वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक
गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी
ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी
कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता वस्तुवादाच्या
प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित्याच्या संदर्भात chosisme फार महत्वाची संकल्पना मानली जाते
रँडम हाउस ऑफ डिक्शनरी त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे देते
chosisme
[shaw-zeez-muh]
Spell Syllables
· Word
Origin
noun
1.
a writing style in which plot and characterization are de-emphasizedand people, events, and setting are recorded as though seen by theauthor through the lens of a camera.
Origin of chosismeExpand
Dictionary.com Unabridged
Based on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.
Based on the Random House Dictionary, © Random House, Inc. 2017.
प्रतिसृष्टीय युगात कॅमेरा फार महत्वाचा बनला आणि क्रयवस्तूही ह्या क्रयवस्तूंच्यावर फोकस करणारी नवी
निर्वस्तुवादी कवितांची सामाजिक पार्श्वभूमी आपण पाहिली आता वैयक्तिक पार्श्वभूमी पाहू डेकॅथलॉन कॅटेगरीतील आणि साधनेतील भक्तोपाय व लोकायतपणा सम्पला होता योगोपायात अडथळे येऊ लागले होते बुद्ध आणि जे कृष्णमूर्ती ह्यांच्यामुळे ज्ञानोपायाचा उदय झाला ह्या काळात आता डेकॅथलॉन ट्रांसरियल मधून प्रकाशित झालेल्या कविताही लिहून झाल्या होत्या बुद्ध फळेना आणि जे कृष्णमूर्ती भीक मागू देईना अशी ही अवस्था होती आणि ह्याचवेळी तिळवे भंडारमधील माझा सहभाग वाढायला लागला होता क्रयवस्तूंची मी स्वतःच विक्री आणि मार्केटिंग करायला लागलो होतो त्यातूनच क्रयवस्तू आणि अध्यात्मिक साधना ह्यांचे विविध पेच निर्माण व्हायला सुरवात झाली व्यवहारात क्रयवस्तुवाद आणि साधना क्रयवस्तूला नकार देणारी ! ह्या डायलेक्टिक्सचा पडसाद कवितेत उमटणे अटळ होते . पुढे मुंबईत मी आल्यावरही मुंबईतले त्या काळातले बहुदा सर्वात मोठे डिपार्टमेंटल स्टोअर्स एशियाटिक डिपार्टमेंटल हे आमच्या होस्टेलच्या जवळ असल्याने आणि आता मी ग्राहक असल्याने हा पेच वेगळ्या स्वरूपात यायला सुरवात झाली आणि कविता निर्वस्तुवादी कविता म्हणून फुटायला लागल्या १९९३ ला चॅनेल निर्वस्तुवादी कविताचा फ्लो सम्पला . पण कोल्हापुरात शेतकरी बाजार आणि मुंबईत मॉल निर्माण झाल्यावर माझ्या मॉलवरच्या कविता जन्मल्या ज्या पुढे आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण मध्ये प्रसिद्ध झाल्या मॉलवरची एक कविता चॅनेल डिस्ट्रॉयरी मध्ये आली . क्रयवस्तू विकणारा , क्रयवस्तू खरेदी करणारा आणि पुढे हेडरोसा बाम , राजबिंदू सिरप , अंबर , ह्यासारख्या क्रयवस्तूंच्या ब्रँड्सच्या जाहिराती करणारा निर्माता लेखक दिग्दर्शक असे क्रयवस्तू संदर्भातले तिन्ही रोल मी पार पाडले अश्या माणसाने कवितेत निर्वस्तुवादी कविता लिहाव्यात का असा प्रश्न मला विचारण्यात येतो पण मी त्याचे उत्तर देत नाही कारण क्रयवस्तूत वावरूनही त्या अंगाला लागून न घेण्याचे कसब मला अवगत आहे आणि त्यात ह्या निर्वस्तुवादी कवितांचाही वाटा आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment