देशीवादाचा इंग्लंडमधील मूळपुरुष श्रीधर तिळवे नाईक
मर्ढेकर आणि अभिरुची नियतकालिकाने आणलेल्या आणि सत्यकथेने विस्तार केलेल्या मार्गी आधुनिकतेला पूर्ण छेद देणारी देशी आधुनिकता साठोत्तरी पिढीने आणली ह्यातील काहीजण पक्के देशीवादी म्हणवून घेत होते जसे कि नेमाडे चंद्रकांत पाटील अशोक वाजपेयी रंगनाथ पाठारे राजन गवस तर काहीजण मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल साधणारे होते जसे कि दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर ! काहींनी मात्र मार्गी आधुनिकता मिरवणे अधिक पसंत केले जसे विलास सारंग वसंत आबाजी डहाके गुरुनाथ धुरी वैग्रे
देशीवादावर पडलेल्या अमेरिकन प्रभावाची चर्चा मी चौथी नवता ह्या पुस्तकात केली आहे आणि त्यात मी सिद्ध केलंय कि नेमाडेंचा देशीवाद हा पूर्ण विदेशी आहे आपल्याकडे पहिला देशीवादी म्हणून महात्मा फुले ह्यांचे नाव घ्यावे लागते दुर्देवाने त्यांनी त्याची मांडणी देशीवाद म्हणून न करता आर्य आणि अनार्य ह्या संघर्षांसन्दर्भात केली आणि खंडोबा आदी देशी शैव दैवतांचा प्रचार केला ही मांडणी ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात पुढे गोते खात राहिली आणि देशीवादाची मांडणी मग आर्य संस्कृतीने बळकावली आणि नेमाडे ह्या आर्य मांडणीला घेऊन मराठी संस्कृतीत दाखल झाले ह्याला मी आर्य देशीवाद म्हणतो जो हल्ली वर्ण जात ह्यांच्या आडव्या अक्षाला मान्यता देतो आणि उभ्या अक्षाला नकार देतो ह्यावर जी काही टीका करायची आहे ती मी टीकाहरण ह्या माझ्या पुस्तकात केली आहे
मी स्वतः असे मानतो कि मार्गी देशी पोटी जमाती ह्यांचा समतोल साधावा मात्र देशी घटकांचा स्वीकार आपण फुले दाम्पत्याच्या अंगाने करावा मी स्वतः ते केलेही आहे
आता प्रश्न असा आहे कि नेमाडे नेहमी म्हणतात (टीकास्वयंवर पहा )कि शेक्सपियर सारखे लोक स्वतःच्या देशी परंपरेत लिहीत होते म्हणून थोर झाले त्याचे काय करायचे ?
सर्वात पहिली गोष्ट अशी कि मी टीकाहरण व चौथी नवता ह्या ग्रंथांमध्ये विचारल्याप्रमाणे शेक्सपियरप्रमाणे त्याचे अनेक समकालीन देशी परंपरेतच लिहीत होते ते शेक्सपियरप्रमाणे थोर का झाले नाही ? वस्तुस्थिती अशी आहे कि शेक्सपियर देशी परंपरेत न्हवे तर यूरोपीय परंपरेत लिहितोय आणि त्यामुळेच त्याचे नायक फक्त इंग्लंडचे नाहीत उदा हॅम्लेट प्रिन्स ऑफ डेन्मार्क आहे किंवा ऍन्टोनिया आणि क्लिओपात्रा ग्रीक व इजिप्तमधले आहेत
दुसरी गोष्ट शेक्सपियरवर प्रभाव असलेल्या दोन्ही ख्रिश्चन धारा ह्या देशी नाहीत प्रोटेस्टंट धारा ही चक्क जर्मनीतुन उगम पावली आहे आणि जिझस ब्रिटिश न्हवता हे नक्की आहे
ज्या नेचर ह्या संकल्पनेला शेक्सपियर कमालीचे महत्व देतो ती यूरोपीय जडणघडणीचा अविष्कार आहे
