फादर दिब्रिटो , ख्रिश्चनिटी व साहित्य श्रीधर तिळवे नाईक
मी झोपी गेलोय माझी आई प्रेग्नन्ट आहे नववा महिना भरला आहे आता ती कधीही बाळंत होऊ शकते आम्ही माळी गल्लीत राहतोय पवारांच्या घरी पवारांची रविवार पेठेत फेमस असलेली गिरण रात्र झाल्याने बंद आहे रात्रीचे बारा वाजलेत
आईचा व्हीव्हळण्याचा आवाज ऐकून भाऊ म्हणजे माझे वडील जागे झालेत आई आत्ता बाळन्त होणार आहे काय हा प्रश्न त्यांना सतावतोय मागचे बाळंतपण त्रासाचे न्हवते पण ह्या बाळन्तपणात डॉक्टर जोशींनी जी खात्री दिली होती तशी खात्री त्या आत्ताच्या केसमध्ये देत नाहीयेत त्यामुळे एक अस्वस्थता आहे
आणि अचानक घराचा दरवाजा प्रकाशाने उघडला जातोय चप्पला उतरल्या जातायत प्रकाशात माझा पूर्वज रामपुरुष उभा आहे सखाराम तिळवे तो आत येतो तो आईला म्हणतोय ," घाबरू नकोस सगळं काही सुरळीत होईल पोटात जुळी आहेत म्हणून त्रास होतोय " पुन्हा चपला घातल्या जातायत दरवाजा बंद होतोय
माझा बाप चकित तर आई निवांत होतिये दुसऱ्या दिवशी ती बाळंत होतीये तिला जुळी झालेत
मी आईकडून हा किस्सा लहानपणापासून ऐकतोय एरव्ही नास्तिक असणारे माझे वडील हा किस्सा आला कि गप्प व्हायचे रामपुरुषांचे म्हणजे मूळ पुरुषांचे किस्से कोकणात कायमच ऐकायला येतात हा माझ्या घरातला किस्सा आहे
आता समजा माझी आई लेखिका आहे तर मी तिच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विरोध करायचा का ? कि तिच्या धर्मश्रद्धा म्हणून त्यांचा आदर करायचा ?
आता समजा कुणी रा चि ढेरे आहेत त्यांची ८०% पुस्तके धर्म ह्याच विषयावरची आहे तर त्यांना अध्यक्षपद नाकारावे का ?
मुद्दा असाही येईल कि ते शंकराचार्य नाहीत किंवा शिवाचार्य नाहीत किंवा शैवाचार्य नाहीत पण समजा ते शैवाचार्य आहेत तर त्यांना विरोध करावा का ?
सुरवातीलाच एक गोष्ट सांगतो सर्वच धर्म माझ्यासाठी रद्दीत जमा करण्याचा लायकीचे आहेत मी फक्त मोक्ष किंवा निर्वाण ह्यावरच विश्वास ठेवतो मोक्षदर्शनांच्यावर विश्वास ठेवतो
तरीही धर्माचं असणं मी कसं हाताळावं ?
ह्या समाजात अनेक गोष्टी अशा असतात ज्या मला नकोश्या वाटतात पण तरीही समाजातील लोकांना त्या आवश्यक वाटल्याने मी त्या असू देतो
माझ्या आईच्या श्रद्धा मी असू देतो माझा भाऊ माझा भाचा माझी भाची माझे भावोजी कट्टर हिंदुत्ववादी असतात मी त्यांचे हिंदुत्ववादी असणे असू देतो माझी अट एकच असते ती म्हणजे हे सर्व संविधानाच्या चौकटीत बसले पाहिजे आणि ते जर बसत असेल तर मी ते असू देतो
फादर दिब्रिटोंना मी सर्वात प्रथम ह्या अर्थानेच असू देतो इतरांना असू देणे ह्यालाच मी उदारमतवाद म्हणतो प्रश्न असा कि हा उदारमतवाद फादर दिब्रिटो स्वीकारतात काय ? ख्रिश्चन धर्म धर्मप्रसाराचे तत्व मान्य करतो शैव जैन बौद्ध आर्य समाज भक्तिवेदांत हेही धर्मप्रसाराचे तत्व मान्य करतात पुढील प्रश्न असा कि फादर दिब्रिटो इतरांचा पॅगन असण्याचा हक्क मान्य करतात काय कि त्याला ते मागासलेलं समजतात ? आणि जर मूर्तिपूजेचं असणं अनेक देव असणं त्यांना अमान्य असेल आणि त्यांचं असणं ते असू द्यावे म्हणून मान्य करत नसतील तर मग त्यांचा उदारमतवाद हा पोकळ आहे असंच म्हंटलं पाहिजे ह्याबाबत त्यांची भूमिका काय आहे ? मला वाटत कि ते मुर्तीपुजेबाबत थोडे उदार आहेत
धर्मप्रसाराला त्यांचा पाठिंबा आहे फक्त तो फार गोड भाषेत घोळवल्याने दिसत नाही पण मग प्रश्न असा येतो कि वैदिक , पारशी , ब्राम्हण , वैष्णव व हिंदू ह्या धर्मात स्वतःच्या धर्मात इतरांना घ्यायला बंदी घातली असेल तर ह्यात दोष कुणाचा ?ह्यांना धर्मप्रसार करण्यासाठी कुणी प्रतिबंध केलाय ? तुमच्या धर्मात धर्मप्रसाराला बंदी असेल तर तो तुमचा मागासलेपणा झाला त्यासाठी तुम्ही इतर धर्मांना दोष देऊ शकत नाही ज्या लोकांना साधं घरवापसीचं आंदोलन नीट उभा करता येत नाही किंवा जे गावागावात जाऊन अस्पृश्यता नष्ट करत नाहीत त्यांनी बढाया माराव्याच कशाला ? फादर दिब्रिटोंना बंदी घालण्यापेक्षा त्यांनी हिंदू धर्मात परतावं असं का तुम्ही म्हणत नाही ? निषेधाचे फलक दाखवण्यापेक्षा " हिंदू धर्मात परत या " असे फलक तुम्ही का दाखवत नाही ? कि धर्मात परतणाऱ्या माणसाला कुठल्या वर्णात व जातीत बसवायचं हे तुमचं अजून ठरत नाहीये ? तसं असेल तर आमचे शिवाजी महाराज तुमच्यापेक्षा फास्ट होते म्हणायचे !
आता प्रश्न फादर दिब्रिटोंच्या साहित्याच्या लायकीचा ? तर इथे कसोट्यांचा प्रश्न येतो म्हणजे एक पारंपरिक धर्म असतो कॅथॉलिक आणि ऑर्थोडॉक्स चर्च ! मग सृष्टीय प्रबोधन होते आणि प्रोटेस्टंट क्रांती जन्म घेते म्हणजेच धार्मिक प्रबोधन म्हणजे प्रोटेस्टंट कॅथॉलिक चर्च ! मग किर्केगार्द येतो ख्रिश्चन अस्तित्ववाद नावाचा नवा अवतार घेऊन तो श्रद्धेला नवे आयाम देतो मग पोस्टमॉडर्न ख्रिश्चनिटी येते न्यू वेव ख्रिश्चनिटी येते जी स्वतःला परिवर्तनवादाला जोडून घेते
फादर ह्यात कुठे बसतात ?
