महापुरानंतरचे तुकडे श्रीधर तिळवे नाईक



आपणाला पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला पुराचे  व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला सांडपाण्याचे आणि गटारांचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला दुष्काळाचे व्यवस्थापन कसे करायचे माहित नाही आपणाला व्यवस्थापन कसे करायचे तेच माहित नाही



पावसाळा आता आभाळातल्या आभाळात थांबवावा काय ?



गोव्यात घर कोसळलंय कोल्हापुरात दुकान उभं करतांना नाकीनऊ आणि इथे खाली तीन फूट पाणी आणि वर छप्परगळती पाण्याला जायला वाट नाही म्हणून ते थेट जमिनीतून उगवत घरात ! लोक सेल्फी पाठवतायत आणि आपण इथं पाण्याशी मुकाबला करत



पाणी म्हणजे एच टू ओ ह्या सूक्ष्म वैज्ञानिक सत्याचा महापुरात काय फायदा ? त्यापेक्षा प्राचीन शेत्तीय (आर्यांसाठी खत्तीय ) विचारानुसार पंचमहाभूती विचारप्रणाली कदाचित जास्त उपयुक्त ! जल हे एक पंचमहाभूत म्हणूनच दर्शन देतंय एच टू ओ म्हणून नाही



शेत्तीय थिंकिंग मध्ये पुढच्या किमान सात पिढ्यांचा विचार व्हायचा त्यामुळं मी झाड लावल्यावर माझे नातू पणतू खापरपणतु फळं खातील असा दूरदृष्टीचा विचार असायचा होमो सेपियन्सला सुसंस्कृत बनवलं ते ह्या शेत्तीय थिंकिंगने ! नाहीतर होमो सेपियन म्हणजे रानवट पोस्टमॉडर्न नीच माणूस ! फक्त स्वतःचा विचार आणि स्वतःच्या टोळीचा !

पाणी पोस्टमॉडर्न नाही पाणी नेट फ्लो आहे आणि माणसांसाठी जितके इंडस्ट्रियल त्याहून अधिक शेत्तीय !



विठ्ठलाला वाऱ्या दोन कारणांनी पाणी पाठव म्हणून किंवा पाणी प्रचंड झालंय ते हलव म्हणून आता तारखाच बदलल्या आणि वारी काळाच्या आधी दोन आठवडे सुरु

अक्कलशून्यतेचा हाही कळस !



केऑस कळला आणि त्यावरचा मोक्ष हा उपायही सापडला नंतर विज्ञान म्हणाले ह्या केऑसमध्येही ऑर्डर आहे
नंतर तंत्रविज्ञान म्हणाले केऑस केऑसच आहे आणि ऑर्डर आपणाला निर्माण करावी लागेल प्रश्न इतकाच ही ऑर्डर निर्माण करायची कुणी

राजकारण्यांनी हे पारंपरिक उत्तर जे राजकारणी लोकांना कधीच पेलायचं न्हवतं आणि नाहीये त्यांना फक्त सत्ता हवी आणि पैसा ह्यातून पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये प्रचंड करप्शन

नवे उत्तर कार्पोरेट हाऊसेसनी तर त्यांना आपल्या उत्पादन प्रणालीतून केऑस निर्माण करण्याचं स्वातंत्र्य हवंय पण ऑर्डर मेंटेन करण्याची जबाबदारी नकोय



तुम्ही नदीच्या दारात घुसला म्हणून नदी तुमच्या घरात घुसली



तुम्ही नदीच्या दारात का घुसलात ?

कारण तुमची वाढती लोकसंख्या

वाढलेल्या लोकांना घरे द्यायची कोठून जमीन अनलिमिटेड नाही मग जी आहे ती वापरा नदीच्या आणि समुद्राच्या किनाऱ्यावर जमीन निर्माण करा जी निसर्गाकडून पाण्याला देण्यात आली होती आणि मग पाण्याने आपली जमीन क्लेम केली कि त्याला महापूर म्हणा

१०

पाणी जमिनीत जिरतच नसेल तर ते वाहायला लागणारच पाणी जिरवणाऱ्या प्राचीन व्यवस्था मोडीत काढल्यावर तुम्ही सुरक्षित राहाल ही अपेक्षा करण्याइतके पाणी आणि पावसाळा काय तुमच्या खिशातील चिल्लर वस्तू आहे ?

११

जे पीडित आहेत त्यांच्याबद्दल करुणाच आहे त्यासाठी जे करता येईल ते चालू आहेच

१२

कोल्हापूर हे भावंडभावाचे शहरच आहे कॉस्मोपॉलिटिन विलेज ! त्यामुळे एकमेकांना मदत करत ते उभारी घेईलच !