पुढचा प्रश्न असा कि मग नेमाडेंच्या डोक्यात हे पिल्लू सोडलं कुणी ? ह्यासाठी आपणाला १९५० नंतरच्या इंग्लंडमधील घुसळणीत जावे लागेल राल्फ लिंटनची दोन पुस्तकं द स्टडी ऑफ मॅन व द ट्री ऑफ कल्चर आणि अमेरिकन ट्राइब्जवरच त्याचं काम जेव्हा इंग्लंडला पोहचलं तेव्हा साहजिकच इंग्लंड अमेरिकन सांस्कृतिक संघर्षात इंग्लंडला स्वतःचा एक देशीवादी नायक हवा झाला तो मिळाला एडवर्ड हरबर्ट चेरबुरीच्या (१५८२ ते १६४८)रूपाने आपल्या तुकारामाप्रमाणे हा सश्रद्ध होता आणि तुकारामाच्या विठ्ठलाप्रमाणे त्यालाही आपला देव आपल्याशी बोलतो अशी खात्री होती पण गंमतीचा भाग असा कि त्याला मिळालेली कीर्ती ही धार्मिक साक्षात्कारातून मिळालेल्या देवज्ञानावर अवलंबून न्हवती ती त्याला निसर्गाचे निरीक्षण करून देवज्ञान मिळते ह्या DEISM ह्या प्रबोधिनी संकल्पनेच्या आधारे मिळाली होती त्याने इंग्लंडमध्ये ही DEISM परंपरा स्थापन केली कॅथॉलिक धर्माने अर्थातच ज्या पाच लेखाच्या आधारे ही इंग्लड DEISM ची संकल्पना मांडली होती ते बॅन केले
लिली नावाच्या नाटककाराने आता गॉड इंग्लिश बनला आहे अशी घोषणा केली होती हे त्याच्यापुढचे पाऊल होते
नंतर त्याने जे आत्मचरित्र लिहिले ते पूर्णपणे देशी बाजाचे होते त्याच्यामुळे हा सगळा काळच इंग्लिश आयडेंटिटी रचित करणारा काळ होता अशी चर्चा पुढे येऊ लागली आणि शेक्सपियर हा ह्याच काळात असल्याने साहजिकच शेक्सपीयर हाही देशी आणि नंतर देशीवादी होता असा विचार इंग्लंडमध्ये पुढे आला साम्राज्य गमावलेल्या इंग्लंडला आता इंटरनॅशनल आयडेंटिटी कामाला येत न्हवती साहजिकच इंग्लंडच्या आयडेंटीचा पुनर्विचार चालू झाला १९६० ला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी आयडेंटिटीचा प्रश्न पुढे आला होताच त्याच्याशी हा विचार मॅच करणारा असल्याने नेमाडे इंग्लंडहून हा विचार घेऊन आले
दुर्देवाने हा विचार चुकीचा होता कारण त्यांचा हा नायकच लॅटिनमधूनही लिखाण करत होता आणि त्याने DEISM ची कल्पना मार्गी स्कोलॅस्टिक परंपरेतून उचलली होती आणि मग तिचे इंग्लंडिकरण केले होते १९६० ला संपूर्ण जगभर हा स्थानिक व नॅशनल आयडेंटीटीचा प्रश्न उभा झाला होता कारण अनेक देश साम्राज्यवादातून व साम्राज्यवादी आयडेंटिटीतून मोकळे झाले होते आणि देशीवाद ही त्याकाळाची गरज होती आज हा देशीवाद सांस्कृतिक वा धार्मिक राष्ट्रवादापर्यंत पोहचला आहे आणि भारतात त्याचे रूपांतर आर्य राष्ट्रवादात झाले आहे
माझा त्याला ठाम नकार आहे आणि त्याची मुळे देशीवादात असल्याने देशीवादालाही माझा ठाम विरोध आहे
देशीवाद आंधळा झाला कि काय होते त्याचा नवा नमुना म्हणून आपण देवेंद्र फडणवीसांचे वारीचे राजकारण पाहू शकतो ह्या पाऊलामुळे कोव्हीडच्या प्रसाराची शक्यता डबल होते हे माहित असूनही हे पाऊल टाकले जाते कारण अंतिमतः देशीवाद विज्ञानाला नाकारण्याइतपत आंधळा आणि बहिराही होतो वैज्ञानिक मूल्ये ही आंतरराष्ट्रीय असतात आणि देशीवाद आंतरराष्ट्रीय मूल्यांच्या विरोधात असतो ती स्वीकारणे देशीवादाला परवडणारे नसते कारण ती नाकारण्याशिवाय देशीवादाला पर्याय नसतो
श्रीधर तिळवे नाईक
देशीवाद प्रथम अमेरिकेत का आला भाग १ श्रीधर तिळवे नाईक
देशीवाद प्रथम अमेरिकेत का आला हा एक कळीचा प्रश्न आहे ह्यासाठी प्रथम मांसल व डिजिटल ह्या दोन संकल्पना कळल्या पाहिजेत
कुठलाही मानवी समूह हा मांसल असतोच पण त्याला स्वतःचे अनुभव ज्ञान वैग्रे टिकवण्यासाठी चिन्हकीही व्यवस्थित विकसित करावी लागते त्यासाठी मांसल आणि डिजिटल ह्यांचे त्वचन आणि डिजिटलन व्हावे लागते मग तुम्ही कुठेही असा त्याने तुमच्या ओळखीला अस्मिता आयडेंटिटी मिळते आणि जगणे सुकर होते
त्वचन म्हणजे सरफॅसिन्ग इनरफेसिंग आणि फेशियालिटी ह्यांचे नेटवर्क अमेरिकेतील गोऱ्या व काळ्या लोकांच्याजवळ तेच न्हवते कारण ते स्वतःच काळांच्याप्रमाणे फक्त परके वा गोऱ्यांच्याप्रमाणे परके व आक्रमकही होते मात्र अमेरिका हा त्यांचा स्वतःचा देश न्हवता त्यांचे स्वतःचे यूरोपियन्स त्यांना स्वीकारायला तयार न्हवते कारण हे लोक एकतर गुन्हेगार होते किंवा श्रमिक होते किंवा पळालेले किंवा देशनिकाले किंवा अनावश्यक म्हणून फेकले गेलेले किंवा दास म्हणजे गुलाम होते त्यांच्याजवळ स्वतःची सामूहिक ओळख न्हवती जे डोकेबाज होते त्यांची मानसिकता क्रिमिनल असल्याचा संशय होता आणि ज्यांच्याकडे प्रशिक्षित डोके न्हवते त्यांना आपणाला अस्मिता हवी म्हणजे काय हवे ते कळत न्हवते
अशावेळी वाट काढायची कशी ? ह्यातून देश स्वतंत्र करणे आणि मग अंतर्गत प्रश्न सोडवणे अशी एक पॉलिसी सेट झाली आणि त्यातून अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध लढले गेले अमेरिका स्वतंत्र झाली आपल्याकडे टिळकांनी हाच सिद्धांत मांडला प्रथम अमेरिकेसारखे स्वतंत्र होऊ मग आपले अंतर्गत प्रश्न सोडवू फुले आंबेडकरांना हे मान्य न्हवते पण जनता फुले आंबेडकरांच्या मागे गेली नाही ती टिळक गांधींच्या मागे गेली
अमेरिकेत स्वातंत्र्ययुद्धातच व्हॉट इज अमेरिकन हा प्रश्न सतत विचारला जायला लागला कारण आपण कशासाठी लढतो आहोत हेच क्लिअर न्हवते त्यांच्याकडे गुलामगिरीचे समर्थन करणारे प्रतिगामी स्वातंत्र्ययोद्धे होते आपल्याकडे जातवर्णाचे समर्थन करणारे प्रतिगामी स्वातंत्र्ययोद्धे होते त्यांच्याकडे गुलामगिरीचे समूळ निर्दालन करू पाहणारे स्वातंत्र्ययोद्धे होते तसे आपल्याकडे वर्णजातीचे समूळ उच्चाटन करू पाहणारे नेहरूंच्यासारखे पुरोगामी स्वातंत्र्ययोद्धे होते मात्र आधी समाजसुधारणा कि राजकीय स्वातंत्र्य असा वाद तिकडे निर्माण झाला नाही आपल्याकडे मात्र झाला कारण आपल्याकडे पेशवाई होती आणि ती कमबॅक करेल अशी भीती फुले व आंबेडकर ह्या दोन मराठी विचारवंतांना होती ह्या दोघांनी ही महाराष्ट्रीय भीती राष्ट्रीय भीती केली तिकडे गुलांमांना आवाजच न्हवता कारण खुद्द ब्रिटिशांना सर्व गुलाम प्रामुख्याने गौरेतर काळे वर्णाचे असल्याने गुलामगिरी नष्ट व्हावी असे वाटत न्हवते ह्याउलट आपल्याकडचे दास हे अनेक वर्णाचे होते त्यामुळे अस्पृश्यता नष्ट व्हावी असे ब्रिटिशांना मनापासून वाटत होते आपल्याकडे मुस्लिम नावाचा फॅक्टर होता तो अमेरिकेत न्हवता त्यामुळे आपल्याला जी एक धार्मिक संघर्षांची एक्स्ट्रा लढाई लढावी लागली त्यानेच आपली व्याप्ती इतकी वाढवली कि त्यांच्याकडे अमेरिकन युद्ध झाले ते गुलामगिरीच्या प्रश्नावरून आपल्याकडे अशा युद्धाची व्याप्ती हिंदू मुस्लिम संघर्षाने घेतली आणि पुढे दोन राष्ट्रेही झाली यु एस ए चे दोन तुकडे झाले नाहीत कारण मुस्लिमांच्याइतके प्रतिगामी गुलामगिरीचे समर्थन करणारे लोक न्हवते ते प्रतिगामी होते पण जहाल कट्टर न्हवते त्यामुळे नंतर पुरोगामीपणा विजयी होऊ शकला अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध हे साम्राज्यवादाविरुद्ध उभे राहिलेले व विजयी झालेले प्रथम स्वातंत्र्ययुद्ध होते आणि त्यासाठी त्यांना अमेरिकन म्हणजे काय ह्या प्रश्नाचे सोल्युशन युद्ध लढतांना आणि नंतरही हवे होते आणि म्हणूनच देशीवाद प्रथम तिथे जन्मला देशीवाद हा तिथल्या पुरोगामी लोकांनी मांडला आणि आपल्याकडे फुल्यांनी तो अमेरिकेतून आयात केला आणि नंतर गांधींनी त्याची राजकीय परिपूर्तीही केली
फाळणीत पुरोगामीपणाची कसोटी लागली आणि आपल्याकडच्या पुरोगामीपणाने एक राष्ट्रच देऊन टाकले कारण इथल्या पुरोगामी लोकांना युद्धाची भीती वाटत होती अमेरिकेत अब्राहम लिंकनला मात्र अशी भीती वाटत न्हवती पुरोगामीपणाची म्हणून एक किंमत असते आणि ती चुकवायला लागते हे त्याला माहित होते आपले पुरोगामी डरपोक होते त्यांनी युद्ध टाळले खरे पण मनुष्यहानी टळली नाहीच फाळणीच्या रूपाने अनकॉन्शसमध्ये असलेली हिंसा उफाळून आलीच आणि त्यात युद्धाएव्हढेच लोक मारले गेले म्हणजे राष्ट्रही दिले आणि युद्धही घडलेच हा सगळा कालखंड देशीकरणाच्या मूर्ख गदारोळाने भारावून गेलेला कालखंड आहे भारतीय अहिंसक आहेत ह्या मूर्ख गैरसमजुतीतून हे घडले आहे बुद्ध हा कधीही भारतीयांचा आयकॉन न्हवता नंतरच्या बौद्ध नसलेल्या किती राजवटींनी बुद्धाला स्वतःचा आयकॉन मानला होता हे तपासले तर उत्तर निराशाजनक येते केवळ ब्रिटिश लोकांनी सोडलेले हे पिल्लू होते आणि गम्मत म्हणजे ज्या अशोकाच्या स्तंभ व शिलालेखाच्या आधारे ते तयार केले होते त्या अशोकाने नंतरही लढाया केल्या होत्या
अमेरिकन व्हाईट लोकांना स्वतःचा असा प्रदीर्घ इतिहासच न्हवता त्यामुळे त्यांचा देशीवाद हा वर्तमानात उभा होता भारतीयांचा देशीवाद विशेषतः गांधींचा हा इतिहासाच्या रोमँटिक अपआकलनातून उभा होता त्याचा बॅण्डबाजा वाजणे अटळ होता तसा तो फाळणीत वाजला पाकिस्तान त्यानंतरही गप्प बसला नाहीच त्याने युद्धे केलीच आणि आपणाला युद्धात उतरावे लागलेच अध्यात्मिक असणे म्हणजे रोमँटिक असणे न्हवे तर मानवाच्या सामूहिक