कला आकारावर जी  एक पोस्ट टाकली त्याचा उद्देश एकच होता तो म्हणजे मराठीत भालचंद्र नेमाडेंनी ज्या सूक्ष्म आणि लघुकृतींची टर उडवली होती त्याची झालेली वापसी . महाकृती आणि बृह्दकृती ह्यांच्यामुळे सूक्ष्मकृती आणि लघुकृती साइडला गेल्या आणि सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी , पंकज कुरुलकर , सुहृद जावडेकर ह्यांच्यासारखे अतिशय ताकदीचे कथाकार जे साहित्याच्या केंद्रवर्ती वर्तुळात यायला हवे ते तेवढ्या प्रमाणात आले नाही पण २००५ नंतर मात्र चिन्ह बदलले आणि आता अशी अवस्था आहे कि महाकृती लिहिणारे साईडलाईन झालेत आणि हे फारसे बरे नाही त्यातल्या त्यात बृह्दकृती लिहिणारे मात्र टिकलेत साहित्यात सर्वच आकारांना समान न्याय मिळायला हवा असे मला वाटते
दुसरी गोष्ट आपल्याकडे वाङ्मय प्रकारची चर्चा होते वाङ्मय आकाराची नाही ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हेच जर कळणार नसेल तर कठीण आहे महाकाव्य ,  महाकादंबरी  आणि टीव्हीसीरियल(लिखीत संहिता )  हे तीन  भिन्न वाङ्मयप्रकार असतील पण ते एकच वाङ्मय आकार आहेत हे तरी कळायला हवे . मराठीत श्रीमान योगी ,  तुंबाडचे खोत , ताम्रपट , पानिपत , अ डॉ हॉ का बा ना सु ना आणि आता हिंदू अश्या महाकृती जन्मल्या आहेत प्रवीण बांदेकरांची उजव्या सोंडेच्या बाहुल्या मी वाचलेली नाही आणि न वाचताच बोलण्याचे अमोघ कौशल्य मला प्राप्त नाही . बृह्दकृतींना महाकृती म्हणणे मला मंजूर नाही मराठीतील बहुतांशी कादंबऱ्या ह्या बृह्दकृती असतात .
मी काही लोकांच्या वितंडवादाला भीक घालत नाही कारण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही कोण वाद घालतो आणि कोण वितंडवाद घालतो हे ठरवण्याचा अधिकार माझ्या पोस्टपुरता माझा आहे असे मी मानतो . इतरांच्या पोस्टवर वाद घालायला मी जात नाही आणि वाद भडकणार असे वाटले तर मी तिथून निघतो मी माझी ऊर्जा क्रिएटिव्ह कामासाठी राखून ठेवणे ज्यादा पसंत करतो . मी कुठल्याही गोतावळ्यात कधी सामील झालेलो नाही साहित्यिक कंपू आणि पॉलिटिकल पार्ट्या ह्यांच्यात काहीही फरक नाही असे मी मानतो अध्यात्म आणि कला ह्यांच्यापलीकडील क्षेत्रात आपल्याला फार काही कळतं असं मला वाटत नाही माझे कार्यक्षेत्र हे माझा देह आणि ह्या देहाच्या आसपासचे देह एव्हढेच असते  त्यामुळे मी महान नाही हे तर उघडच आहे माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट निर्वाण हेच आहे
श्रीधर तिळवे नाईक

कलाकृतीचे आकार व  प्रकार ह्यांची चर्चा केली आता तिसऱ्या मितीकडे यायला हरकत नाही . ही तिसरी मिती आहे गहार
गहार म्हणजे साहित्यातील गहनता , गहनशीलता आणि गहराई ह्यांचे मॅट्रिक्स  . गहराई म्हणजे आशयाची खोली गहनशीलता म्हणजे आशय मांडण्याची बौद्धिक कुवत  आणि तिची कलाकृतीतील पेशकश आणि गहनता म्हणजे आशयाची व्याप्ती आणि सूक्ष्मता ह्यावरून कलाकृतीचे / साहित्यकृतीचे गहन , सखोल , खोल , उथळ , पृष्ठस्तरीय आणि सजावटी असे सहा प्रकारचे गहार होतात असे म्हणता येते . एखादी कलाकृती पारंपारिक असूनही गहन असू शकतात कोसला हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे किंबहुना पारंपारिक पण गहन कलाकृत्या ह्या लोकांना नेहमीच आधिक भावतात . लोकांना स्वतःला दुखवून घ्यायचे नसते त्यामुळे कोसलासारख्या  लोकांना न दुखावणाऱ्या आणि परंपरेला बळकट करणाऱ्या गहन कलाकृत्या त्यांना भावतात . सात सक्क त्रेचाळीस सारख्या धक्का देणाऱ्या गहन कलाकृत्या ह्या सहजासहजी भावत नाहीत .

श्रीधर तिळवे नाईक




Comments

Popular posts from this blog