आल्हाद भावसार ह्याच्या एका कॉमेन्टला दिलेले उत्तर
आल्हाद म्हणून तर मी आधीपासूनच चौथी नवता किंवा जालीय नवता असा शब्दप्रयोग वापरूया म्हणत होतो कारण साठोत्तरीत शेवटी ग्रेस सारखा रोमँटिक कवीही शिरला काळ धरून लिहिले कि हे हमखास होते कविता बदलते ती अवकाश कायापालट करतो तेव्हा ! संवेदनशीलता भावशीलता शरीरशीलता विचारशीलता आत्मशिलता अवकाशशीलता काळशीलता स्थितिशीलता गतिशीलता जेव्हा कायापालट करतात आणि अवकाशाचा भूगोल कायापालट करतो बदलतो जागा बदलते कायापालट करते आपला मी कायापालट करतो शरीराच्या ऍक्सेसरीज आणि वापर कायापालट करतो विचार कायापालट करतो भाव कायापालट करतो शक्तीचा ऊर्जेचा प्रतिभेचा झोत कायापालट करतो स्थितीचा ताणाबाणा कायापालट करतो गतीचा वेग आणि संवेग कायापालट करतो तेव्हा कला बदलते केवळ मानवी काळाने कायापालट करून कविता बदलत नाही म्हणूनच साठोत्तरी प्रमाणे नव्वदोत्तरी म्हणून प्रचार करू नका म्हणून सगळ्या चौथ्या नवतेच्या कविंना सांगत होतो सांगत होतो कि नव्वदोत्तरी ह्या शब्दाने पुढे जी भाऊबहीणगर्दी तयार होईल त्यात तुमची विशेषता हरवून जाईल पण श्रीधरने दिलेला शब्द स्वीकारायचा नाही म्हणून आणि साठोत्तरीची मान्यता मिळवली तर त्यांच्या मान्यतेच्या आधारे मराठी साहित्यात व जगभर लवकर प्रस्थापित होता येईल ह्या गणिताने नव्वदोत्तरी ही संज्ञा स्वीकारली गेली प्रस्थापित होण्याची इतकी घाई कुठल्याच पिढीला नसेल पुढची पिढी तर अभिधाच्या गुढग्याला आपला मेंदू बांधून हिंडणारी मग सलील वाघ आणि मन्या जोशी पोहचायचे कसे ?क्रांती करू पाहणाऱ्याने त्या क्रांतीत किमान वीस वर्षे थांबावे लागते त्यासाठी क्रांतीवर निष्ठा असावी लागते मी टिकलो बाकीचे टिकले नाहीत ही वस्तुस्थिती !पन्नाशीनंतर मी मवाळ झालो पण आता फेसबुकवर ज्या तऱ्हेची कविता धुमाकूळ घालतीये त्यामुळे मला पुन्हा जहाल व्हावे लागणार कि काय अशी शंका यायला लागली आहे मला नेमाडेंचं एका बाबतीत कौतुक वाटते ते म्हणजे त्यांनी आपली भूमिका कोसलानंतरही २० वर्षे ताठर ठेवली आणि त्यांच्या आसपास त्यांच्यासारखे लोक होते म्हणजे अशोक शहाणे राजा ढाले असेच कट्टर ताठर चंद्रकांत पाटील असेच नंतर आलेले रंगनाथ पाठारेही असेच ! आमच्याच पिढीने काय झक मारली माहित नाही . सतत तडजोडवादी ! काही प्रमाणात सलील , मनोज व ज्ञानदा टिकलेले दिसतात विशेषतः ज्ञानदा पण अलीकडे तीही देशीवादी झाल्याचा संशय येतोय सलील कधी इकडे कधी तिकडे मनोजचेही तेच सौष्ठवने ओपनिंग केल्यावर अभिधाने चांगली इंनिंग खेळायला सुरवात केली होती पण मंगेश काळे नावाचे सतत साठोत्तरीशी तडजोड करणारे गृहस्थ शिरले आणि त्यांच्या नादाने अभिधाच्या संपादकाने कमवलेली सगळी प्रतिष्ठा दावणीस लावली माणूस फक्त स्वतःच्या जागतिकीकरणाची काळजी करायला लागला कि चळवळीचं जागतिकीकरण बोंबलत जाणे अटळच ! जागतिकीकरणासाठीही मेंदू मजबूत टिकवावा लागतो तो टिकवला कि जग आपोआप तुमच्याकडं येतं . पण मार्केटींगच्या अतिरेकी प्रभावामुळे ह्या मजबूत गृहीतकावरचा विश्वास उडतो स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास नसल्याचं हे उदाहरण आहे म्हणून मग आधीच यशस्वी झालेली चित्रेंनी विकसित केलेली साठोत्तरीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली जाते बरं त्यात तरी काही प्रामाणिकपणा ? तर तिथेही गोतावळावाद आणि इतिहास बदलण्याचा प्रयत्न ! ह्याबाबतीत मी स्पष्ट बोलतो म्हणून माझ्याशी छत्तीसचा आकडा ! सलील मनोज ज्ञानदा सचिन हेमंत संजीव नितीन रिंढे , भ्रमिष्टाचा जाहीरनामामधला संतोष पवार संदीप देशपांडे नितीन कुलकर्णी निवि कुलकर्णी व् प्रणव सखदेव स्वप्नील शेळके सत्यपाल राजपूत कथेत २००५ नंतरचे सतीश तांबे पंकज कुरुलकर प्रणव सखदेव मेघना भुस्कुटे ह्यांच्या कथा व्हर्जीनकार नितीन वाघ लेखकाची गोष्टमधला विश्राम गुप्ते कार्पोरेट मधले संजय भास्कर जोशी नाटकात राहुल कोसंबी शिवाय आहे कार्पोरेट तरी मधले सं भा जोशी अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर हे आत्मचरित्र महेश पवार , सुनील तांबेंच्या अलीकडच्या पोस्ट्स असा एक मोठा तामझाम चौथ्या नवतेचा उभा राहिलाय ह्यावर वेगवेगळ्या लोकांनी लिहिणे आवश्यक आहे ह्या सगळ्याचा एक पूर्ण वेगळा चेहरा आहे हा जोवर मान्यताप्राप्त होत नाही तोवर सगळेच देशीवादाची शेवटची शेपूट म्हणून मान्यता पावतील सर्वात आधी कुठे नव्वदोत्तरी शब्द वापरायचा आणि कुठे चौथी नवता हे क्लिअरकट समजून घेऊया अन्यथा नव्वदोत्तरीची भाऊबहीण गर्दी फेसबुकमुळे विराट झाली आहे ती ह्या चेहऱ्याला गिळून टाकेल जर ह्या लोकांना ह्यात संतोष असेल तर म्हणा नव्वदोत्तरी महाराज कि जय !
श्रीधर तिळवे नाईक
कायापालट करतो कायापालट करतो कायापालट करतो कायापालट करतो

Comments
Post a Comment