Posts

गहारांच्या चर्चेनंतर आता आपण कालिक मितीकडे वळू ही मिती म्हणजे नवतार होय नवताराला तीन चेहरे असतात १  ताजा २ नवा ३ नवतारी सर्वसाधारणपणे चांगली कलाकृती ही कमीत कमी ताजी फ्रेश असावी लागते अनेकदा पारंपारिक लिहिणारे लोक शिळेच लिहीत असतात पण काही बहाद्दर असे असतात कि ते पारंपारिक आशय ताजा करून सांगतात मराठीत व भारतात  रोमँटिक आशय वापरून वापरून गुळगुळीत झालाय पण तरीही प्रत्येक पिढीत त्याला ताजे बनवणारे कलावंत जन्मत असतात उदा गुलज़ार , सौमित्र , गणेश दिघे , चंद्रशेखर सानेकर किंवा आधुनिक नवतेत दासू वैद्य , वर्जेश सोळंकी ह्या रोमँटिसिझम मध्ये पूर्णतः नवा आशय आणणारे काही कलावंत असतात उदा ग्रेस वा पु शि रेगे ह्यांची राजपुत्र आणि डार्लिंग वा पुष्कळा ह्या कविता किंवा आधुनिक नवतेत वसंत डहाकेंची योगभ्रष्ट व विलास सारंगाची सर्वच कविता ,  किंवा देशी नवतेत मंगेश काळे , प्रफुल्ल शिलेदार , प्रवीण बांदेकर , कविता महाजन , नितीन कुलकर्णी , भ्रमिष्टाचा जाहीरनामानंतरचा संतोष पवार , सध्याच्या काळात नवतारी कविता ही चौथ्या नवतेच्या कवींनी लिहिली आहे उदा  सलील वाघ ह्यांची ट्रॅफि...
मराठीत गहाराची सर्वोत्तम चर्चा तीन साठोत्तरी समीक्षकांनी केली भालचंद्र नेमाडे द ग गोडसे आणि गंगाधर पाटील ह्यातील गाजले फक्त नेमाडे आणि सर्वाधिक उपेक्षित राहिले ते गंगाधर पाटील . असे का झाले वास्तविक गंगाधर पाटलांनी म सु पाटील , हरीश्चन्द्र थोरात , गो तु पाटील ,   वैगरें असा मोठाच शिष्यवर्ग निर्माण केला पण तरीही त्यांची चर्चा ऍकेडेमिक वर्तुळातच मर्यादित राहिली  ह्याची तीन मोठी कारणे स्पष्ट दिसतात १ गंगाधर पाटील हे कलावंत म्हणून परिचित नाहीत आणि निखळ समीक्षकाची कदर करणे मराठी संस्कृतीत बसत नाही २ दुसरे ते मार्गी आहेत पाश्च्यात्त सरंचनावादी , विरचनावादी चिन्हमीमांसेचा मराठी भ्रतार ते साजरा करतात देशीवादाच्या अतिप्रभावामुळे ही मार्गी चिन्हमीमांसा पूर्णच उपेक्षेच्या गर्तेत गेली त्यामुळेही गंगाधर पाटील उपेक्षित राहिले ३ गंगाधर पाटील ह्यांनी आपल्या मीमांसेचा वापर समकालीन साठोत्तरी साहित्याकरता कमी आणि त्यामानाने जुन्या झालेल्या साहित्याच्या मीमांसेसाठी आधिक केला आमच्या पिढीकडे तर त्यांनी साफच दुर्लक्ष्य केले आणि पारंपरिक घाटाच्या साहित्याच्या आकलनाचे धडे आधिक शिकवल...
कला आकारावर जी  एक पोस्ट टाकली त्याचा उद्देश एकच होता तो म्हणजे मराठीत भालचंद्र नेमाडेंनी ज्या सूक्ष्म आणि लघुकृतींची टर उडवली होती त्याची झालेली वापसी . महाकृती आणि बृह्दकृती ह्यांच्यामुळे सूक्ष्मकृती आणि लघुकृती साइडला गेल्या आणि सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी , पंकज कुरुलकर , सुहृद जावडेकर ह्यांच्यासारखे अतिशय ताकदीचे कथाकार जे साहित्याच्या केंद्रवर्ती वर्तुळात यायला हवे ते तेवढ्या प्रमाणात आले नाही पण २००५ नंतर मात्र चिन्ह बदलले आणि आता अशी अवस्था आहे कि महाकृती लिहिणारे साईडलाईन झालेत आणि हे फारसे बरे नाही त्यातल्या त्यात बृह्दकृती लिहिणारे मात्र टिकलेत साहित्यात सर्वच आकारांना समान न्याय मिळायला हवा असे मला वाटते दुसरी गोष्ट आपल्याकडे वाङ्मय प्रकारची चर्चा होते वाङ्मय आकाराची नाही ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हेच जर कळणार नसेल तर कठीण आहे महाकाव्य ,  महाकादंबरी  आणि टीव्हीसीरियल(लिखीत संहिता )  हे तीन  भिन्न वाङ्मयप्रकार असतील पण ते एकच वाङ्मय आकार आहेत हे तरी कळायला हवे . मराठीत श्रीमान योगी ,  तुंबाडचे खोत , ताम्रपट , पानिपत , अ डॉ हॉ क...
कलाआकार  , वाङ्मय आकार ,   कलाप्रकार  ,वाङ्मयप्रकार फेसबुक श्रीधर तिळवे नाईक कला आकार (वाङ्मय आकार )आणि  कला प्रकार (वाङ्मय प्रकार ) ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे कला (वाङ्मय) आकार हा भौमितिक आकाराप्रमाणे स्थायी प्रकार आहे म्हणजे ज्याप्रमाणे भूमितीत वर्तुळ  त्रिकोण चोकोन बिंदू रेषा रेषाखंड असे स्थायी आकार आहेत आणि ते बदलत नाहीत तसेच कलेत महाकृती , बृह्दकृती , स्थूलकृती , लघुकृती , सूक्ष्मकृती , बिन्दूकृती असे कला -आकार आहेत आणि ते वाङ्मयातही आहेत फेसबुकमुळे बिन्दूकृती , सूक्ष्मकृती आणि लघुकृती ह्यांचा सुळसुळाट प्रचंड वाढला असला तरी हे कला  आकार (वाङ्मय आकार ) थेट गाथासप्तशतीपासून अस्तित्वात आहेत हे लक्ष्यात घ्यायला हवे. तंत्र कलेत एकाच  शब्दाच्या वा आकाराच्या बिन्दूकृती नेहमीच वापरल्या गेल्या आहेत विशेषतः ओम व बिंदू  ह्या  भारतातील आणि बहुदा जगातील सर्वात लोकप्रिय बिन्दूकृती आहेत .  गाथासप्तशती हा शेकडो  सूक्ष्मकृतींचा  संग्रह आहे तर जातककथा हा लघुकृती आणि सूक्ष्मकृतींच...
चौथ्या नवतेचा लेखक चौथ्या नवतेचा लेखक म्हणून मी लिहायला बसतो तेव्हा मी चौथ्या नवतेचा लेखक नसतो तर मी फक्त लेखक असतो ज्याला माहित असते कि मला एक जाल निर्माण करायचे आहे . हे जाल महाजाल कि बृहदजाल कि लघुजाल कि सूक्ष्मजाल होणार हे माहीत नसते एक ओळ येते मग एक कडवे किंवा परिच्छेद मग कळते कि गद्य येणार आहे कि कविता पहिली ओळ अनेकदा कागदावर व पेजवर असत नाही पण डोक्यात असते आणि काहीवेळा तीच बऱ्याच गोष्टी निश्चित करते . भगवान शिवांनी तीन अक्ष तीन डोळे सांगितले होते १ पहिला कामाक्ष म्हणजे काम हा डोळा २ दुसरा अर्थ ३ आणि तिसरा महाक्ष म्हणजे मोक्ष ज्याला जनसामान्य शंकराचा तिसरा डोळा म्हणतात ह्यात पुढे धर्म ह्या जीवनार्थाची भर वैदिकांनी घातली ह्या तिन्ही अक्षांच्यावर एक एक महाकृती लिहायची हे मी निश्चित केले होते पण सुरवात कुठून करायची हेच स्पष्ट होत न्हवते सरतेशेवटी ज्या कामामुळे आपणा सर्वांचा जन्म होतो तिथूनच सुरवात करावी असा विचार करून स्फूर्तीची वाट पाहात बसलो . शाळेच्या पुस्तकाची सुरवात प्रतिज्ञेपासून होते म्हणून आधीच लिहून ठेवलेली प्रेमप्रतिज्ञा नावाची कविता घेतली पण समाधान होईना म्...
वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक   गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत     वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर     पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता   वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे प...
ओबीसी साहित्याची चळवळ आणि स्त्रीवाद  भारतातील विचारप्रणालीत्व  खालील टप्प्यातून गेलेलं दिसतं १ नवजागरणवाद : ह्याची सुरवात बसवेश्वरापासून झाली . छत्रपती शिवाजी , पहिला बाजीराव पेशवा , गुरु नानक , सम्राट अकबर , दयानंद सरस्वती ह्यांनी हा टप्पा अधिक विकसित केला आणि त्याची धार वाढवली . जागरणवादाला पडलेल्या सामाजिक मर्यादा ह्यांनी ओलांडल्या आणि वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध एक ठाम भूमिका घेतली प्रस्थापित धर्मांना ठाम नकार दिला . २ सुधारणावाद : ह्याची सुरवात राजाराम मोहन रॉय ह्यांनी केली . न्यायमूर्ती रानडे , लोकहितवादी , बाळशास्त्री जांभेकर ह्यासारख्यांनी त्याचा विस्तार केला  विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार केला आणि समाजात सुधारणा झाली पाहिजे असा आग्रह धरला ३ प्रबोधनवाद : ह्याची सुरवात महात्मा फुले ह्यांनी केली आणि आज ज्याला बहुजनवाद म्हणतात त्याची स्थापनाही महात्मा फुले ह्यांनी केली . ब्राह्मण्याविरुद्ध ठाम बुद्धिवादी भूमिका घेऊन बहुजनांच्या सामाजिक संघटनाची आवश्यकता मांडली ४ दलितवाद : सवर्णवादाने केलेल्या शोषणाला अधोरेखित करून त्याविरुद्ध बंड केले ....