आसक्तींचे म्हणजेच भुकांचे तृष्णांचे व निकडीचे समग्र भान असणे हे भान गांधींच्याकडे न्हवते आणि ज्या आंबेड्करांच्याकडे ह्याचे समग्र भान होते त्यांना भारतीय राजकारणात त्यावेळी डिसीजनमेकर म्हणून किंमत न्हवती त्यामुळेच तेलही गेले आणि तूपही गेले अशी ह्या फाळणीच्या काळातील देशीवादाची अवस्था आहे ह्या फाळणीच्या काळात दोन्ही धर्मांच्या किती उच्च वर्णियांची नेमकी हत्या झाली ह्याचे इन्वेस्टीगेशन झाले असते तर बहुजनांनी फाळणीची नेमकी काय किंमत चुकवली हे स्पष्ट झाले असते पाकिस्तान ह्याबाबत इतके नालायक कि त्यांनी दलितांना मायग्रेट्च होऊ दिले नाही कारण सगळी अस्पृश्यांची पारंपारिक कामे करण्यासाठी त्यांना अस्पृश्य हवे होते आणि आज त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर झाले आहे आणि पारंपारिक कामे कितपत सुटलेत ह्याविषयी डेटा उपलब्ध नाही देश एक असता तर किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या मॅपींगनुसार फाळणीत स्थलांतर झाले असते तर हे सगळे बौद्ध होण्याची शक्यता होती हे आपल्या नवबौद्धांच्याही लक्ष्यात येत नाही इतके आपले नवबौद्ध नादान आहेत
अमेरिकेत अस्मितेचा प्रश्न उपस्थित झाला तरी आधी स्वातंत्र्य मग सुधारणा ह्याविषयी तिकडे पक्के बहुमत होते
हा सुधारणेचा प्रश्न शेवटी तिथे उभा राहिलाच मात्र त्याआधी अमेरिकन असणे म्हणजे काय ह्याची सुस्पष्ट व्याख्या तिकडच्या देशीवादाने पक्की केली होती त्यात गुलामगिरी बसत नाही आणि अमेरिकेने गुलामगिरी नष्टच केली पाहिजे अशी देशीवाद्यांची ठाम भूमिका होती ज्याची अब्राहम लिंकनला मदत झाली आपल्याकडे गांधी अब्राहम लिंकन बनण्याच्या शक्यता निर्माण झाल्या पण जिनांनी एक असाधारण सिच्युएशन निर्माण केली ज्यात अहिंसेला टिकवणे अशक्य बनले पुढे लिंकनच्या हत्या झाली तशी गांधींचीही झाली अधिक पुरोगामी बनतील ही भीती व आपल्या विरोधकांना अधीक आडवांटेज दिला ही भावना दोन्ही हत्यांच्या मागे होती
अमेरिकन समाजरचनेत
१ ज्यू अथवा ज्युडायिक ख्रिश्चन गोरे म्हणजे ब्राम्हण सवर्ण
२ ख्रिश्चन गोरे म्हणजे ब्राम्हणेतर सवर्ण
३ काळे म्हणजे अतिशूद्र
४ अमेरिकन आदिवासी म्हणजे आपल्याकडचे आदिवासी
अशी रचना तयार झाली होती
ह्यातील गोऱ्या लोकांच्यात ब्रिटिशकेंद्रीयतेवर अवलंबून असणाऱ्या लोकांची ब्रिटिश मार्गी अमेरिकेत राज्य करत होती आणि ह्या सांस्कृतिक लोकांची राजवट कायमच सत्ताधारी वर्चस्ववादी राखण्याचे प्रयत्न करत होती
ख्रिश्चन गोरे म्हणजे ब्राम्हणेतर सवर्ण लोकांपैकी काहींना ही ब्रिटिश केंद्री संस्कृतिकता खटकायला लागली होती त्यांना स्वातंत्र्ययुद्धानंतर हे मेगॅनॅरेटिव्ह स्वीकारणे अधिकच जड जाऊ लागले होते त्याऐवजी अमेरिकेने स्वतःचे राष्ट्रीय नॅरेटिव्ह तयार करावे अशा मताचे हे लोक होते पण प्रश्न काळे म्हणजे अतिशूद्र
आणि अमेरिकन आदिवासी म्हणजे आपल्याकडचे आदिवासी टाईप समूह ह्यांचे ह्या नॅशनल नॅरेटिव्हमध्ये काय करायचे हा होता ह्याचवेळी ह्या दोन समूहातून हळूहळू उठाव व्हायला सुरवात झाली म्हणजेच भारताप्रमाणे अमेरिकेतही
१ यूरोपीय ब्रिटिश महामार्गीविरुद्धचे देशी राष्ट्रीय
२ राष्ट्रीय मार्गिविरुद्धचे देशी नॅरेटिव्ह
अशा पद्धतीने काम सुरु झाले
आपल्याकडे ब्रिटिश महामार्गीविरुद्धचे देशी राष्ट्रीय नॅरेटिव्ह म्हणजे टिळकांनी हिंदुत्ववादी नॅरेटिव्ह रानडे गोखल्यांनी सेक्युलर वैष्णववादी नॅरेटिव्ह तर गांधींनी हिंदूवादी नॅरेटिव्ह
तर आर्य राष्ट्रीय मार्गिविरुद्धचे देशी नॅरेटिव्ह फुलेंनी उभे केले
फक्त बाबासाहेब आंबेड्करच असे होते ज्यांना मार्गी देशी पोटी जमाती ह्यांचे समग्र भान होते त्यामुळेच ते देशीवादाला बळी पडले नाहीत आणि कदाचित म्हणूनच त्यांना हा देश नीट कळला
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधरजी, आपला हा लेख भयंकर गुंतागुंत असणारा विचारप्रवृत्त करणारा असा लेख आहे.
माझ्या आकलनाप्रमाणे अमेरिकन स्वातंत्र्य लढा व भारतीय स्वातंत्र्य लढा अशी तुलनात्मक मांडणी करताना, अमेरिकेतला गुलाम, काळे, गोरे, ज्यु ख्रिश्चन, आदिवासी या सार्यांची एतत्देशीय चातुर्वण्यात्मक समाज रचनेशी तुलना करणं हे धाडसाचं आहे. त्यातील काही साम्यस्थळं असतीलही पण त्याचा व देशीवाद अमेरिकेत प्रथम का? या प्रश्नाशी तुम्ही कशी सांगड घालणारहात हे मी वाचणार आहेच.
अब्राहम लिंकन व म. गांधी यां दोघांनाही जी काही तत्व, धोरणं अवलंबावी लागली त्यामागील पार्श्वभुमी व भौगोलीक परिस्थीती काही प्रमाणात साम्य दाखवणारी आहे हे मान्य, परंतू आध्यात्मिकता हा रोमॅंटीसिझम नव्हे वगैरे जरा विक्षीप्त वाटतंय वाचताना. असो,
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
ह्या दोन्ही स्वातंत्र्ययुद्धाची तुलना मी करतो कारण ह्या दोन देशांच्या संस्कृतीत काही विलक्षण साम्ये आपोआपच निर्माण झालेली आहेत दोन्ही प्रदेश यूरोपियनांचे गुलाम साहजिकच भारतीयांनी अमेरिकेकडून सतत प्रेरणा घेतलीये म्हणजे अलीकडेही तिकडे ब्लॅक पॅन्थर निर्माण झाल्यावर आपल्याकडे दलित पॅन्थर निर्माण झाली वास्तविक पँथरचा आणि आपला संबंध तितका गहन नाही त्यापेक्षा दलित टायगर्स असे नाव दिले असते तर जास्त बरे झाले असते तर अनुकरण नावापासून सुरु होते ही आपली अवस्था आहे रोमँटिसिज्म हा शब्द मी युरोपियन अर्थाने वापरतो मराठी लोकांनी हा शब्द भंपक केला तुम्ही कोणत्या अर्थाने हा शब्द वापरता ते सांगाल तर मी विक्षिप्त वैग्रे टीकेला उत्तर देईन तुम्हाला अध्यात्मिकता रोमँटिक असते असं म्हणायचंय काय ? मी पुढच्या वाक्यात अध्यात्मिक असणे म्हणजे रोमँटिक असणे न्हवे तर मानवाच्या सामूहिक आसक्तींचे म्हणजेच भुकांचे तृष्णांचे व निकडीचे समग्र भान असणे असे म्हंटले आहे ह्यात विक्षिप्त काय आहे ?
Comments
Post a Comment