मराठीत गहाराची सर्वोत्तम चर्चा तीन साठोत्तरी समीक्षकांनी केली भालचंद्र नेमाडे द ग गोडसे आणि गंगाधर पाटील ह्यातील गाजले फक्त नेमाडे आणि सर्वाधिक उपेक्षित राहिले ते गंगाधर पाटील . असे का झाले वास्तविक गंगाधर पाटलांनी म सु पाटील , हरीश्चन्द्र थोरात , गो तु पाटील , वैगरें असा मोठाच शिष्यवर्ग निर्माण केला पण तरीही त्यांची चर्चा ऍकेडेमिक वर्तुळातच मर्यादित राहिली ह्याची तीन मोठी कारणे स्पष्ट दिसतात
१ गंगाधर पाटील हे कलावंत म्हणून परिचित नाहीत आणि निखळ समीक्षकाची कदर करणे मराठी संस्कृतीत बसत नाही
२ दुसरे ते मार्गी आहेत पाश्च्यात्त सरंचनावादी , विरचनावादी चिन्हमीमांसेचा मराठी भ्रतार ते साजरा करतात देशीवादाच्या अतिप्रभावामुळे ही मार्गी चिन्हमीमांसा पूर्णच उपेक्षेच्या गर्तेत गेली त्यामुळेही गंगाधर पाटील उपेक्षित राहिले
३ गंगाधर पाटील ह्यांनी आपल्या मीमांसेचा वापर समकालीन साठोत्तरी साहित्याकरता कमी आणि त्यामानाने जुन्या झालेल्या साहित्याच्या मीमांसेसाठी आधिक केला आमच्या पिढीकडे तर त्यांनी साफच दुर्लक्ष्य केले आणि पारंपरिक घाटाच्या साहित्याच्या आकलनाचे धडे आधिक शिकवले त्यामुळे साठोत्तरीने त्यांना अनुल्लेखाने मारले तर नव्व्दोत्तरी पिढीला ते अदृश्यच वाटले
द ग गोडसे तर कम्प्लिट रोमँटिक त्यामुळे रोमँटिक देशीवादाची प्रारूपे मिरवीत त्यांची समीक्षा अवतरली आणि तिला काही प्रमाणात का होईना मान्यता मिळाली विशेषतः औदुंबरची समीक्षा गंगाधर पाटलांनीही पु शि रेगे ह्या रोमँटिक देशीवादी कवीचा पाठपुरावा केला म्हणजे अंतिमतः देशीवादालाच हे लोक हातभार लावत राहिले आणि ह्या हातभारानेच १९९९ नंतर त्यांना साईडलाईन करायला सुरवात केली माझ्या आयुष्यात मी माझ्या पी एच डीच्या निमित्ताने १९९५ -१९९७ ला चिन्हमीमांसेवर एक पुस्तक लिहिले तर त्याला प्रकाशकच भेटला नाही त्या पुस्तकाचे आधार गंगाधर पाटील होते कारण नेमाडे आणि पाटील ह्या दोघांनाही आपण सामान न्याय द्यावा असे वाटत होते त्यातील नेमाडेंच्यावरचे पुस्तक पुढे १९९९ साली आले आणि गंगाधर पाटलांच्यावरचे पुस्तक धूळ खात पडून राहिले आज प्रिया जामकरांची पोस्ट व फोटो पाहून हे सर्व आठवले .
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment