ऋषी आणि इरफान एक कमर्शियल एक प्रोफेशनल श्रीधर तिळवे नाईक
इरफान खान गेला आणि त्यातून बाहेर पडतो न पडतो तोच ऋषी कपूर ! आमच्या थिएटर अकादमीत ज्या काही मोजक्या अभिनेत्यांची चर्चा करण्याची माझ्याकडे मागणी झाली होती त्यातील एक इरफान ! ऋषी कपूर त्यामानाने अभिनेता म्हणून दुर्लक्षित ! नवीन पिढीच्या मते ऋषी कपूरची रौफलाला ही अग्निपथमधली भूमिका हीच सर्वश्रेष्ठ ! सुदैवाने दोघांच्याकडे जे बेस्ट होते ते त्यांनी दृश्यकलांना दिले होते
दोघेही अभिनेते होते त्यामुळे त्यांचा विचार अभिनयाच्या दृष्टीने करणे योग्य होय
शंकर स्वतः नटराज असल्याने शैवाचार्यांना अनेक गोष्टी याव्या लागतात त्यातील एक अभिनय !
अभिनयाचे
१ बाह्यकारणात्मक अभिनय
२ अंतःकरणात्मक अभिनय
३ आहार्यकरणात्मक अभिनय
असे तीन मुख्य प्रकार होतात
ह्यातील बाह्यकरणात्मक अभिनयाचे दोन उपप्रकार होतात
१ देहमौद्रीक अभिनय
२ ध्वनिमौद्रीक अभिनय
अंतःकरणात्मक अभिनयाचे
१ मानसिक अभिनय
२ बौद्धिक विचारात्मक अभिनय
आणि ३ अहंकारात्मक अभिनय
असे तीन उपप्रकार होतात
आहार्य अभिनयाचे
१ रंगभूषात्मक
२ वेषभुषात्मक
३ अलंकारात्मक
४ शस्त्रात्मक
५ अस्त्रात्मक
६ मुखवट्यात्मक
असे सहा उपप्रकार होतात
ह्यातल्या प्रत्येक प्रकार व उपप्रकारांचे पुन्हा तीन पोटप्रकार होतात
१ आत्मधर्मी अभिनय
२ नाट्यधर्मी अभिनय
३ लोकधर्मी अभिनय
ह्या दोघांच्या संदर्भात मेथड ऍक्टिंग हा शब्द वापरला जातो आपल्याकडे हा विचार लोकधर्मी अभिनयाच्या संदर्भात केला जातो अभिनय हा शुद्रांनी करायचा प्रकार असल्याने देवधर्मांनी (म्हणजे वैदिक ब्राम्हण वैष्णव हिंदू )ब्राम्हण क्षत्रियांना अभिनय करण्यास बंदी घातली त्यामुळे ब्राम्हणांनी सुरवातीच्या काळात अभिनयाच्या समर्थनासाठी पाश्च्यात्य अभिनयशास्त्रींचा आधार घेतला समर्थ , गोखले , मुखर्जी , जहागीरदार व कपूर ही पाच घराणी स्तानिस्लावस्कीचं नाव पुढे करत कारण त्यांचा उच्च वर्ण अभिनयाला अनुमती देत न्हवता आणि मान्यता मिळवण्यासाठी गोऱ्यांची नावं पुढे करणं सोयीस्कर होते पुढे आनंद ,पदुकोण , रे , टागोर वैग्रे आले प्रत्यक्षात मात्र ह्यांची अभिनयशैली ही शैव नाट्यशास्त्राशी मिळतीजुळती होती आणि कॅमेऱ्यापुढे पूजा नटेश्वराचीच होत असे पुढे गणपती आला आणि तोही शैव होता
ऋषी कपूर हा ह्या टिपिकल शैव ज्याला अलीकडे बॉलिवूड अभिनय स्कूल म्हंटले जाते त्यातून आला होता साहजिकच अभिनयाच्या सर्वच प्रकार उपप्रकारात त्याला गती होती अभिनयाची मुख्य शैली ही पृथ्वीराज कपूरप्रमाणे आत्मधर्मी अभिनयाची होती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण त्याग त्याला कधीच जमला न्हवता तो जमला रौफलालाच्या अभिनय करतांना हा एक वेगळाच ऋषी कपूर वाटावा इतका हा क्रांतिकारक बदल होता
राज कपूरला चार्ली चॅप्लिनची किंवा शम्मी कपूरला एल्विस प्रिस्लेची नक्कल करावी लागली तशी ऋषी कपूरला करावी लागली नाही कारण शशी कपूरने ह्या दोघांच्यापासून फारकत घेत कुणाचीही नक्कल न मारता स्वतःचीच देहबोली कशी अभिनयासाठी वापरायची ह्याचे तंत्र शोधले होते इतकेच कशाला स्वतःच्या देहबोलीची एक डान्सिंग स्टाईल (प्यार का मौसममधले ये खुश नजारे किंवा प्यार किये जा पहा ) तयार केली होती ऋषी कपूरने शशी कपूरला फॉलो करत बॉबीत धमाकेदार एंट्री मारली शैवांच्यात आंगिक अभिनयाचा अर्थ फक्त गद्य अभिनय होत नाही तर तुम्हाला नृत्य नृत शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या ह्या चारी गोष्टीत पारंगत असावे लागते ऋषीला शस्त्रविद्या नकोशी वाटली तरी इतर तीन उपप्रकारात तो पारंगत होता अस्त्राभिनयाला अलीकडच्या भाषेत बिझनेस म्हणतात आणि ऋषी त्यात मास्टर नसला तरी त्याला ती उत्तम येत होती आसपासच्या सर्व वस्तूंना अभिनयासाठी अस्त्र म्हणून वापरणे ह्या अस्त्रविद्येत अभिप्रेत होते आणि रजनीकांत ह्या अभिनयात सगळ्यांचा बाप होता विशेषतः गॉगल व सिगरेट पुढे रजनीकांतची ही स्टाईल झाली आणि अनेकदा अभिनयात एखाद्या गोष्टीची स्टाईल झाली कि ती सपाट व्हायला लागते राजेश खन्ना ह्याने जिंदगी एक सफर ह्या गाण्यात गॉगल प्रभावीपणे वापरला तसा ऋषीनेही तो बॉबीपासूनच वापरला ऋषीचा सर्वात मोठा हातखंडा नृत आणि नृत्यात होता चा चा चा ( ह्या चित्रपटाने हेलनला हिरॉईन म्हणून सादर केले होते )ह्या चित्रपटाने पाश्च्यात्त नृत्यप्रकार बॉलिवूडमध्ये कसा वापरता येईल ह्याचा पहिला धडा दिला असला तरी (त्याआधी गुरु दत्तने मिस्टर अँड मिसेस ५५ मध्ये झलक दाखवली होती ) तिसरी मंझीलमध्ये शम्मी कपूरने एल्विस प्रिस्ले टाईप नृत हालचाली केल्या असल्या तरी किंवा जितेंद्रने जम्पिंग जॅक म्हणून नृत्य उड्या मारल्या असल्या तरी नासिर हुसेनचा हम किसीसे कम नही हा चित्रपटच ह्याबाबत खरा क्रांतिकारी होता ह्या चित्रपटात बचना ए हसींनो ही सुरवात होती पण नंतर जे तारिक व त्याच्यात जे नृत्य युद्ध होते तो माझ्यासाठी चमत्कार होता त्यासाठी हा चित्रपट मी किमान दहावेळा पाहिला असेल आणि मग ती है अगर दुश्मन ही अभिनयाचा ट्रेंड सेट करणारी कव्वाली ! आणि अमर अकबर ऍंथोनीतल्या दोन कव्वाल्या ऋषी कपूरचे हे योगदान आहे त्याच्या आधी हमें तो लूट लिया दिलके हुस्नवालोने ट्रेंड सेटर असली तरी ऋषी कपूर ही परिपूर्णता होती त्याच्या फेमिनाईन चेहऱ्याला कव्वाली शोभून दिसे कुणालाही ही हाईट गाठता आली नाही अगदी शाहरुख खानही तुमसे मिलके दिलका मध्ये ऋषीला पार करू शकला नाही कव्वालीला हस्ताभिनय आणि मुखाभिनय ह्यांच्या सौंदर्यपूर्ण
तोलाची गरज असते ही गरज फक्त ऋषी कपूरने भागवली अस्त्राभिनयात वाद्याभिनय हा सर्वात कठीण प्रकार हिंदीत ही गोष्ट सुरवातीला फक्त राज कपूरला जमली आणि राज कपूरनंतर ऋषी कपूरला अलीकडे सैफ अली खानला तुम्ही जे वाद्य वाजवताय ते तुम्ही खरोखरच वाजवताय असं वाटलं पाहिजे हे राज कपूरनंतर ऋषीला जमले ह्याबाबत त्याचे समकालीन त्याच्यापुढे चाय कम पाणी सरगम मधली डफली ही केवळ ऋषी होता म्हणूनच अस्सल वाजली व वाटली
राजेश खन्नानंतरचा लवर बॉय ही ऋषी कपूरची इमेज सुरवातीपासूनच घट्ट बनली मी आजही म्हणतो कि खरी टीनएज लव्हस्टोरी बॉबीच ह्या वयातला कोवळेपणा जसा ऋषी कपूरच्या चेहऱ्यावर दिसला तसा कधीही ह्यापूर्वी दिसला न्हवता पुढे अखियोंके झरोखेसें व त्रिशुलमधला सचिन आणि बेवफाई मधला सिद्धार्थ आश्चर्य म्हणजे तो ऋषी कपूरच्या अभिनयातही दिसला . ह्या चित्रपटामुळे तीस पस्तीसचे घोडे कॉलेजकुमार म्हणून दिसायचे बंद झाले आणि हा आमच्या पिढीवर राज कपूरचा उपकार होता
आणि मग मल्टी स्टारर चित्रपटांचे युग आले आणि ह्या युगात ऋषी कपूर मुख्य नायक म्हणून सेट होणे कठीण झाले परिणामी सेकण्ड किंवा पॅरलल लीड आल्या पुढे जितेंद्रचा ता थय्या सुरु झाला आणि वाह्यातपणा हा ऋषीच्या चेहऱ्याला शोभणे कठीण होता
आणि ह्यावेळी आणखी एक अभिनेता आला ज्याला जे जे ऋषीला येते ते ते येतच होते पण ऋषीपेक्षा एक गोष्ट एक्सट्रा येत होती ती म्हणजे शस्त्रविद्या मार्शल आर्टस् त्याचे नाव मिथुन चक्रवती सुरक्षा हा आमच्या टिनेजचा चित्रपट होता गनमास्टर जी नाईन ने ऋषी कपूर साईडलाईन केला मिथुन नाचत तर होताच पण फाईट सीनही उत्तम करायचा आणि मग ज्याला मी भारतीय अभिनयाची चालतीबोलती व्याख्या म्हणतो तो कमल हसन एक दुजे के लिये घेऊन उगवला आणि अर्धसत्य प्रायोगिक सिनेमालाही बॉक्स ऑफिस मिळू शकते हे सांगत ह्या सगळ्यात जिथे यश चोप्रांसारखा रोमँटिक सिनेमाचा मुख्य बालेकिल्लाच कोसळला तिथे ऋषी कपूर कोण होता गाणी प्रचंड गाजूनही कर्ज सारखा सिनेमा पहिल्या रनला फ्लॉप झाला सेकण्ड रनला चालला नासिर हुसेनचा जमानेको दिखाना है फ्लॉप झाला आणि मग ती घटना घडली एका मूर्ख निर्मात्याने ऋषीला करिष्मा कपूरचा नायक होणार का म्हणून विचारले आणि ऋषीच्या लक्ष्यात आले कि खूप वय झाले तोवर खुद्द ऋषीलाच आपल्या स्टिरीओटाइप भूमिकेचा कंटाळा यायला लागला होता ह्यातूनच तात्पुरती निवृत्ती घेतली गेली
ह्या सर्व भूमिका करतांना ऋषी आत्मधर्मी आणि नाट्यधर्मी होता पण अग्निपथमधला रौफ सादर करतांना ऋषीने देहबोलीचा जो कायापालट केला तो लोकधर्मी अभिनयातील एक वस्तुपाठ ठरावा कपूर अँड सन्स ह्याच्या आसपास त्याशिवाय असा कायापालट पुन्हा त्याला जमला नाही ह्याच्या आसपास जाणारे कायापालट दो दुनि चार वैग्रे
आत्मधर्मी नाट्यधर्मी आणि नंतर लोकधर्मी अश्या तिन्ही फिरतीत यशस्वी झालेले किती अभिनेते असतील ज्यांना पोरीला मिठीत घेऊन कसं झुलवायचं हे कळत नाही अशांच्या बावळट टीकांना विचारतो कोण ? ऋषी हा राजेश खन्ना आणि शाहरुख खान ह्यांच्या दरम्यानचा एक रोमँटिक पण डौलदार फ्लायओव्हर आहे ज्याने पुढे लोकधर्मी भूमिकाही करून दाखवल्या त्याच्या टीनएज रोमँटिक भूमिका तर आजही मार्गदर्शक आहेत त्याने दाखवलेल्या वाटेवरून पुढे सलमान गेला त्यालाही अभिनेता म्हणून मान्यता अजूनही नाही कदाचित त्याने काही लोकधर्मी अभिनय करून दाखवला तर मिळेल आपल्याकडे अजूनही व्यक्तिरेखा म्हणजे अभिनय न्हवे हे अनेकांना कळत नाही त्यामुळेच लेखकांनीं लिहलेल्या व्यक्तिरेखांच्यावर भाळून अभिनेत्याला दाद देणारे मूर्ख भरपूर अभिनेत्याचे मूल्यमापन अभिनयाच्या आधारे व्हायला हवे त्याच्या व्यक्तिरेखांच्या आधारे न्हवे ऋषी कपूरने न्याय न दिलेल्या व्यक्तिरेखा फारश्या नाहीत दामिनीत त्याच्या बाजूने स्क्रिप्ट न्हवते तरी तो अधिक ऊर्जा टाकून उभा राहू शकला असता पण असे रोल फार कमी मिथुनला टक्कर देण्यासाठी तो मिथुनसारखी बॉडी कमवू शकला असता पण त्याने ही मेहनत केली नाही ह्याबाबतीत तो कपूरच निघाला
त्याच्या जाण्याने अभिनयाची एक म्युझिकल सिम्फनी कायमची निघून गेली
(क्रमशः )
श्रीधर तिळवे नाईक
ऋषी आणि इरफान एक कमर्शियल एक प्रोफेशनल २ श्रीधर तिळवे नाईक
कुठल्याही क्षेत्रात कार्य चार प्रकारे होते
१ नवतीक : ह्यात पुर्णपणे नवे व क्रांतिकारक असे आशय वा अभिव्यक्ती वा दोन्ही असतात जे आत्तापर्यंत कोणीही कार्यात आणलेले नसतात
२ समांतर : ह्यात नवतीक पण समाजाने न स्वीकारलेले आशय वा अभिव्यक्ती वा दोन्ही असतात
ज्यांना आपण प्रायोगिक म्हणतो असे कार्य नवतीक व समांतर अशा दोन्ही पद्धतींनी चाललेले असते भारतात प्रायोगिकता कायमच समांतर असते मूळ नवतीक कार्य बाहेर झालेले असते
३ व्यवसायिक : ह्यात समांतरचे सारे फॉर्म्युले यशस्वीपणे राबवून स्वतःला सादर केलेले असते ह्यात कर्ता रिस्क न घेता लोकमान्य होतील असे प्रायोगिक हातखंडे लोकांच्या बौद्धिक कुवतीनुसार सादर करतो व्यावसायिकमध्ये पैसे कमवणे अभिप्रेत असते पण स्वतःचा विवेक शाबूत ठेवून
४ धंदेवाईक : ह्यात तद्दन लोकांच्यासाठी व पैसे मिळवण्यासाठी काम केले जाते विवेकाला सोडचिठ्ठी दिली जाते
अभिनयाच्या क्षेत्रात शंकर , अभिनवगुप्त , कालिदास , शूद्रक ह्यांनी केलेल्या नवतीक कामाच्या आधारे कायमच समांतर वा व्यावसायिक वा धंदेवाईक कामे केली गेली भरताने शंकराचे नाट्यशास्त्र संस्कृतमध्ये आणले आणि आर्यांच्यात रंगभूमी रुजवली व कालिदास व शूद्रक सारख्यांची मूळ प्राकृत नाटके पुढे संस्कृतमध्ये सादर करण्यात आली
भारतात ह्याबाबत दुसरे क्रांतिकारी नवतीक कार्य होते स्तानिस्लावस्कीचे त्याने लोकधर्मी अभिनयाचे नाट्यरूपच बदलून टाकले आणि अभिनयाचे एक नवीन स्कूल सुरु केले जे भारतात नारायण काळे व गजानन जहागीरदार ह्या दोघांनी आणले आणि इथूनच लोकधर्मी अभिनयाचे समांतर स्कूल सेटल झाले जहागीरदारांचा सर्वात गाजलेला विध्यार्थी होता अशोककुमार गांगुली जो सुपरस्टार झाला
देहमौद्रीक अभिनयात
१ आंगिक
२ नृत
३ नृत्य
ह्या तीन उपप्रकारांचा समावेश होता आर्यांना नृत्य व नृत करणे हे अतिशुद्रांचे काम वाटत असल्याने त्यांचा सगळा भर आंगिक अभिनयावर होता त्यामुळे त्यांनी फक्त आंगिक अभिनयावर जोर दिलेला दिसतो हे काम करणाऱ्यांना नंतर देवदास व देवदासी बनवून जे घृणास्पद काम आर्यांनी केले त्याला तर तोडच नाही
ध्वनी मौद्रिक अभिनयात
१ वाचिक : ह्यात मानवी गळ्यातून निघणाऱ्या भाषिक ध्वनींचा समावेश होतो
२ बोलिक : ह्यात अभाषिक पण मानवी गळ्यातून निघणाऱ्या ध्वनींचा समावेश होतो उदा संगीताचे तुकडे विशेषतः तबल्याचे बोल किंवा आरोळी जशी टारझनची आरोळी किंवा किशोरकुमारचे यॉडलिंग
३ वैशेषिक : ह्यात अभाषिक अमानवी पण मानवी गळ्यातून निघणाऱ्या ध्वनींचा समावेश होतो उदा पशु पक्षी ह्यांचे आवाज , वस्तूंचे आवाज जसे आगगाडीचा आवाज
४ विशेष आवाज : वरील वर्गीकरणात न बसणाऱ्या इतर सर्व आवाजांचा ह्यात समावेश होतो उदा पादणे काही लोकांची ह्यावरही मास्टरी असते ते हमखास हव्या त्या वेळी पादून दाखवतात
आर्यांनी प्रामुख्याने वाचिक अभिनयाचीच चर्चा केली आहे अपवादात्मक वेळा बोलिक
मी मागे म्हंटल्याप्रमाणे अभिनय करू पाहणाऱ्या ब्राम्हण व क्षत्रियांनी जाणीवपूर्वक मान्यता मिळवण्यासाठी सुरवातीला पाश्च्यात्य दाखले दिले पण हेही तितकेच खरे कि एकदा शोभना समर्थ व अशोककुमार गांगुली सुपरस्टार झाल्यावर भरताच्या नाट्यशास्त्राची चर्चाही ह्यांनीच सुरु केली योगायोगाने ही सर्व घराणी शाक्त होती अगदी सावरकर घराणेही शाक्त होते आणि ठाकरे घराणे तर अथपासून इतिपर्यंत शाक्त आहेत (ज्यांना शंका असेल त्यांनी प्रबोधनकारांचे आत्मचरित्र वाचावे )फक्त शंकराचार्यांच्यामुळे ह्या लोकांनी वैदिक धर्म स्वीकारल्याने आर्यांचे काही दुर्गुण ह्यांच्यात शिरले (ठाकऱ्यांच्यात तर तेही शिरलेले नाहीत )
गांगुली , समर्थ (शोभना , नूतन , तनुजा )व मुखर्जी नातेवाईक असल्याने ह्या तिन्ही घराण्यात एकदा स्तानिस्लावस्की घुसल्यावर तो ठाणच मांडून बसला आणि थेट काजोल पर्यंत चालत आला ह्या लोकधर्मी अभिनयाची बॉलिवूडमध्ये पाच स्कूल्स झाली
१ नेत्रवाचीक घराणे :मोजक्या हालचाली करून वाचिक व नेत्रिक हालचालीवर अभूतपूर्व नियंत्रण मिळवणारे स्कूल ह्याची सुरवात गजानन जागीरदारांनी केली असली तरी हे स्कूल लोकप्रिय झाले ते अशोककुमारमुळे
२ वास्तवदर्शी घराणे :संपूर्ण देहबोली व्यक्तिरेखेप्रमाणे हवी तशी वाकवणारे व वळवणारे स्कूल हे बलराज सहानीमुळे परिचित झाले व दिलीपकुमार अभिताभ बच्चनमुळे लोकप्रियही झाले
३ देहनृत्यदर्शी घराणे : संपूर्ण देहबोली व्यक्तिरेखेप्रमाणे हवी तशी वाकवणारे , नाचवणारे व वळवणारे स्कूल हे भगवान व किशोरकुमार गांगुलीमुळे सुरु झाले तरी व्यक्तिरेखेप्रमाणे आंगिक अभिनय बदलण्यात भगवानदादा व किशोरला तितकेसे यश मिळाले नाही अपवाद किशोरचा पडोसन मात्र नंतर आलेल्या वहिदा व नूतनने ते करून दाखवले व तनुजा रेखा मुळे ते सर्वपरिचित झाले ह्या घराण्यात पुरुषांच्यात सर्वोत्तम काम ऋषी कपूरने केले भगवान किशोर चे नृत्य रॉ होते तर शम्मी नृत्याच्या बाबतीत केवळ अंगवळणावर अवलंबून होता शशी व जितेंद्र गणपती डान्समध्ये वाक्बगार होते चा चा वाला चंद्रशेखर साऊथकडून आल्याने डान्समध्ये उत्तम पण आंगिक व वाचिक अभिनयात एकदम कच्चा होता
ऋषी कपूरने नायकाने अभिनयासोबतच फिनिशिंग नृत्य कसे करावे ह्याचे धडे अधिक विकसित केले व परफेक्ट सादरीकरणाचे असंख्य नमुने सादर केले
१ झूठ बोले कव्वा कांटे (बॉबी )
२ हमने तुमको देखा तुमने हमको देखा /एक मै और एक तू /खुल्लम खुल्ला (खेल खेल मे )
३ बचना ए हसींनो /आ दिल क्या /मिल गया वैग्रे (हम किसीसे कम नहीं )
ह्या गाण्यातील डान्सेस टर्निंग पॉईंट्स होते ह्या गाण्यांच्यानंतर बच्चनलाही नृत्य करण्याची वेळ आली आणि त्याने ती कशीबशी निभावली
४ देहशस्त्रदर्शी घराणे संपूर्ण देहबोली व्यक्तिरेखेप्रमाणे हवी तशी वाकवणारे , वळवणारे व शस्त्र हाताळणारे हे स्कूल नसिरुद्दीन शहामुळे सुरु झाले व्यक्तिरेखेप्रमाणे आंगिक अभिनय बदलण्यात जे यश नासिरुद्दीन शहाला मिळाले ते भारतात कुणालाच मिळालेले नाही ह्या घराण्यातला दुसरा तालेदार अभिनेता म्हणजे अजय देवगण
दक्षिणेकडे चार स्कूल्स आलीच पण पाचवे स्कूलही आले ते म्हणजे
५ संपूर्ण घराणे :संपूर्ण देहबोली व्यक्तिरेखेप्रमाणे हवी तशी वाकवणारे , नाचवणारे, मार्शल आर्ट हाताळणारे व वळवणारे स्कूल हे कमलहसन मुळे सर्वपरिचित झाले आणि हिंदीत त्याचा अविष्कार मिथुन चक्रवर्तीने केला कमलने भारतीय व पाश्चात्य दोन्ही प्रकारची नृत्ये केली अप्पू राजासारख्या चित्रपटात तो गायलाही मिथुनला भारतीय नृत्य आणि गाणे तितकेसे जमले नाही नासिरुद्दीन शहाने जलवा चित्रपटात अभूतपूर्वरित्या देहबोली बदलून मारामारीची अप्रतिम दृश्ये दिली पण त्रिदेव मध्ये भरसक प्रयत्न करूनही नसिरला नाचता आले नाही आणि कमल हसन हाच सर्वांचा बाप आहे हे सिद्ध झाले नव्वोदत्त्तर अभिनेत्यांनी कमल व मिथुन ह्या दोघांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनयाचे संपूर्ण स्कूल जोशात पुढे न्हेले ऐंशोत्तरी पिढीत उत्तरेकडून एकटा मिथुनच होता पण पुढे गोविंदा आमिर खान शाहरुख खान ह्रितिक रोशन वरुण धवन टायगर श्रॉफ असे एकापेक्षा एक दिग्गज अभिनेते आले
इरफान खान हा नेत्रवाचीक घराण्यातला अभिनेता होता तो एका अर्थाने अभिनयात अशोककुमार ह्यांचा नातू होता अशोककुमार देखणे होते कि नाही हा आजही वाद आहे इरफानबाबतही हाच वाद आहे दोघेही नेत्रांच्या हालचाली करण्यात वाकबगार जणू अभिनयाचा सगळा जीव डोळ्यात ओतलेला मात्र इरफान खानला एक प्रचंड मर्यादा होती बॉलिवूडमधले आर्टिफिशियल सिन त्याला कधीही करता आले नाहीत उदाहरणार्थ त्याचा ज़ज्बा पहा त्यात अभी असली जंग शुरु ह्या टाईपचं ऐश्वर्या रॉयला मिठीत ठेऊन म्हणायचं आहे त्याची देहबोली ह्या सीनमध्ये कमालीची कृत्रिम व डायलॉगबाजी टोन पूर्ण ऊर्जाशून्य किंवा संताप आल्यावर आसपासच्या वस्तूंची मोडतोड करण्याच्या सिन हा टिपिकल बॉलीवूडी सिन पण इरफानची देहबोली ह्या सीनमध्ये कमालीची जड आहे अशोककुमार असले सीनही स्टायलिश करायचा इरफानला ते जमायचे नाही महेश भटच्या रोगमधले कित्येक सिन इरफानच्या अभिनयशैलीमुळे फ्लॅट झाले ह्याचे कारण उघड आहे इरफान कधीही धंदेवाईक स्क्रिप्टशी ऍडजस्ट होऊ शकला नाही ह्याउलट ऋषी बॉलिवूडमधल्या डेव्हिड धवनच्या वाह्यातगिरीलाही अड्जस्ट झाला
इरफान सतत प्रयोगाला सामोरा जायला तयार ऋषी कपूरने म्हातारपणात ह्या रिस्क घेतल्या ह्याला कारण शशी कपूरचे काय झाले हे त्याने पाहिले होते प्रायोगिकतेच्या गप्पा मारणं व त्यासाठी किंमत मोजणे ह्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत शशी कपूरची सर्व मालमत्ता गहाण पडलेली त्याने पाहिली होती आणि त्यासाठी टॅक्सीप्रमाणे १८ -१८ तास काम करतांनाही त्याने आपल्या काकाला पाहिले होते इरफानने कधीही अशी रिस्क घेतली नाही आयजीच्या जीवावर बायजी उदार ही प्रायोगिकवाल्यांची वृत्ती म्हणजे पैसे तुम्ही टाका आम्ही फक्त काम करतो अशी वृत्ती मग तुम्ही रस्त्यावर आलात तरी ती जबाबदारी तुमची वर तुम्ही पैसे देत नाही म्हणून बोंबा मारूच आणि ज्या धंदेवाईक लोकांनी घर चालवायला पैसे दिले ते धंदेवाईक आहेत म्हणून त्यांच्याही नावाने बोंबा मारू ही कलात्मक चित्रपटवाल्यांची वृत्ती ऋषी कपूरने फार जवळून पाहिली होती
फक्त आंगिक अभिनयाचा विचार केला तर ऋषी व इरफान उन्नीस बीस होते पण वाचिक अभिनयात इरफान थोडा सरस होता प्रायोगिकतेत तर इरफान मैलोगणती पुढे होता मात्र ऋषी कपूर नृत नृत्यात इरफानच्या कैक मैल पुढे होता
इरफानची खरी ताकद कशात होती ?
त्यासाठी अभिनयाच्या अंतःकरणात्मक ह्या प्रकाराकडे वळावे लागेल
मी म्हणालो होतो
अंतःकरणात्मक अभिनयाचे
१ मानसिक अभिनय
२ बौद्धिक विचारात्मक अभिनय
आणि
३ अहंकारात्मक अभिनय
असे तीन उपप्रकार होतात
इरफान हा अंतःकरणात्मक अभिनयात निपुण होता एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंतःकरणाशी कसे कनेक्ट व्हायचे ह्याचे त्याला उपजत भान होते त्याच्या आंगिक अभिनयात फार विविधता न्हवती पण तो आंगिक अभिनयाच्या हालचाली करायच्या त्या ढळढळीत असायच्या आणि डोळे तर त्या कनेक्टिव्हिटीत पार बुडून गेलेले असायचे असं वाटायचं हा खरोखर हे सर्व महसूस करतोय व्यक्तिरेखेच्या बौद्धिक विचारात्मक भागाविषयी तो जेव्हा कन्व्हिन्स असायचा तेव्हा त्याचे डोळे त्याला साथ द्यायचे आणि तो कन्व्हिन्स नसला कि डोळे भुईसपाट त्यामुळेच तो भूमिकांची निवड करतांना आपण ह्या भूमिकेच्या अंतःकरणाशी कनेक्ट होतो कि नाही ह्याला तो प्राधान्य द्यायचा आणि जेव्हा त्याने हे नाकारले तेव्हा तो सपाट झाला
क्रमशः
श्रीधर तिळवे नाईक
१ मानसिक अभिनय
२ बौद्धिक विचारात्मक अभिनय
आणि
३ अहंकारात्मक अभिनय
असे तीन उपप्रकार होतात
इरफान हा अंतःकरणात्मक अभिनयात निपुण होता एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंतःकरणाशी कसे कनेक्ट व्हायचे ह्याचे त्याला उपजत भान होते त्याच्या आंगिक अभिनयात फार विविधता न्हवती पण तो आंगिक अभिनयाच्या हालचाली करायच्या त्या ढळढळीत असायच्या आणि डोळे तर त्या कनेक्टिव्हिटीत पार बुडून गेलेले असायचे असं वाटायचं हा खरोखर हे सर्व महसूस करतोय व्यक्तिरेखेच्या बौद्धिक विचारात्मक भागाविषयी तो जेव्हा कन्व्हिन्स असायचा तेव्हा त्याचे डोळे त्याला साथ द्यायचे आणि तो कन्व्हिन्स नसला कि डोळे भुईसपाट त्यामुळेच तो भूमिकांची निवड करतांना आपण ह्या भूमिकेच्या अंतःकरणाशी कनेक्ट होतो कि नाही ह्याला तो प्राधान्य द्यायचा आणि जेव्हा त्याने हे नाकारले तेव्हा तो सपाट झाला
क्रमशः
श्रीधर तिळवे नाईक
शरीराच्या कमीत कमी हालचाली करत केवळ वाचिक व
ह्यातील मुखवट्यात्मकला रंगभूषात्मक अभिनयाचा एक प्रकार मानावा असा एक सूर आहे पण एक गोष्ट आपण
लक्ष्यात घ्यायला हवी मुखवटे तयार करणे ही पूर्ण वेगळी बाब आहे आणि ती अभिनयासाठी वापरणे हीही ! यक्षगानासारखे नाट्यप्रकार हे पूर्णपणे मुखवट्यात्मक अभिनयाच्या आधारे खेळले जातात आणि मुखवट्यांचा अभिनय हा स्पेशल ट्रेनिंग घेऊन शिकावा लागतो अगदी अलीकडच्या काळातही जोकरसारख्या चित्रपटात मुखवट्यांचा अप्रतिम अभिनय आपण पाहिला आहे ऋषी कपूरच्या बॉबी ह्या पहिल्याच चित्रपटात (तो मोठा झाल्यावर त्याआधी त्याने मेरा नाम जोकर केला होता ) ए फँसा ह्या गाण्यात मुखवटे होते आणि मुखवट्यांचा वापर कामचलाऊ होता
इरफान खानचा अभिनय हा एक गूढ प्रकार बनलाय कारण त्याची ताकद नेमकी कुठं आहे हेच स्पष्ट होत नाहीये आणि त्याचाही शोध आपणाला इथे घ्यायचा आहे
Comments
Post a Comment