कलाआकार , वाङ्मय आकार , कलाप्रकार ,वाङ्मयप्रकार फेसबुक श्रीधर तिळवे नाईक
कला आकार (वाङ्मय आकार )आणि कला प्रकार (वाङ्मय प्रकार ) ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे कला (वाङ्मय) आकार हा भौमितिक आकाराप्रमाणे स्थायी प्रकार आहे म्हणजे ज्याप्रमाणे भूमितीत वर्तुळ त्रिकोण चोकोन बिंदू रेषा रेषाखंड असे स्थायी आकार आहेत आणि ते बदलत नाहीत तसेच कलेत महाकृती , बृह्दकृती , स्थूलकृती , लघुकृती , सूक्ष्मकृती , बिन्दूकृती असे कला -आकार आहेत आणि ते वाङ्मयातही आहेत फेसबुकमुळे बिन्दूकृती , सूक्ष्मकृती आणि लघुकृती ह्यांचा सुळसुळाट प्रचंड वाढला असला तरी हे कला आकार (वाङ्मय आकार ) थेट गाथासप्तशतीपासून अस्तित्वात आहेत हे लक्ष्यात घ्यायला हवे. तंत्र कलेत एकाच शब्दाच्या वा आकाराच्या बिन्दूकृती नेहमीच वापरल्या गेल्या आहेत विशेषतः ओम व बिंदू ह्या भारतातील आणि बहुदा जगातील सर्वात लोकप्रिय बिन्दूकृती आहेत . गाथासप्तशती हा शेकडो सूक्ष्मकृतींचा संग्रह आहे तर जातककथा हा लघुकृती आणि सूक्ष्मकृतींचा समूह आहे रामायण आणि महाभारत ह्या भारताच्या प्राचीन महाकृती आहेत तर जैन कादंबऱ्या किंवा कालिदास भवभूती शूद्रक विशाखादत्त ह्यांची नाटके ह्या बृह्दकृती आहेत
पुढे भारतात इंग्रजी प्रभावाने महाकाव्याच्या रूपाने महाकृती सादर करण्याची पद्धत बंद पडली आणि कादंबरी हा प्राचीन भारतात असलेला पण दुर्लक्षित झालेला वाङ्मयप्रकार महाकृती म्हणून रूढ झाला सृष्टीयतेने गद्याची मिजास वाढवली मात्र कवितेत दीर्घकविता हा वाङ्मयप्रकार हा बृह्दकृती म्हणून स्थिरावयाला सुरवात केली मराठीत मनमोहन ह्यांची युगायुगांचे सहप्रवासी ही खऱ्याअर्थाने पहिली आधुनिक दीर्घ कविता होय त्यांच्यावर हिंदुत्ववादी असल्याचा शिक्का बसल्याने मराठीतील पुरोगामी लोकांनी त्यांच्या ह्या कवितेकडे दुर्लक्ष्य केले तर हिंदुत्ववाद्यांना ह्या कवितेत हिंदुत्ववाद न आढळल्याने त्यांनीही तिला कचऱ्यात टाकून दिले फाळणीच्या पार्श्वभूमीवरची मराठीतील ही एकमेव अस्सल कलाकृती आहे पण लक्ष्यात कोण घेतो ? असो .
प्रतिसृष्टीयतेत मुक्त कादंबरी वा प्रतिकादंबरी हा नवीन वाङ्मयप्रकार उदयाला आला आणि त्याने महाकृती आणि बृह्दकृती म्हणून अश्या दोन्ही वाङ्मय आकारात काम करायला सुरवात केली कोसला ही मराठीतील पहिली प्रतिकादंबरी आहे ती महाकृती म्हणावी कि बृह्दकृती हा मात्र वादाचा विषय होऊ शकतो मात्र नेमाडेंची हिंदू मात्र निर्विवादपणे महाकृती म्हणून लिहिली जात आहे आणि तिचा पहिला भाग आला आहे जगभर महाकृती लिहिल्या जात असताना मराठीत मात्र त्यांची संख्या कमी का असावी ?मराठी लेखक बृह्दकृतीच्या पलीकडे का जात नसावेत ?मोठ्या आकाराची मराठी लेखक आणि वाचकांनाही भीती आहे का ?कि हा कंटाळा आणि आळस आहे ?
चिन्हसृष्टीयतेत महाकृती म्हणून मुक्तजाल हा आकार उदयाला आला आहे आणि मी स्वतः अ डॉ हॉ का बा ना सु ना नावाचे १०२४ पानांचे मुक्तजाल विणून ठेवले आहे अशी अनेक मुक्तजाळी विणून वाचकांच्या पुढे ठेवली जातील तेव्हा ह्या वाङ्मयप्रकाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होत जाईल
सृष्टीयतेत रवींद्रनाथ टागोर , खलील जिब्रान ह्यांनी अनेक सूक्ष्मकृती लिहल्या आहेत पुढे प्रतिसृष्टीयतेत अश्या सूक्ष्मकृतींचे पेवच फुटले कविता तर स्वभावतः अनेकदा सूक्ष्मकृती असते आणि प्रतिसृष्टीयतेत आणि चिन्ह सृष्टीयतेत कवितेत अनेक प्रयोग झाले ह्यात सलील वाघ , मनोज जोशी , सचीन केतकर , दोन्ही नितीन कुलकर्णी , अजित अभंग , सत्यपालसिंग राजपूत , योजना यादव , ज्ञानदा , शर्मिला रानडे , हर्षदा विनया , अविनाश वसंत , हेमंत दिवटे , नितीन रिंढे , आल्हाद भावसार , अरुण काळे , महेंद्र भवरे , भुजंग मेश्राम , अविनाश गायकवाड , प्रणव सुखदेव , नितीन वाघ , कविता महाजन , प्रज्ञा पवार , मंगेश बनसोड ह्यासारख्या अनेकांनी सूक्ष्म कृतींचे नवेनवे धुमारे सादर केले आहेत . अगदी रोमँटिक कवितेतही किशोर कदम , चंद्रशेखर सानेकर , प्रिया जामकर ह्यांच्यापासून प्रमोद कोपर्डे , अनंत ढवळे , सतीश दराडे , रुपेश देशमुख ह्यांच्यापर्यंत एक जाळे फेसबुकवर अवतरतंय . सूक्ष्मकृतीय आकाराचा हा दबदबा सतत वाढतांना दिसतोय आणि ह्या दबदब्याचे दुसरे प्रारूप जोक्स आहेत ह्या जोक्सच्या प्रभावाने हल्ली किस्से हे तिसरे आणि निरीक्षणकथा हे चौथे प्रारूपही फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय होतांना दिसते आहे .ह्याशिवाय टिपण्या आहेतच ह्यातील सुनील तांबे , महेश पवार , सतीश वाघमारे , सतीश तांबे , राजेंद्र बाणाईत , पुरुषोत्तम गोखले , रेणुका खोत , संध्या सोमण , कविता महाजन , मुकेश माचकर , कीर्ती शिंदे , प्रवीण बांदेकर , अविनाश गायकवाड , संजय सोनवणी , हरी नरके , सचिन केतकर ह्यासारख्यांचे काही किस्से , टिपण्या व निरीक्षणकथा निवळ धमाल आणि जबरदस्त असतात मराठीत सूक्ष्मकृती हाच वाङ्मय आकार हा आता मुख्य वाङ्मय आकार म्हणून स्थिरावताना दिसतो आणि हा सांस्कृतिक बदल फेसबुक आणि व्हाट्सअप वरील कविता , किस्से , सूक्ष्मकथा( ह्यात निरीक्षणकथा नावाचा नवीन कथाप्रकार उदयाला आला आहे ) ह्यांनी घडवलेला आहे हा बदल कुणी घडवायचा म्हणून घडवलेला नाही हा मराठी लेखकांनी अजाणतेपणाने ऊस्फूर्तपणाने सामूहिकरित्या घडवलेला बदल आहे . त्यात अनेक सामान्य वाचकांचा लेखक म्हणून केलेल्या कार्याचाही सिंहाचाही वाटा आहे ह्या बदलाचे श्रेय कुणा एकाचे नाही ते सर्वांचे आहे
पण ह्याचे काही दुष्परिणामही झालेले आहेत . कविता ही सूक्ष्मकृतीच असली पाहिजे असा आकारिक हट्ट धरणारे लोकही आहेतच त्यामुळे कविता ह्या वाङ्मयप्रकारात बृहद्कृती आणि महाकृती असे वाङ्मय आकार फारसे आढळत नाहीत मी आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण नावाची अशी एक महाकृती सादर केली होती पण तिच्याशिवाय कविता ह्या वाङ्मयप्रकारात अश्या किती महाकृती लिहिल्या गेल्या आहेत ? कि कवितेत महाकृती सादर करणे अशक्यच आहे असे ह्या फेसबुक व्हाट्सअप पिढीला वाटते ? डेरेक वॉलकॉट ह्या माझ्या आवडत्या कवीने ओमेरॉस नावाची एक प्रतिसृष्टीय होमेरिक एपिक महाकृती सादर केली होती आणि त्याला नोबलही मिळाले होते ह्यानंतर जगभर अश्या महाकृतीय कविता वाढायला हव्या होत्या पण किमान मराठीत तरी हे घडलेले दिसत नाहीये कवितीय महाकृती ह्या वाचतांना दमवतात हे त्यामागचे कारण आहे का ? अभिजित देशपांडे ह्या माझ्या परममित्राचे शब्द वापरायचे तर वाचकाची दमवणूक करून घेण्याची क्षमता संपली आहे का ? ह्याबाबतीतला सर्वात मोठा विरोधाभास जर कुठला असेल तर जगभर १९६० नंतर सिरीयल हा महाकृतीय फिल्मप्रकार सर्वाधिक लोकप्रिय बनत आहे बनला आहे लोक १००० एपिसोड्स पाहात आहेत ज्यांची छापील पृष्ठे ५००० होतील पण साहित्यात मात्र महाकृती ह्या वाङ्मय आकाराची लोकप्रियता घटत चालली आहे असे का व्हावे कि दृश्यात्मक माध्यमात समजून घेण्याची झटापट करावी लागत नाही आणि शब्दमाध्यमात ती करावी लागते म्हणून शब्दमाध्यमात महाकृती ह्या वाङ्मय आकाराची लोकप्रियता घटत चालली आहे कि भारतीय परंपरा ही मौखिक असल्याने महाकृती पाहणे आणि ऐकणे आपल्याला मानवते आणि वाचणे मानवत नाही ? कि जे गंभीर वाचक आहेत आणि ज्यांना सिरीयल आवडत नाहीत त्यांच्याकडे महाकृतीसाठी आवश्यक असलेला सोशिकपणा आणि चिकाटीच नाही ? कि हे गंभीर आहेत आणि महाकृती त्यांना महागंभीर वाटतात आणि महागांभीर्य त्यांना परवडत नाही ? शेवटी कसोटी क्रिकेटचा जमाना जसा संपला तसा साहित्यिक महाकृतींचा जमानही संपला असे मानावे का ? जसे तीन तासाचे एकरागीय शास्त्रीय संगीत संपले तसे महाकृतीचे झाले आहे का कि सर्वच क्षेत्रातील महाकारीपणा संपत चालला आहे ? मग महाकारी बिल्डिंगांचे , डेली सोपऑपेरांचे काय ? कि साहित्यकृती स्टार्ट टू फिनिश संपली पाहिजे आणि साहित्यिक महाकृती अशी स्टार्ट टू फिनिश संपत नाही ह्या महाअंध साहित्यिक वाचकीय गैरसमजूतीतून हे घडते आहे ? कि जे समोर अवाढव्य महाकारी आहे ते एकत्रितपणे पाहण्याची क्षमताच संपली आहे किंवा संपवली गेली आहे ? आपण सर्वच ब्रेकिंग न्यूज प्रमाणे ब्रेकिंग सूक्ष्मकृती प्रसवतो आहोत का ? आपण सर्वच सपाट माध्यमें बनत चाललो आहोत का ? सपाटीला उंचीही गाठावी लागत नाही आणि खोलीही . त्यामुळेच सपाटी मोस्ट परवडेबल झाली आहे का ? एकीकडे सिरियलमधून आत्ताच्या काळाचे एक परिस्थितीशरण सपाट महाकृतीय प्रारूप सातत्याने ठेवले जात असताना साहित्यात मात्र असपाट महाकृतीय प्रारूप उदयास न येणे हे सांस्कृतिक पातळीवर एकांगी विकासाचे मॉडेल सशक्त करणारे ठरणार नाही का ?
हे आपल्या काळाचे गंभीर प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपणालाच शोधावी लागतीलच अन्यथा मागची पिढी सपाट होती असे निरीक्षण पुढची पिढी नोंदवलेच . मराठीत तशी परंपराच आहे नाही का ?
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment