फ्रान्सिस बेकन आणि कला श्रीधर तिळवे नाईक 


प्रबोधनाचा आरंभ बसवेश्वर आणि रॉजर बेकन ह्यांनी केला असला तरी प्रबोधनाचा कणा असणाऱ्या विज्ञानाच्या पद्धतीची सुरवात फ्रान्सिस बेकन ह्यानेच केली ग्रेट इंस्टारेशन द वर्क्स ऑफ फ्रान्सिस बेकन खंड ४ संपादक जेम्स स्पिडिंग लॉंगमन लंडन १८६० पान क्रमांक १९ ते ३२ ,३३   मध्ये त्याने म्हंटले होते कि  “For God forbid we should give out a dream of our own imagination for a pattern of the world and must keep “the eye steadily fixed upon the facts of nature in order to grasp the image of things “simply as they are.” वस्तू जशा आहेत तशा पाहणे हे त्याने विज्ञानाचे मुख्य तत्व मानले स्वतःशिवाय जग जसे आहे तसे पाहणे विज्ञानात आवश्यक आहे असे त्याला वाटे आपल्याकडे हेच नेमाडेंनी वास्तववादाची व्याख्या करतांना मांडले स्वतःशिवाय अस्तित्वात असलेले जग ही वास्तवाची व्याख्या बेकनपासून सुरु होते प्रयोग बेकन आवश्यक मानतो त्यातूनच पुढे रंगमंचावरही प्रयोग होऊ लागले आणि कवितेतही ! प्रायोगिक कविता प्रायोगिक नाटक ही प्रबोधनाची देणगी  तत्वज्ञानात एक्सपिरिमेंटल डिस्कोर्सेस म्हणतात त्याची सुरवात बेकननेच केली बेकनचा प्रभाव पडल्यानेच शेक्सपियर थोडा सुधारला असण्याची शक्यता आहे रॉजर बेकनच्या प्रभावातून मार्लोने जो निसर्गवादी रंगमंच उभा केला त्याला शेक्सपियरने अपडेट करून एक सौंदर्यतोल दिला रॉजर बेकनने स्वप्नांचे महत्व अधोरेखित केलेच होते त्याचा नाट्यमय वापर मार्लोने केला मार्लोने सुरु केलेल्या रंगभूमीचा शेक्सपिअर कळस होता

गंमतीचा भाग असा कि प्रत्यक्ष कवितेबाबत त्याची व्याख्या वेगळी होती “Poetry is as a dream of learning,” अशी त्याने व्याख्या केली होती आणि जगातले पहिले सौंदर्यशास्त्र त्यानेच मांडले होते कविता म्हणजे शिकवणारे स्वप्न ही त्याची व्याख्या ज्ञानकेंद्रित प्रबोधनाला साजेशी होती मात्र त्याने स्वप्न म्हंटल्याने त्यात कल्पनेलाही वाव होता पुढे बेकनच्या सौंदर्यशास्त्राचे दोन तुकडे झाले स्वप्नावर भर देणारा रोमँटिसिझम आणि वास्तवाला प्राधान्य देणारा प्रबोधनवादी वास्तववादी परिवर्तनवादी रियॅलिझम ! शेक्सपियर ह्या दोन्ही तुकड्यापासून वाचला व त्याने दोन्ही बेकनना अभिप्रेत असणारी एकसंधता साधली ज्यावेळी निसर्गवादी बाहेरच्या निसर्गाचा शोध घेत होते तेव्हा शेक्सपियर त्याच्या नाट्यगुरूप्रमाणे नेचरचा म्हणजे माणसाच्या स्वभावाचा शोध तो जसा असतो तसा घेत होता कुठेही स्व न आणता !

महात्मा फुलेंनी हा बेकनी अजेंडा मराठी कवितेत यशस्वीपणे राबवला फुलेंची कविता ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह कविता आहे इतकी कि कधी कधी ती थोडी सब्जेक्टिव्ह झाली असती तर बरं झालं असतं असं वाटत राहतं फुले शिकवणारे स्वप्न मधील शिकवणारे घेतात पण स्वप्न सोडतात त्यामुळे एक बौद्धिक रुक्षपणा कवितेला प्राप्त होतो
स्वप्नांच्यात एक बेदरकार इंटेन्सिटीही असते फुल्यांच्यात ती आढळत नाही पण आश्चर्य म्हणजे केशवसुतांच्यातही ती आढळत नाही परिणामी केशवसुतांच्या कवितेत अनेकदा रोमान्स फ्लॅट होतो अपवाद काही कवितांचा आहे
त्यामुळेच पहिला संपूर्ण रोमँटिक कवी मराठीला प्राप्त व्हायला बालकवी जन्मावें लागतात त्यामुळेच मर्ढेकर बालकविंच्यावर समीक्षा लिहितात गडकरी नाटकात चमकतात पण कवितेत मार खातात

दोन्ही बेकन मराठीला थेट भेटले नाहीत हे ह्याचे कारण असेल का ? म्हणजे फुल्यांना बेकन भेटतो तो व्हाया थॉमस पेन तर केशवसुतांना बेकन भेटतो तो कच्चा लिंबू असणाऱ्या ब्रिटिश रोमँटिक काव्याद्वारा मिर्झा गालिबपुढे चाय कम पाणी असणारी ही ब्रिटिश कविता मराठीला बळ पुरवू शकली नाही हे वास्तव बालकवी हे केवळ जिनियस होते म्हणून आपल्या ढंगात लिहून गेले आणि मग मराठी रोमँटिसिझमला पंख फुटले ते फ़ुटलेच

ह्याच्या उलट बंगालीत रवींद्रनाथ ठाकूर नावाचा अस्सल रोमँटिक कवी जन्मतो जो त्याचा अख्खा काळ भारतीय अध्यात्मिक रोमँटिसिझमची नवी परिभाषा घडवत ताब्यात घेतो आणि भाषेत उधळतो राजकीय पातळीवर बंगालला महाराष्ट्र मागे टाकतो खरा पण कलेबाबत एकटा रवींद्रनाथ ठाकूर महाराष्ट्राला पुरून उरतो नंतर मराठी आणि बंगाली ह्यांच्यात जो गॅप आहे त्या गॅपचे नाव रवींद्रनाथ ठाकूर आहे ह्याला अपवाद फक्त चौथी नवता आहे तिच्याबाबत मात्र महाराष्ट्राने प्रथमच बंगालीला हरवले आहे

बेकन कवितेची व्याख्या स्वप्नाला धरून करत असला आणि नंतर फ्रॉइड संपूर्ण कलेला स्वप्न म्हणत असला तरी
“dream of our own imagination,” आपण मागे सोडून द्यावे आणि विज्ञानाची पायाभरणी करावी असाच उपदेश करतो जे त्याच्या नंतर आलेल्या न्यूटन वैग्रेंनी ऐकलेले दिसते गॅलिलिओने पुस्तक बाजूला करून मी टेलीस्कोपकडे वळलो आहे असे एके ठिकाणी म्हंटले आहे मी अधूनमधून गॅलिलिओची टेलीस्कोपही हातात घेतो
त्याने कोव्हीड नीट दिसतो एव्हढेच

श्रीधर तिळवे नाईक





















Comments

Popular posts from this blog