चौथ्या नवतेचा लेखक
चौथ्या नवतेचा लेखक म्हणून मी लिहायला बसतो तेव्हा मी चौथ्या नवतेचा लेखक नसतो तर मी फक्त लेखक असतो ज्याला माहित असते कि मला एक जाल निर्माण करायचे आहे . हे जाल महाजाल कि बृहदजाल कि लघुजाल कि सूक्ष्मजाल होणार हे माहीत नसते एक ओळ येते मग एक कडवे किंवा परिच्छेद मग कळते कि गद्य येणार आहे कि कविता पहिली ओळ अनेकदा कागदावर व पेजवर असत नाही पण डोक्यात असते आणि काहीवेळा तीच बऱ्याच गोष्टी निश्चित करते .
भगवान शिवांनी तीन अक्ष तीन डोळे सांगितले होते
१ पहिला कामाक्ष म्हणजे काम हा डोळा
२ दुसरा अर्थ
३ आणि तिसरा महाक्ष म्हणजे मोक्ष ज्याला जनसामान्य शंकराचा तिसरा डोळा म्हणतात
ह्यात पुढे धर्म ह्या जीवनार्थाची भर वैदिकांनी घातली
ह्या तिन्ही अक्षांच्यावर एक एक महाकृती लिहायची हे मी निश्चित केले होते पण सुरवात कुठून करायची हेच स्पष्ट होत न्हवते सरतेशेवटी ज्या कामामुळे आपणा सर्वांचा जन्म होतो तिथूनच सुरवात करावी असा विचार करून स्फूर्तीची वाट पाहात बसलो . शाळेच्या पुस्तकाची सुरवात प्रतिज्ञेपासून होते म्हणून आधीच लिहून ठेवलेली प्रेमप्रतिज्ञा नावाची कविता घेतली पण समाधान होईना म्हणून काळाने सुरवात केली ( ही सुरवात धाडसी सैनिक ह्या दिवाळी अंकांत नंतर प्रसिद्ध झाली )तीही मानवेना मग लक्ष्यात आले कि आपल्यातच अनेक मी असल्याने अनेक सुरवाती अटळ आहेत मग ह्या अनेक मींची प्रतिनिधी म्हणून मींची बाराखडी टाकली स्वतःच्या नावाबाबत मराठीत एक अस्तित्ववादी रोमँटिसिझम आहे म्हणजे मी अमुक मी तमुक तो खोडून काढण्यासाठी श्रीधर ह्या नावाने एक सुरवात टाकली मग प्रकाशकाचे नाव वगैरे ह्यांच्यापासूनही एक सुरवात अश्या सर्वच सुरवाती मी सुरवातीला टाकल्या आणि त्या अनेक मींना धरून होत्या .

Comments
Post a Comment