जोकर :क्रेझी केऑस आणि सायकेऑस श्रीधर तिळवे नाईक 



जॅक निकोलसन हा सेल्फस्टायिल्ड  अभिनयाचा बादशहा (आपल्याकडे असा राजेश खन्ना होता  ज्याचा नीट वापरच केला गेला नाही अभिनेता उत्तम असणे पुरत नाही त्याच्या देहबोलीचा नीट वापर करणारे प्रतिभावंत दिग्दर्शकही असावे लागतात उदाहरणार्थ ह्याबाबत देव आनंद नशीबवान ठरला त्याच्या  मर्यादित कुवतीचा असाधारण वापर विजय आनंद वैग्रे प्रभुतींनी केला   ) त्यामुळेच जेव्हा तो बॅटमॅन मध्ये खलनायक करतोय हे कळले तेव्हा बॅटमॅन बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली बॅटमॅन हा माझा आवडता सुपरहिरो आहे कारण तो मानवी आहे आईवडिलांच्या डोळ्यादेखत झालेल्या खुनाने भांबावून गेलेला आणि घाबरून गेलेला , शहराच्या भंपकपणाची पूर्ण खात्री पटूनही शहराच्या भल्याचा विचार करणारा , स्वतःच्या आतील भयाला नीट पाहणारा आणि मुख्य म्हणजे प्रसिद्धी फाट्यावर मारणारा असा हा सुपरहिरो आहे मला प्रसिद्धी फाट्यावर मारणारे लोक आवडतात कारण आजच्या युगाचे खरे हिरो तेच आहेत त्यामुळे बॅटमॅनचा माझ्या मेंदूतील प्रवेश हा नैसर्गिक आहे 


पण जोकरने माझ्या आत केलेला प्रवेश हा मात्र अनपेक्षित होता त्याने हा प्रवेश केला तो १९८९ च्या बॅटमॅनमुळे ! क्रेझी हिरो वा व्हिलन जोकरपूर्वी झाले न्हवते असे नाही पण बॉब केन सॅम हॅम वॉरेन स्कारेंन ह्यांच्या पोस्टमॉडर्न लेखनशैलीने व त्या लेखनशैलीला न्याय देणाऱ्या  जॅक निकोलसनच्या अभिनयाने जोकर फिनॉमिना बनवला लयपूर्ण क्रेझी मुद्रांचे विरचित खंड रचत जाणे हे देहबोलीला फार कठीण जाणारे काम जॅक ने इतक्या लीलया करून दाखवले कि अभिनय शिकवतांना अनेकदा मी ह्याचा उल्लेख करत असे हा जोकर पोस्टमॉडर्न जोकरची सुरवात होती 

बॉब केन सॅम हॅम वॉरेन स्कारेंन ह्यांच्या लेखनशैलीतला हा जोकर क्रेझी होता त्याने ट्रॅडिशनल जोकरचे व चॅप्लिनच्या मॉडर्न जोकरचे नॉर्म्स पूर्ण भिरकावले होते त्याला मुखवट्यांचा बाज होता आणि हास्याला क्रौर्याची चमत्कारिक जोड होती रिकोर्सोबरोबर त्याचा पुढील संवाद प्रथम वाचा 

Ricorso You're crazy.
Joker Haven't you ever heard of the healing power of laughter?
[He begins to laugh again and mops sweat from his brow, exposing a patch of chalk-white flesh] 

हा संवाद वरकरणी  चॅप्लिनिक असला  तरी हा बहाणा होता हसणे ही त्याच्यासाठी थेरपी आहे पण ह्या थेरपीवर त्याचा विश्वास आहे का ? तर नाही 


ह्या पोस्टमॉडर्न जोकरबाबत मुख्य गोष्ट जोकर इज डेड ही होती आणि ती पोस्टमॉडर्न सब्जेक्ट इज डेड च्या जवळ होती सब्जेक्ट डेड झाल्यावर जॅक डेड झाल्यावर फक्त जोकरच उरतो तर जोकर ही उत्तराधुनिक ओळख होती जी हसत होती ह्या दृष्टीने खालील डायलॉग्ज पाहण्यासारखे आहेत 



Grissom Your life won't be worth spit!
Joker I've been dead once already. It's very liberating. You should think of it as, uh... therapy.
Grissom Jack, listen. Maybe we can cut a deal.
Joker Jack? Jack is dead, my friend.
[steps into the light] 
Joker You can call me... Joker. And as you can see, I'm a lot happier.
[laughs, and then proceeds to kill Grissom] 

मरणे लिब्रेटिंग असते असं हा जोकर म्हणतो आणि स्वतःच्या ह्या मरणावर हसणे हे तर आणखीनच लिब्रेटिंग चॅप्लिनिक जोकर असा मरत नाही उलट तो मॉडर्न जीवनाची खिल्ली उडवत जिवंत राहतो आपल्याकडे असा जोकर काही प्रमाणात कोसलाच्या पांडुरंग सांगवीकर मध्ये आढळतो पण दुर्दैवाने विदूषकत्वाचा त्याग करून पारंपरिक खुंट्याला  जाऊन मिळतो 

पोस्टमॉडर्न जोकर असा फक्त खिल्ली उडवत नाही तो ती खिल्ली स्वतःही सोसतो आणि त्यातूनच एका क्रेझीपणाची सुरवात होते 

१९८९ मध्ये आलेल्या बॅटमॅनमध्ये अशा अनेक क्रेझी घटनांची व डायलॉग्जची  रेलचेल होती ही फक्त सुरवात आहे हे मात्र त्यावेळी माहीत न्हवते 


बॉब केन सॅम हॅम वॉरेन स्कारेंन ह्यांच्या लेखनशैलीनंतर व जॅक निकोलसनच्या अभिनयानंतर  जोकरबाबत काही महान घडेल असं वाटलं न्हवतं आणि मग अचानक द डार्क नाईट आला २००८ साली !ख्रिस्तोफर नेलोन व डेव्हिड गोयरने ह्या जोकरला केऑसचा प्रतिनिधी बनवला त्यामुळेच   ह्यातला जोकर  I believe that what doesn't kill you....simply makes you stranger. 

अशी घोषणा करत अवतरला 

जॅक निकोलसनच्या अभिनय शैलीला बाजूला काढत पूर्णपणे स्वतःच्या शैलीत हिथ   लेजर ने साकार केलेला जोकर हा निकोलसन इतकाच जबरदस्त होता केशरचनेच्या केऑसपासून चालण्याच्या केऑस पर्यंत  इतके  आयाम ह्या व्यक्तिरेखेला होते कि ते पेलणे सोपे न्हवते पण लेजरने ते पेलले जी क्रेझ आमच्या पिढीत  निकोलसनची होती तीच क्रेझ  लेजरची ह्या नव्या पिढीत झाली इतकी कि शेवटी जोकरवर स्वतंत्र चित्रपट काढावा वा निघावा असे सर्वांनाच वाटू लागले लेजर जिवंत असता तर आत्ता आलेल्या जोकर मध्ये त्यानेच काम केले असते इतकी त्याची क्रेझ ह्या द डार्क नाइटने निर्माण केली 


 द डार्क नाईटमधला हा जोकर फक्त क्रेझी नाही आता क्रेझीनेसची पुढची अवस्था तो गाठतो त्यामुळेच तो केऑसचा एजन्ट बनून येतो मात्र तो केऑसचा एजन्ट असला तरी 
Like my mother used to tell me- if you're good at something, never do it for free.
असा तो व्यवहारीही आहे 

हा व्यवहारीपणा ओळखून बॅटमॅन त्याला म्हणतोही 
You're garbage who kills for money. 

प्रत्यक्षात बॅटमॅनचे हे आकलन चुकते कारण जोकर तो पैश्याच्या मागे नाही हे पैसे जाळून सिद्ध करतो पैसे जाळताना  आपल्या पार्टनरला तो म्हणतो 
All you care about is money. This city deserves a better class of criminal, and I'm going to give it to them. 

 आपल्या राजकारणाला तर हे खूपच लागू पडावे बेटर क्लास ऑफ क्रिमिनल्स हे गुड क्लास ऑफ क्रिमिनल्सना रिप्लेस करतात आणि जो बेस्ट आहे तो महानेता बनतो 


मग हा जोकर आहे काय ?

जोकर आपण काय आहोत ते सांगतांना म्हणतो कि चीज संपले तर हे लोक एकमेकालाही खातील त्यामुळेच तो म्हणतो See, I'm not a monster... I'm just ahead of the curve. म्हणजेच शहरातले सगळे लोक लुच्चे आहेत आणि मी फक्त त्यांच्या ह्या कर्वचा नेता आहे किंवा अहेड आहे असे तो म्हणतो 

बॅटमॅनला शहरात कायदा व सुव्यवस्था (ऑर्डर )हवी आहे त्यामुळे नियमांची एक अवस्था हवी आहे मात्र ही व्यवस्था धार्मिक नाही तर लोकांनी बनवलेल्या नियमांची आहे स्वतः बॅटमॅनचे काही नियम आहेत 

जोकरला नियमांचा  कंटाळा आहे बॅटमॅनला  एकदा तो म्हणतो 
The only sensible way to live in this world is without rules. 

त्यामुळे त्याला प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट नाही त्याला प्लॅन विचारला जातो तेव्हा जोकर म्हणतो 
 Do I really look like a guy with a plan, Harvey? I don't have a plan...The mob has plans, the cops have plans. You know what I am, Harvey? 
मग तो स्वतः काय आहे ते सांगतो  
 I'm a dog chasing cars... I wouldn't know what to do with one if I caught it. I just do things. I'm just the wrench in the gears. I hate plans. Yours, theirs, everyone's. Maroni has plans. Gordon has plans. Schemers trying to control their worlds. I'm not a schemer, I show the schemers how pathetic their attempts to control things really are. So when I say that you and your girlfriend was nothing personal, you know I'm telling the truth... Hands him the pistol.

It's the schemers who put you where you are. You were a schemer. You had plans. Look where it got you. I just did what I do best- I took your plan, and I turned it on itself. Look what I've done to this city with a few drums of gas and a couple of bullets. Nobody panics when the expected people get killed. Nobody panics when things go according to plan, even if the plan is horrifying. If I tell the press that tomorrow a gangbanger will get shot, or a truckload of soldiers will be blown up, nobody panics. Because it's all part of the plan. But when I say that one little old mayor will die, everybody loses their minds! Introduce a little anarchy, you upset the established order and everything becomes chaos. I'm an agent of chaos. And you know the thing about chaos, Harvey?

हा जोकर स्कीम आणि स्कीमर्स च्या विरोधात केऑसचा एजन्ट म्हणून स्वतःला सादर करत जातो स्कीम्सची धज्जी उडवतो 

मीडियालाही प्लॅनेड गोष्टीत रस नाही कारण प्लॅनिंगमध्ये काय होणार हे स्पष्टच आहे आणि काय होणार हे माहित असेल तर न्यूज बघणार कोण ?

त्यामुळेच जोकर अनपेक्षिततेचा प्रवक्ता आहे तो ते घडवतो जे त्यालासुद्धा अनपेक्षित आहे 
मग तो मरतो का ? तर माहित नाही 

ह्या जोकरनंतर मात्र आणखी एक जोकर येणे त्यामुळेच अटळच होतं (लेजरच्या अनपेक्षित मृत्यूने हे येणं लांबलं एव्हढंच )प्रश्न फक्त प्रिक्विल कि सिक्वेल एव्हढाच प्रश्न होता टॉड फिलिप्स व स्कॉट सिल्व्हरने प्रिक्वेल निवडला साहजिकच जोकर कसा तयार झाला त्याचे कुटुंब कसे होते ह्याचा मागोवा घेतला गेला 

नवीन आलेला आणि सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला हा मागोवा  जोकर हे टायटल ठेवूनच आलेला आहे ह्या  चित्रपटात जोकर हिरो आहे आणि व्हिलनही त्याचे बालपण व आयुष्य व संघर्षरत तारुण्य आताच्या चित्रपटात आहे पोस्टमॉडर्नचा ओरिजनल टेक्स्टवर विश्वास नसला तरी टॉड फिलीप्सने व स्कॉट सिल्व्हरने ह्या भागात अनेक घटना ओरिजनल लिहिलेल्या आहेत 

जोकरची सायको आई तिने निर्माण केलेला काल्पनिक भूतकाळ तिच्या काल्पनिक भूतकाळाला सत्य मानून त्या काल्पनिक सत्याची पीडा झेलणारा जोकर हा आपल्या पोस्ट्रुथ जमान्याचा बळी वाटतो ज्या सत्यासाठी तुम्ही आयुष्य पणाला लावावे ते सत्य कुणाचातरी केवळ कल्पनाविलास असावा ह्याहून शोकांतिका ती काय बरं तिला शोकांतिका तरी म्हणावी काय आपल्या आयुष्यातील सत्य कळल्यावर हा जोकर म्हणतो 



ट्रम्पच्या राजवटीचा हा झाकोळ आहे का ? आयुष्यभर निगेटिव्ह विचार करणारा 

जोकर कबुलीजवाबही देतो 


आयुष्यात माणसाला कधीकधी काही असं काही मोडून टाकतं कि ते तुम्हाला अनब्रेकेबल बनवतं जोकरचे आईचे सत्य असे आहे 

आपण ज्याला आईच्या सांगण्यावरून बाप समजत होतो तो आपला बाप नाहीये जिला आपण आई समजतो ती आपली आई नाहीये तिने आपणाला दत्तक म्हणून आणलं होतं आणि तिने जो भूतकाळ आपल्याला सांगितला आणि जो खरा समजून आपण वाटचाल केली तो भूतकाळच मुळात तिने रचला होता हे कळल्यावर एखाद्या माणसाने रिऍक्ट कसं व्हावं ?

जोकर शेवटी आईचा खून करतो आणि कॉमेडी शो होस्ट करणाऱ्या अँकरचाही ! तो आता सायकोपॅथ राहात नाही सायकेऑस बनतो तो फक्त मनोरुग्ण नाही तर मनोरुग्णतेचं भान असणारा आणि ही मनोरुग्णता हाताळणारा विरचित असा जोकर आहे तो एके ठिकाणी म्हणतो ,

“The Worst Part Of Having A Mental Illness 

Is 

People Expect You To Behave As If You 

Don't.”


आर्थिक मंदीमुळे रसातळाला गेलेल्या आत्ताच्या अमेरिकन सोसायटीचे प्रतिबिंब चित्रपटभर आहे पण काळ संदिग्ध आहे 

आपण सर्वच जोकर आहोत किंवा आपल्या प्रत्येकाच्या आत एक जोकर असतो असली भुक्कड रोमँटिक वाक्ये टाकणाऱ्या लोकांना जोकरचा एथॉस कळणे कठीण 

जोकर हे पोस्टमॉडर्न विरचित आहे आणि ह्या आयुष्याच्या विरचितेतून जोकर शेवटपर्यंत बाहेर पडत नाही तो त्या विरचितेत ट्रॅप होत जातो 

हा जोकर जोएक्वीन फिनिक्स ह्याने सादर केलाय मुळात तो हा रोल  करणार हे कळल्यावरच मी काहीसा चकित झालो होतो ग्लॅडिएटरमधला त्याचा अभिनय अप्रतिम होता पण आधीच्या दोन अभिनेत्यासारखा तो काही नैसर्गिकरित्या ह्या रोलला फिट न्हवता पण त्याने हे धनुष्य पेलले त्याने जॅक निकोलसनचा जोकर आणि हेजरचा जोकर ह्यांना आपल्या देहशैलीत सामावून घेतलेच पण त्यांचा समतोल साधत तिसरा जोकर उभा केला देहाची वक्रता वाढवत वेडीवाकडी अभिनयशैली प्रस्थापित करत त्याने ही किमया साधली आहे आता ह्या तीनपैकी सर्वश्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण एखाद्या व्यक्तिरेखेला तीन अभिनेत्यांनी सारख्याच ताकदीने पेलणे हे अद्भुतच म्हंटले पाहिजे 

प्रबोधनाच्या काळात शेक्सपियरने निर्माण केलेली इयागो ही व्यक्तिरेखा अशी गुंतागुंतीची होती आमच्या काळात हे स्थान जोकरने पटकावले आहे 

आता चौथा जोकर कसा असेल हा मात्र चांगलाच औत्सुक्याचा विषय असेल 

श्रीधर तिळवे नाईक 






























Comments

Popular posts from this blog