तर न्यू वेव कॅथॉलिक कर्मठ श्रद्धेत ! ते सनातन कॅथॉलिक ख्रिश्चन चर्चचे प्रतिनिधित्व करतात आणि धड प्रोटेस्टंटसुद्धा होत नाहीत इंग्लंड आणि जर्मन स्वतःच राष्ट्रीय चर्च उभे करतात पण भारतीय ख्रिश्चनिटीला अजूनही व्हॅटिकन सिटी सोडवत नाही कि भारतीय चर्च उभे करावेसे वाटत नाही फादर दिब्रिटो हे ह्या व्हॅटिकन सिटीच्या गुलामगिरीतून मुक्त होत नाहीत आणि आमचे नवबौद्ध मित्र नवयानाची स्थापना करणाऱ्या आंबेडकरी विचारांना पूर्ण तिलांजली देऊन त्या गुलामगिरीच्या ताटाखालून सरकत राहतात कारण त्यांना ख्रिश्चनिटीचा इतिहासच माहित नसतो
सनातन हिंदू धर्माला जसा पश्चाताप होत असतो तसा सनातन ख्रिश्चन धर्मालाही आपल्या काळ्या कृत्याचा पश्चाताप होत असतो पण कन्फेशनला इतका उशीर ? म्हणजे लॅटिन अमेरिकेतले तब्बल ९० टक्के आदिवासी लोक मारले गेल्यावर तुम्ही कन्फेशनचा ढेकर देणार ?
एकंदरच सनातनचे दिवस आले कि काय ?
फादर सात्र व नित्शे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकतात तो अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वेदांताचा अभ्यास करू पाहणाऱ्याला स्वामी विवेकानंद शिकावे लागतात तसे ! हा अभ्यास त्यांना जुन्या कॅथॉलिसिझमपासून वाचवतो आणि टोकाच्या कट्टरपणापासूनही ! मात्र जुनाट जळमटापासून मुक्तता लाभली तरी कॅथॉलिक चौकट सुटत नाही
मग साहजिकच आहे कि कॅथॉलिक दृष्टिकोनातून विषयाला ट्रीटमेंट मिळत जाते मदर तेरेसा परखड विश्लेषणाच्या चौकटीत न येता श्रद्धेच्या पाण्यात ओथंबते सुदैवाने मूळ ख्रिस्तात प्रेमाचा अभूतपूर्व झरा आहे ज्याचे अपिलिंग आजही जिवंत आहे हा झरा फादरांच्या व्यक्तिमत्वात व साहित्यातही खळखळतो म्हणजे जसा काही उपनिषदात आत्मसाक्षात्कार खळखळतो हा प्रेमाचा झरा ही दिब्रिटोंची खरी ताकद ! पण ह्या झऱ्याला शाप आहे त्याचे काठ पाप आहेत पापाच्या आणि त्या पापाच्या पश्चातापाच्या काठांमधून हा प्रेमाचा झरा वाहतो पण त्याला एका शुभ गोष्टीची जोड आहे सेवा ! फादरांची ही दुसरी ताकद आहे
प्रेम आणि सेवा ह्यांच्याशी नातं जोडलेल्या दिब्रिटो यांचा नवीन ज्ञानाशी परिचय ? म्हणजे जुने टेस्टामेन्ट मोझेसने लिहिले हा नवा सिद्धांत किंवा मेरी चे नवे बायबल सापडणे किंवा ख्रिस्त कथेचे मूळ थेट ईजिप्शियन संस्कृतीत सापडणे
फादर श्रद्धा ठेवतात आणि नव्या ज्ञानाकडे दुर्लक्ष्य तरी करतात किंवा ते कॅथॉलिकच्या सनातन चौकटीत बसवतात त्यामुळेच त्यांचा बायबल अनुवाद हा पारंपारिक बायबल अनुवाद असतो
सर्वच धर्मवाद्यांनी अलीकडे एक नवे शस्त्र वापरायला सुरवात केलीये ते शस्त्र म्हणजे फ्रॉईडने शोधलेले सिम्बॉलिझम ! प्रत्येक कथा किंवा व्यक्तिरेखा किंवा घटना सायको-सिम्बॉलिक ठरवायची म्हणजे जग सात दिवसात तयार केले मधले सात दिवस सिम्बॉलिक मानायचे प्रत्यक्षात सात दिवस म्हणजे सात दिवसच अशी श्रद्धा होती ती विज्ञानाच्या कसोटीवर टिकेना म्हणून सिम्बॉलिक ! (पहा कट्टा राजीव खांडेकरांनी घेतलेली मुलाखत )फ्रॉईडचा आत्मा आपल्या सिम्बॉलिझमला चक्क चर्चमध्ये मिळालेले हे यश पाहून नरकात बसूनही डान्स करत असेल
फादर सिम्बॉलिझममध्ये मास्टर आहेत आणि कॅथॉलिक परंपरेचेही ! आपल्या धर्माच्या अब्राहमी मुळाची त्यांना खोल जाणीव आहे मात्र त्यातल्या उणिवांची नाही ते आपल्यात काय आहे त्याविषयी बोलतात आणि जे त्यांना हवे आहे ते ते सिम्बॉलिझमच्या छत्रीखाली येऊन मिळवतात ही धार्मिक रफूगीरी इतक्या सहजपणे केली जाते कि ती मूळ कपड्याचा भाग वाटते
सेवा ही ख्रिश्चनिटीचा एक पारंपारिक भाग आहे १९३० पूर्वी ती धर्मपरिवर्तनाचे साधन म्हणून वापरली जायची ही खरंतर मूळची भारतीय गोष्ट जी बौद्ध धर्माने जगात मांडली १९३० नंतर काही श्रद्धाळू लोकांनी तिचा वापर समाजपरिवर्तनासाठी करायला सुरवात केली दिब्रिटोंनी सेवा आणि परिवर्तनवाद आत्मसात करून वसईत पुन्हा पाऊल ठेवले तेव्हा वसई ही भाई ठाकुरांची जहागिरी होती माफियागिरी , पाणीगिरी व बिल्डर अशा तीन फ्रंटवर
दिब्रिटो लढले हा एक असा लढा होता ज्याला यशस्वी करण्यात पत्रकारांचा व मीडियाचा फार मोठा वाटा होता
ही आंदोलने चालवतांना त्यांनी धर्मनिरपेक्षता पूर्ण सांभाळली व धार्मिकता वगळून सेवा आणि परिवर्तनवादाच्या जीवावर माफियाला हरवले
ओऍसिस हे दिब्रिटोंचे माझ्या मते उत्तम पुस्तक ! इतर सो सो !
मी अनेक पोस्टमॉडर्न धर्मगुरू शैवाचार्य म्हणून नीट वाचले आहेत त्यांची जी झेप आहे तिचा मागमूससुद्धा दिब्रिटोंच्यात आढळत नाही मग दिब्रिटोंना पाठिंबा का द्यायचा ?
पहिले कारण म्हणजे ख्रिश्चन मराठी साहित्याचा हा सन्मान आहे आणि फादर दिब्रिटो हे त्या साहित्याचे सिम्बॉल आहेत वासरात लंगडी गाय शहाणी तसा हा प्रकार आहे भारतात परिवर्तनवाद्यांनी किमान प्रोटेस्टंट धर्माला पाठिंबा द्यायला हवा असे माझे मत आहे नाहीतर न्यू वेव कॅथॉलिसिझ्म फादर न्यू वेवमध्ये पुरते दाखल झालेले नाहीत पण निदान न्यू वेवच्या गल्लीत दाखल झालेले आहेत मात्र कॅथॉलिक जोखड उतरलेले नाही ही त्यांची गंभीर मर्यादा आहे
दुसरे कारण वसईने जिवंत ठेवलेल्या ख्रिश्चन देशीवादाची ते खरेखुर्रे प्रतिनिधी आहेत त्यांचा ख्रिश्चन मराठीवाद हा देशीवादी चळवळीचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे मात्र हा ख्रिश्चन देशीवाद एका व्यापक कॅथलिक धर्मप्रसार पॉलिसीचा भाग आहे हेही आपण लक्ष्यात घेतलं पाहिजे प्रोटेस्टंट बंडाने लॅटिन भाषेविरुद्ध व तिच्या धर्मवर्चस्ववादाविरुद्ध एक सर्वंकष बंड पुकारून स्वतःच्या देशी भाषांत बायबलचे भाषांतर सुरु केले व देशी व स्थानिक भाषेत प्रवचने द्यायला सुरवात केली त्यामुळे प्रोटेस्टंट धर्म झपाट्याने पसरत गेला आधी लॅटिनच्या वर्चस्वाच्या बाजूने भांडणाऱ्या कॅथॉलिसिझमने पुढे आपण लढाई हरत आहोत हे ओळखून देशी भाषांना उत्तेजन देणारी प्रोटेस्टंट पॉलिसी स्वीकारली आणि देशी भाषा शिकून त्या देशी भाषांत धर्मप्रसार करा असा संस्कारच दिला त्यानुसार फादर लोकांनी स्थानिक भाषा शिकायला व त्या शिकण्यासाठी त्या स्थानिक भाषांचे व्याकरण शिकायला व त्या स्थानिक भाषांचे शब्दकोश तयार करायला सुरवात केली मराठीत ह्याची सुरवात फादर स्टीफन्सनी गोव्यात केली त्यांनी मराठीत ख्रिस्तपुराण रचले पुढे विल्ल्यम कॅरीने बायबलचा मराठी अनुवाद केला
तर मोल्सवर्थने सर्वोत्तम मराठी शब्दकोश तयार केलाआपल्याकडे संस्कृतचे वर्चस्व जसे मोडीत काढले तसा हा लॅटिन वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रकार होता पण आपले वैष्णव संत मूळ वैष्णव मगरमिठीतुन कधीच सुटले नाहीत तसे हे देशी भाषांत लिहिणारे कॅथॉलिक मगरमिठीतून कधीही सुटले नाहीत मी ह्या देशीवादाला स्पॉन्सर्ड देशीवाद म्हणतो जो मार्गीनेच स्वतःच्या वर्चस्वासाठी स्पॉन्सर केलेला असतो देशी वा स्थानिक भाषांचा वापर करून स्थानिक वा देशी धर्म व पंथ मोडीत काढणे हा ह्या स्पॉन्सर्ड देशीवादाचा हेतू असतो आणि तो सहजासहजी दिसत नाही वसई चर्च हे ह्या स्पॉन्सर्ड देशीवादाचे उत्तम उदाहरण आहे उद्या जर व्हॅटिकनने पुन्हा एकदा लॅटिन भाषा वापरा असा आदेश काढला तर हे देशीवादी लोक मराठीसाठी भांडतील काय ? तर नाही ! कारण ते तसे भांडले तर व्हॅटिकनचा पैसा मिळणे बंद होईल आणि ते अफोर्डेबल नाहीये त्यामुळे ह्या देशीवादाला पाठिंबा देतांना त्याच्या मर्यादा आणि स्पॉंसरडनेस लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे
तिसरे कारण फादर दिब्रिटोंनी लढलेल्या लढाया ! माझ्यासाठी फादरना पाठिंबा देण्याचे सर्वात महत्वाचे कारण हे आहे ह्या लढाया अतिशय महत्वाच्या आहेत शैव बौद्ध व जैन धर्मातील धर्मगुरूव्यवस्था म्हणजे आचार्यव्यवस्था ही वसई सोपारा भागात पूर्णपणे कृतीशून्य झालेली असतांना एक ख्रिश्चन धर्मगुरू परिवर्तनवादाच्या लढाईत उतरतो हे कौतूकास्पद आहे मराठी साहित्याने ह्या लढाईची कदर केलीच पाहिजे
म्हणूनच सगळ्या साधकबाधक विचारासहित मी फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाला पाठिंबा देतो आहे मात्र त्यातून ख्रिश्चन धर्मप्रसाराचे बांडगुळ उगवणार नाही ह्याची काळजीही आपण घेतली पाहिजे कारण ख्रिश्चन धर्मप्रसार हा फक्त धर्मप्रसार नसतो तर ख्रिश्चन भांडवलशाहीने स्वतःच्या हितसंबंधांना स्पॉन्सर करण्यासाठी रचलेला एक व्यापक कट असतो जो सेवादर्शी सभ्य चेहऱ्याने येतो भारतीयांना आंतरराष्ट्रीय कट कळत नाहीत ते ह्याबाबत अडाणी आहेत म्हणून हे सांगावेसे वाटते
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment