पृथ्वीला माता समजणाऱ्या माणसाचा मृत्यू झाला असून पृथ्वीला पत्नी समजणाऱ्या माणसाचा उदय झाला आहे नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार पृथ्वीला वेश्या समजणाऱ्या माणसानेही आता आपले स्थान निश्चित केले आहे पृथ्वी ह्या संदर्भात काहीच कृती करणार नाही अशी ह्या नव्या माणसाची खात्री आहे खांडव वन जाळणाऱ्या महान वैष्णव परंपरेचा ह्यामुळे विजय झाला असून ह्या सोहळ्या प्रित्यर्थ व्याध गीता सांगणाऱ्या श्री व्याध ह्यांना आमंत्रित करण्यात आले आहे पशुपक्ष्यांना अन्नातून बेशुद्ध करून मग अहिंसकपणे त्यांना कापणे हे कसे धर्मसिद्ध आहे हे ते पटवतील झाडांच्याबाबतीत त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रश्नच येत नसल्याने त्यांच्या संदर्भात हिंसा किंवा अहिंसा ह्यांचा प्रश्नच उद्भवत नसल्याची ते मांडणी करतील वाढ पशु पक्ष्यांची होते तर विकास हा फक्त मानवी समाजाचा होतो माणसांच्या वाढत्या संख्येला सुविधा पुरवायच्या कि झाडांची संख्या शाबूत ठेवण्यासाठी माणसाला असुविधेत ढकलायचे ह्याचा विचार शेवटी शासनाला करावा लागतो झाडे मतदार नसल्याने निवडून येणाऱ्यांनी त्यांचा विचार का करावा ?
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment