायचा आहे. हे ितसरेअंग Ċहणजे, तांितर्की होय. मानवी इितहासात गिणत आिण भूिमती या मानवी ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
एकाकीपण , एकटेपण आणि एकांत एकाकीपण एकटेपण आणि एकांत ह्या भिन्न गोष्टी आहेत एकाकीपण ही एक लादली गेलेली सामाजिक स्थिती असते जिथे माणूस समाजापासून स्वइच्छेने तुटलेला नसतो एकटेपणात माणूस स्वतःच एकटा होतो काही कामे एकट्याने करायची असतात म्हणून म्हणजे तुम्ही संडासात जाता तेव्हा तुम्ही एकट्याने जाता कारण संडासकर्म एकट्याने करण्याची गोष्ट असते एकांत मात्र अध्यात्मिक निवड असते ती एकाची शांतता असते आणि जर हा साधकाचा एकांत असेल तर जो एक उरलाय त्याचाही अंत व्हावा अशी तडफड असते एकांती होणे एकांतिक होणे हे सोपे नसते त्यात तुम्ही एकांगी होण्याचा धोका असतो जेव्हा महापुरासारखी आत्यंतिक वेदनादायी व दुःखदायी सामाजिक परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला एकांताचा त्याग करावा लागतो नंतर वेदांती असाल तर तुम्ही म्हणू शकता कि महापूरही माया होती आणि मदत करणारा मीही माया होतो पण एकांताचा त्याग करावा लागतो आणि डाव्या हाताचे दान उजव्या हाताला कळू न द्यावे ह्या अध्यात्मिकतेला अनुसरत लोकांतातुन एकांतात परतावेही लागते आपत्तीत माणसे घाबरतात आणि धैर्य एकवटून एकमेकाला मदत करत त्यातू...
- Get link
- X
- Other Apps
महापुरानंतरचे तुकडे श्रीधर तिळवे नाईक १ आपणाला पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला पुराचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला सांडपाण्याचे आणि गटारांचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला दुष्काळाचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला व्यवस्थापन कसे करायचे तेच माहित नाही २ पावसाळा आता आभाळातल्या आभाळात थांबवावा काय ? ३ गोव्यात घर कोसळलंय कोल्हापुरात दुकान उभं करतांना नाकीनऊ आणि इथे खाली तीन फूट पाणी आणि वर छप्परगळती पाण्याला जायला वाट नाही म्हणून ते थेट जमिनीतून उगवत घरात ! लोक सेल्फी पाठवतायत आणि आपण इथं पाण्याशी मुकाबला करत ४ पाणी म्हणजे एच टू ओ ह्या सूक्ष्म वैज्ञानिक सत्याचा महापुरात काय फायदा ? त्यापेक्षा प्राचीन शेत्तीय (आर्यांसाठी खत्तीय ) विचारानुसार पंचमहाभूती विचारप्रणाली कदाचित जास्त उपयुक्त ! जल हे एक पंचमहाभूत म्हणूनच दर्शन देतंय एच टू ओ म्हणून नाही ५ शेत्तीय थिंकिंग मध्ये पुढच्या किमान सात पिढ्यांचा विचार व्हायचा त्यामुळं मी झाड लावल्यावर माझे नातू पणतू खापरपणतु फळं खातील असा दूरदृष्टीचा विचार असायचा होमो सेपियन्...
- Get link
- X
- Other Apps
कोल्हापुरात असतांना शाहिरी परंपरेशी घट्ट नातं होतं साहजिकच अण्णाभाऊ साठेंच्या काही रचना त्यावेळी गंमतीगमतीत कम्पोज केल्या होत्या त्यातील जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव इथे देतोय ही माझी आदरांजली दाखवण्याची पद्धत आहे असं समजू शकता अण्णांच्यावर एक लेख लिहायचा विचार आहे जी के ऐनापुरेने हा आग्रह केलाय बघू कसं जमतं ते !
- Get link
- X
- Other Apps
कवितेचा थाट श्रीधर तिळवे नाईक मराठीला पु शि रेगे ह्यांच्या ज्या काय देणग्या आहेत त्यातील एक म्हणजे स्वतःच्या कवितेवर कसं काम करायचं ह्याचा त्यांनी घालून दिलेला आदर्श पाठ पारंपारिक वृत्तावर कसं काम करायचं हे आपणाला बोरकर कुसुमाग्रज करंदीकर मर्ढेकर ह्यांनी दाखवून दिलं आणि पुढे ग्रेस व आरती प्रभू ह्यांनी पण मुक्तछंदावरही काम करायचं असतं ह्याची पहिली तीव्र जाणीव रेगे आणि करंदीकर ह्यांनाच होती असे दिसते ह्यातील रेगे ज्याला ठाणमंडित थाट म्हणता येईल तो सतत विकसित करतांना दिसतात त्यासाठी ते पाश्च्यात्य कविंचे थाटही कसे मराठीत विकसित करतात हे मी कमिंग्ज ची एक थाटरचना त्यांनी मराठीत पक्षी जे झाडावर गाणे गातो असते झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात वैग्रे मध्ये कशी आणली ते मी सप्रमाण सिद्ध केले होते आपल्याकडे ह्याला चोरी म्हणणारे मूर्ख आहेत वास्तविक ही एक आवश्यक आयात असते आणि एखादा कवी त्या थाटाचे मराठी रूपांतर कसे करतो हे महत्वाचे असते गाथा सप्तशतीचे सौष्ठव तर ज्या तर्हेने पु शि नीं नवीन मराठीत आणले त्याला तोड नाही अरुण कोल्हटकर हे पु शिंच्या खांद्यावर उभे असलेले कवी आहेत १९४० ते १९६० ...
- Get link
- X
- Other Apps
मला अनुवादाचा अनुभव नाही पण पुनर्वाचन करावे लागते कधीकधी ! शेक्सपिअर कॉलेजातच समग्र वाचला होता पण पीचडीच्या वेळी पुन्हा वाचावा लागला पुढे पीटर ब्रुकने ऑथेल्लोचा अर्थ एक दिग्दर्शक म्हणून कसा पलटवला ते वाचले आणि ब्रुकच्या नजरेतून ऑथेल्लो वाचायची वेळ आली त्यानंतर पुन्हा सलमान रश्दीने मूरस लास्ट साय लिहिली आणि ती वाचतांना पुन्हा ऑथेल्लो वाचायची वेळ आली ब्रुकने वंशभेदाच्या अंगाने तर रश्दीने तो मूर असल्याच्या अंगाने ऑथेल्लो पाहिला होता आता हा युवल हे अनएन्डिंग आहे मॅट्रिक्सवर मी दैनिक प्रहारमध्ये लेखमालिका लिहिली तेव्हाही त्याचे काही तुकडे पुन्हा पाहावे लागले होते नंतर त्यात एक बॉद्रीलार्द चा संदर्भ आहे म्हणून तो कन्फर्म करायला पहावा लागला होता सर्वाधिक वाचन अर्थातच महाभारताचे करावे लागते महाभारताने सगळ्या भारतीय लेखकांची ठासलेली आहे सर्वात वाईट म्हणजे महाभारत अथपासून इतिपर्यंत ब्राम्हण्यवादाचे समर्थन करत असल्याने त्याची धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी प्रत्येक वाचनात अवस्था असते युवल भारतीय नाही हेच बरे ------------------------------------ सर्वोत्कृष्टतेची आस ही एकतर तुमच...
- Get link
- X
- Other Apps
भारतीय प्रबोधन आधी सुरु होऊनही का वाढले नाही हा भारतीय इतिहासातील एक कळीचा प्रश्न आहे ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे भारतीय प्रबोधनाला इथल्या राज्यकर्त्यांनी आधार पुरवला नाही आणि ज्यांनी आधार पुरवला त्या राजांना अतिशय पद्धतशीरपणे संपवले गेले शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन करून पंचायतन देऊन हिंदूंचा गाभारा वसवला तर वेदांत सांगून मोक्षाची वाट वसवली समाजरचनेत वर्णजातिव्यवस्थेचा पुरस्कार करून वर्णजातीअधिष्ठित समाज निर्माण केला आणि अर्थकारणही वर्णजातिप्रधान केले शैवांचे धर्मांतर घडवून त्यांना हिंदू करून टाकले आणि वैदिक समाजरचना व धर्मरचना त्यांच्यावर लादली ह्याला शैव उत्तर देणे अपरिहार्य होते शैवांचे उत्तर दक्षिणेत बसवेश्वर व उत्तरेत नानक ह्यांच्या रूपाने उदयाला आले आणि ह्यांच्या आधारे शैव राजवटी उभ्या करण्याचा प्रयत्न झाला मुस्लिमांच्यात प्रबोधनाचा राजकीय घाट घातला तो अकबराने ! त्याने दिनेईलाही हा नवीन धर्म उभा केला तर शिवाजींनी पुन्हा एकदा शैव राजवटींचा आदर्श निर्माण केला पण मग माशी शिंकली कुठं ? ह्यापैकी कुणी शंकराचार्यांना नाकारण्याचा प्रयत्नच केला नाही ...