१३

समस्या निर्माण झाल्यावर भेटी देण्यापेक्षा समस्या निर्माणच होणार नाहीत ह्याची काळजी घ्याल तर जास्त बरं होईल .

१४

मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून पुराविषयी नेमके काय कळले किंवा काय कळते ?

१५

कर्नाटकाचा देशीवाद महाराष्ट्राचा देशीवाद मग कर्नाटकचे स्वतःचे देशी धरण आणि त्यावरचा कंट्रोलराइट स्वतःच्या प्रदेशापुरते पाणी अडवलं कि झालं मग त्या अडवलेल्या पाण्याने पाठीमागच्या राज्यात पाणी वाढून
तिथे महापूर आला काय न आला काय आपण एका राष्ट्रीय मार्गीचे घटक आहोत ह्याचे भान नाही

जिथून आमची हद्द सुरु
तिथे आम्ही काहीही करू

उद्या पाऊस पडलाच नाही तर मागणी येईल
कर्नाटकसाठी पाणी सोडा

१६

ह्या देशात काय चाललंय ते आपणाला कळत नाही
कि आपण न कळल्याचे नाटक करत आहोत ?

१७

लोकसंख्यानियंत्रण होत नाही तोवर तुमची कुठलीही समस्या सुटणे शक्य नाही मग तुम्ही कितीही बोंबा मारा
पहिल्यांदा लोकसंख्येचा महापूर आवरा तरच पाण्याचा महापूर नियंत्रणात नाहीतर वाढती लोकसंख्या आणि नदीच्या एरियात जाऊन बांधकामं आणि नद्यांचे आपल्या एरियात पसरण्याचे नैसर्गिक कसब !
हम दो हमारा एक ह्याला पर्याय नाही

पृथ्वी आकाराने डबल करण्याची टेक्नॉलॉजी
अद्याप अस्तित्वात आलेली नाही

१८

कार्पोरेट थिंकिंगने इंडस्ट्रियल थिंकिंगचा स्कारसिटीचा मुद्दा मोडीत काढून अब्युन्डन्सचा प्रोपोगण्डा मांडला त्या प्रोपोगंडाचे सिम्बॉल म्हणून अब्यूड्न्टल खचाखच भरलेले मॉल  उभा केले आणि मिनरल वॉटरच्या बॉटल्सचा ढीग उभा करून सांगितले पाणी ही आम्ही सिक्युर कमोडिटी बनवलीय जणू नद्या चुपचाप ह्यांच्या बॉटल्समध्ये जाऊन बसणार होत्या !

दुष्काळ आवडे सर्वांना च्या धर्तीवर साईनाथांनी आता महापूर आवडे सर्वांना असे पुस्तक लिहावे काय ?

१९

जलव्यवस्थापन हे जोवर शेत्तीय होत नाही ऍग्रिकल्चरल होत नाही तोवर दुष्काळ आणि महापूर ह्यातच तुम्ही गटांगळ्या खात राहणार पंचवार्षिक आणि दशवार्षिक पाण्याला कळत नाही मित्रांनो पाण्याला शंभर आणि हजार वर्षाची भाषा कळते आज पैसे खाऊन आजच्यापुरते स्वतःचे कल्याण करू पाहणाऱ्यांनो दोन पिढ्यानंतर हा पापाचा पैसा तुमच्याच घरात टिकेल ह्याची काय खात्री ? शक्यता हीच कि तुमची तिसरी चौथी पिढी तुम्हीच बनवलेल्या भ्रष्ट व्यवस्थेची बळी ठरेल तीही बोट उलटून बुडू शकेल कुठल्या गॅरेंटया घेऊन करप्शन करताय जे आज पेराल ते तुमच्याही पिढ्यात उगवणार आहे पोरगा सिक्युर कराल आणि खापरपणतु बुडवाल तर तुमच्या ह्या कार्पोरेट करप्शनला काय गाढवाच्या गांडीत घालायचंय ?

शहाणे व्हा

२०

इकोफ्रेंडली न होणे म्हणजे पृथ्वीचा मर्डर करणं
तुम्हाला पृथ्वीचे खुनी म्हणून मिरवायचे आहे काय

२१

कृतिशीलता हरवलेला देश
एका पायावर झोपून
बगळ्यासारख्या झोपा काढतो
आणि बकबक करतो

हीही बकबकच !
फक्त दोन पायांवर उभे राहून जागृतीत केलेली

कान बंद करू शकता
किंवा मेंदू उघडा करू शकता

असेल तर !

श्रीधर तिळवे नाईक



















Comments